आमच्या विश्वासाचा पाया येशू ख्रिस्त याचा आदर करा
१ यहोवाच्या संकल्पातील येशू ख्रिस्ताची भूमिका समजावून घेणे हे फार महत्त्वाचे आहे. येशूने आज्ञांकित मानवाकरिता त्याच्या जीवनाची खंडणी दिली. (मत्तय २०:२८) येशू ख्रिस्ताद्वारे पुरविलेल्या यहोवाकडील या प्रेमळ तरतुदीविना आम्हास कोणाही भावी आशेविना त्याच मरणप्राय स्थितीत राहावे लागले असते.
२ खासकरुन मेमोरियलच्या काळात, आम्ही येशूचे जीवन, त्याची शिकवण व त्याचे बलिदान यांच्यावर खासकरून लक्ष देतो. (लूक २२:१९) ती याच गोष्टीची आवड प्रदर्शित करुन की, “देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” यास्तव, आम्ही देवास आणि ख्रिस्तास सन्मानीत करावे या ईर्षेने सुवार्ता प्रचारात सहभागी होण्यात प्रवृत्त होतो. हे आम्ही कसे करू शकतो?—रोम. ५:८, १०.
कृतज्ञतेचे प्रदर्शन
३ आम्ही हे ओळखून आहोत की येशू ख्रिस्ताच्या मस्तकपदाखाली यहोवाची दृश्य संस्था आपले काम चालवीत आहे. येथे पृथ्वीवर आम्हास आवश्यक अशा आध्यात्मिक (पौष्टीक) आहाराची पुरवणूक विश्वासू दासवर्ग करीत आहे. येशूने त्याच्या युवकपणापासूनच त्याच्या पित्याच्या वचनाबद्दल गुणग्राहकत्व दाखविले होते व आम्हीही इतरांना शिकवण देण्याचे उद्दिष्ट लक्षात ठेवून अभ्यास आणि चांगली समज करून घेणे यांचे द्वारा त्याचे उदाहरण अनुसरु इच्छितो. (मत्तय २४:४५, ४६; लूक २:४६-५०) आम्ही संस्था व तिजद्वारा जो आध्यात्मिक अन्नपुरवठा केला जातो त्याबद्दलची कृतज्ञता, तिचे मार्गदर्शनास अनुसरणे आणि वडीलवर्गाशी सहकार्य करीत राहून व्यक्त करतो.
४ आम्ही जे काही देववचनातून शिकतो ते आचरणात आणून ख्रिस्ताबद्दल आदर आणि आपल्या सेवकपणाबाबतीतचे प्रेम व्यक्त करू शकतो. येशू, हा कोणाही चुकीविना महायाजक असा “पापी जनांपासून वेगळा” होता. (इब्री. ७:२६) एक बोलतो आणि एक करतो अशा आरोपाखाली तो कधीच आला नाही. मग, एकमेकांचे जर दास आहोत तर आम्ही त्याच उच्चपातळीचे असण्यास हवे. यास्तव, जर आम्ही इतरांना यहोवाकडील नितीमान व्यवस्थीकरणाबाबत आर्जवून सांगतो तर आमचे आजचे राहणीमान तसेच असावे जे त्या नवीन जगाशी संबंधित असल्याची ओळख देईल.—मत्तय ७:२१; १ करिंथकर १:१८; १ योहान २:१७.
ख्रिस्ताच्या मस्तकपदाखालील प्रचारकार्य
५ मे आणि जून महिन्याचे दरम्यान आम्ही टेहळणी बुरुज मासिकाची वर्गणी सादर करू. आम्ही येशूचा सन्मान, संभाव्य वाचकाला टेहळणी बुरुज प्रकाशनाच्या उद्देशाबाबत जे काही पान २ वर दर अंकात प्रसिद्ध होते ते विवेचीत करावे की, “सध्या राज्य करीत असलेला राजा येशू ख्रिस्त, ज्याने आपल्या स्वरुधिराने सबंध मानवजातीकरता सार्वकालिक जीवनप्राप्तीचा मार्ग मोकळा केला आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे प्रोत्साहन देते.” जेथे कोठे शक्यता, संधि असेल तेथे प्रथम वर्गणी सादर करण्याची खात्री राखावी. जर वर्गणी स्विकारली नाही तर तुम्ही सत्याचे बीजारोपणार्थ दोन मासिके व एक माहितीपत्रक देऊ शकता.
६ आमच्या स्मारकविधीच्या समारंभास उपस्थित राहून अद्यापि यहोवाचे साक्षीदार बनलेले नाहीत अशा लोकांच्या एका मोठ्या समुदायाने येशूला आदर प्रदर्शित केला. मग, अशांची वैयक्तीक शास्त्राभ्यास देण्याद्वारा आध्यात्मिक उन्नती करण्यात मदत करू शकतो का? कोणी त्यांची भेट घेईल व जरूर ती मदत करण्याची तजवीज करील तर फार बरे! आपल्या प्रेमळ सहाय्याने कदाचित कोणी पुढल्या वर्षीच्या प्रभूच्या सांजभोजनाच्या सोहळ्यापर्यंत आम्हासोबतीत सेवकपणात सहभागी झालेला असेल.
७ आम्ही केवढे कृतज्ञ की, आमच्या मुक्तीदात्या येशूने आम्हाकरिता एवढे प्रेमळ बलिदान दिले. त्याने आम्हास केवढी निश्चित आशा पुरविली. त्याचे जीवनाक्रमण आणि सेवकपणाचे अहवाल, आम्ही अनुसरण्याचे केवढे उत्तम उदाहरण पुरवितो.