सत्याविषयी साक्ष द्या
१ आपण जगात सत्याविषयी साक्ष देण्यासाठी आलो आहोत हे येशूने स्पष्ट केले. त्याने म्हटलेः “मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.”—योहान १८:३७.
२ येशूने आपल्या आवेशी प्रचारामुळे यहोवाच्या नामाचा सन्मान केला. याशिवाय लोकांची आध्यात्मिक दयनीय स्थिती बघून त्याने त्यांच्याविषयी खरा कळवळा व्यक्त केला. मत्तयाने त्याच्या कार्याविषयीची अशी नोंद केली आहेः “नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत . . . फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३५, ३६) येशूप्रमाणेच आम्ही यहोवाविषयी राखून आहोत ती निष्ठा व आम्हास इतरांविषयी वाटणारे प्रेम यांनी प्रचार करायला आपल्याला चालना दिली पाहिजे.
आमची महत्त्वपूर्ण नेमणूक
३ लोक तसेच यहोवाविषयी वाटणारे खरे प्रेम आपल्याला, लोकांना यहोवा व त्याच्या अद्भुत कार्याविषयी शिक्षण देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास उद्युक्त करते. (स्तोत्र ९६:२, ३; १४५:१०-१३) तरीपण, रोजची कामाची दगदग, जीवनविषयक चिंता तसेच विचलीत करणाऱ्या बहुत गोष्टी यामुळे आमचे लक्ष साक्षीकार्यावरुन सहजपणे दुसरीकडे नेले जाते. यासाठीच देव व त्याच्या राज्याविषयी साक्ष देण्याची निकड आम्ही आपल्या नजरेसमोर सातत्याने ठेवली पाहिजे. आपल्याला हे जे जीवन वाचविण्याचे सर्वात महत्त्वाचे काम सोपविण्यात आले आहे त्यापासून आम्ही स्वतःला बाजूला होऊ देऊ नये. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) यहोवाच्या सेवेत मग्न राहणे हे आम्हासाठी संरक्षक ठरते व त्यामुळे जे सत्याचा संदेश ऐकण्याच्या गरजेकडे लक्ष देतात त्यांना चिरकालिक फायदे देते.—१ करिंथ. १५:५८.
४ तुम्हाला नियमित किंवा साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करता येईल का? याकरवी तुम्हाला आपल्या सेवेचे क्षेत्र वाढवता येण्यासाठी तुमच्या परिस्थितीचा विचार करुन बघा. तुम्ही आपल्या प्रापंचिक कामापासून सेवानिवृत्त झाला आहात का? तर मग, आपणापाशी असणारा वेळ अधिक पूर्णपणे प्रचाराच्या कार्यात का घालवू नये? शाळेला जाणारे काही युवक अद्याप साहाय्यक पायनियरींगचे काम नियमितपणे करीत आहेत. त्यांना हे काम शारीरिकदृष्ट्या व आध्यात्मिकदृष्ट्या तजेला देणारे असल्याचे आढळले आहे व त्यांच्या अंतःकरणाला आनंद मिळाला आहे.
५ सत्याची परिणामकारक साक्ष देण्यासाठी वेळेचा सूक्ष्म आराखडा तयार करण्याची गरज आहे. (इफिस. ५:१५, १६) साहाय्यक पायनियरींगसाठी दर महिन्यात दर दिवसाला केवळ दोनच तास हवेत. काहीजण लवकर उठून कामाला किंवा शाळेला निघण्याआधी एक तास सेवा करतात. पुष्कळ मंडळ्यांनी सायंकाळच्या साक्षीकार्याची योजना आखून साहाय्यक पायनियरांची मदत केली आहे. ज्यांनी साहाय्यक पायनियरींगकरता आपला वेळेचा सुयोग्य आराखडा करून त्यात चांगली यशप्राप्ती मिळविली आहे अशांबरोबर बोलणी करून त्यांचे साहाय्यकारी प्रस्ताव संपादून तुम्हालाही उत्तेजन मिळवता येईल.
६ यहोवा देवाने आपल्या सेवकांच्या बाबतीत नेहमी चांगुलपणा दाखविला आहे. ज्यांनी त्याची सेवा विश्वासाने केली अशांना मुबलक आशीर्वाद मिळाले. यहोवाचा हा चांगुलपणा अद्यापही जे त्याजवर प्रेम व्यक्त करतात अशांसाठी दाखवला जातो. आपण सत्याविषयी साक्ष देण्यामध्ये आमच्या परिस्थितीनुसार जे काही करू शकतो त्याविषयी तो संतुष्ट असतो.—इब्री. ६:१०.