वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९० पृ. १
  • प्रत्येक संधीवर मासिके सादर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रत्येक संधीवर मासिके सादर करा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लोकांसोबत बोला
  • इतर प्रसंग
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिक कार्यासाठी वेळ राखून ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km १/९० पृ. १

प्रत्येक संधीवर मासिके सादर करा

१ शंभरापेक्षा अधिक वर्षांपासून द वॉचटॉवर हे राज्याचे सत्याचे मुख्य उपकरण ठरले आहे. ते कौशल्यपूर्ण रितीने देव वचनाचा उपयोग चुकांचा भेद पाडणारी तरवार व खोट्या धर्माच्या शिकवणूकीस उघड करणारे म्हणून करीत आहे. त्याचा सोबती अंक अवेक! सुद्धा सत्याची घोषणा करतो. धार्मिकतेकडे कल असणाऱ्‍या लोकांची आस्था संस्थेच्या इतर प्रकाशनात मिळणाऱ्‍या शास्त्रवचनीय साहित्यासाठी ते वाढवील. अधिक लोकांच्या हाती ही मासिके जाण्यासाठी आम्ही काय करू शकतो?

२ पहिली गोष्ट मासिकात काय सामावलेले आहे ते जाणणे होय. याचा अर्थ ती प्राप्त होताच वाचणे व त्यातील लेखासंबधी मंडळीतील इतरासोबत बोलणे. ही गोष्ट आम्हास इतरांना मासिके आवेशाने सादर करण्यास व त्यांच्या मोलाबाबत निश्‍चयी दृष्टीकोन राखण्यास मदत करील.

३ त्यानंतर इतरांना मासिके सादर करण्यास प्रत्येक सप्ताहात वेळ बाजूस काढून ठेवणे आहे. ही गोष्ट तुमच्या नियमित वेळापत्रकातील कार्य हालचालीतील बनवा. तुम्ही मासिके सादर करण्याच्या इतर संधीबाबत जागृत आहात का?

लोकांसोबत बोला

४ घरोघरच्या मासिक कार्यात असताना तुम्हास हे आढळेल की पुष्कळ लोक घरात नाहीत. परंतु तुम्हास जेथे लोक मिळतात त्याजसोबत तुम्ही बोलू शकता. लोक रस्त्यावरून चालत असतात तेव्हा त्यांना भेटा. मोटारीत बसून आहेत, बागेत काम करतात, सार्वजनिक बससाठी उभे आहेत व इतर, त्यांच्यासोबत बोला. विशिष्ट लेखास संदर्भित करून चित्तवेधक मुद्याकडे निर्देश करा. उत्कृष्ठ फोटोचा व चित्रांचा त्यांची आस्था चेतविण्यासाठी उपयोग करा. लोकांसोबत उबदार, मित्रत्वाने व निश्‍चयी रितीने बोला व मासिकातून तुम्ही वाचताना निवडलेले ठाम मुद्दे प्राजंळपणे सादर करा.

इतर प्रसंग

५ ह्‍या सूचना व्यापारी क्षेत्रात काम करताना सहाय्यक ठरतील. गिऱ्‍हाईकामुळे व्यापारी कार्यव्यग्र नाहीत अशा संधीचा फायदा घ्या. पुष्कळ प्रचारकांना नियमीत घरोघरच्या कार्यापेक्षा व्यापारी क्षेत्रात मासिके बाहेर देणे सोपे आढळळे अहे.

६ तुम्ही मासिक मार्ग वाढविण्याचा प्रयत्न केला आहे का? एकाद्या घरी किंवा दुकानात मासिके दिल्यावर त्यांना हे सांगा की दोन सप्ताहानंतर पुढील अंक घेऊन येण्यात तुम्हास आनंद वाटेल. पुष्कळांना हे घरपोच देणे आवडेल हे पाहून तुम्हास आश्‍चर्य वाटेल. हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी परत येऊन तुम्ही त्या व्यक्‍तीसोबत बोलता किंवा एकादे वाङमय देता तेव्हा अहवालात पुनर्भेट लिहिण्यास विसरू नका.

७ तुम्ही मासिके सादर करण्याच्या इतर संधीचा सुद्धा मागोवा घेऊ शकता, जसे की सायंकाळचे साक्षीकार्य, नातेवाईकांसोबत बोलणे, पुनर्भेटी घेणे, किंवा प्रवास करताना अगर खरेदी करीत असताना. या सर्व सूचनांच्या अवलंबनाने पुष्कळांना आमच्या पवित्र शास्त्रीय प्रकाशनाचे नियमित वाचक बनण्यास व सरतेशेवटी यहोवाचे स्तुतीपाठक बनण्यास मदत करू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा