शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
सूचनाः आमची राज्य सेवा ही अधिवेशन काळादरम्यान दर आठवडी एका सेवा सभेची आयोजना करील. या कारणास्तव, मंडळ्या कार्यक्रमात तसा फेरफार करु शकतात, ज्यामुळे अधिवेशनास उपस्थित राहणे व त्यानंतरच्या आठवडी सेवा सभेत ३० मिनिटासाठी कार्यक्रमाच्या ठळक मुद्यांची चर्चा ठेवता येईल. दर दिवसाची चर्चा दोन किंवा तीन लायक बंधूंना आधीच नेमून द्यावी, जे प्रमुख मुद्यांवर आपले लक्ष केंद्रित करू शकतील. ही उत्तम, तयारीनिशी सादर केलेली उजळणी बांधवांना प्रमुख मुद्दे लक्षात आणून त्याचा व्यक्तीगत तसेच क्षेत्रावर अवलंब करण्याचे उत्तेजन देईल. वापरण्यात येणारे अनुभव आणि सभागृहातील विवेचने त्रोटक व मुद्देसूद असावीत.
जुलै ९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १५१ (२५)
७ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यातील घोषणा सदरामधील योग्य घोषणा. आठवड्याच्या शेवटाला असलेल्या क्षेत्रकार्याच्या माहितीचा समावेश करावा.
१५ मि: “तुमच्या उपाध्यपणात कुशल व्हा.” लेखाची प्रश्नोत्तराद्वारे चर्चा. ५ व ६व्या परिच्छेदाची चर्चा करताना जुलै १५, १९८८ च्या वॉचटावर तसेच रिझर्निंग पुस्तकात आढळणाऱ्या प्रस्तावांचे प्रात्यक्षिक करा. याशिवाय, यहोवाच्या संस्थेकरवी लाभलेल्या प्रस्तावांचे अवलंबन केल्यामुळे जे चांगले परिणाम मिळाले त्याविषयी प्रचारकांना सांगू द्या.
२३ मि: “१९९० च्या ‘शुद्ध वाणी’ प्रांतिय अधिवेशनाला या.”—भाग १. परिच्छेद १-१५ पर्यंत सभागृहासोबत चर्चा तसेच “प्रांतिय अधिवेशन स्मरणिका” याविषयी त्रोटक उजळणी.
गीत १७८ (६७) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै १६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ४३ (१०३)
५ मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल आणि देणगी पोचविषयीची माहिती.
१० मि: प्रश्न पेटी. वडीलाकरवीचे भाषण.
१५ मि: “साक्ष देण्याच्या संधी साधा.” लेखाची प्रश्नोत्तररुपाने चर्चा.
१५ मि: पवित्र शास्त्र अभ्यास कसे सुरु करावेत. शास्त्राभ्यास सुरु करण्यात यशस्वी असलेल्या दोन किंवा तीन प्रचारकांची मुलाखत. कुठली गोष्ट त्यांना परिणामकारक आहे असे दिसले? मूळची आस्था ते कशी जिवंत ठेवतात? सुरवातीच्या भेटीत आणि पुनर्भेट घेताना पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करावा याचे एकेक त्रोटक प्रात्यक्षिक सादर करा.
गीत १४३ (७६) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९१ (६१)
१० मिः स्थानिक घोषणा, ईश्वरशासित वृत्त. आठवड्याच्या बाकी दिवसात योजिलेल्या क्षेत्रकार्याच्या रुपरेषेचा आढावा द्या. वेळ असल्यास चालू मासिकातील बोलके मुद्दे सांगा.
१८ मिः “तुमच्या आध्यात्मिक गरजा भागविणे.” लेखाची प्रश्नोत्तराच्या रुपाने चर्चा. एक कुटुंब प्रमुख तसेच एका सड्या प्रचारकाची मुलाखत घेऊन हे स्पष्ट करा की, हे आपल्या आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी वेळेविषयीच्या आव्हानास कसे तोंड देत आहेत. बंधूजनांना आपल्या स्वतःच्या परिस्थितीचे परिक्षण करण्यास उत्तेजन देऊन काही सुधारणा करण्याचे दिसत असल्यास त्या जरुर कराव्यात हे प्रोत्साहन द्या.
१७ मिः “योग्य वेळी मदत.” सेवा देखरेखे सभागृहासोबत माहितीची चर्चा करतात. पुस्तक अभ्यास गटाला सेवा देखरेख्यांनी भेट देण्याच्या व्यवस्थेकरवी जे फायदे मिळतात ते ठळकपणे मांडा. सेवा देखरेख्यांच्या भेटी दरम्यानच्या आठवडी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांनी खास प्रयत्न करावेत असे सर्वांना उत्तेजन द्या.
गीत १७७ (५२) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै ३० ने सुरु होणारा सप्ताह
गीत २१३ (८५)
८ मिः स्थानिक घोषणा. गॉडस् वर्ड या पुस्तकाच्या वितरणाविषयी आलेले एकदोन अनुभव सांगू द्या. ऑगस्टमध्ये वितरणासाठी जी माहितीपत्रके उपलब्ध आहेत त्यांचे शीर्षक सांगा. स्थानिक क्षेत्रात माहितीपत्रकाचे कसे वितरण करता येईल ते दाखवा. या सप्ताहाच्या शेवटी प्रचारकांना क्षेत्र कार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
१५ मिः “सुवार्ता सादरता—कुटुंब या नात्याने.” साहित्याची प्रश्नोत्तराने चर्चा. प्रत्येक परिच्छेदावर एक किंवा दोनच प्रश्न विचारा म्हणजे परिच्छेद वाचता येतील.
२२ मिः “१९९० च्या ‘शुद्ध वाणी’ प्रांतिय अधिवेशनाला या.”—भाग २. सभागृहासोबत परिच्छेद १६ ते ३४ ची चर्चा करा. अधिवेशनात आमची वागणूक कशी असावी यावर असणाऱ्या शास्त्रवचनीय तत्त्वांवर जोर द्या. या पुरवणीची उजळणी आपल्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांसोबत करण्याचे बांधवांना उत्तेजन द्या. तसेच त्यांना उपस्थित राहण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेत मदत द्या.
गीत २१४ (२३) व समाप्तीची प्रार्थना.