पायनियरींगद्वारा यहोवावरील भरवसा व्यक्त करणे
१ राज्याचे आपुलकीस प्रथम स्थान देण्यास यहोवावरील भरवशाची गरज आहे. (स्तोत्र. ५६:११; नीती ३:५; मत्तय ६:३३) जग ज्या गोष्टींना महत्त्वाचे मानते त्यापासून आमच्या विचारांना पूर्णपणे दूर करून आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. जग जरी जडवादीय गोष्टींच्या मोहांना अधिक आकर्षित बनवीत असले तरी यहोवा आम्हास समज देतो की ज्या खरोखरीच गरजेच्या वस्तु आहेत तेवढ्यातच तृप्त रहा.—१ तीम. ६:८; फिलिप्पै १:१०.
२ हे खासकरुन त्या ख्रिस्ती युवकांसमोरील आव्हान आहे जे यहोवाच्या आदेशांचा पुरस्कार तेवढ्याच गंभीरतेत करतात. जीवनात यशप्राप्ती करावयाची आहे तर उच्च शिक्षण घेतलेच पाहिजे असे दबाव शिक्षक तसेच सोबत्याकडून, शाळेत असताना त्यांचेवर जरुर आले असतील. तरीपण, आवश्यक अशा सर्व जीवनोपयोगी गोष्टी आपणापाशी असल्याचे ओळखून अनेक ख्रिस्ती युवकांनी सूज्ञपणे अशा दबावांना बळी पडण्याचे टाळले व पायनियरींग करणे याला आपले जीवनध्येय ठरविले. यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेऊन त्यांनी त्यांच्या गरजांची पूर्तता करणे त्याजवर सोपविले.—स्तोत्र. ६२:२; ६८:१९; १ तीम. ५:८; ६:९, १०.
व्यक्तीगत परिस्थितीची उजळणी करा
३ नोव्हेंबर १५, १९८२ च्या द वॉचटावर ने आम्हा प्रत्येकाला हे विचारण्याचे उत्तेजन दिले की, “‘मी पायनियर नाही,’ या गोष्टीबद्दल मी यहोवासमोर स्वतःचे पुरेसे समर्थन करू शकतो का?” अनेकांस त्या काळी पायनियरींग करण्याची सुलभता नव्हती. पण यामुळे ते निराश झाले नाहीत. कारण ते हे जाणून होते की कोणाही परिस्थितीत संपूर्ण हृदयाने केलेली केवढीही सेवा यहोवाला नेहमी मान्य असते. (मीखा ६:८; २ करिंथ ८:१२) पुढे जसजशी व्यक्तीगत परिस्थिती बदलली तसतसे अनेकांनी १९८२ मधील वॉचटावरच्या लेखाचा परत प्रार्थनापूर्वक विचारविनिमय केल्यामुळे अलिकडेच नियमित पायनियरींगला सुरवात केलेल्या हजारो जणांमध्ये त्यांनाही सामील होता आले.
४ १९८२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या विधानाच्या वेळी तुमची परिस्थिती पायनियरींग सेवेत प्रवेश करण्यास शक्यतेची नव्हती, तर आता तुमच्या परिस्थितीत बदल झाला आहे का? गतवर्षी अमेरिकेत १७,००० पायनियर अर्ज हाताळले गेले. यात काय संशय की यांच्यापैकी अनेक आधीच पायनियरींग करु इच्छित असतील पण परिस्थितीच्या दबावामुळे थांबावे लागले असेल.
५ काही प्रकरणात पायनियर सेवेबाबत एखाद्या ठायी असलेला मानसिक कल, दृष्टीकोन यात बदल करण्याची गरज भासली असेल. किंवा फक्त सेवेकरता एक उत्तम कार्यक्रम आखण्याचे बाकी असेल. काही वेळा, व्यक्तीगत कामे आणि जबाबदाऱ्या यांच्यात केलेले बदल यांची पायनियर सेवेकरता मार्ग मोकळा करण्यास गरज असते. या कारणास्तव, ह्या विषयाला यहोवाकडिल प्रार्थनेत नित्यनियमाने उल्लेख, नित्य गोष्ट बनवावी; पण सोबतच आत्मपरिक्षण आणि आमच्या सद्य परिस्थितीचे अवलोकन देखील जोडलेले असावे. हजारोंनी असे केले व आज ते पायनियर सेवेच्या आशीर्वादांचा आनंद लुटत आहेत.
६ आपल्या परिस्थितीचा निर्भिड आढावा जर हे सूचित करीत आहे की, जवळच्याच काळात तुम्हाला पायनियरींग करणे शक्य होईल तर मग, तोपर्यंतच्या काळापावेतो सतत साहाय्यक पायनियरींग करीत राहण्यास का सुरवात करू नये? या काही महिन्यात तुम्ही कदाचित चांगल्या परत भेटी तसेच पवित्र शास्त्राभ्यास सुरु करु शकाल. हे करणे कदाचित तुमचे अगदी सुकरपणे नियमित पायनियरींगचा स्वीकार करण्यात मदत पुरवील. कदाचित नवे कार्यवर्ष सुरु होण्याच्या आधीच हे शक्य झाल्याचे तुम्ही अनुभवू शकाल.
७ या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसात यहोवा महान गोष्टींची पूर्तता करीत आहे. हीच ती वेळ आहे जीत त्याच्या अधिक समीप जावे आणि “प्रति दिवशी” त्याच्या नामास गौरवीत राहावे. (स्तोत्र. १४५:२; याकोब ४:८) आम्हास परिस्थिती मुभा देत आहे व त्याकरता आपण पात्र आहात तर पायनियर सेवा ही यहोवावर भरवसा ठेवून असल्याचा आणखी एक पुरावा ठरो.—स्तोत्र. ९४:१८.