वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp19 क्र. २ पृ. ६-७
  • प्रिय व्यक्‍तीला कायमचं गमावतो तेव्हा . . .

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रिय व्यक्‍तीला कायमचं गमावतो तेव्हा . . .
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काहींना सावरायला कशामुळे मदत झाली
  • माझे हे दुःख व्यक्‍त करणे सामान्य आहे का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मृत्यूच्या शोकातून कसं सावराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत?
    सावध राहा!—२०१८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
wp19 क्र. २ पृ. ६-७
एक दुःखी जोडपं समुद्र किनारी उभं आहे आणि दूरवर नजर लावून पाहत आहे

प्रिय व्यक्‍तीला कायमचं गमावतो तेव्हा . . .

ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी वनेसा म्हणते: “माझ्या मोठ्या भावाचा अचानक मृत्यू झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी मी काहीच करू शकले नाही. काही महिन्यांनी मला एकाएकी त्याची आठवण यायची आणि जणू कोणीतरी माझ्या काळजात सुरा भोसकावा तशा वेदना मला व्हायच्या. कधीकधी तर मला खूप रागही यायचा. माझा भाऊ मला का सोडून गेला? तो जिवंत असताना मी त्याच्यासोबत जास्त वेळ घालवला नाही म्हणून माझ्या मनात सतत दोषीपणाची भावनाही यायची.”

तुम्ही आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावलं असेल तर तुमच्या मनातही वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आल्या असतील. जसं की दुःख, एकटेपणा आणि अगदी असाहाय्य वाटणं. तसंच तुम्ही राग, दोषीपणा आणि भीती या भावनाही अनुभवल्या असतील. जगण्यात काही अर्थ आहे का असाही विचार तुमच्या मनात आला असेल.

दुःख व्यक्‍त करणं म्हणजे तुम्ही कमजोर आहात असा याचा अर्थ होत नाही. उलट यावरून समजतं की तुमचं तुमच्या प्रिय व्यक्‍तीवर किती प्रेम होतं. असं असलं तरी या दुःखातून सावरायला आपल्याला काही प्रमाणात मदत मिळू शकते का?

काहींना सावरायला कशामुळे मदत झाली

आपलं दुःख कदाचित कधीही संपणार नाही, पण खाली दिलेल्या सल्ल्यांमुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकतं.

दुःख व्यक्‍त करण्यासाठी हवा तितका वेळ घ्या

प्रत्येक व्यक्‍ती सारख्याच पद्धतीने दुःख व्यक्‍त करते आणि सारखाच वेळ घेते असं नाही. तरीसुद्धा रडल्यामुळे आपल्याला दुःखातून सावरण्यासाठी मदत होऊ शकते. आधी उल्लेख करण्यात आलेली वनेसा म्हणते: “मला फक्‍त रडावसं वाटायचं. मला कसंही करून माझं मन हलकं करायचं होतं.” सोफियाची बहीण अचानक वारली. ती म्हणते: “जे काही झालं त्याबद्दल विचार केल्याने खूपच त्रास व्हायचा. जखमेवरची पट्टी काढून तिला साफ केल्याने जसा त्रास होतो, तसा त्रास मला व्हायचा. दुःख तर माझ्या सहनशक्‍तीच्या पलीकडचं होतं, पण जे झालं त्यावर विचार केल्यामुळे मला दुःखातून सावरायला मदत झाली.”

तुमच्या भावना कोणालातरी सांगा

काही वेळा तुम्हाला एकटं रहावंसं वाटेल हे समजण्यासारखं आहे. पण दुःखाचं ओझं एकट्याने वाहणं खरंच खूप कठीण असतं. १७ वर्षांच्या जॅरेडने आपल्या वडिलांना मृत्यूत गमावलं. त्या वेळेबद्दल तो आठवून म्हणतो: “मी माझ्या भावना इतरांना सांगायचो. मला माझ्या भावना कदाचित व्यवस्थित मांडता आल्या नसल्या तरी असं केल्याने मला खूप बरं वाटायचं.” आधीच्या लेखात उल्लेख केलेली जॅनिस म्हणते: “इतरांशी बोलल्याने खरंच खूप दिलासा मिळतो. मला जाणीव झाली की दुसरे मला समजून घेतात आणि त्यामुळे माझा एकटेपणा काही प्रमाणात दूर झाला.”

मदत स्वीकारा

एक डॉक्टर असं म्हणतात: “पीडित व्यक्‍तीने जर [दुःखाच्या धक्क्यातून] सावरण्यासाठी सुरुवातीलाच तिच्या मित्रांची आणि नातेवाइकांची मदत स्वीकारली, तर त्या संपूर्ण काळात ज्या वेगवेगळ्या भावनांचा तिला सामना करावा लागतो त्यातून निभावण्यासाठी तिला सोपं जाईल.” तेव्हा, तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी आहे ते तुमच्या मित्रांना सांगा. कारण त्यांना तुम्हाला मदत करायची इच्छा असेल पण ती कशी करायची हे कदाचित त्यांना माहीत नसेल.​—नीतिसूत्रे १७:१७.

देवासोबत एक घनिष्ठ नातेसंबंध जोडा

टीना म्हणते: “माझ्या पतीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. माझ्या भावना, समस्या आणि चिंता ऐकून घेणारं आता माझं कोणीच नव्हतं, म्हणून मग मी देवाजवळ माझ्या भावना व्यक्‍त करायचे. मला दररोजची कामं करता यावीत म्हणून मी दिवसाच्या सुरुवातीला देवाकडे मदत मागायचे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपलीकडे मदत केली.” तारशा २२ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला. ती म्हणते: “दररोज बायबल वाचल्याने मला खूप सांत्वन मिळालं. यामुळे मला बऱ्‍याच प्रोत्साहनदायक गोष्टींवर विचार करता आला.”

प्रिय जणांना पुन्हा जिवंत केलं जाईल त्या काळाची कल्पना करा

टीना पुढे म्हणते: “मृत लोकांना पुन्हा जिवंत केलं जाणार या आशेमुळे मला सुरुवातीला सांत्वन मिळालं नाही, कारण त्या वेळी मला माझ्या पतीची आणि माझ्या मुलांना त्यांच्या बाबांची गरज होती. पण आता चार वर्षं उलटून गेली आहेत आणि माझा या आशेवर पक्का विश्‍वास आहे. मी आज या आशेवरच जगतेय. माझ्या पतीला मी पुन्हा भेटेन हे दृश्‍य मी माझ्या डोळ्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न करते आणि असं केल्यामुळे मला शांत आणि आनंदी राहायला मदत होते.”

तुम्हाला दुःखातून सावरणं लगेच शक्य होईल असं नाही. पण वनेसाच्या अनुभवामुळे आपल्याला बराच दिलासा मिळतो. ती म्हणते: “तुम्हाला वाटू शकतं की या दुःखातून बाहेर पडणं कधीच शक्य होणार नाही, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागते.”

तुमच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही हे जरी खरं असलं, तरी लक्षात असू द्या की अजूनही जीवन जगण्याला अर्थ आहे. देवाच्या प्रेमळ मदतीमुळे तुम्ही आताही चांगले मित्र बनवू शकता आणि एक अर्थपूर्ण जीवन जगू शकता. लवकरच देव मरण पावलेल्या लोकांना जिवंत करणार  आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्‍तीला पुन्हा भेटावं अशी देवाची इच्छा आहे आणि मग त्यानंतर तुमच्या मनाला झालेल्या जखमा कायमच्या भरून निघतील!

मदतदायी ठरणारी बायबलमधली वचनं

देव तुमच्या दुःखाची आणि अश्रूंची दखल घेतो.

एक बायबल लेखक देवाबद्दल म्हणतो: “माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?”​—स्तोत्र ५६:८.

देवाजवळ आपलं मन मोकळं करा.

“मी आपले संकट [देवापुढे] मांडतो . . . तुला, हे यहोवाa मी आरोळी केली.”​—स्तोत्र १४२:२, ५, पं.र.भा.

तुम्ही आशा ठेवू शकता.

“सर्व लोकांचं पुनरुत्थान [पुन्हा जिवंत] होणार आहे.”​—प्रेषितांची कार्ये २४:१५.

मरण पावलेल्या लाखो लोकांना पुन्हा जिवंत करणार असल्याचं अभिवचन देव देतो आणि असं करण्याची त्याला खूप उत्कंठा लागली आहे.b​—ईयोब १४:१४, १५.

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं देण्यात आलं आहे.

b मरण पावलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याच्या आशेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा ३० पाहा. तसंच www.jw.org/mr या वेबसाईटवरून तुम्ही हे मोफत डाऊनलोडही करू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा