प्रश्न पेटी
● मंडळीतील सभामध्ये ॲटेन्डन्टसचे काम करणाऱ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या येतात?
ॲटेन्डन्टसनी जे सर्व सभांना येतात त्यांचे उबदार व हार्दिक स्वागत करण्यास हवे. त्यांच्या जबाबदारत, उशीरा येतात त्यांची बसण्याची सोय, उपस्थिती नमुद करणे, सुव्यवस्थता व सुरक्षितता राखणे, व राज्य सभागृहाच्या हवेशीरपणाकडे लक्ष देणे समाविष्ठ आहे. ॲटेन्डन्ट्सनी मैत्रीपूर्ण, व त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात पुढाकार घेणारे बांधव असावे.—ओ.एम. पृ. ६३-४.
ॲटेन्डन्टसनी नविन लोकांच्या गरज कडे लक्ष दिले पाहिजे, त्यांना त्यांचे हार्दिक स्वागत झाल्यासारखे वाटू दिले पाहिजे व त्यांना जागा मिळविण्यास मदत केली पाहिजे. मंडळीतील सर्वांनी नविन लोकांना मदत करण्यास व परिचित होण्यास व त्यांचे स्वागत करण्यात तयार असले पाहिजे. उशीरा आलेल्यांना सूचीकडे मार्गदर्शित करताना जे आगोदरच बसले आहेत त्यांना विचलीत न करण्याचा ॲटेन्डन्टनी प्रयत्न करावा. कांही वेळेस अभ्यासले जाणारे मासीक नवोदीतास ते पुरवितील.
सभे दरम्यान सुव्यवस्था राखणे अत्यावश्यक आहे. आम्ही पालकांना त्यांची लेकरे सभेस आणण्यास उत्तेजन देतो हे पहाता कांही वेळेस हे विचलता आणते. परंतु ज्यावेळेस लेकरे चुळबूळ करतात किंवा अनावर होतात तेव्हा ॲटेन्डन्ट मदत देवू शकतात म्हणजे पालकांना, त्यांच्या लेकरांना कांही काळ सभा दालनातून बाहेर नेण्याचा इशारा करतील. लहान लेकरे असणारे पालक त्यांना झटकन बाहेर जाता येईल अशा ठिकाणी बसले तर हे फारच थोड्या विचलतेत केले जाऊ शकते.
सुरक्षितता धोक्यात असले अशा विभागात सुव्यवस्थेत बाधा आणणारे किंवा विचलता देणाऱ्या विरोधका विरूद्ध संरक्षण देण्यास ॲटेन्डन्टसना नेमूणका द्याव्यात. राज्यसभागृहात असणारा कोणी सभेत दंगा करण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यास निघून जानणयाची विचारणा केली जावी. त्याने ते धुडकावले व गोंधळ करण्याचा प्रयत्न केला तर वडीलांनी अधिकाऱ्यासोबत संपर्क साधावा. कांही विभागात सभे दरम्यान राज्यसभागृहाच्या पार्किंग विभागात लक्ष ठेवण्यात बांधवास नियुक्ती देणे जरूरीचे ठरेल.—आ.रा.से. १२/८४, पृष्ठ ४.
उपस्थीतीची मोजदाद केली जाते तेव्हा सर्व प्रौढ तसेच जी बालके लक्षपूर्वक ऐकतात व फायदा घेतात तो मर्यादीत असेल तरी त्यांची मोजदाद केली जावी.—आ.रा.से. ८/७९, पृष्ठ ४.