सुट्टीच्या स्मरणिका
१ सुट्टीच्या महिन्यांमध्ये आपल्यातील अनेक जण आपल्या मंडळीपासून दूर असतील किंवा जातील, आणि नंतर आपण सर्वजण ह्या वर्षी प्रांतिय अधिवेशनांना उपस्थित राहणार आहोत, कदाचित हे आमच्या सुट्टीच्या काळातच येईल. महिन्याच्या शेवटी जर आम्ही जाणार आहोत, तर मग आमच्या क्षेत्र कार्याचा अहवाल मंडळीच्या सचीवांना पाठविण्यास आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. मंडळीच्या महिन्याच्या अहवालांमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी आम्ही ते लवकरात लवकर पाठवण्यास हवे, ज्यांना सचीव एकत्र करून महिन्याच्या सहा तारखेला संस्थेला पाठवितात.
२ अनौपचारिक साक्ष याकरता संधीसाठी आम्ही जागृत असले पाहिजे. अशा प्रकारची परिस्थिती प्रवास करताना, नातेवाईकांना भेटी देताना, किंवा आम्ही ज्यांना भेटतो अशांबरोबर बोलताना उद्भवू शकते. येशूने केले त्याप्रमाणे कोणताही प्रसंग साक्ष देण्याच्या दृष्टीने तुम्ही पाहता का? अनौपचारिक साक्ष देण्यासाठी तो मागे पडला नाही. (योहान ४:५-३०) प्रेषित पौलाने देखील ‘वेळेचा सदुपयोग’ केला आणि उत्तम परिणामांचा आनंद घेतला. (इफिस. ५:१६; प्रे. कृत्ये १७:१७; २८:३०, ३१; कलस्सै. ४:५) अनौपचारिक साक्षकार्यात भाग घेण्यासाठी ठराविक योजना करा. काही उचित बोलक्या मुद्यांची तयारी करा आणि आस्था वाढविण्यासाठी एखादे मासिक किंवा पत्रिका हातात तयार ठेवा.
३ ह्या स्मरणिकांचे निक्षून पालन केल्याने, आम्ही आमच्या सुट्टीचा आणि प्रवासाच्या वेळेचा सुज्ञतेने उपयोग करू शकतो व यहोवाला आमचे “प्रथम फळ” देऊ शकतो.—नीति. ३:९.