१९९० च्या “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास या
१९९० च्या प्रांतिय अधिवेशनाला “शुद्ध वाणी” हे शीर्षक असेल व याला उपस्थित राहण्याचे तुम्हाला निमंत्रण आहे. भारतात अशी २६ अधिवेशने होणार आहेत. त्यांची सुरवात सप्टेंबर २७ पासून होऊन ती जानेवारी ६, १९९१ पर्यंत चालतील. ती जेथे होणार त्यांची शहरे, भाषा व तारखांची माहिती आमच्या मार्च १, १९९० च्या प्रसिद्धीपत्रकात पुरविण्यात आली आहे.
२ सफन्या ३:९ मधील यहोवाचे भविष्यवादित वचन म्हणतेः “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन व यहोवाची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नावाचा धावा खांद्याला खांदा लावून करतील.” या वर्षाचे अधिवेशन, ही “शुद्ध वाणी” काय आहे त्याचेच स्पष्टीकरण करणार नाही तर, ती शिकून घेणे व ती अस्खलितपणे बोलणे का महत्त्वाचे आहे तसेच तिचा वापर करण्यामुळे आमचे जागतिक बंधुवर्गाचे ऐक्य कसे बळकट केले जाते याचीही रसिकता बळावण्यासाठी ते मदत देईल.
३ लवकर या: यहोवाची संस्था आपल्याला त्याच्या आध्यात्मिक मेजावर जेवण करण्याचे आमंत्रण देत आहे. यामुळे वेळेवर येणे हे आदर व रसिकतेचे चिन्ह ठरणार. याचा अर्थ हा होतो की आपण प्रत्येक दिवशी लवकर येऊन कार्यक्रम सुरु होण्याआधी आपल्या जागेवर बसले पाहिजे. हे करण्यासाठी इतर ज्या गोष्टींकडे लक्ष द्यावयाचे आहे त्यासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. यात आमचे वाहन वाहनतळावर उभे करणे तसेच आमच्या कुटुंबाला बसण्यासाठी योग्य जागा शोधणे यांचा समावेश होतो.—१ करिंथ. १४:४०.
४ गेल्या वर्षी पोलंड येथील अधिवेशनास उपस्थित राहिलेल्या लोकांना आपल्या बांधवांची ईश्वरी भक्ती, प्रेम व ऐक्यता बघून भारावून आले. अधिवेशन ज्या आध्यात्मिक तरतुदी पुरविणार आहे त्याविषयीची खोल रसिकता व्यक्त झाली. दर दिवशी सकाळीच बांधव अधिवेशन स्थळी लवकर आलेले, आपल्या जागी बसलेले आणि गीत गाण्याच्या व प्रार्थनेच्या तयारीत बसलेले दिसत होते. ते शेवटले गीत व प्रार्थनेसाठीही बसून राहिले व कार्यक्रमानंतर आपल्या बांधवांचा सहवास मिळावा म्हणून थांबून राहिले.
५ बंधूजनांचा टापटीपपणा स्तुत्य होता. ते तेथे श्रवण करण्यासाठी व शिकून घेण्यासाठी आले होते. पोझनन व चोर्झो येथे उघड्या स्टेडियमवर पाऊस पडत होता तरी यामुळे बांधवांनी कार्यक्रमापासून आपले लक्ष विचलीत होऊ दिले नाही. तेथील उपस्थित असणारे युवक व लहान मुले सुद्धा शिस्तबद्ध, शांत व कार्यक्रमाकडे लक्ष देत होती. कुटुंबे एकत्र बसली होती. यहोवाच्या मेजासंबंधाने गाढ आदर व्यक्त करण्यात ते नमुना होते. त्यांच्या उदाहरणाचा आपल्याला कसा फायदा करुन घेता येईल?
६ दुसऱ्यांच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण करणे हे शास्त्रोक्त आहे. (२ थेस्सलनी. ३:७) आमची व्यक्तीगत परिस्थिती भिन्न असली तरी आमच्या अधिवेशनांपासून शक्य तेवढा लाभ मिळविण्याची आमची इच्छा आहे. अधिवेशनाला येण्याचा विलंब व त्यामुळे होणारी उद्विग्नता व चीडचीड टाळता यावी यासाठी काही कुटुंबे रात्री झोपण्याची नियुक्त वेळ ठरवून देतात. योजलेल्या आराखड्याचे कटाक्षाने पालन केल्यामुळे रात्री चांगली झोप मिळू शकते व दुसऱ्या दिवशी लवकर निघायला जमते. यामुळे कार्यक्रम सुरु झाल्यावर येण्याचे टळते व जे आधीच येऊन बसलेले असतात अशांना विचलीत करण्याचे व त्रास देण्याचे टळते. या गोष्टीविषयी आमचा विचारीपणा यहोवाबद्दल आम्हाला वाटणारा भाव व आदर तसेच आमच्या बंधूंविषयीची प्रीती व समंजसपणा प्रदर्शित करणारा ठरतो.
७ चार दिवसांचे अधिवेशनः “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशन चार दिवसांचे असेल. ते गुरुवारी दुपारी १:३० वाजता सुरु होईल आणि गरुवार, शुक्रवार व शनिवारी सायंकाळी ५:१० वाजता संपेल. रविवारी ते सायंकाळी ४ वाजता संपेल. शुक्रवार ते रविवारचा कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता सुरु होईल. दर दिवशीचा कार्यक्रम शुद्ध वाणी बोलण्याच्या अनुषंगाने विविध गोष्टींचा असेल. भाषणे, प्रात्यक्षिके, अनुभव, परिसंवाद व दोन पवित्र शास्त्रीय नाटके यात होतील.
८ यापैकीचा एखादाही कार्यक्रम चुकविला जाऊ नये असा निर्धार करा. यासाठी तुमच्या आराखड्यातील काही गोष्टींमध्ये सुधारणा व काही व्यक्तीगत गोष्टींना काट द्यावी लागेल. काहींना आपल्या नोकरीच्या व्यवस्थापकांशी खास व्यवस्था आखावी लागेल. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी काहीजण आर्थिक फायदाही सोडून देतात. गेल्या वर्षी पोलंडमध्ये अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी आमच्या बांधवांना कोणकोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागला व कोणत्या परिस्थितीतून जावे लागले ते विचारात घ्या. तर मग आपणही आपल्या अधिवेशनातील कार्यक्रमांना उपस्थित असले पाहिजे ही चालना आपल्याला याकडून मिळत नाही का? या विषयासंबंधाने जे यहोवाला प्रामाणिकपणे प्रार्थना करतात आणि उपस्थित राहण्याचा कसून प्रयत्न करतात अशांना यहोवा निश्चितपणे आशीर्वाद देतो.—इब्री. १०:२४, २५.
९ गेल्या वर्षी प्रांतिय अधिवेशनाला आलेल्या मध्यपश्चिमेकडील एका कुटुंबाला कोणता आनंद मिळाला ते विचारात घ्या. त्यांनी म्हटलेः “तो बोधप्रदायक असा सुंदर कार्यक्रम होता व तो आम्हा सर्वांनाचा आवडला. एक उल्लेखनीय गोष्ट जी आमच्या अंतःकरणाला भिडली ती होती, तुमची नवी प्रकाशने प्रकाशित करण्याची पद्धत. मी व माझी बायको खरोखरीच भारावलो, आमची अंतःकरणे खरीच ‘विस्तीर्ण झाली.’ आम्ही आजतागायत जितक्या संमेलनांना उपस्थित राहिलो त्यापेक्षा अधिकपणे देऊ करण्याची आम्हाला चालना मिळाली. आम्ही एकटेच नव्हतो. जी नवी व्यवस्था सांगण्यात आली तिने आम्हाला वाजवीपेक्षा अधिक देण्याची चालना दिली. हे खरे की, आम्हापैकी कोणालाही यहोवाला, त्याने जे आम्हासाठी केले व जे तो आमच्यासाठी करीत आहे त्याच्या मोबदल्यात भरपूर असे देता येऊ शकणार नाही.”
१० लक्षपूर्वक ऐका: स्तोत्रसंहिता ५०:७ मध्ये यहोवा म्हणतोः “माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे.” या कारणास्तव अधिवेशनाचा कार्यक्रम चालू असताना, व्यासपीठावर जे सादर केले जाते त्याव्यतिरिक्त इतर कोणात्याही दृश्यामुळे व आवाजामुळे विचलीत होऊ नका. शुद्ध वाणी अस्खलितपणे बोलण्याची आमची इच्छा आहे तर यशया ५५:२ मध्ये यहोवाने, “माझे लक्षपूर्वक ऐका,” अशी जी विनंती केली आहे तिच्या पूर्ण सहमतात असणे आवश्यक आहे.
११ या अधिवेशनात सादर होणारे सर्व साहित्य हे आमच्या आध्यात्मिक कल्याणास अनुलक्षून आहे. ते आम्हास यहोवाची सेवा दृढपणे करण्याच्या तसचे आमच्या बांधवांसोबत ऐक्याने राहण्याच्या आमच्या निर्धारास बळकट करील. सध्याच्या गरजांनुरुप हे अधिवेशन आम्हाला अद्ययावत बनवील व ते यहोवाच्या संस्थेसोबत शांतीसख्य टिकविण्याची मदत करील. आम्ही लक्ष बहकविल्यास ते आम्हाला मागे टाकील. कार्यक्रमापासून पूर्ण रुपाचा फायदा करून घेण्यासाठी आम्ही त्यात मग्न झाले पाहिजे. नंतर या शिकलेल्या गोष्टी आचरल्या पाहिजे.—याकोब १:२५.
१२ कार्यक्रमाकडे चांगले लक्ष लागावे व सादर करण्यात आलेल्या माहितीचे चांगल स्मरण रहावे याकरता आपल्याला काही करता येण्याजोगे आहे का? होय, आहे. कार्यक्रमादरम्यान टिपणे घेण्याचा प्रघात पुष्कळ बांधवांनी आचरला आहे. यासाठी पवित्र शास्त्र, गायनाचे पुस्तक यांच्याबरोबर टिपणे घेण्याचे साहित्य देखील सोबत आणले पाहिजे. टिपणे घेणे याकडे निरर्थक व कोणताही खरा फायदा नाही अशा दृष्टीने पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन असल्यास या “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनादरम्यान तुम्ही त्याचा प्रयत्न का करून पाहू नये? तुम्हास आढळून येईल की जे काही म्हटले जाते त्यावर तुमचे लक्ष एकाग्र ठेवण्याचा हा एक मार्ग आहे तसेच ते तुम्हास मनोराज्यात किंवा तुमचे मन भटकण्यापासून संरक्षण देईल.
१३ टिपणे फारच लांबलचक किंवा तपशीलवार असण्याची गरज नाही. एका मुख्य मुद्यासाठी एक किंवा दोन वाक्ये पुरेशी होतील. वडीलांनी सुव्यवस्थीत रीतिने घेतलेली टिपणे सेवासभेत अधिवेशन कार्यक्रमाची अर्थभरीत उजळणी घेताना फायदेकारक आढळली आहेत. अधिवेशनात सादर केलेले पुष्कळ मुद्दे ते त्यांच्या शिकविण्यात व मेंढपाळकत्वाच्या कार्यात संक्रमीतही करू शकतात.
१४ गीत व प्रार्थना: यहोवाचे स्तुतीगान गीताकरवी करण्याद्वारे आम्ही त्याचा सन्मान करीत असतो. तो आमच्या उपासनेचा एक भाग आहे. त्याचे लोक मोठ्या कळकळीने त्याच्याकडे नम्रतेने येतात तेव्हा यहोवाला आनंद होतो. (नीती. १५:८ब) प्रांतिय अधिवेशन आपल्याला आमच्या हजारो बंधु-भगिनींसोबत एकत्र मिळून ऐक्याने यहोवाची स्तुती गायन व प्रार्थनेद्वारे करण्याची संधि देते. तरीपण काहींनी उपासनेच्या या महत्त्वपूर्ण भागाविषयी अनादर दाखविला आहे. तो कसा? अधिवेशनाचे गीत व प्रार्थना झाल्यावर तेथे येऊन. तसेच कार्यक्रम संपण्याच्या बेतात असताना काहीजण गीत व प्रार्थनेमध्येच सभागृह सोडून बाहेर पडतात. ते का? अपवादात्मक स्थितीत याविषयी खरे कारण असू शकेल. पण जर कोणी आपले वाहन लवकर काढून घ्यावे किंवा बसथांब्याकडे रांग लावण्यासाठी पळावे किंवा खाद्यगृहातील चीजवस्तु लवकर मिळाव्या यासाठी गीत गाण्याचे व प्रार्थनेत सहभागी होण्याचे नाकारीत असतो तर ते यहोवाच्या मेजाविषयी योग्य तो आदर व आवड दाखविण्याजोगे आहे का?—मत्तय ६:३३.
१५ आम्ही जगाच्या मी-प्रथम प्रवृतीस किंवा आमच्या आध्यात्मिक प्रगतीस तडा जाऊ देण्यास दुष्ट योजना, लोभ व स्वार्थीपणा यास वाव देऊ नये. गेल्या वर्षी पोलंडमध्ये अधिवेशनाला उपस्थित राहून आमच्या बांधवांनी पवित्र गोष्टींविषयी जो रसिकतेचा आत्मा व्यक्त केला तोच आपण दाखवू या व आमच्या उपासनेची उच्च स्वरुपे म्हणजे यहोवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ गीत व प्रार्थना यासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पुढे चालू या.—स्तोत्र. ६९:३०.
१६ आमचे ख्रिस्ती शिष्टाचार: गेली पुष्कळ वर्षे आमचे ख्रिस्ती शिष्टाचार व अधिवेशनातील आमचे स्वरुप यांनी आमच्याविषयी यहोवाचे साक्षीदार यानाते चांगला नावलौकिक मिळविला आहे. याचे कारण आम्ही आमच्या अधिवेशनास सामाजिक मौजमजा म्हणून नव्हे तर यहोवास तेथे गंभीरपणे उपासना दिली जाते या नात्याने बघत असतो. अशा खास प्रसंगी आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्ही ख्रिस्ती प्रतिष्ठा व आध्यात्मिक मनोवृत्ती राखली पाहिजे आणि सर्वदा उपाध्याय या नात्याने वागविले पाहिजे.—१ करिंथ. १०:३१-३३.
१७ दुखःदपणे, हे प्रत्ययास येते की, अधिवेशनास उपस्थित राहणारे कांहीजण त्यांची मनोवृती, पेहराव, भाष्य व वर्तणुकीत फाजील बनतात. अशाप्रकारची गोष्ट स्थानिक मंडळी किंवा अधिवेशनादरम्यान सुस्पष्ट होते तेव्हा काय केले जावे? ज्यांच्यापाशी आध्यात्मिक गुणवत्ता आहे त्यांनी यांची सुधारणूक करण्याच्या दृष्टीने प्रेमळ सूचना प्रदान करावी. (गल. ६:१; इफि. ४:११, १२) शुद्ध वाणी बोलणे या गोष्टीने आम्हास चांगला नावलौकीक उंचावण्यास व आमच्या वर्तणूकीतील उच्च दर्जा टिकविण्यात परिश्रमी असण्यास चालना दिली पाहिजे.
१८ अधिवेशनास उपस्थित राहिलेल्या एकाने एक चिठ्ठी अनुदानाच्या एका खोक्यात टाकलीः “मला तुमचा कार्यक्रम खूपच आवडला. मी बांधवांपैकी एकासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करीन. मी तुमच्या संमेलनाला प्रथमच येत आहे. मी फक्त शनिवारीच येणार होतो, कारण रविवारी मी चर्चला जातो. पण शनिवारच्या कार्यक्रमामुळे मी इतका प्रभावीत झालो की, आज मी माझ्या सर्व कुटुंबालाही घेऊन येथे आलो आहे. तथापि, वक्ता भाषण करीत असता काही प्रौढ मोठ्याने आपसात गप्पा करीत होते ते बघून मला निराशा वाटली.”
१९ याशिवाय आणखी हे दिसले की, काही अधिवेशनात काही युवक सभागृहाच्या वरच्या मजल्यावर व निवांत स्थळी बसतात, एकमेकांना चिठ्ठया लिहितात, कुजबुजतात व कार्यक्रमाकडे लक्ष देत नाहीत. अशाप्रकारची वर्तणूक हे सुचविते की, यांना अद्याप पालकांच्या देखरेखीची गरज आहे व यांनी आपल्या कुटुंबासोबत बसण्यास हवे. जबाबदार पालक या गोष्टींकडे लक्ष देतील व आपल्या मुलांना आवश्यक असणारे मार्गदर्शन पुरवतील. (इफिस. ६:४) बंधू, भगिनी व मुलांनी याची जाण राखावी की, कार्यक्रम चालू असतो तेव्हा ती बोलण्याची नव्हे तर ऐकण्याची, श्रवण करण्याची वेळ असते.—अनु. ३१:१२.
२० आणखी जेथे सौजन्य व विचारशीलता दाखविली गेली पाहिजे ते क्षेत्र आहे, जेथे आपण निवासास असतो. आम्ही व्यवहार्य किंमतीत चांगल्या हॉटेल-खोल्यांचे आरक्षण करून देत असतो. यासाठीच हॉटेलमधला कर्मचारीवर्ग याजसोबत आपण सौजन्य दाखवून रसिकता दाखविली पाहिजे, त्यांच्याकडून वाजवीपणे मागणी करू नये. (गल. ६:१०) हॉटेलमध्ये आपले वर्तन कसे असावयास हवे यासाठी चांगल्या सूचना आधीच दिल्या गेल्या आहेत. पुष्कळांनी याला योग्य प्रतिसाद दिला आहे व ते हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत पूर्ण रुपाचे सहकार्य देण्याचा यत्न करीत आहेत.
२१ गेल्या वर्षीच्या अधिवेशनानंतर एका भगिनीला, ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तेथे काम करणाऱ्या एका सेविकेकडून एक पत्र आले. त्यात तिने म्हटलेः “तुम्ही माझ्यासाठी एक पुस्तिका व बक्षिसी ठेवून गेलात त्याविषयी मी आपले आभार मानते. . . . मी आता पवित्र शास्त्र अभ्यास घेत आहे व आमचा पिता यहोवा व त्याचा एकुलता एक पुत्र येशू खिस्ताविषयी आपली आवड वाढवीत आहे. आमच्या हॉटेलमध्ये राहण्यास तुम्हाला आनंद वाटला याची मला धन्यता वाटते. मी तुम्हाला पुढच्या अधिवेशनात भेटण्याची आशा ठेवते.” त्या सेविकेने आपल्या पत्रात “पुस्तिका” व “बक्षिसी” हे शब्द अधोरेखित केले होते.
२२ आमचे बहुतेक बांधव देवाच्या नावाला गौरव आणीत असले तरी आम्हाला हे कळवावेसे वाटते की अधिवेशनाला येणारी काही कुटुंबे तक्रारीला जागा देत आहेत. उदाहरणार्थ, राहण्याच्या जागेची जेथे व्यवस्था करून देण्यात आली, जेथे मुलांसहित केवळ चार वा पाचजण राहू शकतील तेथे काहींनी दहा जण राहावयास आणले; हे अप्रामाणिकपणाचे आहे. जादा लोकांसाठी त्यांनी खाटेवरील बिछाना खाली घेतला व त्यावर त्यांची झोपण्याची व्यवस्था केली. तर दुसरे खाटेवर दुसरे अंथरुण पसरुन त्यावर निजले. त्यावर अंथरण्यासाठी त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडून जादा चादरी देण्याची मागणी केली.
२३ अशीही काही हॉटेल्स आहेत जेथे खोलीत जेवण तयार करू नये या नियमाचा भंग केला गेल्यामुळे ते यहोवाच्या साक्षीदारांना देण्यास काकू करतात. दुसरे कारण असे की बांधवांनी हॉटेलची खोली सोडताना त्याची दशा नकोशी करून टाकली होती. तेव्हा आमची स्वच्छता व टापटीपणा हा केवळ आमचा पेहराव व वागणूक यातच नव्हे तर दुसऱ्यांच्या मालकी जागेची हाताळणी आम्ही ज्या पद्धतीने करतो तेथेही दिसला पाहिजे. हॉटेलची खोली सोडताना ती स्वच्छ व नीटनीटकी न सोडण्याचे काही वाजवी कारण आहे का? आमची अविचारी वागणूक आमचे नाव वाईट करते. यास्तव येणाऱ्या प्रांतिय अधिवेशनात आपण अशा स्वरुपाची वागणूक ठेवू या की ज्याकरवी “सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणली जाईल.—तीत २:१०.
२४ पालकांसाठी: “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनाला लहान मुले व युवकांनाही येण्याचे आमंत्रण आहे. त्यांनाही शुद्ध वाणी स्पष्टपणे बोलता आली पाहिजे. ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणारी तसेच अधिवेशनाच्या कार्यक्रमाविषयी खरी आस्था राखणारी मुले बघितल्यावर किती बरे वाटते! (स्तोत्र. १४८:१२, १३) पण हे बहुतांशी पालक ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन देतात व स्वतःचे उदाहरण ठेवतात त्यावर अवलंबून आहे. पुष्कळ मुलांना नोंद घेण्याची चांगली तालीम मिळालेली आहे. तुम्ही पालक या नात्याने मुलांना हे शिकवले नसल्यास अधिवेशनाआधी हा जो समय आहे त्यात आपल्या मुलांना ही तालीम का देऊ नये? अगदी लहान असणाऱ्यांना शास्त्रवचनीय अवतरणे व वक्ता उच्चारतो व ते ऐकतात असे मुख्य शब्द लिहिण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते. कांही पालक त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी किंवा घरी परतताना प्रवासात मुख्य मुद्यांची उजळणी करण्याची योजना करतात.
२५ अर्थात, सर्व पालक लेकरांचा स्वाभाविक गुण खेळकरपणा याची गुणग्राहकता बाळगतात. त्यांना जीवनातील अनुभवांची कमतरता असते, व ते कमअनुभवी असतात. यास्तव त्यांना केव्हा लक्ष द्यावे व सभेत कसे स्वतःस वागवावे हे शिकविले गेले पाहिजे. ही गोष्ट त्यांच्या पालकांच्या चांगल्या देखरेखीस हाक देते. याबाबत कांही पालक ढिलेपणा देतात. कांही वेळेस पालक प्रार्थनेत यहोवास उचित भीतीदायक आदर दाखवितात तरी त्यांची लेकरे खेळत व इतरांना विचलीत करीत असतात. पालकांना त्यांची मुले प्रार्थनेच्या दरम्यान काय करीत असतात हे ज्ञात असावे. त्यांनी त्यांच्या जागा कार्यक्रमादरम्यान कधी सोडल्या तर ते काय करतात? अधिवेशन कार्यक्रमादरम्यान किंवा नंतर लेकरांना देखरेखीविना मोकाट सोडले आहे का?—नीती. २९:१५.
२६ हॉटेलमध्ये राहतेवेळी काही पालकांनी ते आत असता, किंवा बाहेर गेले असता किंवा दुसऱ्या काही कामात गुंतले असताना आपल्या मुलांना हॉटेलच्या जिन्यावर आणि इकडेतिकडे खेळू देण्यास वाव दिल्याची काही प्रकरणे घडली. अशावेळी पालकांचे त्यांच्यावर लक्ष नव्हते. हे योग्य नाही. तेव्हा काही मुले बेशिस्त वागली आणि ज्या बंधू व भगिनींनी त्यांना दयाळूपणे सल्ला दिला त्यांचाही त्यांनी अपमान केला. अशी ही बेशिस्त व गैरख्रिस्ती वागणूक घरात लाड पुरविणे व योग्य ती शिस्त न लावण्याचे परिणाम आहेत. ती सुधारली गेली पाहिजे. मुलांचा “यहोवाकडील बोध व शिस्त यांच्या योगे प्रतिपाल” करण्याची जबाबदारी असल्यामुळे सर्व ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांकडे चांगले लक्ष देण्यास हवे.—इफिस. ६:४.
२७ तुमच्या पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे: अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या सर्वांना पुरेशा बसण्याच्या जागा, प्रकाशने, अन्न व इतर तरतुदी उपलब्ध असण्यासाठी पुष्कळ योजना व परिश्रम केले जात आहेत. या परिणामकारक योजनांची खात्री देण्यासाठी प्रत्येक मंडळीस विशिष्ठपणे खास अधिवेशनासाठी नेमणूक दिली आहे. अधिक गर्दी टाळण्यासाठी तुमचे पूर्ण सहकार्य महत्वाचे आहे. अर्थात, अशी परिस्थिती असेल की जी काही थोडक्यांना अधिवेशनास इतर भागात उपस्थित राहाणे जरूरीचे बनवेल. तथापि अधिकांना त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी अधिवेशनात उपस्थित राहाणे शक्य होईल.—१ करिं. १३:५; फिलि. २:४.
२८ बैठका राखून ठेवण्याबाबत तुमच्या पूर्ण सहकार्याबद्दल विनंती केली जात आहे. कृपया हे लक्षात ठेवा की जागा केवळ तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठी राखल्या जाव्यात. इतरांसाठी कृपया जागा राखून धरू नका. कांही वेळेस जादा जागा राखल्या जातात पण त्या कोणासाठीही नसतात. हे निर्दयीपणाचे व ॲटेन्डन्ट तसेच उपलब्ध जागा शोधणाऱ्यांस चुकीचा मार्ग दाखविण्यासारखे आहे. पवित्र शास्त्राच्या सूचनेनुसार आम्ही बंधुभाव प्रदर्शित केला पाहिजे व जागा राखून ठेवण्याच्या मान्य योजनेसोबत पूर्ण सहकार्य केले पाहिजे.—२ पेत्र १:५-८.
२९ अधिवेशन ठिकाणी व्यक्तीगत वस्तु आणताना विचारीपणाचा उपयोग करण्याचे सुचविले जाते. गत काळात, काहींनी मोठमोठे कुलर्स व इतर बोजड वस्तु आणल्या होत्या ज्या त्यांच्या खुर्चीखाली ठेवता आल्या नाहीत. त्या रांगातून किंवा खुर्च्यावर ठेवल्या होत्या, याचा परिणाम इतरांना जागा मिळण्यापासून वंचित ठेवण्यास व कांहीवेळेस त्याने आग व सुरक्षिततेचे नियम उल्लंघले. आम्हास अशा गोष्टीत विचारीवृती दाखविण्याची गरज आहे.
३० व्हिडीओ कॅमेरा व ध्वनिमुद्रण वस्तुंना अधिवेशन जागी परवानगी दिली गेली आहे. तथापि, जे अशा उपकरणांचा उपयोग करतील त्यांनी इतरांना विचलीत किंवा त्रास देण्याचे टाळण्यात काळजी दाखविली पाहिजे. अशी उपकरणे दोन रांगेमध्ये किंवा प्रवेशद्वारात आयोजित केली जावू नयेत. अशाप्रकारची उपकरणे पब्लीक ॲड्रस सिस्टम किंवा इलेक्ट्रीक सुविधासोबत जोडले जावू नयेत. फ्लडलाइट्सची परवानगी दिली जाणार नाही. जे विचलीतपणा करण्यास कारण असतात किंवा वरील मार्गदर्शक रूपरेषेकडे दुर्लक्ष करतील त्यांना या गोष्टी त्यांच्या ध्यानात आणून दिल्या जातील तेव्हा कोणतीही कुचराई न करता त्यात सुधारणा करावी. या मार्गदर्शक रूपरेषाचे कोणतेही उल्लंघनात सुधारणूक करवून आणण्यात ॲटेन्डन्ट व इतर प्रमुखांनी जागृत असावे व त्यांना अशा उपकरणांचा उपयोग करणाऱ्यापासून पूर्ण सहकार्य प्राप्त झाले पाहिजे.
३१ भोजन सेवा: संस्था भोजनाची व्यवस्था साधी ठेवील. यामुळे काम हलके व त्वरीत होण्यासाठी पुष्कळ मदत मिळेल आणि सर्वांना लाभ मिळू शकेल. देवाच्या संस्थेने हे जे औदार्य दाखवले आहे त्यामुळे आम्ही व्यावहारिकरित्या आमची रसिकता व्यक्त करण्यासाठी आम्हाला चालना मिळेल.—नीती. ११:२५.
३२ होय, यहोवाच्या लोकांना वर्षातून एकदा एकत्रित होणे व तयार करण्यात आलेल्या आनंदी आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेणे याची मोठी रसिकता वाटते. अशा या मेळाव्यात पुरविल्या जाणाऱ्या सर्व सुविधा तसेच सेवा यांचे आम्हाला मोल वाटते. अधिक काळजी तसेच संस्थेकरवी केल्या जाणाऱ्या बऱ्याच खर्चाने अधिवेशनाच्या पुरेशा बैठका, ध्वनिक्षेपण सामग्रीची व्यवस्था, प्रभावी भोजन सेवा पुरविणे आणि इतर व्यवस्था व सेवा प्रदान करणे या गोष्टी संपन्न केल्या जातात व यामुळेच अधिवेशनास उपस्थित राहणे हे आनंददायक व आध्यात्मिकरित्या तजेला देणारे ठरते.
३३ हा सर्व खर्च तुम्ही संस्थेच्या जागतिक कार्यासाठी जे ऐच्छिक अनुदान देता त्यावर भागविले जातात. यासाठीच, तुम्हास दिसू शकतील अशी स्पष्टपणे लिहिण्यात आलेली अनुदान पात्रे अधिवेशनाच्या सभागृहात ठेवलेली असतात. सर्व अनुदानांविषयी खरी आत्मीयता व्यक्त केली जाते. तद्वत, तुम्ही राज्य आस्थेसंबंधाने या प्रकाराने जे औदार्ययुक्त अनुदान द्याल त्याविषयी संस्था तुमचे आगाऊच आभार मानू इच्छिते. येथे उल्लेखिण्यात आलेल्या गोष्टीसंबंधाने सर्वजण आपापल्या वैयक्तीक जबाबदारीची जाण राखतील आणि परिस्थितीनुसार शक्य आहे तेवढे सहकार्य दिली जाईल असा आत्मविश्वास आम्ही बाळगतो.—लूक ६:३८.
३४ “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास या: “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनास येऊन कार्यक्रमास नीट लक्ष देऊन तुम्हाला, यहोवाने आपल्याला जी शुद्ध वाणी दिली आहे त्याचे महत्त्व तसेच ज्यामुळे आमच्या बांधवाबरोबरील आमचे सख्य धोक्यात येऊ शकेल त्या कोणत्याही स्वार्थी प्रवृत्तीविषयी नेहमीच का दक्ष राहिले पाहिजे त्याविषयी अधिक रसिकता वाटू लागेल. तेव्हा आत्ताच योजना निश्चित करा व अधिवेशनाच्या पहिल्या गीताला उपस्थित राहून सर्व कार्यक्रमास हजर व्हा व रविवारी दुपारच्या शेवटल्या प्रार्थनेपर्यंत आपली उपस्थिती दाखवा.
प्रांतिय अधिवेशन स्मरणिका
राहण्याच्या व्यवस्था: अधिवेशनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या राहण्याच्या जागांचा उपयोग करण्यातील तुमच्या सहकार्याची फारच गुणग्राहकता बाळगली जाते. तुमच्या जागेचे आरक्षण रद्द करणे तुम्हास जरूरीचे वाटते तर तुम्ही हॉटेलला सरळपणे लिहावे किंवा फोन करावा असे करणे शक्य तो लवकर करावे ज्यामुळे खोली दुसऱ्या कोणास उपलब्ध करून दिली जाईल.
बाप्तिस्मा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी शनिवारी सकाळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी विशेष आयोजित केलेल्या विभागात त्यांच्या खुर्चीवर असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विनयशील असा अंघोळीचा पेहराव व टॉवेल जे बाप्तिस्मा घेण्याची इच्छा करतात त्या प्रत्येकाने आणावा. बाप्तिस्म्याचे भाषण व वक्त्याने केलेल्या प्रार्थनेनंतर, कार्यक्रम अध्यक्ष बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना संक्षिप्त सूचना देतील व नंतर गीत होईल. शेवटच्या ओळीच्या सुरुवातीस ॲटेन्डन्ट बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना बाप्तिस्मा ठिकाणाकडे किंवा त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनाकडे मार्गदर्शित करतील तेव्हाच उपस्थित सर्व गीताचे गायन पूर्ण करतील. बाप्तिस्मा हा एकाद्याचे समर्पणाचे द्योतक असून ही गोष्ट यहोवा व त्या व्यक्तीमधील वैयक्तीक व खाजगी बाब आहे हे पाहता भागीदारीचा बाप्तिस्मा संबोधला जातो ती तरतुद येथे नाही ज्यात दोन किंवा अधिक बाप्तिस्मा घेणारे उमेदवार बाप्तिस्मा देताना मिठी मारतात किंवा हात पकडतात.
पायनियर ओळखपत्र: सर्व रेग्युलर व स्पेशल पायनियर्स तसेच प्रवासी देखरेखे यांनी त्यांचे वॉचटॉवर आयडेन्टीफिकेशन ॲन्ड असायनमेन्ट कार्ड (एस्-२०२) अधिवेशनास आणले पाहिजे. ते उपस्थित राहणाऱ्या प्रांतिय अधिवेशन काळापर्यंत सहा महिने यादीवर असणाऱ्यांना ६० रूपयांची अधिवेशन फूड टिकीट्स त्यांचे ओळखपत्र दाखविल्यानंतर केवळ एका अधिवेशनासाठी मिळतील. यास्तव कार्डला पैश्याप्रमाणे काळजीपूर्वक जपा. ते अधिवेशनात बदलून मिळू शकत नाही. कोणतेही नवीन प्रसिद्ध होणारे प्रकाशन बक्षीस म्हणून किंवा इतर प्रकाशने पायनियर दरावर पुस्तक खात्यामध्ये ओळखपत्र दाखविण्यानेच मिळेल. बेथेल सेवेमध्ये असणारे त्यांचे बेथेल ओळखपत्र दाखविण्याने ते प्राप्त करतील.
स्वयंसेवक सेवा: प्रांतिय अधिवेशनाच्या सुरळीत कार्य प्रवणासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे. तुम्हास अधिवेशनाच्या विशिष्ठ भागामध्ये काम करणे शक्य असेल तरीही तुमच्या सेवेची रसिकता जाणली जाईल. तुम्ही मदत करू शकाल तर कृपया तुम्ही अधिवेशन ठिकाणी याल तेव्हा स्वयंसेवक विभागास ते कळवा. १६ वर्षे वयाखालची मुले ही अधिवेशनाच्या यशस्वीपणास हातभार लावू शकतात, पण त्यांनी त्यांच्या पालकांच्या किंवा इतर जबाबदार प्रौढांच्या सोबत काम करण्याची आवश्यकता आहे.
लेपल कार्डस: कृपया खासपणे आयोजित केलेली लेपल कार्ड अधिवेशनात व अधिवेशन ठिकाणाकडे येताना किंवा जाताना ती परिधान करा. हे आम्हास प्रवास करताना उत्तम साक्ष देणे शक्य करून देते. लेपल कार्डस तुमच्या मंडळीतून प्राप्त केली जावीत कारण ती अधिवेशनात उपलब्ध नसतात. बॅज होल्डर्स मंडळीने ऑर्डर करून मागविण्यास हवीत. पण लेपल कार्डस् मंडळ्यांना पाठविण्यात येतील. होल्डरची किंमत रु. १ व कार्डची किंमत २० पैसे.
सावधानतेचा इशारा: तुम्ही तुमचे वाहन कोठेही लावत असा पण ते सर्ववेळी कुलूप लावलेले व त्यात दिसेल असे कांही कधीही ठेवू नका. शक्य असेल तर तुमच्या मालकीच्या वस्तु ट्रंक मध्ये लॉक करून ठेवा. तसेच चोर व खिसेकापू यापासून सावध असा कारण लोकसमुदाय पाहून ते आकर्षित होतात. यामध्ये अधिवेशनातील खुर्च्यावर काहीही मोलवान कोणाच्या देखरेखीशिवाय सोडू नये हे समाविष्ठ आहे. कृपया दक्षता घ्या.
असे कळविले गेले आहे की काही हॉटेल्स टेलिव्हीजनवर अनैतिकता काय पण अश्लीलता असणाऱ्या चित्रपटाच्या सोई पुरवितात. अशा राहत्या ठिकाणी लेकरांनी देखरेखीविना टी.व्ही. पाहणे टाळावे या निकडीवर हे प्रकाशझोत टाकते.