ईश्वरशासित वृत
◆ जानेवारी २३, १९९० रोजी बेनिन सरकारने त्यांच्या देशात असणारी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावरील शासकीय बंदी उठविली. जानेवारी २८ रोजी बांधवांना कोटोनोऊ येथे खास सभेला उपस्थित राहण्याचा आगळा आनंद वाटला आणि आता ते आपल्या ईश्वरशासित कार्यात पुढे पाऊल टाकण्याकडे आपली दृष्टी लावून आहेत.
◆ कोलंबिया अजूनही वाढीचा अहवाल देत आहे. जानेवारीत त्याने ४३,८५० प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला व ४९० जणांचा बाप्तिस्मा झाला.
◆ जानेवारी २६, १९९० रोजी कोस्टा रिका येथे पहिले सम्मेलन सभागृह बांधण्याचा परवाना मिळाला. त्यामध्ये २,२०० जणांची बसण्याची व्यवस्था होऊ शकेल व ते वर्षभरात पुरे होईल अशी आशा आहे.