वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • br-1 १२/१५ पृ. २८-पृ. ३१ परि. ६
  • मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे
  • टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • याजकांनी ‘पुष्कळांस ठोकर खाण्यास लावले आहे’
  • (मलाखी १:१–२:१७)
  • ‘प्रभू आपल्या मंदिरात येईल’
  • (मलाखी ३:१–४:६)
  • “देवाचे भय धर”
  • खरा प्रभु न्यायासाठी येतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
br-1 १२/१५ पृ. २८-पृ. ३१ परि. ६

यहोवाचे वचन सजीव आहे

मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे

जेरूसलेममधील मंदिराची पुनर्बांधणी करून आता ७० वर्षे लोटली आहेत. पण काळाच्या ओघात, यहुद्यांची आध्यात्मिक स्थिती अतिशय खराब झाली आहे. याजकही नीतीभ्रष्ट झाले आहेत. कोण त्यांना या वास्तवाची जाणीव करून देऊन आध्यात्मिकरित्या पुनरुज्जिवित करेल? यहोवा हे कार्य संदेष्टा मलाखी याच्यावर सोपवतो.

मलाखीने अतिशय सडेतोड शैलीत लिहिलेल्या या इब्री शास्त्रवचनांतील शेवटल्या पुस्तकात, देवाने प्रेरित केलेली भाकिते आहेत. मलाखीच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिल्यास आपल्याला ‘परमेश्‍वराच्या [त्या] मोठ्या व भयंकर दिवसाकरता’ तयार असण्यास साहाय्य मिळेल, जेव्हा सध्याच्या जगाचा अंत होईल.—मलाखी ४:५.

याजकांनी ‘पुष्कळांस ठोकर खाण्यास लावले आहे’

(मलाखी १:१–२:१७)

इस्राएलाप्रती आपल्या भावना व्यक्‍त करताना यहोवा म्हणतो, की “मी तुम्हावर प्रीति केली.” पण याजकांनी देवाच्या नावाचा अपमान केला. तो कसा? ‘त्याच्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवून’ व बलिदानाकरता “लंगडा किंवा रोगी” पशू देऊन.—मलाखी १:२, ६-८.

याजकांनी ‘धर्मशास्त्राच्या मार्गांत पुष्कळांस ठोकर खाण्यास लावले आहे.’ लोक “आपआपल्या बंधूचा विश्‍वासघात” करतात. काहींनी विदेशी स्त्रियांशी लग्न केले आहे. इतरांनी ‘आपल्या तारुण्यातल्या स्त्रीचा’ विश्‍वासघात केला आहे.—मलाखी २:८, १०, ११, १४-१६.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:२—यहोवाने नीतीभ्रष्ट याजकांचे ‘आशीर्वाद शाप केले’ ते कोणत्या अर्थाने? ते या अर्थाने की, या याजकांनी दिलेले आशीर्वाद, शापात बदलतील असे देवाने घडवून आणले.

२:३—याजकांच्या मुखास ‘विष्ठा फासण्याचा’ काय अर्थ होतो? नियमशास्त्रानुसार यज्ञपशुची विष्ठा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकण्याची आज्ञा होती. (लेवीय १६:२७) याजकांच्या मुखास विष्ठा फासण्याचा असा अर्थ होतो की यहोवाने त्यांचे यज्ञ स्वीकारले नाहीत आणि हे यज्ञ अर्पण करणारे त्याच्या नजरेत तिरस्करणीय होते.

२:१३—यहोवाची वेदी कोणाच्या आसवांनी झाकली गेली होती? ही आसवे यहोवाच्या मंदिरात येऊन त्याच्यापुढे आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवणाऱ्‍या स्त्रियांची होती. या स्त्रियांच्या दुःखाचे कारण काय होते? त्यांच्या यहुदी पतींनी, कदाचित तरुण विदेशी स्त्रियांशी लग्न करण्याकरता, बेकायदेशीर कारणांचा आधार घेऊन त्यांच्यापासून घटस्फोट घेतला होता.

आपल्याकरता धडे:

१:१०. वेदीवर अग्नी पेटवणे व मंदिराचे दरवाजे बंद करणे यांसारख्या साध्या कामांसाठीही याजक मोबदला मागत होते. अशा लोभी याजकांच्या यज्ञांनी यहोवा मुळीच संतुष्ट झाला नाही. आपण यहोवाच्या उपासनेत व ख्रिस्ती सेवाकार्यात जे काही करतो ते कधीही पैशाच्या लोभाने नव्हे, तर देवाबद्दल व आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल असलेल्या निःस्वार्थ प्रेमाने प्रवृत्त होऊन करावे हे अतिशय महत्त्वाचे आहे.—मत्तय २२:३७-३९; २ करिंथकर ११:७.

१:१४; २:१७. यहोवा कधीही ढोंगीपणा खपवून घेत नाही.

२:७-९. मंडळीत ज्यांना शिकवण्याचा बहुमान दिला जातो त्यांनी याची खात्री केली पाहिजे की ते जे काही शिकवतात ते देवाच्या वचनाशी, पवित्र शास्त्रवचनांशी आणि ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याने’ पुरवलेल्या बायबलवर आधारित प्रकाशनांशी सुसंगत आहे.—लूक १२:४२; याकोब ३:११.

२:१०, ११. यहोवा आपल्या उपासकांकडून ही अपेक्षा करतो की त्यांनी “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याविषयीच्या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहावे.—१ करिंथकर ७:३९.

२:१५, १६. जे खरी उपासना करतात त्यांनी आपल्या तारुण्यातल्या पत्नीशी केलेल्या विवाहाच्या कराराचा सन्मान केला पाहिजे.

‘प्रभू आपल्या मंदिरात येईल’

(मलाखी ३:१–४:६)

‘प्रभू [यहोवा देव] एकाएकी आपल्या मंदिरात येईल’ व त्याच्यासोबत ‘करार घेऊन येणारा निरोप्या [येशू ख्रिस्त]’ येईल. देव ‘न्याय करावयाला [आपल्या लोकांकडे] येईल’ आणि सर्व प्रकारच्या पातक्यांविरुद्ध साक्ष देण्याची तो त्वरा करील. शिवाय, जे यहोवाचे भय बाळगतात त्यांची “एक स्मरणवही” लिहिली जाईल.—मलाखी ३:१, ३, ५, १६.

“भट्टीसारखा तप्त” असणारा दिवस येईल आणि सर्व दुष्टांचा सर्वनाश करील. तो दिवस येण्याअगोदर एका संदेष्ट्याला पाठवले जाईल व तो “वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील.”—मलाखी ४:१, ५, ६.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३:१-३—‘प्रभू’ व “करार घेऊन येणारा निरोप्या” मंदिरात केव्हा आले आणि त्यांच्यापुढे कोणाला पाठवण्यात आले होते? यहोवा आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमाने सा.यु. ३३ सालच्या निसान १० रोजी आपल्या मंदिरात आला. त्या प्रसंगी येशूने मंदिरात प्रवेश करून तेथे व्यापार करणाऱ्‍यांना बाहेर हाकलले होते. (मार्क ११:१५) येशूला देवाच्या राज्याचा नियुक्‍त राजा या नात्याने अभिषिक्‍त करण्यात आल्याच्या साडेतीन वर्षांनंतर हे घडले. त्याचप्रकारे, असे दिसते की स्वर्गात, येशू राजा म्हणून सिंहासनाधिष्ट झाला त्याच्या साडेतीन वर्षांनंतर तो यहोवासोबत त्याच्या आत्मिक मंदिरात आला आणि तेव्हा देवाच्या लोकांना शुद्ध करण्याची गरज असल्याचे त्याला आढळले. पहिल्या शतकात, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाला, येशू ख्रिस्ताच्या आगमनाकरता यहुद्यांच्या मनाची तयारी करण्यास पाठवण्यात आले होते. आधुनिक काळात, यहोवा आपल्या आत्मिक मंदिरात येण्याअगोदर त्याचा मार्ग तयार करण्याकरता त्याच्यापुढे एक निरोप्या पाठवण्यात आला. १८८० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच बायबल विद्यार्थ्यांच्या एका गटाने बायबलविषयीचे शिक्षण देण्याचे आणि प्रामाणिक मनाच्या लोकांना बायबलमधील मूलभूत सत्ये शिकवण्याचे कार्य हाती घेतले होते.

३:१०—“सगळा दशमांश” आणण्याचा अर्थ आपले सर्वस्व यहोवाला अर्पण करणे असा होतो का? येशूच्या मृत्यूने मोशेचे नियमशास्त्र रद्द झाले. त्यामुळे आता पैशाच्या रूपात दशमांश देण्याची गरज उरली नाही. तरीपण, दशमांश देण्याचा लाक्षणिक अर्थ आजही आहे. (इफिसकर २:१५) दशमांश देण्याचा अर्थ आपले सर्वस्व देणे असा होत नाही. दशमांश हा दर वर्षी आणला जात होता, पण आपण आपले सर्वस्व यहोवाला केवळ एकदाच देतो. अर्थात, आपण आपले जीवन त्याला समर्पित करून त्याचे द्योतक म्हणून जेव्हा पाण्याचा बाप्तिस्मा घेतो. तेव्हापासून आपल्याजवळ जे काही आहे ते यहोवाच्या मालकीचे बनते. तरीसुद्धा, आपल्याजवळ जे आहे त्यापैकी काही, आपल्या इच्छेनुसार त्याच्या सेवेकरता देण्याची तो आपल्याला मुभा देतो. जे काही आपल्या परिस्थितीनुसार शक्य असेल आणि आपले हृदय आपल्याला जे काही देण्यास प्रेरित करते ते यहोवाच्या सेवेत आपण देऊ शकतो. यहोवाला आपण जे देऊ शकतो, त्यात राज्य प्रचाराकरता व शिष्य बनवण्याच्या कार्याकरता दिला जाणारा आपला वेळ, शक्‍ती, साधनसंपत्ती यांचा समावेश होतो. तसेच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे, आजारी व वृद्ध बांधवांना भेटी देणे तसेच खऱ्‍या उपासनेला आर्थिक साहाय्य देणे याचाही यात समावेश होतो.

४:३—यहोवाचे उपासक कशाप्रकारे ‘दुष्टांस तुडवतील?’ देवाचे पृथ्वीवरील लोक खरोखर ‘दुष्टांना तुडवणार’ नाहीत, अर्थात, त्यांच्यावर न्यायदंड बजावण्यात ते प्रत्यक्ष सहभाग घेणार नाहीत. उलट, या शब्दांतून असे सुचवले आहे की सैतानाच्या जगाचा अंत झाल्यावर जो विजयोत्सव साजरा केला जाईल त्यात मनःपूर्वक सहभाग घेण्याद्वारे यहोवाचे पृथ्वीवरील सेवक लाक्षणिक अर्थाने दुष्टांना पायाखाली तुडवतील.—स्तोत्र १४५:२०; प्रकटीकरण २०:१-३.

४:४—आपण ‘मोशेला दिलेल्या धर्मशास्त्राचे स्मरण’ का ठेवले पाहिजे? ते धर्मशास्त्र आज ख्रिश्‍चनांवर बंधनकारक नाही. तरीपण ते ‘पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची छाया’ होते. (इब्री लोकांस १०:१) त्यामुळे, मोशेच्या नियमशास्त्राकडे लक्ष दिल्यास आपल्याला त्या गोष्टी कशाप्रकारे पूर्ण झाल्या हे समजून घेण्यास साहाय्य मिळेल. (लूक २४:४४, ४५) शिवाय, मोशेच्या नियमशास्त्रात “स्वर्गातील गोष्टींचे नमुने” आहेत. ख्रिस्ती सिद्धान्त व आचार समजून घेण्याकरता या नमुन्यांचा अभ्यास करणे अगत्याचे आहे.—इब्री लोकांस ९:२३.

४:५, ६—‘एलिया संदेष्टा’ कोणाचे प्रतिनिधीत्व करतो? “एलीया” एक पुनर्स्थापनेचे कार्य करील, अर्थात लोकांचे हृदय वळवण्याचे कार्य करील असे भाकीत करण्यात आले आहे. सा.यु. पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा देणारा योहान “एलीया” असल्याचे सांगितले. (मत्तय ११:१२-१४; मार्क ९:११-१३) आधुनिक काळात ‘एलीयाला,’ “परमेश्‍वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी” पाठवले जाते. तर आज हा एलीया दुसरा तिसरा कोणी नसून ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आहे. (मत्तय २४:४५) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेला हा दासवर्ग जिवेभावे खरी उपासना पुनर्स्थापित करण्याचे कार्य करत आहे.

आपल्याकरता धडे:

३:१०. आपण यहोवाची मनापासून सेवा करत नाही तेव्हा आपण त्याचे आशीर्वाद गमावून बसतो.

३:१४, १५. याजकांच्या वाईट उदाहरणामुळे यहुदी लोक देवाच्या सेवेला क्षुल्लक लेखू लागले. ख्रिस्ती मंडळीत जबाबदारीच्या पदांवर असलेल्यांनी इतरांकरता चांगला आदर्श ठेवला पाहिजे.—१ पेत्र ५:१-३.

३:१६. जे यहोवाचे भय बाळगतात आणि त्याला विश्‍वासू राहतात त्यांची तो नोंद करून ठेवतो. तो त्या सर्वांची आठवण ठेवतो आणि सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करताना तो त्यांचा बचाव करेल. म्हणूनच, आपण देवाला विश्‍वासू राहण्याचा आपला दृढ निश्‍चय कायम ठेवला पाहिजे.—ईयोब २७:५.

४:१. यहोवाला हिशेब देण्याच्या दिवशी “फांदी” व “मूळ” यांना एकच प्रतिफळ मिळेल. याचा अर्थ, लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच न्याय मिळेल. हे लक्षात घेता, आईवडिलांची आपल्या अल्पवयीन मुलांप्रती किती गंभीर जबाबदारी आहे! ख्रिस्ती पालकांनी देवाची संमती मिळवण्याचा आणि त्याच्यासमोर एक चांगले नाव कायम ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे.—१ करिंथकर ७:१४.

“देवाचे भय धर”

‘परमेश्‍वराच्या मोठ्या व भयंकर दिवशी’ कोणाचा बचाव होईल? (मलाखी ४:५) यहोवा म्हणतो: “तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यांतल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.”—मलाखी ४:२.

देवाच्या नावाचे आदरपूर्वक भय मानणाऱ्‍यांवर “न्याय्यत्वाचा सूर्य” येशू ख्रिस्त उदय पावेल आणि त्यांना यहोवाची कृपादृष्टी लाभेल. (योहान ८:१२) तसेच, “त्याच्या पंखांच्या ठायी [त्यांना] आरोग्य” लाभेल—सध्याच्या काळात आध्यात्मिक आरोग्य आणि देवाच्या नव्या जगात संपूर्ण शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य. (प्रकटीकरण २२:१, २) आनंदित व उल्लसित होऊन ते “गोठ्यांतल्या वत्सांप्रमाणे” बागडतील. हे सगळे आशीर्वाद आपल्यासाठी राखून ठेवलेले आहेत, तेव्हा, आपण शलमोन राजाच्या या सल्ल्याचे मनःपूर्वक पालन केले पाहिजे: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.

[२८ पानांवरील चित्र]

संदेष्टा मलाखी देवाचा आवेशी व समर्पित सेवक होता

[३१ पानांवरील चित्र]

आपण जे शिकवतो ते बायबलशी सुसंगत असले पाहिजे

[३१ पानांवरील चित्र]

यहोवाचे सेवक आपल्या विवाहाच्या कराराचा सन्मान करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा