वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९२ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९४
  • ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • देवाच्या मार्गानुसार चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • ख्रिस्ती मंडळीला वडिलांची कशी मदत होते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
आमची राज्य सेवा—१९९२
km ६/९२ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ मंडळीपुढे ठराव मांडताना कोणती पद्धत आचरावी?

मंडळीच्या अनुषंगाने असणाऱ्‍या अनेक गोष्टीचा निर्णय स्थानिक वडीलांचा वर्ग घेत असतो. हे निर्णय घेताना हे जबाबदार बांधव शास्त्रवचनीय तत्त्वांचे तसेच संस्थेने पुरविलेल्या प्रस्तावांचे व मार्गदर्शनांचे अनुकरण करतात. तरीपण असेही काही निर्णय आहेत ज्यात मंडळी सहभागी होते व त्याला ठराव संमत करावा लागतो. अशा प्रकरणात सभांसाठी आणखी चांगली जागा बघणे, जमीन किंवा इमारत विकत घेणे, राज्य सभागृहाची पुनर्बांधणी किंवा बांधणी, राज्य आस्थेच्या वाढीसाठी संस्थेला अनुदान पाठविणे, इत्यादि गोष्टी समाविष्ट होतात. नेहमी लागणाऱ्‍या खर्चासाठी ठराव संमत करण्याची गरज नाही, तर सर्व प्रमुख किंवा असाधारण खर्चासाठी मंडळीकडून ठराव मंजूर करण्यास हवा.

हे ठराव कसे तयार व सादर केले जातात? वडीलांचा वर्ग यासंबंधाने कसून चर्चा करतो व यात मंडळी तसेच राज्य कार्याला मिळणारे लाभ लक्षात घेतो. त्यांचे सहमत झाल्यावर, कदाचित सेवा समितीतील एक वडील एक लिखित ठराव तयार करील ज्यात वडीलांच्या शिफारसी स्पष्ट करील. एका सेवा सभेत संबंधित गोष्टी व तयार केलेला ठराव याची चर्चा होईल. ते हाताळणारा वडील मंडळीतील सभासदांना एखादी गोष्ट स्पष्ट कळली नसल्यास त्याची स्पष्टता विचारण्याची संधि देईल. एखादा प्रमुख निर्णय घ्यायचा असल्यास वडील, मंडळीने आपले मत जाहीर करण्याआधी विचार करावा म्हणून एक किंवा अधिक आठवड्यांचा कालावधी देतील. आणखी चर्चा न करता मांडलेला ठराव मंजूर करण्यासाठी मंडळीने तयारी दाखविल्यास अध्यक्ष मंडळीला संमतीकारक इच्छा असणाऱ्‍यांना आपले हात वर करण्यास लावतील व नंतर ज्यांची संमती नाही अशांना हात वर करावयास लावतील. सुचविलेल्या ठरावाला समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या बांधवातील अधिकांची मंजुरी असेल तर जे संमत झाले आहे त्याच्या अनुषंगाने वडील आपली पुढील हालचाल करतील.

प्रस्तुत केलेल्या ठरावास मंजुरी देण्यासाठी मंडळीतील सर्व समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकांना मुभा देण्यात यावी. अशा ठरावात कायदेशीर गरजा असणाऱ्‍या प्रकरणांचा समावेश राहणार नाही.

पालिका प्रकरणे, राज्य सभागृहासाठीचे कर्ज, इत्यादि गोष्टींबद्दलचा निर्णय घेताना संस्थेच्या नियम व कायदेशीर गरजांच्या पूर्तीच्या अनुषंगाने लोकसभेची पद्धत वापरण्याची गरज राहील. (भारतात ही गोष्ट, जेथे मंडळ्यांनी मिळकत, राज्य सभागृह स्वतःच्या मालकीचे बनवण्यासाठी कायदेशीर मुलकी संघटनेची प्रस्थापना केली असेल तेथे लागू होते.) अशा वेळी ज्या बंधूने ठराव संमत करण्यासाठी तो पुढे मांडला असेल त्याचे नाव व ज्याने याला आपली पुष्टी दिली त्या बांधवांची नावे तसेच जितक्यांनी त्याला आपली मंजूरी व जितक्यांनी आपली नापसंती दाखविली ती संख्या नोंदण्याची गरज राहील. जेथे ही लोकसभेची पद्धत जरुरीची नाही, तेथे मंडळीला संबंधित ठरावाबद्दल विचार करण्यास वेळ दिल्यावर आपले मत हात वर करून दर्शविण्यासाठी सांगू शकता. परंतु कोणत्याही प्रकरणात संमत झालेले ठराव लिहिण्यास व जबाबदार वडीलांनी हस्ताक्षर केलेले व तारीख टाकलेले असे मंडळीच्या दप्तरी संग्रही करावेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा