कैद्यांसोबत पत्रव्यवहार राखणे
१ विविध स्थरातील लोकांना राज्य संदेशाच्या संपर्कात आणले जात आहे. मग, कैदी लोकांच्या बाबत काय? तरूंगवासात असणाऱ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दाखविला असे कांही चांगले अहवाल मिळाले आहेत. पवित्रशास्त्राभ्यास व सभा अशा ठिकाणी चालविल्या जात आहेत. याचा परिणाम नवीन शिष्य त्यांचे जीवन यहोवास समर्पित करून बाप्तीस्मा घेत आहेत.
२ पुष्कळशा प्रकरणात तरूंगवासात असणाऱ्यांना साक्ष पत्रव्यवहाराने दिली जात आहे. याबाबत आम्हास सावधानतेचा इशारा पुन्हा देणे जरूरीचे वाटते. पत्रव्यवहार करू इच्छिणाऱ्या कांही कैद्यांचा हेतु प्रश्नार्थक आहे असे आढळून आले आहे. तरूंगात असणाऱ्यांना पत्रे लिहून शास्त्रवचननीय माहिती पुरविणे, उत्तेजन किंवा जरूरीचे तेव्हा पवित्रशास्त्रीय प्रकाशने देणे उचित ठरले, पत्रव्यवहारामार्फत पैसे किंवा बक्षीसे यांची विचारणा केली असली तरी ते पाठविणे अयोग्य ठरेल व ते पाठवू नयेत.
३ याची जोरदार शिफारस केली जाते की केवळ प्रशिक्षित बांधवांनीच पुरूष कैद्यांसोबत पत्रव्यवहार करावा. प्रशिक्षित बहिणींनी स्त्री कैद्यांसोबत पत्रव्यवहार करावा. मंडळीच्या एकाद्या सदस्याने तरूंगास भेट देऊन त्यातील कोणासोबत सख्य राखू नये.
४ कैद्याने आस्था दाखविली असेल तर अशाचे नाव व पत्ता तो तुरूंग ज्या शहरात आहे तेथील विशिष्ठ मंडळीकडे तो सुपर्त करावा. तेथे असणारे जबाबदार बांधव कैद्यास भेट देतील व शक्य तो सत्याच्या प्रांजळ आस्थेवाईकासोबत अभ्यासाची योजना करतील.
५ तथापि आम्ही पुन्हा उल्लेख करू इच्छितो की कैद्यांसोबत व्यवहार राखताना सावधानता बाळगली गेली पाहिजे.