प्रश्न पेटी
▪ ईश्वरशासित सेवा प्रशाला, सेवा सभा, जाहीर सभा आणि टेहळणी बुरूज अभ्यास यांच्याआधी असलेल्या सुरुवातीचे गीत कसे व कोणी घोषित केले पाहिजे?
ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या प्रत्येक आठवड्यासाठी सुरुवातीचा गीत क्रमांक, ऑक्टोबर महिन्याच्या आमची राज्य सेवा यात येणाऱ्या ईश्वरशासित सेवा प्रशाला आराखड्यात दिलेला असतो. प्रत्येक आठवड्याच्या सेवा सभेचे सुरुवातीचे व समाप्तीचे गीत, आमची राज्य सेवा याच्या पृष्ठ २ वर दिलेले असते. तसेच, साप्ताहिक टेहळणी बुरूज अभ्यासाचा गीत क्रमांक, प्रत्येक टेहळणी बुरूज अंकाच्या पृष्ठ २ वर दिलेला असतो. नेमलेली गीते, त्यांच्याशी संबंधित असलेल्या सभांचा भाग असल्यामुळे जो बांधव सभा चालवणार आहे त्याने गीत घोषित केले पाहिजे. आधीच्या सभेचा अध्यक्ष असलेल्या बांधवाने नव्हे.
उदाहरणार्थ, ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षक श्रोत्यांचे स्वागत करतील, सुरुवातीचे गीत घोषित करतील, प्रशाला चालवतील आणि मग सेवा सभेच्या पहिल्या वक्त्याला स्टेजवर बोलवतील. ज्या बांधवाला सेवा सभेत भाग आहे त्याने सेवा सभेची सुरुवात करणारा गीत क्रमांक घोषित केला पाहिजे.
तसेच, जाहीर सभेची सुरुवात अध्यक्ष करतील. ते उपस्थित असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतील आणि जाहीर भाषणाच्या वक्त्याने निवडलेले सुरुवातीचे गीत गाण्यास उपस्थितांना आमंत्रित करतील. अध्यक्ष (किंवा, आधीच सूचित केलेला एखादा योग्यताप्राप्त बांधव) सभेची प्रार्थनेने सुरुवात करतील. अध्यक्ष वक्त्याचे नाव सांगतील आणि त्यांच्या भाषणाचा विषय सांगतील. भाषण संपल्यानंतर अध्यक्ष बांधव, वक्त्याच्या भाषणाचे सार न देता, भाषणातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल थोडक्यात आभार व्यक्त करील. ते पुढील आठवड्याच्या जाहीर भाषणाचा विषय सांगतील आणि उपस्थित असलेल्या सर्वांना टेहळणी बुरूज अभ्यासालाही थांबण्याचे उत्तेजन देतील. पाहुणे वक्त्याच्या मंडळीला प्रेम व शुभेच्छा पाठवण्याची घोषणा अध्यक्षांना करण्याची गरज नाही. नंतर, अध्यक्ष बांधव टेहळणी बुरूज अभ्यास संचालकाला स्टेजवर बोलवतील.
टेहळणी बुरूज संचालक मग अभ्यासाच्या विषयाशी संबंधित असलेले पहिले गीत घोषित करतील. मग छापील सूचनांच्या सुसंगतेत ते अभ्यास संचालित करतील आणि मग समाप्तीचा गीत क्रमांक सांगतील. टेहळणी बुरूज अभ्यास संचालक सहसा जाहीर भाषण देणाऱ्या बांधवाला समाप्तीची प्रार्थना करण्यास बोलवतात.
या सर्वसामान्य सूचनांचे पालन केल्यामुळे, आपल्या मंडळीच्या सभा संयुक्त पद्धतीने होतात.