यहोवाचे साक्षीदार या नात्याने आमचे राज्याचे उपाध्यपण पूर्ण करणे
१ यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे आम्हाला या पृथ्वीवर सर्वात थोर असा हक्क मिळाला आहे. आम्ही एका विश्वव्यापी न्यायालयीन प्रकरणात, जेथे देव म्हणून भक्ती होत असलेल्या सर्व देवांची चौकशी होत आहे, त्यामध्ये यहोवाचे प्रतिनिधित्व करीत आहोत. (यशया ४१:१, २३; ४३:१२) आमच्या आशेची बाजू आम्हाला नीटपणे मांडण्यात मदत मिळावी यासाठी यहोवाने उत्तम संग्रह असणाऱ्या प्रकाशनांचे ग्रंथालय दिले आहे. (१ पेत्र ३:१५) वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स ही, आम्हाला जरूरीची माहिती मिळविण्यामध्ये अत्यंत उपयुक्त अशी किल्ली आहे. या इंडेक्सच्या काही महत्त्वाच्या माहितीशी आम्ही परिचित बनल्यास त्याचा उपयोग आम्हाला कुशलतेने करणे जमू शकेल.
२ “यहोवा” या मुख्य शिर्षकासोबत आम्ही सर्व कदाचित चांगले परिचित असू. तर मग, १९८६-१९८९ इंडेक्समध्ये यहोवाने जे वाईट त्याला का तात्पुरती अनुमती दिली आहे याविषयीचे स्पष्टीकरण करणाऱ्या माहितीचे संदर्भ शोधून काढता येतील का? याचप्रमाणे “नेम” (नाव) हे शीर्षक तुम्हाला सध्याच्या तसेच १९३०-१९८५ इंडेक्समध्ये देखील मिळेल. येथे यहोवा या नामविषयीचे जे जे प्रकाशित करण्यात आले त्याचे सर्व संदर्भ संग्रहीत करण्यात आले आहेत.
३ आणखी एक महत्त्वाचे शीर्षक म्हणजे, “यहोवाचे साक्षीदार.” ते यहोवाचे साक्षीदार एक संस्था या नात्याने कसे आहेत याविषयीचे सर्व संदर्भ एकत्रित करून आहे. प्रगत शिक्षण, परिक्षणार्थ शवविच्छेदन, आत्मरक्षणासाठी ठार मारणे, तसेच जाहीर कल्याण सेवा याविषयी आमचे शासकीय दृष्टीकोण काय आहेत हे तुम्हाला ठाऊक आहेत का? या सर्व प्रश्नांविषयीची माहिती तुम्हाला “ॲटीट्युड टुवर्ड—” या उपशिर्षकाखाली मिळू शकेल. यासोबत निरनिराळ्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक काळचा इतिहास याची यादी दिलेली आहे. तसेच यहोवाच्या साक्षीदारांविषयी जी विवेचने मांडण्यात येतात त्याची तर विस्तारित यादी “स्टेटमेंटस् बाय अदर्स” या शीर्षकाखाली संग्रहीत केलेली आढळेल.
४ यहोवाच्या लोकांनी आधुनिक काळी आपले राज्याच्या उपाध्यापणाचे काम कसे पूर्ण केले आहे याविषयीची माहिती प्रमुख अशा कित्येक शीर्षकाखाली दिसेल. “डेटस्” (तारखा) या शीर्षकाखाली मधोमध “क्लारिफिकेशन ऑफ बिलिफ्स” हे शीर्षक दिसेल. तत्त्वे, भविष्यवाद तसेच भविष्यवादित प्रकार याविषयी आमची असणारी समज याबद्दल प्रमुख स्पष्टीकरणाचे संदर्भ वर्षाच्या अनुक्रमणिकेने देण्यात आले आहेत. यानंतर लगेचच “डेटस् ऑफ प्रॉफेटिक सिग्निफिकन्स” हे सदर दिसते. ही अशी वर्षे आहेत ज्यामध्ये एकतर भविष्यवाद किंवा भविष्यवादित प्रकार यांची पूर्णता झाली किंवा पूर्णतेची सुरवात झाली ते दर्शविण्यात आले आहे.
५ यहोवाच्या विश्वासू सेवकांचे जीवनचरित्र हे आम्हाला उत्तेजनाचा उगम आणि आमच्यासाठी बोध असे आहेत. ही चरित्रे आम्हाला आमच्या मुलांमध्ये तसेच पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये भविष्यासाठी बळकट पाया उभारण्यामध्ये मदत करू शकतात. ही जीवनचरित्रे “लाईफ स्टोरिज् ऑफ जेहोवाज् विटनेसेस्” खाली व्यक्तीगत नाव व लेखाचे शीर्षक याद्वारे नमूद केले असल्याचे दिसेल.
६ यहोवा ज्याविषयी आपली संमती दर्शवितो, अशांना जे वतन मिळणार आहे त्या दोन वतनांविषयीची शास्त्रवचनीय शिकवण ही यहोवाच्या लोकांना निश्चितच अद्वितीय आहे. एक स्वर्गाचे तर दुसरे पृथ्वीचे हे ते वतन आहे. ज्यांना “स्वर्गीय पाचारण” आहे त्यांच्या माहितीविषयीचे संदर्भ आपल्याला “काँग्रिगेशन ऑफ गॉड” या प्रमुख शीर्षकाखाली मिळतील. (इब्री ३:१; प्रे. कृत्ये २०:२८; १ तीम. ३:१५) आणखी इतर शीर्षके “रेमनन्ट,” व “१,४४,०००” ही आहेत. याचप्रमाणे “ग्रेट क्राऊड” आणि “अदर शीप” ही शीर्षके, ज्यांना पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा आहे त्यांच्याविषयीची माहिती पुरविण्यात प्रमुख आहेत.—प्रकटी. ७:९; योहान १०:१६.
७ आम्ही तरुण असोत की, वृद्ध, आमचा यहोवाचे साक्षीदार असण्याचा हक्क आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रकाराला समाविष्ट करून आहे. आमची राज्य सेवा यामध्ये नंतर येणारे लेख आम्हास इंडेक्स आमचे उपाध्यपण, मंडळीत, कुटुंबात व क्षेत्रकार्यात कशी मदत करू शकतो याविषयीची स्पष्टता पुरवतील.