वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 १०/१५ पृ. ९-१३
  • “आमचा विश्‍वास वाढवा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आमचा विश्‍वास वाढवा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला आवडेल असा विश्‍वास विकसित करा
  • भक्कम विश्‍वासासाठी काय करता येईल?
  • आपण विश्‍वास कसा दाखवू शकतो?
  • विश्‍वासासाठी केलेल्या प्रार्थना ऐकण्यात आल्या
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • तुमचा विश्‍वास किती मजबूत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 १०/१५ पृ. ९-१३
बंदी असलेल्या ठिकाणी एका अंधाऱ्‍या तळघरात, यहोवाचे साक्षीदार सभा चालवत आहेत

“आमचा विश्‍वास वाढवा”

“माझा अविश्‍वास घालवून टाका.”—मार्क ९:२४.

गीत क्रमांक: ५४, २४

तुम्ही काय उत्तर द्याल?

  • आपला विश्‍वास मजबूत करणं इतकं महत्त्वाचं का आहे?

  • आपला विश्‍वास वाढवण्याकरता आपण काय करू शकतो?

  • आपला विश्‍वास भक्कम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

१. विश्‍वास इतका महत्त्वाचा का आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

‘मोठ्या संकटादरम्यान यहोवा मला वाचवेल का,’ असा प्रश्‍न तुम्हाला कधी पडला आहे का? हे खरं आहे की त्या वेळी जीव वाचण्यासाठी बऱ्‍याच गोष्टी गरजेच्या असतील. पण प्रेषित पौलानं सांगितल्यानुसार मोठ्या संकटातून आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला एका महत्त्वाच्या गुणाची, म्हणजे विश्‍वासाची गरज आहे. तो म्हणतो: “विश्‍वासावाचून त्याला [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री ११:६) ही गोष्ट जरी साधारण वाटत असली तरी बायबल अगदी स्पष्टपणे म्हणते: “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनी. ३:२) तेव्हा, आपला विश्‍वास बळकट करणं किती महत्त्वाचं आहे, ते या दोन वचनांवरून स्पष्ट होतं.

२, ३. (क) आपला विश्‍वास इतका महत्त्वाचा का आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

२ प्रेषित पेत्रानं म्हटलं की आपला विश्‍वास परीक्षेत खरा उतरल्यास तो “येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत” ठरेल. (१ पेत्र १:७ वाचा.) असं म्हणण्याद्वारे त्यानं विश्‍वास असणं किती महत्त्वाचं आहे यावर जोर दिला. मोठं संकट आता खूप जवळ आहे. आणि “जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” आपण असावं अशी आपल्या प्रत्येकाचीच इच्छा आहे. (इब्री १०:३९) त्यामुळे, आपल्या विश्‍वासाला आणखी मजबूत करण्यासाठी आपण खूप परिश्रम घेण्याची गरज आहे. आपला राजा येशू प्रकट होईल, तेव्हा ज्यांना जीवनाचं बक्षीस मिळेल अशांपैकी असण्याची आपली इच्छा आहे. आपला विश्‍वास आणखी वाढवण्यासाठी एका व्यक्‍तीनं येशूकडे विनंती करत म्हटलं: “माझा अविश्‍वास घालवून टाका.” (मार्क ९:२४) आपल्यालाही हेच करण्याची गरज आहे. म्हणून प्रेषितांप्रमाणेच आपणही असं म्हणू शकतो: “आमचा विश्‍वास वाढवा.”—लूक १७:५.

३ तेव्हा, या लेखात आपण तीन प्रश्‍नांचा विचार करू या: आपण आपला विश्‍वास कसा बळकट करू शकतो? आपला विश्‍वास भक्कम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? आणि, विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपण जेव्हा देवाकडे विनंती करू तेव्हा तो नक्की उत्तर देईल, असं आपण का म्हणू शकतो?

देवाला आवडेल असा विश्‍वास विकसित करा

४. कोणाची उदाहरणं आपला विश्‍वास आणखी मजबूत करतात?

४ विश्‍वासाला इतकं महत्त्व असल्यामुळेच यहोवानं बायबलमध्ये विश्‍वासाची अनेक उदाहरणं नमूद करून ठेवली आहेत. ही सगळी उदाहरणं आपल्या ‘शिक्षणाकरताच’ लिहिण्यात आली आहेत. (रोम. १५:४) आपल्या विश्‍वासाला आणखी बळकट करण्यासाठी अब्राहाम, सारा, इसहाक, याकोब, मोशे, राहाब, गिदोन, बाराक आणि इतर अनेक विश्‍वासू जणांची उदाहरणं आपल्याला प्रवृत्त करतात. (इब्री ११:३२-३५) शिवाय आजच्या काळातील आपल्या बंधू-भगिनींनीही अप्रतिम विश्‍वास दाखवून आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं आहे.a

५. यहोवावर आपला भक्कम विश्‍वास असल्याचं एलीयानं कसं दाखवलं, आणि आपण स्वतःला काय विचारलं पाहिजे?

५ बायबलमधील एलीया संदेष्ट्याचंच उदाहरण घ्या. देशावर यहोवा मोठा दुष्काळ आणणार आहे याबद्दल अहाब राजाला सांगताना एलीया अगदी आत्मविश्‍वासानं म्हणाला: “इस्राएलाचा देव परमेश्‍वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पर्जन्य पडणार नाही.” (१ राजे १७:१) त्याच्या या शब्दांवरून त्याचा यहोवावर किती भरवसा होता हे दिसून येतं. यासोबतच दुष्काळादरम्यान अन्‍न-पाण्याचा तुटवडा असतानाही, यहोवा आपल्याला आणि इतरांना हव्या असणाऱ्‍या गोष्टी नक्की पुरवेल, याविषयी एलीयाला पूर्ण भरवसा असल्याचं आपण पाहू शकतो. (१ राजे १७:४, ५, १३, १४) तसंच, एका विधवेच्या मृत मुलाला यहोवा पुन्हा जिवंत करू शकतो याचीदेखील एलीयाला पूर्ण खात्री होती. (१ राजे १७:२१) आणि कर्मेल पर्वतावर, त्यानं केलेल्या अर्पणावर यहोवाचा अग्नी उतरेल याबद्दल त्याच्या मनात थोडीदेखील शंका नव्हती. (१ राजे १८:२४, ३७) इतकंच नव्हे, तर पाऊस पडण्याआधीच एलीयानं अगदी ठामपणे अहाब राजाला सांगितलं: “ऊठ, खा, पी; विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे.” यावरूनही यहोवावर त्याचा किती भरवसा होता हे दिसतं. (१ राजे १८:४१) एलीयाच्या जीवनातील या पाच घटनांचा विचार केल्यावर, आपणही स्वतःला विचारू शकतो: ‘माझाही विश्‍वास एलीयाइतकाच भक्कम आहे का?’

भक्कम विश्‍वासासाठी काय करता येईल?

६. विश्‍वास वाढवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे?

६ केवळ आपल्या स्वतःच्या बळावर आपण आपला विश्‍वास मजबूत करू शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी आपण यहोवाला विनंती केली पाहिजे. कारण विश्‍वासदेखील पवित्र आत्म्याच्या फळाचाच एक पैलू आहे. (गलती. ५:२२) त्यामुळे येशूच्या सल्ल्याचं पालन करून, पवित्र आत्म्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. शिवाय येशूनंही आपल्याला अशी खात्री दिली, की “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”—लूक ११:१३.

७. आपण आपला विश्‍वास कसा टिकवून ठेवू शकतो? स्पष्ट करा.

७ पण केवळ विश्‍वास मजबूत करूनच चालणार नाही, तर तो टिकवूनही ठेवता आला पाहिजे. विश्‍वासाची तुलना आपण आगीशी करू शकतो. लाकडं रचून जेव्हा आपण पहिल्यांदा आग लावतो, तेव्हा ते लगेच पेट घेतं आणि आग अगदी प्रखरतेनं पेटत राहते. पण त्या आगीत जर आपण आणखी लाकडं घातली नाहीत, तर थोड्या वेळानं आग विझून तिथं फक्‍त राख उरेल. याउलट जर आपण त्या आगीत सतत लाकडं टाकत राहू, तर ती आग तशीच पेटत राहील. आपल्या विश्‍वासाच्या बाबतीतही असंच आहे. आपण जर दररोज देवाच्या वचनाचं वाचन करू आणि त्याचा अभ्यास करू, तर त्याच्या वचनाविषयी आणि यहोवाविषयी असणारं आपलं प्रेम आणखी वाढत जाईल. याचा परिणाम म्हणजे आपला मजबूत विश्‍वास आपल्याला तसाच टिकवून ठेवण्यास मदत होईल.

८. आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी कशाची गरज आहे?

८ बाप्तिस्म्याआधी शिकलेल्या गोष्टींवरच समाधान मानून चालणार नाही. (इब्री ६:१, २) मग आपल्याला आणखी काय करता येईल? बायबलमधील पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांचा आपण अभ्यास करू शकतो. यामुळे आपला विश्‍वास आणखी भक्कम होईल आणि तो टिकवून ठेवण्यासही आपल्याला मदत होईल. शिवाय, आपला विश्‍वास खरंच मजबूत आहे की नाही, हे पाहण्यासाठीही देवाच्या वचनाचा आपल्याला वापर करता येईल.—याकोब १:२५; २:२४, २६ वाचा.

९, १०. (क) चांगल्या संगतीमुळे (ख) मंडळीतील सभांमुळे, आणि (ग) प्रचारकार्यामुळे, आपला विश्‍वास कसा मजबूत होतो?

९ प्रेषित पौलानं आपल्यासोबतच्या बांधवांना म्हटलं: “तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने आपणा उभयतास, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.” (रोम. १:१२) त्याच्या या बोलण्याचा काय अर्थ होतो? हाच, की आपल्या बंधू-भगिनींसोबत वेळ घालवण्याद्वारे आपण एकमेकांचा विश्‍वास बळकट करू शकतो. हे खासकरून अशा बंधू-भगिनींसोबत शक्य आहे, ज्यांनी वेगवेगळ्या परीक्षांना तोंड देऊन आपला विश्‍वास टिकवला आहे. (याको. १:३) वाईट संगत आपल्या विश्‍वासाला घातक ठरते, पण चांगली संगत विश्‍वास आणखी मजबूत करते. (१ करिंथ. १५:३३) म्हणूनच सभांना नियमित रीत्या उपस्थित राहण्याकरता आपल्याला प्रोत्साहन दिलं जातं. तिथं आपण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. (इब्री लोकांस १०:२४, २५ वाचा.) यासोबतच, सभांमध्ये आपल्याला जे काही ऐकायला मिळतं, त्यामुळेही आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. म्हणूनच बायबल म्हणतं, की विश्‍वास “वार्तेने” वाढतो. (रोम. १०:१७) तेव्हा, तुम्ही स्वतःला असं विचारू शकता: ‘मी नियमितपणे सभांना जातो का?’

१० प्रचारकार्यात सहभाग घेतल्यामुळेही आपण आपला विश्‍वास आणखी मजबूत करत असतो. त्यामुळे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणेच, आपल्यालाही यहोवावर विश्‍वास ठेवण्यास आणि अगदी धैर्यानं कोणत्याही परिस्थितीत सुवार्ता घोषित करण्यास मदत होते.—प्रे. कृत्ये ४:१७-२०; १३:४६.

११. कालेब आणि यहोशवा यांचा विश्‍वास कशामुळे बळकट झाला, आणि आपणही त्यांच्याप्रमाणे कसं होऊ शकतो?

११ आपल्या प्रार्थनांचं यहोवा कसं उत्तर देतो आणि तो आपल्याला कशी मदत करतो, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हादेखील आपला विश्‍वास आणखी वाढतो. यहोशवा आणि कालेबच्या बाबतीतही हेच झालं. वचन दिलेल्या देशाची पाहणी करताना, त्यांनीदेखील यहोवावर विश्‍वास असल्याचं दाखवलं. पुढे त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक वळणावर यहोवा आपल्याला कशी मदत करत आहे, हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांचा विश्‍वास आणखी बळकट होत गेला. म्हणूनच यहोशवा अगदी आत्मविश्‍वासानं असं म्हणू शकला: “आपला देव परमेश्‍वर याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही.” त्यानं पुढे असंही म्हटलं: “परमेश्‍वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्‍या मनाने करा . . . मी आणि माझे घराणे तर परमेश्‍वराची सेवा करणार.” (यहो. २३:१४; २४:१४, १५) आपणही जेव्हा यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून, तो कशी मदत करतो हे व्यक्‍तिशः अनुभवू, तेव्हा आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल.—स्तो. ३४:८.

आपण विश्‍वास कसा दाखवू शकतो?

१२. आपला विश्‍वास भक्कम आहे, हे कशावरून दिसून येईल?

१२ आपला विश्‍वास मजबूत असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? याकोबानं म्हटलं: “मी आपला विश्‍वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन.” (याको. २:१८) या वचनातून कळतं की आपला विश्‍वास भक्कम आहे की नाही हे आपल्या कृतीवरून दिसून येईल. चला याची काही उदाहरणं पाहू या.

यहोवाच्या साक्षीदाराचं कुटुंब: १. बायबलचा अभ्यास करताना, २. प्रचारकार्यात सहभाग घेताना, ३. मनोरंजनाचा आनंद लुटताना

सेवाकार्यात होताहोईल तितकं करण्याचा प्रयत्न करणारे मजबूत विश्‍वास असल्याचं दाखवतात (परिच्छेद १३ पाहा)

१३. प्रचारकार्यात सहभाग घेण्याद्वारे आपला विश्‍वास भक्कम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

१३ विश्‍वास दाखवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, प्रचारकार्य. आपण असं का म्हणू शकतो? कारण प्रचारकार्यात सहभाग घेतल्यामुळे, जगाचा अंत आता जवळ आहे आणि त्याला “विलंब” लागणार नाही, याची आपल्याला खात्री असल्याचं आपण दाखवत असतो. (हब. २:३) तेव्हा, आपला विश्‍वास भक्कम आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण स्वतःला असं विचारू शकतो: ‘प्रचारकार्य माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे? देवाबद्दल इतरांना सांगण्याचा मी जास्तीतजास्त प्रयत्न करतो का? यहोवाच्या सेवेत आणखी करण्यासाठी मी वेगवेगळ्या मार्गांचा विचार करतो का?’ (२ करिंथ. १३:५) तर मग, तारणाविषयी ‘मुखाने कबूली’ देऊन, म्हणजे सुवार्तेचा प्रचार करून, आपला विश्‍वास भक्कम असल्याचं दाखवून देऊ या.—रोमकर १०:१० वाचा.

१४, १५. (क) रोजच्या जीवनात आपण विश्‍वास कसा दाखवू शकतो? (ख) यहोवावर भक्कम विश्‍वास असल्याचं दाखवणारं एक उदाहरण सांगा.

१४ दररोजच्या जीवनात जेव्हा आपल्यावर समस्या येतात, तेव्हादेखील यहोवावर असणारा आपला विश्‍वास दाखवण्याची आपल्याला संधी मिळते. आजारपण, नैराश्‍य, गरीबी किंवा इतर कोणतीही समस्या असली तरी आपल्याला याची खात्री असते, की यहोवा आणि येशू अगदी योग्य वेळी आपल्याला मदत पुरवतील. (इब्री ४:१६) त्यामुळे जेव्हा आपण मदतीकरता यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा त्याच्यावर आपला विश्‍वास असल्याचं आपण दाखवत असतो. “आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे,” अशी विनंतीही आपण यहोवाला करू शकतो असं येशूनं सांगितलं आहे. (लूक ११:३) शिवाय, बायबलमधील अहवालदेखील हे स्पष्ट करतात, की यहोवा आपल्याला हवी असणारी कोणतीही गोष्ट पुरवू शकतो. उदाहरणार्थ, इस्राएलमध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला होता. पण त्यादरम्यान यहोवानं एलीयाला अन्‍न-पाणी पुरवलं. बायबल म्हणतं, की “कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत, व त्या ओहळाचे पाणी तो पिई.” (१ राजे १७:३-६) आपली गरज ओळखून यहोवा आपल्यालाही हवी असणारी मदत पुरवेल असा विश्‍वास आपण बाळगू शकतो.

एक ख्रिस्ती बहीण: १. पाळण्यात झोपलेल्या बाळाच्या शेजारी प्रार्थना करताना, २. आपल्या मुलाला जेवण भरवताना, ३. आपल्या बाळाला बाबागाडीत नेताना

समस्येत टिकून राहण्याद्वारे आपण विश्‍वास असल्याचं दाखवत असतो (परिच्छेद १४ पाहा)

१५ आपल्याला याची पूर्ण खात्री आहे, की बायबलची तत्त्वं आपल्या जीवनात लागू केल्यामुळे, आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा नक्की पूर्ण करू शकतो. आशिया खंडात राहणाऱ्‍या रिबेका नावाच्या एका बहिणीच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली. तिनं आणि तिच्या कुटुंबानं मत्तय ६:३३ आणि नीतिसूत्रे १०:४ या वचनांतील तत्त्वे आपल्या जीवनात लागू केलीत. ती म्हणते, की एक वेळ अशी आली जेव्हा आपली नोकरी आपल्या आध्यात्मिकतेच्या आड येत आहे याची जाणीव तिच्या पतीला झाली. त्यामुळे, त्यानं आपली नोकरी सोडली. पण घरात चार मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून त्यांनी काही खाद्यपदार्थ बनवून ते विकायला सुरवात केली. ते करत असलेल्या कष्टामुळे, आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं त्यांना शक्य झालं. ही बहीण पुढे म्हणते: “आमच्यावर एकही दिवस उपाशी राहण्याची वेळ आली नाही. यहोवानं आम्हाला कधीच सोडलं नाही.” तुम्हालाही असा अनुभव आला आहे का, ज्यामुळे तुमचा विश्‍वास बळकट झाला आहे?

१६. देवावर पूर्ण भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होईल?

१६ यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन केल्यास, तो आपल्याला नक्की मदत करेल असा भरवसा आपल्याला असला पाहिजे. हबक्कूकच्या शब्दांचा संदर्भ घेऊन पौलानं असं म्हटलं: “नीतिमान विश्‍वासाने जगेल.” (गलती. ३:११; हब. २:४) त्यामुळे आपल्याला प्रत्येक मार्गानं मदत पुरवणाऱ्‍या देवावर आपला भक्कम विश्‍वास असला पाहिजे. पौलानंही आपल्याला याची आठवण करून दिली, की “आपल्या मागण्या किंवा कल्पना यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्‍या शक्‍तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास” देव समर्थ आहे. (इफिस. ३:२०) यहोवाचे सेवक त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करतात. पण, आपल्याला काही मर्यादादेखील आहेत हे ते विसरत नाहीत. शिवाय, यहोवा आज आपल्यासोबत आहे आणि आपल्या प्रत्येक कार्यावर त्याचा आशीर्वाद आहे, ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे.

विश्‍वासासाठी केलेल्या प्रार्थना ऐकण्यात आल्या

१७. (क) प्रेषितांनी केलेल्या विनंतीचं येशूनं कसं उत्तर दिलं? (ख) विश्‍वास वाढवण्यासाठी आपण करत असलेल्या विनंतीचं यहोवा उत्तर देईल असं आपण का म्हणू शकतो?

१७ आतापर्यंत केलेल्या चर्चेमुळे प्रेषितांनी येशूला जे म्हटलं, तेच आपल्यालाही म्हणावंसं वाटेल: “आमचा विश्‍वास वाढवा.” (लूक १७:५) त्यांच्या या विनंतीचं उत्तर येशूनं एका खास पद्धतीनं दिलं. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टला त्यांच्यावर पवित्र आत्मा ओतण्यात आला आणि देवाच्या उद्देशांची खोलवर समज त्यांना मिळाली. यामुळे त्यांचा विश्‍वास भक्कम झाला. याचा काय परिणाम झाला? त्या वेळेपर्यंतची सर्वात मोठी प्रचारकार्याची मोहीम त्यांना सुरू करता आली. (कलस्सै. १:२३) विश्‍वास वाढवण्यासाठी आपण करत असलेल्या विनंतीचं आपल्यालाही उत्तर मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो का? हो नक्कीच! कारण यहोवा आपल्याला अशी खात्री देतो, की “आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.”—१ योहा. ५:१४.

१८. आपला विश्‍वास भक्कम करणाऱ्‍यांना यहोवा कशा प्रकारे आशीर्वादित करतो?

१८ यहोवावर जेव्हा आपला पूर्ण भरवसा असतो, तेव्हा त्याला याचा खूप आनंद होतो. विश्‍वासाला वाढवण्याकरता आपण करत असलेल्या विनंतीचं तो नक्की उत्तर देईल. त्यामुळे, आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल आणि ‘देवाच्या राज्याला योग्य ठरलेले’ असे आपण होऊ.—२ थेस्सलनी. १:३, ५.

a उदाहरणार्थ, फॉरेस्ट ली (१ मार्च, २००१ टेहळणी बुरूज), आरीस्टॉटलीस आपॉस्टोलीडीस (१ फेब्रुवारी, २००२ टेहळणी बुरूज), एनलेस म्झांग (१ सप्टेंबर, २००३ टेहळणी बुरूज), जॅक योहानसन (८ नोव्हेंबर, १९९८ सावध राहा!) यांची जीवन कथा वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा