वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९० पृ. ४
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वैयक्‍तीक खात्रीसह
  • अंतःकरणापासून बोला
  • वागणूकीतील विशिष्ट ढब टाळा
  • सुवार्तेचा प्रचार दृढ विश्‍वासाने करणे
    आमची राज्य सेवा—२०००
  • परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • पालकांनो, आपल्या मुलांना “तारणासाठी सुज्ञ” व्हायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • घरमालकाला तर्क करण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ३/९० पृ. ४

सुवार्ता सादरता

वैयक्‍तीक खात्रीसह

१ थेस्सलनीकाकर मंडळीने केलेल्या परिश्रमाची आठवण करून प्रेषित पौलाने त्यांना म्हटलेः “आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने; पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने [भक्कम खात्रीने] तुम्हास कळविण्यात आली. . . . तुम्ही . . . आमचे व प्रभूचे अनुकारी झाला.” (१ थेस्सलनी १:५, ६) होय, पौल व त्याचे सहकारी थेस्सलनीकामधील मंडळीसह ही खात्री बाळगून होते की, ते सर्व देवाची संभावितपणे भक्‍ती करीत होते. त्यांच्याठायीची ही खात्री त्यांच्या संभाषणात व्यक्‍त होई. आमच्याही सेवकपणात तशीच भक्कम वैयक्‍तीक खात्री व्यक्‍त होण्यास हवी.

अंतःकरणापासून बोला

२ आम्ही आमच्या सेवकपणात वैयक्‍तीक खात्री कशी परावर्तित करू शकतो? मूलभूतपणे त्यात, जे काही आमच्या अंतःकरणात आहे ते बोलून दाखविणे हे त्याजशी संबंधित असते. सुवार्ता सादर करण्याच्या आमच्या पद्धतीने हे व्यक्‍त करण्यास हवे की जे काही बोलत आहोत त्यावर खरोखरी आमचा विश्‍वास आहे. आम्ही जर अंतःकरणापासून बोलत असलो तर त्यातील आमचा खरेपणा व वैयक्‍तीक खात्री ही चकाकेल; कारण “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.”—लूक ६:४५.

३ आम्हास जर वैयक्‍तीक खात्री परावर्तित करावयाची आहे तर आम्हाठायी सत्याबद्दल तसेच यहोवाच्या संस्थेबद्दल खरी, तीव्र आवड असली पाहिजे. आपल्यापाशी सत्य असताना ते शिकण्यात इतरांचे साहाय्य करणे ही तुम्हावरील जबाबदारी आहे. या सर्व गोष्टीबद्दल विधायकपणे विचार केल्यास तो आम्हास सत्य हे तेवढ्याच खात्रीने सादर करण्यास प्रवृत्त करील. येशूने एका शमरोनी स्त्रीबरोबरच्या संभाषणाद्वारे आम्हाकरता याचे एक उत्तम उदाहरण समोर मांडले.—योहान ४:२१-२४.

४ आम्ही ज्या प्रकारे प्रकाशने सादर करीत असतो ते हे प्रतिक्षेपित करीत असते की आम्ही अंतःकरणपूर्वक बोलत आहोत की नाही. सुवार्ता सादर करते वेळी आम्ही जे प्रकाशन सादर करणार त्याजशी परिचित असले पाहिजे व घरमालकाठायी त्याची आवड उत्पन्‍न करण्यास त्यामधील निवडक मुद्दे लक्षात ठेवावे. ज्यामुळे प्रकाशन सादर करताना आम्हाठायीचा भरवसा अधिक भक्कम होईल.

वागणूकीतील विशिष्ट ढब टाळा

५ काही वेळा वागणूकीतील विशिष्ट ढब, आमचा प्रांजळपणा व खात्री यांच्याबद्दलच्या घरमालकाच्या दृष्टीकोनावर परिणाम करू शकते. जरूर नसताही आमच्याच प्रकाशनाकडे पहात राहणे किंवा घरमालकाशी बोलत असताना आमची नजर इतरत्र फिरवीत राहणे यामुळे कदाचित घरमालकाची अशीही समज होईल की जे बोलत आहेत त्याची आम्हालाच खात्री नाही. तर बोलताना, हे सूचित होण्यास हवे की आम्ही जे बोलतो ते विश्‍वासाने बोलत आहोत म्हणून घरमालकाकडे पाहून बोलावे.

६ तोंडावरील चर्या ही पण महत्त्वाची आहे. कारण तिच्याद्वारे सर्वसाधारणपणे तुमच्या अंतःकरणात काय आहे हे प्रकट होते. पूर्ण खात्री आणि घरमालकाबद्दलचा कळवळा ही तुमच्या चेहरेपट्टीवरून व्यक्‍त व्हावी.

७ आम्ही आपली जी छाप मागे सोडतो तीत आमच्या शब्दांची निवड ही एक मोठे स्थान राखून असते. आम्ही जर सवयीनुसार वारंवार “मला वाटते,” तसेच “कदाचित,” हे शब्द व इतर काही उच्चारत राहिलो तर घरमालकाठायी ही कल्पना उद्‌भवेल की जे काही बोलत आहे त्याची यांनाच खात्री नसावी. यासाठी, आमच्या शब्द निवडीने आम्हाठायीच्या खात्रीस प्रतिबिंबीत करावे.—मत्तय ७:२८, २९ पडताळा.

८ सुवार्ता सादर करण्यात आपण जेवढे परिश्रम, वैयक्‍तीक खात्रीसह कराल, त्याकरवी तुम्ही हा आत्मविश्‍वास बाळगू शकालः “प्रभुमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.”—१ करिंथ. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा