आमच्या तरुण मित्रांकरता
येशू चमत्कार करून लोकांना बरे करतो
सूचना: बायबलमधील या अहवालांचा शांत वातावरणात अभ्यास करा. शास्त्रवचने वाचताना, तुम्हीसुद्धा घडणाऱ्या घटनांचा भाग आहात अशी कल्पना करा. घटनांचे दृश्य डोळ्यांपुढे उभे करा. आवाज ऐका. अहवालांतील घटना खरोखरच घडत आहेत असे तुम्हाला वाटले पाहिजे.
दृश्याचे परीक्षण करा.—मत्तय १५:२१-२८ वाचा.
या घटनेतील आईच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील, असे तुम्हाला वाटले?
_______
तुम्हाला काय वाटते, पुढे दिलेल्या वचनांत येशू कोणत्या पद्धतीने बोलला?
२४ _______ २६ _______ २८ _______
आणखी खोलात शिरा.
त्या कनानी बाईच्या मुलीला बरे करणार नसल्याचे, येशूने आपल्या शब्दांनी किंवा त्याने जे काही केले त्यातून किती वेळा दाखवले?
_______
सुरुवातीला, येशू त्या मुलीला बरे का करणार नव्हता?
_______
नंतर, येशूने त्या मुलीला बरे का केले?
_______
शिकलेल्या गोष्टचा अवलंब करा. तुम्ही जे शिकलात ते लिहून काढा.
येशूच्या अडून न राहण्याच्या मनोवृत्तीविषयी.
_______
इतरांबरोबर व्यवहार करताना या मनोवृत्तीचे तुम्ही कशा प्रकारे अनुकरण करू शकता?
_______
दृश्याचे परीक्षण करा.—मार्क ८:२२-२५ वाचा.
तुम्ही कल्पना केलेल्या दृश्यात, गावात आणि गावाबाहेर तुम्ही काय पाहिले व कोणते आवाज ऐकले?
_______
आणखी खोलात शिरा.
तुम्हाला काय वाटते, येशूने त्या आंधळ्या माणसाला, बरे करण्याआधी गावाबाहेर का नेले?
_______
शिकलेल्या गोष्टचा अवलंब करा. तुम्ही जे शिकलात ते लिहून काढा.
येशूला कधीही दुर्बलतेचा त्रास सहन करावा लागला नाही, तरी दुर्बलांबद्दल त्याला सहानुभूती होती हे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटते?
_______
बायबलमधील या दोन अहवालांतील कोणते पैलू तुम्हाला जास्त मर्मस्पर्शी वाटतात, आणि का?
_______ (w०८ ५/१)