तुमच्या आध्यात्मिक गरजा भागविणे
१ येशूने म्हटलेः “आध्यात्मिक गरजांविषयी जाणीव राखणारे ते धन्य.” (मत्तय ५:३) आमच्या आध्यात्मिक गरजांविषयी जाणीव राखणारे असणे इतके का महत्त्वाचे आहे? आम्ही ती जाणीव राखून आहोत हे आपल्याला कसे दाखविता येईल? आम्ही कोणते धोके टाळले पाहिजे व आध्यात्मिक गरजांविषयी जाणीव राखणारे बनल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळू शकतात?
२ आमच्या शारीरिक आहारावर आमचे शारीरिक स्वास्थ अवलंबून आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आपल्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करुन कोणाही माणसाला दिवसभराचे काम चांगले उरकण्याचे अपेक्षिता येणार नाही. याचप्रमाणे आम्ही जर आम्हाला आध्यात्मिकरित्या भरवणूक करण्याकडे दुर्लक्ष दाखविले तर हेच तत्त्व लागू होईल.—मत्तय ४:४; योहान १७:३.
आमच्या गरजा भागविण्यास सभा मदत देतात
३ आमचे आध्यात्मिक कल्याण आणि आमचा आध्यात्मिक भरवणूकीचा कार्यक्रम यामध्ये थेट संबंध आहे. सभांमध्ये आमच्यासाठी “विश्वासू व बुद्धीमान दास” सुंदर असा आध्यात्मिक कार्यक्रम तयार करून आमची गरज भागवितो. (मत्तय २४:४५-४७) प्रत्येक सभा एक विशिष्ट उद्देश साध्य करते. यामुळे कोणत्याही सभेकडे दुर्लक्ष केले जाता कामा नये. तद्वत, तुम्ही सर्व सभांची तयारी करून त्यांना नियमितपणे हजर राहता का?
४ आमच्या पाच साप्ताहिक सभांपैकी आपण तिघांची थोडक्यात उजळणी करून पाहू या. प्रगतिशील सत्याशी आम्हास निगडीत ठेवण्यासाठी ज्या सभेची योजना करण्यात आली आहे ती आहे टेहळणी बुरुज अभ्यासक्रमाची सभा. ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा आम्हाला प्रभावी उपाध्याय बनण्यात मदत देते. मंडळीचा पुस्तक अभ्यास आम्हाला विविध पवित्र शास्त्रीय विषयांवरील काळजीपूर्वक अभ्यास प्रस्तुत करतो.
५ तुम्ही मंडळीच्या सभांची तयारी करता का? काही लोक अभ्यासाचे साहित्य घाईने नजरेखालून घालतात, प्रश्नांचे उत्तर घाईने अधोरेखित करतात, पण नमूद करण्यात आलेली शास्त्रवचने काढून बघत नाहीत. काही उत्तरे देण्याची त्यांची तयारी राहते, पण त्यांना पूर्ण स्वरुपाचा आध्यात्मिक तजेला खरेपणाने मिळतो का? तुम्ही व तुमचे कौटुंबिक सदस्य एकत्र मिळून सभांची ज्या पद्धतीने तयारी करता त्यामध्ये काही सुधारणा करता येण्याजोगी आहे का?
वेळ काढून घ्या
६ तुम्ही अभ्यासाची तयारी करण्यासाठी जी वेळ बाजूला काढून ठेवता त्यामध्ये दूरदर्शनवरील कार्यक्रम किंवा इतर काही गौण गोष्टींना व्यत्यय आणू देऊ नका. पवित्र शास्त्र अभ्यासाचा नियमित कार्यक्रम, सभांची तयारी आणि क्षेत्रसेवेतील सहभाग यांच्या बाबतीत प्रामुख्याने कुटुंब प्रमुखांनी आपल्या कुटुंबाला हा आराखडा धरुन ठेवण्यासाठी मदत केली पाहिजे.—इफि. ५:१५-१७.
७ आमच्या आध्यात्मिक गरजांविषयीची जाण राखल्यामुळे आम्ही आत्मसंतुष्ट किंवा स्वतःपुरतेच समाधानी बनत राहण्याचा धोका टाळता येईल. वैयक्तीकपणे व कौटुंबिकरित्या आम्हाला खऱ्याच आध्यात्मिक गरजा आहेत. आमच्या या आध्यात्मिक गरजांची तृप्ती करण्यामध्ये आम्ही जे खरे परिश्रम घेऊ त्यावर आमचा सार्वकालिक आनंद अवलंबून आहे.