वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • br-1 १२/१ पृ. ३२
  • “तुमच्याकडून मिळालेली अनमोल देणगी”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुमच्याकडून मिळालेली अनमोल देणगी”
  • टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
br-1 १२/१ पृ. ३२

“तुमच्याकडून मिळालेली अनमोल देणगी”

असे बेल्जियमच्या एका भूतपूर्व प्रधानमंत्र्यांनी सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्यa या पुस्तकाचे वर्णन केले. त्यांच्या एका शेजाऱ्‍यांनी स्नेहभावाने त्यांची भेट घेतली तेव्हा प्रधानमंत्र्यांनी त्या पुस्तकाची एक प्रत स्वीकारली. नंतर, त्यांनी एक पत्र लिहून आभार व्यक्‍त केले: “तुमच्या स्नेही भेटीमुळे मी प्रभावित झालो, आणि ‘सर्वश्रेष्ठ मनुष्य’ या पुस्तकामुळे तर मी खूपच प्रभावित झालो. ही तुमच्याकडून मिळालेली अनमोल देणगी आहे.”

भूतपूर्व प्रधानमंत्र्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला. ते शेवटी असे म्हणाले: “जर लोकांनी सुवार्तेच्या संदेशात जास्त आवड दाखवली असती आणि येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या तत्त्वांनुसार आपल्या जीवनात आचरण केले असते तर, आजचे हे जग एकदम निराळेच असते. तेव्हा आपल्याला सुरक्षा परिषदेची गरज भासली नसती; दहशतवादी हल्ले झाले नसते, आणि हिंसाचार जगातून हद्दपार झाला असता.” अशाप्रकारची आशा अवास्तव असल्याचे ते मानत असले तरी, त्यांच्या शेजाऱ्‍यांनी सौहार्दतेने त्यांची भेट घेतल्यामुळे त्यांनी आदर व्यक्‍त केला.

पत्रात ते पुढे म्हणतात: “तुम्ही एका प्रशंसनीय समूहाचे चांगले नावलौकिक असलेले लोक आहात. तुम्ही आशावादी नाहीत किंवा निराशावादीही नाहीत तर मानव आणि इतर गोष्टींमध्ये सुधार होणार असा विश्‍वास ठेवणारे लोक आहात.”

यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास आहे की मानवांच्या प्रयत्नांनी नव्हे तर, देवाच्या हस्तक्षेपामुळे अखेरीस एक चांगले जग निर्माण होईल. सर्वश्रेष्ठ मनुष्य येशू ख्रिस्त, याचे अनुकरण करण्याचा यहोवाचे साक्षीदार प्रयत्न करतात. याआधी कधी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला भेटले होते का? सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्याविषयी त्यांच्यासोबत मनास तजेला देईल अशी चर्चा केल्याने तुम्हाला खरोखर आनंद होईल. आणि त्यांना ते पुस्तक तुम्हाला द्यायला आवडेल, ज्या पुस्तकामुळे भूतपूर्व प्रधानमंत्री प्रभावित झाले होते.

[तळटीप]

a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा