सुवार्ता सादरता
कुटुंब या नात्याने
१ पवित्र सेवेत एक समर्पित कुटुंब पूर्ण रुपाने सहभाग घेत आहेत; बाप, आई व मुले देवाची सेवा पूर्ण जिवानिशी करीत आहेत तेव्हा यहोवाच्या थोर नामाला गौरव मिळते. जगभरात यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यात अशी अनेक कुटुंबे आहेत हे सांगायला आम्हाला आनंद वाटतो.
२ कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांची काळजी करण्याची पहिली जबाबदारी ही अर्थातच, बापाची आहे. (१ करिंथ ११:३) बायको व मुले यांच्या सहकार्याने ते सबंध कुटुंब इतरांवर आपला चांगला प्रभाव पाडू शकते. (मत्तय ५:१६) असे हे सहकार्य कोणकोणत्या बाबतीत प्रदर्शित करता येईल?
पालक पुढाकार घेतात
३ साधारणपणे कुटुंबातील पिता हा मंडळीत वडील किंवा उपाध्य सेवक असल्याचे दिसते. याचा अर्थ हा आहे की, आपल्या कुटुंबाच्या आस्थांची काळजी करण्यासोबत त्याला मंडळीच्या कामासाठीही वेळ व लक्ष द्यावे लागते. यास्तव, बापाची जबाबदारी ही आहे की त्याने आपल्यापाशी उपलब्ध असणाऱ्या वेळेची अशी विभागणी करावी की आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही. हे, त्याच्या मर्यादित वेळेत बऱ्याच गोष्टी उरकण्याचे आव्हान प्रस्तुत करीत असल्यामुळे तितके सोपे नसणार. तरीपण, कुटुंब ही त्याची प्रमुख जबाबदारी असल्यामुळे त्याने आपल्या महत्त्वपूर्ण वेळेतून नियमितपणे काही कुटुंबाबरोबर मिळून अभ्यास करण्यात, क्षेत्रकार्यात, सभेला येण्यात तसेच योग्य अशा करमणूकीसाठी देण्यात योजना केली पाहिजे. परिस्थिती व इतर जबाबदाऱ्यांमुळे कधी कधी बापाने आखलेल्या आराखड्यात बदल करावा लागेल हे खरे, पण जेव्हा तो दर महिन्याला नियमितपणे आपल्या कुटुंबासोबत मिळून क्षेत्रकार्य करतो तेव्हा ते किती प्रतिफळदायक ठरते!
त्याच्या बायकोकडील सहकार्य महत्त्वाचे आहे. मुलांना उपाध्यपणाविषयीची उत्तम तालीम देऊन ती आपल्या पतीला महत्त्वपूर्ण रितीने सहकार देऊ शकते. तिचा उदाहरणात्मक आवेश व निष्ठा या गोष्टी मुलांना उपाध्यपणाची गोडी लावून त्यामध्ये त्यांची वाढ करण्यात मोठा प्रभाव पाडू शकेल.—२ तीम. ३:१४, १५.
५ जेथे एका पालकाला आपल्या मुलांविषयीच्या आध्यात्मिक जबाबदारीच्या ओझ्याला घ्यावे लागले आणि मुलांना उपाध्यपणात यशस्वीरित्या तालीम देण्यात यश मिळाले अशी बरीच सुंदर उदाहरणे आहेत. आईच्या किंवा बापाच्या सुंदर उदाहरणामुळे पुष्कळ युवकांनी सत्याविषयी आपली दृढ भूमिका ग्रहण केली आणि पूर्ण वेळचे उपाध्यपणही स्वीकारले.
मुलांची जबाबदारी
६ आता मुलांच्या जबाबदारीविषयी काय? येशू हा देवाचा परिपूर्ण पुत्र होता तरी तो आपल्या युवकावस्थेत असताना त्याने आपल्या पालकांचे मार्गदर्शन व सूचना अनुसरल्या. (लूक २:५१) या कारणास्तव, आई व वडील सबंध कुटुंबाने एकत्र मिळून उपाध्यपणात वेळ खर्च करावा म्हणून योजना आखतात तेव्हा मुलांनी आपल्या पालकांना सहकार्य दाखवून आपली ईश्वरी भक्ती प्रदर्शित करावी हे त्यांचे कर्तव्य आहे.—इफि. ६:१-३.
७ अभ्यास, क्षेत्रकार्यातील सहभाग आणि सभांची उपस्थिती अशा स्वरुपाने कुटुंबाने एकत्र मिळून भक्ती करणे हे कौटुंबिक वर्तुळातील प्रेम व ऐक्य दृढ करते. याबाबतीत पालक व मुलांनी आपापले कर्तव्य पुरे केले पाहिजे.