वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km ३/९० पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

मार्च: इंग्रजीमधील १९२ पृष्ठांची जुनी दोन पुस्तके रु. १०; तर प्रांतिय भाषेतील एक रु. ५. (कृपया रा.से.८८ फेब्रुवारी मध्ये “घोषणा” सदर पहावे जेथे कोणती प्रकाशने द्यावीत याची यादी दिली आहे.)

एप्रिल: सर्व्हायव्हल इन्टू अ न्यू अर्थ्‌ हे इंग्रजी पुस्तक रु. १०. (जेथे हे प्रकाशन उपलब्ध नसेल तेथे दोन जुनी पुस्तके १० रुपयांना द्यावीत.) प्रांतिय भाषेतः एक रु. ५.

मे व जून: वॉचटॉवर ची वर्गणी. एक वर्षाच्या वर्गणीसाठी रु. ४०. याची सहा महिन्याची व दर महिना अंकाची वार्षिक वर्गणी रु. २०. दर महिना अंकाची सहा महिन्याची वर्गणी होत नाही.

जुलैः खास सादरतेचे १९२ पृष्ठांचे एक पुस्तक रु. ५.

ऑगस्ट व सप्टेंबरः स्कूल या इंग्रजी माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक.

● मंडळीचे सचिव व सेवा देखरेखे यांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. कोणाला तासांचे ध्येय पूर्ण करण्यात काही अडचणी असल्या तर वडिलांनी मदतीची व्यवस्था करावी. प्रस्तावासाठी संस्थेची ऑक्टोबर १, १९८८ आणि ऑक्टोबर १, १९८९ ची पत्रे (एस-२०१) पहावीत. तसेच आमची राज्य सेवा हिच्या ऑक्टोबर १९८६ च्या पुरवणीतील परिच्छेद १२-२० पहावेत.

● स्मारकदिनाचा समारंभ, मंगळवार, एप्रिल १०, १९९० रोजी साजरा केला जाईल. भाषण जरी थोडे आधी सुरु झाले तरी कृपया हे आठवणीत असू द्या की, स्मारकविधीची भाकर व द्राक्षारस ही बोधचिन्हे फिरविणे हे त्या दिवसाच्या सूर्यास्तानंतर काही वेळाने करावे. यासाठी स्थानिकरित्या सूर्यास्त होण्याची नक्की वेळ मिळवा. त्या दिवशी इतर कोणतीही सभा चालवू नये. तुमची मंडळी मंगळवारी सर्वसाधारणपणे सभा भरवीत असेल तर ती त्याच आठवडी दुसऱ्‍या कोणा दिवशी, राज्य सभागृह उपलब्ध असले तर तेव्हा स्थलांतरीत करू शकता. तुमची सेवा सभा त्या दिवशी होत असली तर त्यातील मंडळीसाठी असणारे महत्त्वाचे भाग पुढील आठवड्याच्या कार्यक्रमात सामील करावेत.

● विभागीय देखरेख्यांनी एप्रिल १ नंतर शक्य तितक्या लवकर “पोलंडमधील अधिवेशनात यहोवाठायी आनंद करणे” हे स्लाईड प्रदर्शन दाखविण्याचा आराखडा ठेवावा.

● प्रकाशने पुन्हा उपलब्धः

पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! —इंग्रजी, बंगाली, बर्मी, कन्‍नड, मल्याळम.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा