वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९० पृ. ८
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०१३
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • बायबल विद्यार्थ्याला प्रगती करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला आपण मदत कशी करू शकतो?—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक होण्यास बायबल विद्यार्थ्यांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ७/९० पृ. ८

प्रश्‍न पेटी

● बाप्तिस्मा घेण्याची संमती मिळण्याआधी कोणा बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाने केवढ्या प्रमाणात क्षेत्रकार्य करण्यास हवे?

बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकाने, स्वतःला यहोवाचे साक्षीदार होण्याची प्रबळ इच्छा आहे हे विविध मार्गाने प्रदर्शित केलेले असते. (स्तोत्र. ११०:३) शास्त्रवचनांचा मननशील अभ्यास केल्यामुळे त्याचे विचार, वागणूक व राहणीमान यात बदल झाल्याचे दिसून आलेले असते. यहोवाला संतुष्ट करावे व त्याच्या इच्छेप्रमाणे करीत राहावे अशी या पवित्र शास्त्राचा गंभीरपणे अभ्यास करणाऱ्‍या व्यक्‍तीठायी उभारी घेणारी इच्छा असल्यामुळे तो यहोवाच्या लोकांबरोबर सभा, संमेलने आणि अधिवेशनाला नियमितपणे उपस्थित राहात असतो. (इब्री. १०:२४, २५) या ख्रिस्ती मेळाव्यांना उपस्थित राहण्यासोबत त्याच्या अंतःकरणाने त्याजठायी असणाऱ्‍या विश्‍वासाचे प्रदर्शन करण्यासाठी सभांमध्ये उत्तरे देण्यासाठी आणि ईश्‍वरशासित शाळेत आपले नाव दाखल करण्याचेही त्याला उत्तेजन दिलेले असते.—स्तोत्र. ४०:९, १०; ओएम पृष्ठ ७३.

एकदा या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याने सत्य अंगिकारले आणि राज्य संदेशाचे महत्त्व खरेपणाने जाणले तर त्याला घरोघरच्या उपाध्यपणाच्या कार्यात सहभागी होण्याचा हक्क मिळतो. हे यहोवाच्या साक्षीदारांचे प्रमुख कार्य आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; ओएम पृष्ठ १११) याच्या अनुषंगाने, त्याचा अभ्यास घेणारा प्रचारक तसेच वडीलांपुढे, त्या विद्यार्थ्याने आपले संपूर्ण जीवनाक्रमण ख्रिस्ती तत्त्वांच्या अनुरोधात आणले आहे याची खात्री करण्याची जबाबदारी राहते. त्याच्याठायी यहोवाचा साक्षीदार बनण्याची खरी कळकळ असली पाहिजे व राज्य-प्रचार तसेच शिष्य बनविण्याच्या कामात सहभागी होण्याच्या हक्काविषयीची रसिकता वाटली पाहिजे.—गल. ६:६; टे.बु. ८/८९, पृ. २०; ओएम पृ. ९८-९, १७४.

कोणा पवित्र शास्त्र विद्यार्थ्याने स्वतःला आम्हासोबत उपाध्यपणात सहभागी होण्याच्या पात्रतेचे आहोत हे दाखविल्यावर त्याचा पाण्याने बाप्तिस्मा होण्यापर्यंत बराच कालावधी जाण्याची गरज नाही. आतापर्यंत त्याचे जीवनाक्रमण ख्रिस्ती तत्त्वांच्या अनुषंगाने पूर्णपणे आलेले असते, त्याला जाहीर उपाध्यपणातील अनुभव कमी असतो. तद्वत, तो क्षेत्रकार्यात नियमितपणे व उत्साहाने भाग घेण्याची इच्छा धरुन आहे हे प्रदर्शित करण्याचा त्याला पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे.—स्तोत्र. ४०:८; रोम. १०:९, १०, १४, १५.

ही व्यक्‍ती बाप्तिस्म्यासाठी तयार होत असता ती सुवार्तेची इतरांमध्ये सहभागिता नियमित रुपाने करीत असेल व यात ती दर महिन्याला एक किंवा दोन तासांपेक्षा अधिक कार्य करीत असेल. (वॉ. ८४ ६/१ पृ. ८ परि. २) अर्थात, ज्याने बाप्तिस्म्याविषयी विनंती केली आहे त्या व्यक्‍तीची पार्श्‍वभूमी, त्याचे वय, क्षमता इत्यादि गोष्टी विचारात घेऊन तिचा विचार होण्यास हवा. वडीलांनी आवर मिनिस्ट्री पुस्तकात १७५ पृष्ठावर त्यांच्यासाठी जे मार्गदर्शन देण्यात आले आहे ते विचारात घेतले पाहिजे. तेथे म्हटले आहेः “ज्यांची अंतःकरणे यहोवाकडे वळालेली आहेत आणि ज्यांनी पवित्र शास्त्राच्या मूलभूत सत्याची शिकवण जाणून घेतलेली आहे त्याविषयी आमची आस्था असावी. तुमच्या प्रेमळ साहाय्यामुळेच, बाप्तिस्मा घेण्याचा विचार करणाऱ्‍यांना ख्रिस्ती उपाध्यपणात प्रवेश मिळविण्याचे प्रोत्साहन व साहाय्य मिळू शकेल व याद्वारे ते त्या महत्त्वपूर्ण नेमणूकीची पूर्तता करण्यासाठी सिद्ध होऊ शकतील.”—मत्तय १६:२४; योहान ४:३४; १ पेत्र २:२१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा