वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९० पृ. १
  • धैर्याने सुवार्ता घोषित करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धैर्याने सुवार्ता घोषित करा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवावर आत्मविश्‍वास प्रदर्शित करणे
  • धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • ‘देवाचे वचन धैर्याने बोला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ५/९० पृ. १

धैर्याने सुवार्ता घोषित करा

१ ऐतिहासिकपणे, खरे ख्रिश्‍चन त्यांच्या धाडसाबद्दल परिचित आहेत. यात पेत्र व योहान या प्रेषितांची प्रमुख उदाहरणे आहेत. कैदखान्यात टाकून धमकावण्या दिल्या असताही या प्रेषितांनी निर्भिडपणे व मोठ्या धैर्याने सत्याची ग्वाही दिली. (प्रे. कृत्ये ४:१८-२०, २३, ३१ब) पौलानेही, जरी त्याला पुष्कळसा छळ सहन करावा लागला तरी त्याच्या सेवकपणात अवघड क्षेत्रावरही मोठ्या धैर्याने त्याचे सेवकपण पार पाडिले.—प्रे. कृत्ये २०:२०; २ करिंथ ११:२३, २८.

२ हे कसे की, सबंध इतिहासभर प्रतिकूल परिस्थिती, विरोध असताही प्रेषित तसेच इतर ख्रिश्‍चनही नेटाने व धैर्याने ही सुवार्ता घोषित करीत राहिले? या प्रश्‍नाचे उत्तर प्रेषित पौल १ थेस्सलनी २:२ मध्ये देताना म्हणतोः “देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.” अशाच प्रकारे पेत्र व योहान तसेच इतर शिष्यांनीही मोठ्या धैर्याने सुवार्ता घोषित केली. बंदिशाळेतून सुटका झाल्यावर पेत्र आणि योहान आपल्या सोबतीच्या शिष्यांना भेटले व सर्व अहवाल कळविला. प्रार्थनेत त्यांनी यहोवापाशी ‘पूर्ण धैर्याने त्याचे वचन सांगता यावे’ म्हणून त्यांना धैर्य आणि शक्‍ती देण्यास विनवणी केली. या प्रार्थनेचे देवाकरवी तत्काळ उत्तर देण्यात आले जेव्हा “ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.”—प्रे. कृत्ये ४:२९, ३१.

यहोवावर आत्मविश्‍वास प्रदर्शित करणे

३ प्रेषितांठायी हा आत्मविश्‍वास होता की यहोवा त्यांचा पाठीराखा आहे. यहोवाने त्याच्या शास्त्रवचनांद्वारे जी सर्व अभिवचने दिली होती ती सत्य ठरत होती. शिवाय ज्याची पूर्णता होणार होती त्यांची येशू ख्रिस्ताद्वारे हमी दिली होती. मग, धैर्याने सुवार्ता घोषित करीत राहण्यात आम्हाठायीही तोच आत्मविश्‍वास आहे का? आम्ही जरी अन्य भाषा बोलत नाहीत किंवा दुखणाईतास बरे करीत नाही तरीही यहोवाच्या पाठिंब्याचा आम्हापाशी सबळ पुरावा आहे. जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रीय भविष्यवादांची पूर्णता होत असल्याचे पाहतो, त्यावेळी आम्हास देवराज्याविषयीची सुवार्ता धैर्याने बोलाविशी वाटत नाही का?

४ हे अपेक्षित आहे की, अशा धिटाईच्या प्रचार कार्यास विरोध होणार. (योहान १५:२०) हेच, येशू आणि पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे बाबतही होते. पण यामुळे ज्या ईर्षेने ते प्रचार कार्य करीत होते त्यात कोणतेही अडखळण आले नाही किंवा त्यांनी ते सोडून दिले नाही. प्रत्यक्षात अशा विरोधांनी त्यांना अनेक वेळा राज्याची ही सुवार्ता अधिक मोठ्या प्रमाणात गाजविण्याची संधि दिली. (प्रे. कृत्ये ४:३, ८-१३अ) महत्त्वाच्या विषयावरील आमचा ख्रिश्‍चन विश्‍वास देवाच्या वचनावर आधारीत असल्यामुळे वेळोवेळी आम्हास आमच्या भूमिकेबद्दलचा जाब देण्याची हाक असते. अशा योगाकडे आम्ही धैर्याने सुवार्ता घोषित करण्याचे प्रसंग या दृष्टीकोणातून पाहतो. तसे करण्याद्वारा आम्ही येशू ख्रिस्ताचे व त्याच्या प्रेषितांचे अनुकरण करतो.

५ साहाय्यक पायनियरांनी सुवार्ता घोषणेत आम्हास अधिक व्यापक आघाडी मिळवून दिली आहे. मे महिन्यात अनेक साहाय्यक पायनियरींग करतील. इतरही काही जन येत्या काही महिन्यात ती करण्याच्या तयारीस लागलेत. तुमची परिस्थिती तशी परवानगी देईल का? साहाय्यक पायनियरींगच्या सेवेत सहभागी होण्यास आम्ही कसून प्रयत्न केल्यास आम्ही स्वतःबाबत पौल आणि बर्णबासारखे असल्याचे शाबीत करू. प्रे. कृत्ये १४:३ म्हणतेः “ते बरेच दिवस तेथे राहिले व यहोवाविषयी निर्भिडपणे बोलले.” जर आम्ही इतर कामातून वेळ काढून महिनाभरात क्षेत्र सेवेत ६० तास खर्च करू शकतो, तर आम्हावरील आशीर्वादात निसंशये वाढ होईल.

६ सेवकपणातील धैर्य, खासकरुन वर्गणी सादर करण्यात साहाय्यक ठरते. मासिकात देववचनावर आधारीत असा जीवनरक्षक संदेश आहे. याकरिताच तो आम्ही मागे रोखणार नाही तर आमचा कित्ता येशू आणि त्याचे प्रेषित यांचे अनुकरण करू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा