वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९० पृ. १
  • साक्ष देण्याच्या संधी साधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • साक्ष देण्याच्या संधी साधा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुटीवर असताना
  • अधिवेशनाला उपस्थित असताना
  • कुटुंब या नात्याने कार्यहालचाल वाढविणे
  • ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा
    आमची राज्य सेवा—१९९४
  • उन्हाळ्याकरता तुमच्या काय योजना आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • उन्हाळ्यात तुम्ही काय करणार आहात?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • पावसाळी महिने सूज्ञतेने घालवा
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ७/९० पृ. १

साक्ष देण्याच्या संधी साधा

१ शास्त्रवचने आपल्याला आर्जवितातः “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिं. १०:३१) येणारे महिने आपल्याला हे विविध मार्गांनी करण्याच्या संधी प्रस्तुत करतात.

२ यंदा कोणी सुटी घेतील. तरी, आमचे प्रचाराचे व शिक्षण देण्याचे कार्य कोणीही, ऋतु कोणताही असला तरी विसरु नये. यास्तव, सुटीवर असता किंवा शाळेला सुटी लागली असता इतरांना साक्ष देण्यासाठी उत्सुक असा. हे कसे करता येईल?

सुटीवर असताना

३ तुम्ही आपल्या नातेवाईकांना भेट देण्याची योजना आखली आहे का? नातेवाईकांना भेटून आपले नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे सर्वांनाच आवडते. तुमचे नातेवाईक सत्यात नसल्यास तुम्हाला त्यांना राज्याच्या संदेशाची सहभागिता करता येईल. आपल्या नातेवाईकांना साक्ष देण्यासाठी कित्येक बांधवांनी योग्य क्षणाची वाट पाहिली व त्याकरवी चांगली यशप्राप्ती मिळविली. या मार्गाने त्यांचे काही नातेवाईक सत्य शिकू शकले.—पहा द वॉचटावर, फेब्रुवारी १५, १९९०, पृष्ठे २५-७.

४ तुम्ही दुसऱ्‍या गावी सुटीसाठी जात असला तर तेथील मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी तसेच तेथील क्षेत्रकार्यात सहभागी होण्याच्या योजना का करु नयेत? आम्हाला जगातील “सर्व बंधुवर्गा”विषयी प्रेम आहे त्यामुळे त्यांच्यासोबत मिळून क्षेर्त्रकार्य केल्यामुळे सत्यातील त्यांचा अनुभव जाणण्याची तसेच त्यांच्याशी चांगला परिचय प्राप्त करून घेण्याची संधि मिळते. (१ पेत्र २:१७) सुटीवर असताना सभांना उपस्थित राहिल्यामुळे व प्रचारकार्यात भाग घेतल्यामुळे आम्हाला लाभ हा मिळेलच, पण आमच्या बंधुवर्गासोबत राहिल्यामुळे आम्हाला तजेलाही मिळेल.—मत्तय ११:२८, २९.

अधिवेशनाला उपस्थित असताना

५ प्रांतिय अधिवेशनास हजर राहात असताना इतरांना साक्ष द्या. आमचे बॅज लावल्यामुळे इतर त्याकडे कुतुहूलाने बघतात व यामुळे आम्हाला त्यांच्याशी सत्याविषयी बोलणी करण्याचा मार्ग उघडा होतो. उपहारगृहात जेवण करीत असता तसेच स्थानिक वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास करीत असता साक्ष देण्याची संधी न्याहाळा. अशा परिस्थितीत देण्यात येणारी साक्ष चांगले परिणाम घडवून आणते. यासाठीच आपले पवित्र शास्त्र तसेच सुयोग्य साहित्य जवळ बाळगा आणि साक्ष देण्यास तयार राहा.

कुटुंब या नात्याने कार्यहालचाल वाढविणे

६ येणाऱ्‍या काही महिन्यात काही जण आपले शालेय शिक्षण पूर्ण करतील किंवा आपल्या प्रापंचिक कामावरुन रजा घेतील तेव्हा साहाय्यक पायनियर बनून क्षेत्रात अधिक वेळ का खर्च करु नये? याकरवी तुम्ही आपल्या क्षेत्रकार्यात सुधारणा करु शकाल आणि इतरांबरोबर मिळून कार्य केल्यामुळे आपले प्रेम ‘विस्तीर्ण करु’ शकाल. तेव्हा शक्य आहे तर मंडळीतील अधिकांसोबत का कार्य करू नये? (२ करिंथ. ६:११-१३) काही कुटुंबांनी आपली सुटी सबंध कुटुंब असे साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी घालविली. यामुळे त्यांचा विश्‍वास अधिक दृढ केला गेला तसेच त्यांचे यहोवासोबत आणि आपसात असलेले बंध अधिक बळकट केले गेले. याकरवी मंडळीस प्रोत्साहन दिले जाते आणि इतरांना अधिक कार्य करण्याची चालना मिळते.

७ आज पुष्कळ गोष्टी आपला वेळ घेत असल्यामुळे आम्ही आपला आराखडा चांगला ठेवण्याची गरज आहे म्हणजे आमच्या वेळेचा चांगला उपयोग करता येईल. आध्यात्मिक गोष्टींना आता प्राधान्य दिल्यामुळे आम्ही ‘आपला उजेड लोकांपुढे पाडू शकू.’ आम्ही सत्याची सहभागिता इतरांमध्ये करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतल्यामुळे आमची सत्कर्मे बघून त्यांनाही यहोवाचे गौरव करण्याची चालना मिळेल.—मत्तय ५:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा