खरी शांती व सुरक्षितता
१ इतरांच्या सोबत सहभागित्व करण्यासाठी कांहीतरी असणे हे उत्साही कार्यहालचालीस हातभार लावते. यास्तव जानेवारीत उत्साही राहण्यासाठी आम्हापाशी कारण आहे कारण आम्हाजवळ सचित्र, व्यावहारिक व सुधारित आवृत्तीचे ट्रू पीस ॲण्ड सेक्युरिटी—हाव कॅन यु फाईन्ड इट? हे पुस्तक आहे. जगाची परिस्थीती सध्या शांती व सुरक्षितता यास अधिक समयोचित विषय बनविते. हजारो वर्षाच्या मानवी अपयशाने पुष्कळांना मनुष्याजवळ त्याच्या अत्यावश्यक गरजांचे उत्तर नाही हे स्विकारण्यास भाग पाडले. परंतु आम्हास ठाऊक आहे की देवाचे राज्य हे उत्तर आहे. देवाच्या वचनाच्या उपयोगाने व आम्हापाशी असे सुंदर प्रकाशन सादर करण्यास असणे याने जानेवारीच्या आमच्या कार्यहालचाली आवेशी असण्यास मदत केली पाहिजे.
२ मग हे केवढे उचित आहे की जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने “अंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष” घोषित केले तेव्हा आम्हापाशी ते उपलब्ध होते! शांती व सुरक्षितता हा विषय पुष्कळ लोकांच्या ध्यानीमनी आहे. कांहीजण संयुक्त राष्ट्र संघाने ती आणावी अशी अपेक्षा करीतात. परंतु यहोवाचे सेवकांना हे माहीत आहे की येशू ख्रिस्ताच्या हातातील देवाचे राज्य हेच यहोवा खरी आणि चिरकालीक शांती व सुरक्षितता आणण्यास उपकरण म्हणून उपयोगात आणील.
३ आम्हास हे आठवतेच की १९८५ मधील “सचोटी रक्षणकर्ते” अधिवेशनात एक सावधानतेचा इशारा समावेश होता की १ थेस्सलनीकाकरास पत्र ५:३ ज्यात म्हटले आहे की, “जेव्हा ते म्हणतात की शांती आहे निर्भयता आहे तेव्हा त्यांच्यावर अकस्मात नाश येतो” याची पूर्णता संयुक्त राष्ट्र संघाने १९८६ मध्ये केलेल्या घोषणेची पूर्णता आहे असे सुचविले नव्हते. आम्हास हे ठाऊक नाही की यहोवा राष्ट्रांना त्याची शांती व निर्भयतेची मोहीम किती काळ चालू ठेवण्यास वाव देतो; तथापि ही गोष्ट आम्ही आता “मोठ्या संकटा”च्या जवळ येत आहोत तसेच ती पुढील पूर्णतेकडे नेणारी चाल आहे.—मत्तय २४:२१.
पुस्तक सादर करण्याची तयारी करा
४ जानेवारीच्या मोहिमेपूर्वी आम्ही ट्रू पीस पुस्तकातील भाग वाचून स्वतःस त्याच्यातील साहित्यासोबत परिचित केले पाहिजे. आम्ही पहिल्या अध्यायातील साहित्य वाचले तर जानेवारीत हे पुस्तक सादर करताना उपयोगात आणण्यासाठी पुष्कळ उत्कृष्ठ मुद्दे मिळतील यात शंका नाही.
५ घरमालकासोबत संभाषणाच्या विषयाची चर्चा केल्यानंतर, तुम्ही म्हणू शकाल: “हे आनंदी भविष्य फारच समीप आहे जेव्हा की तेथे खरी शांती व सुरक्षितता असेल. माझ्यापाशी या विषयावरील समयोचित प्रकाशन आहे. पुस्तकातील पहिल्याच परिच्छेदाकडे लक्ष द्या.” आम्ही परिच्छेद १ वाचू या व नंतर असे म्हणत संभाषण सुरु ठेवा: “येथे असणारे १ अध्याय सुरू होण्याआधीचे चित्र एका चित्रकाराची पृथ्वीवरील नंदनवन कसे असेल याविषयीचे विचार प्रकट करते. तुम्हास तुमच्या प्रियजनासोबत अशा शांति व सुरक्षित वातावरणात राहावेसे वाटणार नाही का? [प्रतिसादास वाव द्या] अशाप्रकारची शांती व सुरक्षितता तुम्हास कशी मिळविता येवू शकेल याची मदत हे पुस्तक करील, ते केवळ १० रूपयास तुमचे होईल.”
६ अजून एक सादरता, नीतिसूत्रे १:८ वाचल्यानंतर आम्ही पृष्ठ १९कडे वळू या व म्हणा: “देवाने दिलेले आनंदी अभिवचन आम्हास त्याची केवढी गरज आहे हे पटविणारा चित्तवेधक परिच्छेद आहे.” परिच्छेद २४ वाचल्यानंतर आम्ही असे म्हणत पुढे बोलू की “तसेच पुढील पृष्ठावरील परिच्छेद २८ वर असलेला मुद्दा पहा. [परिच्छेद वाचा] भवितव्यात काय राखले आहे व जागतिक समस्याबाबतचा देवाचा पर्याय हे तुम्हास चांगल्या रितीने समजण्यासाठी हे पुस्तक छापले गेले आहे. हे १० रू.च्या अनुदानाने तुमचे होईल.”
७ पूर्वी आस्था दाखविलेल्या लोकांना पुन्हा भेट देऊन हे पुस्तक त्यांना सादर करण्यात खात्रीदायक असा. आम्हास घरमालकास प्रथमतः गतवेळी देवाचे नवीन जगाचे अभिवचन बद्दल आठवण देणे उचित वाटेल व नंतर सांगा की आम्ही खरी शांती व सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे याची रूपरेषा देते. आम्ही त्यानंतर पृष्ठ ९१ कडे वळू शकतो त्यानंतर परिच्छेद १२ वाचा व त्यानंतर म्हणा “बचावाच्या खात्रीसाठी अजून कशाची आवश्यकता आहे. देवाच्या गरजा काय आहेत याविषयी सविस्तर माहिती देईल. हे १० रूपयास सादर केले जात आहे.”
८ हे पुस्तक पूर्वी अभ्यास घेतला पण ज्यांना यहोवासाठी भूमिका घेतलीच नाही अशाना सुद्धा देण्यास हे पुस्तक चांगले आहे. पृष्ठ १७५ वरील परिच्छेद १ वाचून निर्देश करा की पुस्तक त्यांनी योग्य निवड करण्यासाठी काय करावे यासाठी मदत करील ज्यामुळे खरी शांती व सुरक्षिता लाभेल.
९ ट्रू पीस ॲन्ड सेक्यूरिटी—हाव कॅन यू फाईन्ड इट? पुस्तक जानेवारी दरम्यानच्या खास मोहीमेत सादर करण्याच्या योजना आताच आखा. आम्ही इतरांना “शांतीदात्या देवापासूनची” खरी शांती व सुरक्षितता मिळविण्यास मदत करू.—रोम. १६:१०.