प्रश्न पेटी
● कोणा नव्या शिष्याचा, दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण होण्याच्या आधीच बाप्तिस्मा झालेला असला तरीही त्याजबरोबर त्या दोन पुस्तकांचा अभ्यास सर्वस्वीपणे पूर्ण करणे का महत्त्वाचे आहे?
आज मंडळ्यात नव्या लोकांना झुंडीने आणण्याद्वारे यहोवा आपल्या संस्थेला आशीर्वादित करीत आहे. हे मोठे एकत्रीकरण पाहून आम्हाला नक्कीच आनंद होत आहे. तथापि, या नव्या लोकांना यहोवाची सेवा कशी करावी याविषयी शिकून घेण्यामध्ये नित्याचे साह्य व मार्गदर्शन मिळत राहण्यास हवे याची आम्हाला जाणीव आहे.
नव्या लोकांना सत्याचे अचूक ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये मदत हवी असते. (कलस्सै. १:९, १०) पवित्र शास्त्रातील मूलभूत तत्त्वांची चांगली समज प्राप्त करून देण्यामध्ये त्यांची मदत करणे हा आमचा हक्क आहे. तसेच नैतिक दर्जे, ख्रिस्ती राहणीमान व इतर गोष्टींविषयी पवित्र शास्त्र जे शिकवते त्याचे चांगले आकलन देखील त्यांना करून दिले पाहिजे. यामुळे त्यांना सत्यामध्ये दृढपणे उभे राहता येईल व नंतर ज्या परिक्षा सामोऱ्या येतील त्यांना समर्थपणे तोंड देता येईल.
विद्यार्थ्यांनी आपली समजशक्ती पूर्णपणे वाढविण्याची गरज आहे. (१ करिंथ १४:२०) आध्यात्मिकरित्या पूर्ण वाढ झालेला मनुष्य व्हावयाचे आहे तर शिक्षकासोबत व्यक्तीगत पवित्र शास्त्र अभ्यास अत्यंत साहाय्यक असतो हे अनुभवाने दाखवून दिले आहे. याकरताच, कोणा व्यक्तीचा दोन पुस्तकांचा अभ्यास पूर्ण होण्याआधीच बाप्तिस्मा झालेला असला तरीही ती दोन्ही पुस्तके अभ्यासून पूर्ण होईपर्यंत तो अभ्यास चालू राहावा असे ज्ञानाची विचारसरणी स्पष्ट करते.
बाप्तिस्म्यानंतर
आम्ही शिष्य करावेत, त्यांचा बाप्तिस्मा करावा व त्यांना शिकवावे असे येशूने आज्ञापिले. (मत्तय २८:१९, २०) शिष्यांना सूचना देऊन शिकवण्याचे काम हे बहुधा बाप्तिस्म्यानंतर होत असते. एका पुस्तकाच्या अभ्यासाने जे ज्ञान त्या व्यक्तीला मिळत असते ते त्याच्या आध्यात्मिक तालमीला भर घालण्यास सहसा पुरेसे नसते. याचप्रमाणे, उपाध्यपणाच्या कामात त्याने सिद्ध राहावे व सोबत या शेवटल्या दिवसात यहोवाची सेवा करणाऱ्यांवर जे दबाव येत आहेत त्यांच्या प्रतिकार करण्यामध्ये तयार असावे म्हणून त्याला अधिक सूचना मिळण्याची जरुरी आहे. पुरेशी तालीम मिळाली नाही तर विद्यार्थ्याला आपल्यापरिने आध्यात्मिक दृष्टीने उभे राहता येणार नाही. आम्ही दोन्ही पुस्तकांचा अभ्यास घेतलेला असो वा नसो, नव्या शिष्याचा बाप्तिस्मा झाल्यावर त्याला प्रगति करीत राहण्यासाठी सतत मदत देण्याचे आम्ही चालू ठेवले पाहिजे. अभ्यासण्यात येणारे पहिले प्रकाशन विद्यार्थ्याला मूलभूत गोष्टीची समज देते, तर दुसरे पुस्तक ख्रिस्ती गुणांवर भर देते. ही दोन्ही प्रकाशने कदाचित लिव्ह फॉरएव्हर व युनायटेड इन वर्शिप किंवा ट्रु पीस ही असतील. ही पुस्तके उपलब्ध नसल्यास त्या माहितीची इतर प्रकाशने वापरावीत. दुसऱ्या पुस्तकाद्वारे पवित्र शास्त्राचा अभ्यास संपवेपर्यंत विद्यार्थ्याला यहोवाचे उद्देश व त्याचप्रमाणे त्याच्याकडील उच्च ख्रिस्ती दर्जे व गरजा यांचे शिक्षण मिळते. हे त्याला ख्रिस्ती तत्त्वांचा अर्थ समजू देण्यात व विश्वासात दृढ बनण्यात मदत देते. (कलस्सै. २:७) अशा या अभ्यासाचा अहवाल देण्याविषयी कृपया आमची राज्य सेवा याच्या डिसेंबर १९८७ च्या अंकातील प्रश्न पेटी हे सदर पहा.
अर्थातच, बाप्तिस्मा झाल्यावर नवीन लोकांनी आध्यात्मिक प्रगति केलीच पाहिजे. (इब्री. ६:१-३) बहुतेक प्रकरणात हे दिसून येते की, दुसरे पुस्तक अभ्यासून संपवण्यात अधिक वेळ लागत नाही. यामुळे नवीन लोकांना सबळ पाया दिला जातो.