यहोवाने शिकविलेले
१ यशया संदेष्ट्याने असे म्हटलेः “शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून सार्वभौम प्रभु यहोवाने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.” (यशया ५०:४) ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेद्वारे तालीम देऊन यहोवा आज एका मार्गाने हे साध्य करीत आहे. तरीपण यासाठी वैयक्तीकाचे प्रयत्न हे हवेत. थिऑक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक हे पुस्तक ३९ व्या पानावर हे परिक्षण देतेः “तुम्ही एका प्रकारची नेमणूक कितीही वेळा का हाताळली असेना, तयारी ही नेहमीच मोलाची ठरते.” हे आम्हा सर्वांना, मग आम्ही या शाळेत काही महिन्यांपुरते असोत की, जेव्हा ती १९४३ मध्ये सुरु झाली तेव्हापासून असोत, लागू पडते.
२ सर्व विद्यार्थ्यांनी कसून तयारी केली पाहिजे. यात वेळेची जाणीव राखणेही समाविष्ट आहे. ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा याचा आराखडा म्हणतोः “कोणतेही भाषण वेळेबाहेर जाऊ देऊ नये.” नेमणूक क्रमांक १ हाताळणारा बांधव जर सारखाच अधिक वेळ घेत राहिला तर त्याला खाजगी सूचना करावी. शाळा देखरेख्यांनीही सभा वेळेवर सुरु करावी आणि सल्ला व शेरा देण्यासाठी वेळेविषयी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचे त्यांनी पालन करावे. “ऑल स्क्रिपचर” पुस्तकाच्या १९९० मध्ये सुधारलेल्या आवृत्तीचा वापर, ती उपलब्ध होईल तेव्हापासून सुरु करण्याची आठवण ठेवा.
३ पवित्र शास्त्रातील ठळक वैशिष्ट्ये या भागाकडून सर्वांनाच लाभ मिळवून घेता येईल. नेमलेला साहित्याचा हा गोषवारा नसावा याचे आम्हाला स्मरण दिलेले आहे. तर ती माहिती आम्हासाठी का व कशी महत्त्वाची आहे त्याची रसिकता वाढविण्याविषयी वक्त्याने सभागृहाची मदत केली पाहिजे.
४ भाषण क्र. ३ विषयी बघता यामध्ये विविध दृश्यरचनांचा वापर करण्यात आला व त्यामुळे विविध यशप्राप्ती मिळाली. पण, सत्याची स्पष्ट व अचूकपणे सादरता केली जावी हा शाळेचा मुख्य उद्देश लक्षात घेतल्यास, भाषणाची दृश्य रचना क्षेत्र कार्य तसेच अनौपचारिक साक्षीकार्य यांचा समावेश असणारी असावी हे बरे वाटते.
५ भाषण क्र. ४ ला जेव्हा यंग पीपल आस्क—आर्न्सस दॅट वर्क या साहित्यामधून नेमणूक असते तेव्हा ती नव्या किंवा युवक विद्यार्थ्यांना दिली जाईल. अर्थातच, ज्याला ही नेमणूक देण्यात येईल त्याला वाचता आले पाहिजे. ही भाषणे दर आठवडी बदलत राहून ती आळीपाळीने रिझनिंग पुस्तकातूनही असतील. भाषण क्र. ३ व भाषण क्र. ४ ची नेमणूक मिळालेल्या विद्यार्थ्याने देण्यात आलेल्या शिर्षकाचा वापर करावा.
६ अधिक साहित्य घेण्याविषयी दक्षता बाळगण्यास हवी. कधी कधी नेमून दिलेले साहित्य केवळ एक किंवा दोन परिच्छेदांपुरतेच मर्यादित असते. पण यातील शास्त्रवचनांचे वाचन व स्पष्टीकरण करून, उदाहरणे वापरुन इत्यादिकरवी वेळेमध्ये हे भाषण पूर्ण करता येऊ शकते. साधारणपणे, बाहेरील साहित्य घेण्याची काही गरज नसते. ते भाषण ज्या प्रकाशनातील साहित्यावर आधारीत आहे त्याला सभागृहाला अनुसरता आले पाहिजे.
७ आम्ही ज्या देवाची भक्ती करीत आहोत तो अमर्याद ज्ञान व माहितीचा उगम आहे. (रोम ११:३३) हजारो वर्षे निघून गेली तरीही आम्हाला शिकण्यासारखे पुष्कळ आहे. आम्ही हे ईश्वरी ज्ञान मिळविण्यामध्ये स्वतःला जितके देत असतो त्यावरच आमच्या स्वर्गीय पित्याची स्तुती करण्याची क्षमता, जीवनातील समस्या हाताळण्याची कुवत, तसेच आमचा आनंद व समाधान या गोष्टींची वाढ विसंबून आहे. तर मग, आमच्या सर्वथोर शिक्षकाने जी तरतूद केली आहे त्या ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेला नियमित उपस्थित राहून तिजकरवी पूर्ण फायदा मिळवून घेण्याचा आजच निश्चय करा. १९९१ मध्ये शाळेतील कार्यक्रमात तुम्हास जी नेमणूक मिळेल तिजविषयी परिश्रमाने तयारी करून तसेच शाळेत चांगला सहभाग घेऊन तुम्हाला तो फायदा मिळत राहो.