शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
मार्च ११ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९२ (५१)
१० मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. वेळ मिळेल त्याप्रमाणे स्थानिक क्षेत्रात अलिकडील मासिके कशी सादर करावीत त्याचे प्रस्ताव सांगा. या आठवड्याच्या शेवटी क्षेत्रकार्यात भाग घेण्यासाठी उत्तेजन द्या.
१५ मि: “‘या!’ असे निर्भिडपणे निमंत्रण द्या.” प्रश्नोत्तराची चर्चा व प्रात्यक्षिके. आमची राज्य सेवा यातील या लेखाची हाताळणी करा आणि वार्षिक वचन प्रकटीकरण २२:१७ च्या अवलंबनाची काही वैशिष्ट्ये स्पष्ट करा. स्थानिक क्षेत्रात सध्याची प्रकाशन सादरता कशी करता येईल ते त्रोटक प्रात्यक्षिकाने दाखवा.
१० मि: “यहोवाची गायनाने स्तुती करणे.” लेखावर आधारीत उत्तेजनात्मक भाषण. लेखात दर्शविलेल्या मुद्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी आज सायंकाळच्या कार्यक्रमातील गीतांचा वापर करा.
१० मि: स्थानिक गरजा किंवा भाषण. लेखः “व्हाय परस्यु रायचसनेस्?” द वॉचटावर, ऑक्टोबर १५, १९९०, पृष्ठे २६-९. (प्रांतिय भाषेतः टे.बु. ऑगस्ट १, १९९० “गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहा.”)
गीत २० (१०३) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च १८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९३ (२२)
१० मिः स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. स्थानिकपणे लागणाऱ्या खर्चाची उदारपणे काळजी घेतल्याबद्दल मंडळीसाठी प्रशंसोग्दार सांगा आणि ज्याची पोच मिळाली आहे असे संस्थेला किती अनुदान पाठविण्यात आले ते बांधवांना कळवा. पुढील आठवड्याच्या कार्यमार्गदर्शक सभेसाठी सर्वांनी अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक घेऊन येण्याचे स्मरण द्या.
२० मिः “सुवार्ता सादरता—रस्त्यावरील साक्षीकार्याद्वारे.” प्रश्नोत्तराने. या आठवडी रस्त्यावरील साक्षीकार्य करण्यामध्ये प्रचारक ज्या मुद्यांचा वापर करू शकतील ते दाखविण्यासाठी मधून मधून दोन किंवा तीन संक्षिप्त प्रात्यक्षिके सादर करा.
१५ मिः साहाय्यक पायनियरिंगसाठी योजना आखा. एप्रिल किंवा मे अथवा दोन्ही महिन्यात साहाय्यक पायनियरिंग करू इच्छितात अशांना उपयुक्त माहिती देणारे उत्तेजनात्मक भाषण. घोषणा या सदरात साहाय्यक पायनियरिंगविषयी जी माहिती देण्यात आली तिच्याकडे निर्देश करा. खास कार्य हालचालीच्या काळात पायनियरींग करणाऱ्यांना उत्तेजन व मदत द्यावी यासाठी मंडळी तसेच वैयक्तिक प्रचारक काय व्यवस्था करू शकतील त्याची माहिती द्या. सभा संपल्यावर साहाय्यक पायनियरिंग कार्यासाठी अर्जाची विचारणा करणाऱ्यांना ते देण्यासाठी अर्ज तयार असू द्या. मार्च ३० रोजी होणाऱ्या स्मारकविधीला तसेच एप्रिल ७ रोजी होणाऱ्या खास जाहीर भाषणासाठी लोकांना निमंत्रित करण्यासाठी खास प्रयत्न केले जाणार असे कळवा.
गीत १३० (५८) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च २५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ७१ (९२)
१० मिः स्थानिक घोषणा. प्रश्न पेटी. सर्व प्रचारकांनी आपल्या मंडळीचे बरोबरचे नाव व मंडळीतील सर्वांचे नाही तरी काही वडीलांची नावे माहीत असू द्यावे हे सांगा. या सप्ताहाच्या शेवटाला क्षेत्रकार्यात पूर्ण रुपाचा सहभाग घेण्याचे सर्वांना उत्तेजन द्या; यासाठी अलिकडील मासिकातील बोलके मुद्यांसंबंधीचे विचार प्रस्तुत करावेत.
१५ मिः “यहोवाचे साक्षीदार या नात्याने आमचे राज्याचे उपाध्यपण पूर्ण करणे.” चांगला शिक्षक असणाऱ्या बांधवाने माहितीची चर्चा करावी व आमचे उपाध्यपण सुधारण्यासाठी जे प्रस्ताव सुचविण्यात आले आहेत त्याविषयीचे प्रात्यक्षिक दाखवावे.
२० मिः एप्रिलमधील सेवाकार्याची तयारी करा. एप्रिल दरम्यान आपण अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर करणार आहोत. या आठवड्याच्या शेवटाला हे प्रकाशन सादर करण्यासंबंधी देण्यात आलेल्या पुढील प्रस्तावांचा विचार करावा. यात हे मुद्दे असू शकतीलः ख्रिस्ती नाहीत अशांना ते सादर करताना तुम्ही अध्याय ७, ११ किंवा १९ मधून कोणते मुद्दे दाखवणार? सध्याच्या संभाषणाच्या विषयासोबत ११, ३३, १००, १२८, १३१, १५६, १५७, १६१, किंवा १६२ पृष्ठावरील चित्रांचा कसा संबंध जुळवणार? पुस्तकातील एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पानाच्या तळाशी असलेल्या प्रश्नांचा वापर करू शकता. या पुस्तकाच्या सादरतेचे प्रात्यक्षिक करून दाखवा.
गीत २११ (१०५) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४८ (५०)
१० मिः स्थानिक घोषणा व ईश्वरशासित बातम्या. मासिकाची योग्य सादरता सुचवा व प्रात्यक्षिक दाखवा. या आठवड्याच्या शेवटी क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
१५ मिः “हाव जेहोवा प्रॉस्पर्स हीज वर्क.” द वॉचटावर, डिसेंबर १, १९९० च्या अंकातील पृष्ठ २२-५ वरील लेखावर आधारीत भाषण. (प्रादेशिकः टे.बु. सप्टेंबर १, १९९० “आम्हास यहोवाची कशी परतफेड करता येईल?”)
२० मिः “या!” असे म्हणण्याद्वारे गोलार्धव्याप्त आनंदात सहभागी व्हा. द वॉचटावर, जानेवारी १, १९९१ अंकातील मुख्य लेखावर भाषण, मुलाखत(ती), आणि अनुभव. (प्रादेशिकः टे.बु. एप्रिल १, १९९१) द वॉचटावरमधील साहित्याचे उत्स्फुर्त व उत्तेजनात्मक रितीने सादरता व सोबत स्थानिक आवेशी प्रचारकांकडून देण्यात आलेल्या मुलाखती व अनुभव यांजद्वारे हा आनंद प्रवर्तित करता येईल.
गीत ६३ (३२) व समाप्तीची प्रार्थना.