गिलियड प्रशाला मिशनऱ्यांना “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पाठवते
सुमारे अर्ध्या शतकापासून वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला मिशनऱ्यांना अनेक देशांत पाठवत आली आहे. सप्टेंबर ११, १९९९ रोजी गिलियडच्या १०७ व्या वर्गाला पदवी प्राप्त झाली. या वर्गामध्ये ११ देशांतून ४८ विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांना २४ वेगवेगळ्या देशांत सेवा करण्याकरता पाठवण्यात आले. येशूने त्याचे स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्याच्या शिष्यांना जे काम दिले होते त्या कामाच्या अनुषंगाने कार्य करणाऱ्या हजारो मिशनऱ्यांमध्ये या नवोदित मिशनऱ्यांचीही भर पडली. त्याने त्याच्या शिष्यांविषयी असे भाकीत केले होते, की ‘ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षी होतील.’—प्रेषितांची कृत्ये १:८.
पदवीदानाचा कार्यक्रम वॉचटावर शैक्षणिक केंद्र, पॅटरसन, न्यूयॉर्क येथे रम्य वातावरणात मोठ्या आनंदात संपन्न झाला. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि इतर पाहुणे या कार्यक्रमाला आल्यामुळे हे विद्यार्थी खूप आनंदी होते. ब्रुकलिन आणि वॉलकिल इमारतींमध्ये देखील हा कार्यक्रम ऑडियो आणि व्हिडियोच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आला होता त्यामुळे एकूण ४,९९२ लोकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.
यहोवाची आणि शेजाऱ्यांची निष्ठेने सेवा करणे
“यहोवाच्या बाजूने कोण आहे?” हा सुरवातीच्या भाषणाचा विषय होता; नियमन मंडळाचे सदस्य आणि पदवीदानाच्या कार्यक्रमाचे संचालक असलेले कॅरी बार्बर यांनी हे भाषण दिले. मोशेच्या दिवसांतील इस्राएल लोकांमध्ये हा वाद निर्माण झाला होता असे त्यांनी सांगितले. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उपस्थित असलेल्या सर्वांना या गोष्टीचे स्मरण करून देण्यात आले, की अरण्यवासात असताना इस्राएल लोकांना आपले जीवन गमवावे लागले कारण ते निष्ठेने यहोवाच्या बाजूने उभे राहिले नव्हते. मूर्तिपूजा करून झाल्यानंतर ते “खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले.” (निर्गम ३२:१-२९) याच धोक्याविषयी येशूने ख्रिश्चनांना इशारा दिला: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.”—लूक २१:३४-३६.
त्यानंतरचे वक्ते, लेखन विभागाचे जीन स्मॉली यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले: “तुम्ही वेदनाशामक असल्याचे दाखवून देणार का?” त्यांनी हे दाखवून दिले, की वेदना शमन करणाऱ्या एका औषधासाठी पॉरिगोरिया या ग्रीक शब्दाचा इंग्रजीमध्ये प्रयोग करण्यात आला आहे. मराठीमध्ये त्याचे भाषांतर वेदनाशामक असे केले जाते. पण, आपल्या सहकर्मचाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी कलस्सैकर ४:११ मध्ये प्रेषित पौलाने याच अभिव्यक्तीचा प्रयोग केला आहे. आणि मराठी बायबलमध्ये याच अभिव्यक्तीचे “सांत्वन” असे भाषांतर करण्यात आले आहे.
पदवीप्राप्त करणारे हे मिशनरी आधुनिक काळात संपूर्ण पृथ्वीवरील भाऊबहिणींसाठी सांत्वन ठरू शकतील; पण त्याकरता त्यांना स्थानिक भाऊबहिणींची त्यांच्या नेमणुकांमध्ये नम्रपणे मदत करावी लागेल तसेच सहमिशनऱ्यांना सहकार्य करावे लागेल आणि त्यांच्याशी प्रेमळपणे सहवास राखावा लागेल.
त्यानंतर नियमन मंडळाचे डॅनिएल सिडलिक “सुवर्ण नियमाप्रमाणे चाला” या विषयावर बोलले. येशूने मत्तय ७:१२ येथे नमूद केलेल्या उदात्त तत्त्वाविषयी त्यांनी चर्चा केली. त्या वचनात म्हटले आहे: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” असे करण्याकरता आपण इतरांना केवळ हानी पोहंचवण्यापासून दूर राहिले पाहिजे असे नाही, तर त्यासाठी आपण लोकांकरता काही चांगली कामे देखील करण्याची आवश्यकता आहे.
हे चांगल्याप्रकारे करता येण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे: पाहणारा डोळा, सहानुभूतीशील हृदय आणि मदतीचा हात. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्यांनी असे म्हटले: “दुसऱ्यांना मदत करावी, असे आपल्याला केवळ वाटता कामा नये, तर प्रत्यक्ष आपण त्यांना मदत केली पाहिजे. लोकांनी आपल्यासोबत ज्याप्रकारे वागावे असे आपल्याला वाटते त्याप्रकारे त्यांच्याशी वागण्याकरता आपल्याला खास प्रयत्न करण्याची गरज आहे.” ही गोष्ट विशेषतः दुसऱ्या देशांमध्ये जाऊन काम करणाऱ्या मिशनऱ्यांच्या बाबतीत खरी आहे कारण त्यांना तेथील लोकांना खऱ्या ख्रिस्ती धर्माप्रमाणे चालण्याकरता मदत करावी लागते.
प्रशाला-शिक्षकांकडून चांगल्या गोष्टींचे स्मरण
कार्ल ॲडम्स या गिलियड मार्गदर्शकांनी पदवीप्राप्त करणाऱ्या मिशनऱ्यांना ‘सतत प्रगती करण्याचे’ उत्तेजन दिले. कोणत्या बाबतीत प्रगती करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे, ज्ञान आणि त्याचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्याची क्षमता. गिलियड प्रशालामध्ये विद्यार्थ्यांनी हे शिकले होते, की बायबल अहवालांची पृष्ठभूमी आणि परिस्थिती जाणून घेण्याकरता कशाप्रकारे संशोधन करावे. त्यांना असे उत्तेजन देण्यात आले होते, की प्रत्येक अहवालाचा त्यांच्या जीवनांवर कशाप्रकारे परिणाम होतो याचा त्यांनी विचार करावा. असे करत राहण्याकरता त्यांना आर्जवण्यात आले.
बंधू ॲडम्स यांनी पुढे असे म्हटले: “दुसरी गोष्ट ज्यांमध्ये मिशनऱ्यांना प्रगती करायची होती, ती म्हणजे प्रेम. प्रेम एखाद्या रोपट्याप्रमाणं आहे; तसेच त्याची निगा राखल्यावर, काळजी घेतल्यावर ते बहरतं, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर मात्र ते कोमजतं.” (फिलिप्पैकर १:९) आता, मिशनरी या नात्याने या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परिस्थितींत प्रेमामध्ये वाढत जाण्याची आवश्यकता होती. प्रगती करण्याची तिसरी गोष्ट म्हणजे: “आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा.” (२ पेत्र ३:१८) बंधू असेही म्हणाले: “यहोवाने त्याच्या पुत्राद्वारे आपल्यावर खरोखरच फार अद्भुत कृपा केली आहे. या अपात्री कृपेची आपण जसजशी कदर करत जातो तसतसे देवाच्या इच्छेप्रमाणे वागताना आणि त्याने दिलेले काम पूर्ण करताना आपल्याला मिळणारा आनंद वृद्धिंगत होत जातो.”
मार्क न्यूमर या आणखी एका गिलियड प्रशिक्षकांनी “प्रेमाने स्वीकारा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल” या विषयावर भाषण दिले. त्यांनी असे म्हटले: “मिशनरी जीवनात आव्हानात्मक परिस्थितींना प्रेमाने सामोरे जाण्याचे शिका कारण असे केल्याने तुम्ही यशस्वी व्हाल. यहोवा अशा लोकांना शिस्त लावतो ज्यांच्यावर त्याचे प्रेम आहे. देण्यात आलेला एखादा सल्ला तुम्हाला चांगला वाटणार नाही, त्या सल्ल्यामुळे तुम्हाला राग येईल किंवा तो सल्ला योग्य नाही असे तुम्हाला वाटेल; पण यहोवावरील प्रेम आणि त्याच्यासोबतचा तुमचा नातेसंबंध यांमुळे तुम्ही तो सल्ला आनंदाने स्वीकाराल.”
बंधू न्यूमर यांनी हे दाखवून दिले, की मिशनरी सेवेमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. “पण जबाबदारी पार पाडत असताना त्याला प्रेमाची जोड नसेल, तर तुम्हाला तुमच्या कामात समाधान मिळणार नाही. तुम्ही घरची कामे—स्वयंपाक, बाजारहाट, धुणीभांडी—करता, पण तुमच्यामध्ये प्रेमाच्या भावनेची उणीव असल्यास ही सर्व कामे तुम्हाला कंटाळवाणी वाटतील. तुम्ही अंमळ थांबून स्वतःला असे विचारायला हवे, ‘हे सर्व मी का करतोय?’ तुम्ही असे स्वतःला म्हणालात, की ‘माझ्या कामामुळे माझ्या सहमिशनऱ्यांची काळजी वाहिली जाते, तसेच त्यांना आनंद मिळतो,’ तेव्हा मग अशी कामे करायला तुम्हाला जड जाणार नाही.” त्यांना थोडक्यात असे सांगायचे होते: “सल्ला स्वीकारण्याची बाब असो, मिशनरी या नात्याने तुम्हाला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या असोत किंवा गैरसमज दूर करण्याची बाब असो, या सर्व गोष्टी हाताळताना तुम्ही प्रेमाचा गुण प्रदर्शित केल्यास तुम्हाला तुमच्या नेमणुकीमध्ये टिकून राहण्यास नक्की मदत होईल. ‘प्रीती कधी अंतर देत नाही.’”—१ करिंथकर १३:८.
त्यानंतर, वॅलस लिव्हरन्स या गिलियड प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्थानिक मंडळ्यांसोबत काम करताना आलेले अनेक आनंददायक अनुभव सांगितले. या विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग केवळ घरोघरच्या प्रचारकार्यातच केला नाही, तर ट्रक थांब्यावर, रेल्वे स्थानकांवर, बाजाराच्या ठिकाणी देखील त्यांनी प्रचारकार्य केले.
अनुभवी मिशनऱ्यांकडून मिळालेले आश्वासन
नवीन मिशनरी विदेशी क्षेत्रांत जातात तेव्हा त्यांना चिंता करण्याचे कारण आहे का? विदेशामध्ये काम करत असताना येणाऱ्या आव्हानांना त्यांना तोंड देता येईल का? या नवोदित मिशनऱ्यांना त्यांचे कार्य यशस्वीरित्या पार पाडता यावे म्हणून शाखा दफ्तरांकडून काय केले जाते? या आणि इतर प्रश्नांची उत्तरे देण्याकरता सेवा विभागाचे स्टिव्हन लेट आणि लेखन विभागाचे डेव्हिड स्प्लेन यांनी वॉचटावर शैक्षणिक केंद्रामध्ये तेव्हा उपस्थित असलेल्या बांधवांची मुलाखत घेतली. स्पेन, हाँग काँग, लायबेरिया, बेनिन, मादागास्कर, ब्राझील, आणि जपान या देशांमध्ये हे बांधव शाखा समितीचे सदस्य या नात्याने काम पाहत आहेत.
यहोवाच्या या अनुभवी सेवकांपैकी कित्येकांनी मिशनरी या नात्याने कित्येक दशके सेवा केली आहे; त्यांनी पदवीप्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित असलेल्या त्यांच्या पालकांना आणि नातेवाईकांना धीर दिला. त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या सहमिशनऱ्यांच्या अनुभवांच्या आधारावरून त्यांनी हे दाखवून दिले, की समस्यांमधून आणि आव्हानांमधून यशस्वीरित्या पार होता येईल. त्यांच्या समस्या कदाचित मोठ्या असतील, “पण त्या सोडवता येण्यासारख्या आहेत आणि आपली संस्था सदैव आपल्या पाठिशी असते,” असे मादागास्करमध्ये मिशनरी कार्य करणारे रिमो कॉककानेन यांनी म्हटले. ब्राझीलमध्ये सध्या सेवा करणारे ऑस्टन गस्टाव्हस्सन यांनी असे म्हटले: “मिळालेली नेमणूक आम्ही स्वतः निवडली नव्हती. त्यामुळे आमच्या नेमणुकीला जडून राहण्याकरता जे काही करता येईल ते सर्व करण्याचं आम्ही ठरवलं.” जपानमध्ये सेवा करणारे जेम्स लिंटन यांनी सांगितले, की “आधीपासूनच मिशनरी कार्य करणाऱ्या बांधवांच्या सहवासामुळे” त्यांना फार मोठी मदत झाली. यहोवाची सेवा करण्याचा आणि त्याच्या मेंढरांची काळजी घेण्याचा एक आनंदी आणि समाधानी मार्ग म्हणजे मिशनरी कार्य.
आध्यात्मिकतेवर घाला घालणारी पीडा टाळणे
नियमन मंडळाचे सदस्य असलेले आणि १९४६ साली गिलियडच्या सातव्या वर्गातून पदवीधर झालेले थिओडोर झरॅक्स यांनी “आध्यात्मिकतेला जागृत ठेवण्याचे आव्हान” या विषयावर शेवटचे भाषण दिले. जगाच्या कानाकोपऱ्यात होणारा भयंकर बीभत्सपणा त्यांनी भाषणाच्या सुरवातीला मान्य केला; परंतु त्याहीपेक्षा भयंकर विपत्तींनी मानवजात ग्रस्त आहे या गोष्टीकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
स्तोत्र ९१ चा उल्लेख करत त्यांनी अशा ‘मरीविषयी’ आणि ‘नाशाविषयी’ सांगितले ज्यांमुळे आपल्याभोवती असलेले कोट्यवधी लोक आध्यात्मिकरित्या आजारी पडले आहेत; मृतवत झाले आहेत. दियाबलाने आणि त्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाने लोकांना आध्यात्मिकरित्या कमजोर करण्यासाठी, त्यांना ठार मारण्यासाठी बुद्धिवाद आणि भौतिकवाद यांच्या आधारावर मरीसमान असलेल्या खोट्या मतप्रसाराचा उपयोग केला आहे; पण यहोवा आपल्याला खात्री देतो, की ही पीडा ‘परात्पराच्या गुप्त स्थळी वसणाऱ्यावर’ येणार नाही.—स्तोत्र ९१:१-७.
बंधू झरॅक्स यांनी असे म्हटले: “विश्वासात सुदृढ राहणे; गुप्त स्थळी वसणे हे आव्हान आहे. ‘पवित्र आत्मा,’ किंवा आध्यात्मिकता नसलेल्या उपहास करणाऱ्यांप्रमाणे आपण होऊ शकत नाही. आज हीच समस्या आहे. संघटनेतील आपण सर्वजण याच समस्येला तोंड देत आहोत. तुमच्या मिशनरी नेमणुकीमध्ये सुद्धा या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागेल.” (यहूदा १८, १९) पण पदवीप्राप्त करणाऱ्या मिशनऱ्यांना हे सांगण्यात आले, की त्यांच्या नेमणुकींमध्ये आध्यात्मिकता यशस्वीपणे टिकवून ठेवणे त्यांना शक्य आहे. बंदी, प्रखर विरोध, उपहास, नास्तिकवादी मतप्रसार आणि खोटे आरोप हे सर्व असतानाही रशिया, आशिया आणि आफ्रिकामधील आपल्या बांधवांनी कशाप्रकारे नेटाने आपले कार्य चालू ठेवले याचा विचार करण्याकरता या नवोदित मिशनऱ्यांना आर्जवण्यात आले. जातीय संघर्ष आणि आवश्यक गोष्टींची कमतरता यांमुळे देखील आपल्या अनेक बांधवांना कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागले.
आपली आध्यात्मिकता कमी होऊ लागते तेव्हा “समस्येचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे आणि त्यानंतर देवाच्या वचनातील सल्ल्यानुसार ती समस्या सोडवण्याकरता पावले उचलणे आवश्यक आहे.” बायबलमधील उदाहरणे देण्यात आली. यहोशवाला असे आर्जवण्यात आले होते, की त्याने प्रत्येक दिवशी नियमशास्त्रावर मनन करावे. (यहोशवा १:८) यहोशवाच्या दिवसात नियमशास्त्राचे पुस्तक सापडले तेव्हा त्यात दिलेल्या सूचना लोकांनी लागू कराव्यात म्हणून यहोवाने त्यांना आशीर्वादित केले. (२ राजे २३:२, ३) तीमथ्याला पवित्र शास्त्रवचने त्याच्या बालपणापासूनच माहीत होती. (२ तीमथ्य ३:१४, १५) बिरुयातील लोक चांगले ऐकणारे होते; त्यांनी शास्त्रवचनाचे दररोज परीक्षण केल्यामुळे त्यांना “मोठ्या मनाचे” लोक असे म्हणण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११) सर्वात महान उदाहरण येशू ख्रिस्त आहे; त्याला देवाच्या वचनाची माहिती होती आणि त्याने देवाच्या वचनाचा उपयोगही केला.—मत्तय ४:१-११.
बंधू झरॅक्स यांनी समारोपाच्यावेळी नवीन मिशनऱ्यांना उद्देशून असे म्हटले: “आता तुम्ही मिशनरी कार्यावर जाण्यास तयार आहात. तुम्ही आता विदेशात जाणार आहात; खरे तर तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागांत जाणार आहात. आध्यात्मिकता जागृत ठेवण्याचे आव्हान तुम्ही यशस्वीरित्या पार पाडल्यास तुम्ही जे करण्याचा संकल्प केला आहे त्यापासून विचलित होण्याकरता कोणतीही गोष्ट तुमच्या आड येणार नाही. तुम्ही मोठ्या आवेशाने प्रचार करणार आहात, इतरांना तुमच्या विश्वासाचे अनुकरण करण्याकरता मदत करणार आहात, आणि तुम्ही ज्यांना शिकवत आहात त्यांच्याकरता आम्ही तुमच्यासोबत यहोवाला हीच प्रार्थना करू, की त्याने आपल्याप्रमाणे या आस्थेवाईक लोकांनाही जागृत करावे. आणि अशाप्रकारे जास्तीत-जास्त लोकांनी संपूर्ण जगावर येणाऱ्या संकटापासून स्वतःचा बचाव करून घ्यावा. मोठ्या संख्येने लोक आपल्यासोबत यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालतील. आणि असे करण्याकरता तुम्ही जे प्रयत्न कराल त्यांवर यहोवाचा आशीर्वाद असावा हीच आमची प्रार्थना.”
या कार्यक्रमाच्या संचालकाने जगभरातील विद्यार्थ्यांकरता आलेल्या शुभेच्छा वाचून दाखवल्यानंतर या नवोदित मिशनऱ्यांच्या पदवीदानाची वेळ आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे गुणग्राहकतेचे पत्र वाचून दाखवण्यात आले. या विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आणि “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” मिशनरी या नात्याने सेवा करण्याकरता त्यांना नेमण्यात आले. मिळालेल्या या बहुमानामुळे हे विद्यार्थी यहोवाचे आणि त्याच्या संघटनेचे किती कृतज्ञ आहेत!—प्रेषितींची कृत्ये १:८.
[२९ पानांवरील चौकट]
वर्गाची आकडेवारी
विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ११
नेमलेले देश: २४
एकूण विद्यार्थी: ४८
विवाहित जोडप्यांची संख्या: २४
सरासरी वय: ३४
सत्यात सरासरी वर्षे: १७
पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १२
[२६ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा १०७ वा वर्ग
खालील यादीत, पुढून मागे याप्रकारे ओळींची संख्या देण्यात आली आहे आणि प्रत्येक ओळीत नावे डावीकडून उजवीकडे या क्रमाने देण्यात आलेली आहेत
१. पेराल्टा, सी.; हॉलनबेक, बी.; शॉ, आर.; हसन, एन.; मार्टिन, डी.; हचिन्सन, ए. २. एडवड्र्स, एल.; वीजर, टी.; सेरूटी, क्यू.; एन्टझ्मिनर, जी.; डालोईज, एल.; बॉलइरी, एल.; ३. नाइट, पी.; क्रॉऊज, ए.; कझसकी, डी; रोझ, एम.; फ्रिडल, के.; न्येटो, आर. ४. रोझ. ई.; बेकस, टी.; टली, एस.; आँबर, डी.; बर्नहार्ट, ए.; पेराल्टा, एम. ५. डालोईज, ए.; आँबर, डी.; डन, एच.; गटलिंग, जी.; शॉ. जे.; सेरूटी, एम. ६. बॉलइरी, एस.; क्रॉऊज, जे.; हॉलेनबेक, टी.; मार्टिन, एम.; बर्नहार्ट, जे.; हचिन्स, एम. ७. बेकस, ए.; डन, ओ.; गटलिंग, टी.; वीजर, आर.; नाइट, पी. हसन, ओ. ८. न्येटो, सी.; टॅली, एम.; फ्रिडल, डी.; कझसकी, ए.; एडवड्र्स, जे.; इन्टझ्मिनर, एम.