वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १२/१५ पृ. ३०
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्हाला तुमच्या भावाला मिळवता येईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १२/१५ पृ. ३०

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूजच्या अलीकडच्या लेखांचे तुम्ही लक्षपूर्वक वाचन केले आहे का? मग, तुम्ही खाली दिलेल्या मुद्द्‌यांची मनोमन उजळणी करू शकता:

◻ मागणीचा विचार करण्याआधी दोन ख्रिस्ती व्यक्‍तींनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारावेत?

‘माझी ज्या व्यक्‍तीबरोबर मागणी होणार आहे तिच्या आध्यात्मिकतेविषयी व देवाला ती किती निष्ठावान आहे त्याविषयी मला पक्की खात्री आहे का? त्या व्यक्‍तीबरोबर मी आजीवन देवाची सेवा करण्याचा विचार करू शकतो/शकते का? आम्हाला एकमेकांचे व्यक्‍तिमत्त्व चांगल्याप्रकारे माहीत झाले आहे का? आमचे शेवटपर्यंत एकमेकांशी जुळेल अशी शाश्‍वती आहे का? आम्हाला एकमेकांच्या गत कृत्यांची व सध्याच्या परिस्थितीची चांगली माहिती आहे का?’—८/१५, पृष्ठ ३१.

◻ “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा,” असे आपल्या शिष्यांना म्हणताना येशूचे काय तात्पर्य होते? (मत्तय ५:१३)

यावरून येशूला असे म्हणायचे होते, की त्याचे शिष्य देव राज्याच्या प्रचाराचे जे कार्य करत होते त्या कार्याचा ऐकणाऱ्‍या लोकांवर होणारा परिणाम कायमस्वरुपी ठरू शकतो किंवा जीवन-रक्षक ठरू शकतो. अर्थात, येशूच्या बोलण्यावर अंमल करणारे लोक त्यांच्या समाजातील नैतिक आणि आध्यात्मिक प्रकारच्या कुजण्यापासून सुरक्षित राहू शकत होते.—८/१५, पृष्ठ ३२.

◻ लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटीगाठी करत असलेली जोडपी लैंगिक अनैतिकतेचा पाश कसा टाळू शकतात?

तुम्ही आपल्या भावी जोडीदाराला जाणून घेण्यासाठी भेटीगाठी करत असल्यास त्याच्या अथवा तिच्यासोबत अनुचित परिस्थितीत एकटे राहण्याचे टाळणे शहाणपणाचे ठरेल. इतरांसोबत असताना किंवा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे सर्वात चांगले. एकमेकांच्या भावनांबद्दल आणि विवेकाबद्दल आदर दाखवून, प्रेम व्यक्‍त करताना कधीही मर्यादा सोडू नका.—९/१, पृष्ठे १७, १८.

◻ समज म्हणजे काय?

समज याचा अर्थ, एखादी गोष्ट जवळून पाहणे व तिच्या वेगवेगळ्या पैलूंचा आणि संपूर्ण गोष्टीचा संबंध काय ते ग्रहण करण्याद्वारे त्या गोष्टीची रचना व तिचा अर्थ समजून घेणे होय. (नीतिसूत्रे ४:१)—९/१५, पृष्ठ १३.

◻ यहोवा आज आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

थोडक्यात, यहोवा आपल्याकडून आज हीच अपेक्षा करतो, की आपण त्याच्या पुत्राचे ऐकावे तसेच त्याच्या उदाहरणाचे आणि शिकवणुकींचे अनुकरण करावे. (मत्तय १६:२४; १ पेत्र २:२१)—९/१५, पृष्ठ २२.

◻ शांती केवळ कोणाला मिळू शकते?

यहोवा “शांतीचा देव आहे.” त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या आणि त्याच्या धार्मिक तत्त्वांचा मनापासून आदर करणाऱ्‍या लोकांमध्येच शांती असू शकते. (रोमकर १५:३३)—१०/१, पृष्ठ ११.

◻ योसेफाला पोटीफरच्या पत्नीला पुन्हा पुन्हा नाही म्हणण्याचे उचित धैर्य कोठून प्राप्त झाले?

योसेफाने क्षणिक सुखापेक्षा यहोवाबरोबरच्या त्याच्या नातेसंबंधाला जास्त मौल्यवान समजले. शिवाय, तो ईश्‍वरी नियमशास्त्राधीन नव्हता तरी, त्याला नैतिक तत्त्वे स्पष्टपणे माहीत होती. (उत्पत्ती ३९:९)—१०/१, पृष्ठ २९.

◻ आपल्या बांधवांना क्षमा करायला तयार असणे किती महत्त्वाचे आहे?

देवाने आपल्याला नेहमी क्षमा करावी असे आपल्याला वाटत असल्यास आपणही आपल्या बांधवांना क्षमा करायला तयार असले पाहिजे. (मत्तय ६:१२, १४; लूक ११:४)—१०/१५, पृष्ठ १७.

◻ मत्तय १८:१५-१७ यात कशाप्रकारच्या अपराधांविषयी सांगण्यात आले आहे आणि हे कशावरून म्हणता येईल?

येशू गंभीर पापांविषयी बोलत होता कारण त्या अपराध्याला “परराष्ट्रीय किंवा जकातदार” ह्‍यांच्यामध्ये गणले जाऊ शकत होते. यहुदी लोक परराष्ट्रीयांशी कोणतेही व्यवहार करीत नसत आणि जकातदारांशीही ते संबंध टाळायचे. त्यामुळे मत्तय १८:१५-१७ येथील संदर्भ हा गंभीर पातकांविषयी आहे; क्षमा करून विसरून जाता येतात अशा साधारण व्यक्‍तिगत समस्यांविषयी येशू तेथे बोलत नव्हता. (मत्तय १८:२१, २२)—१०/१५, पृष्ठ १९

◻ मनापासून देवाचे वचन प्रिय मानण्यामध्ये काय गोवलेले आहे?

देवाचे वचन प्रिय मानणारा त्यामधील अपेक्षांनुसार आचरण करतो. (स्तोत्र ११९:९७, १०१, १०५) यासाठी आपल्या विचारसरणीत आणि जीवनशैलीत सतत सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे.—११/१, पृष्ठ १४.

◻ महान राजा आणि दाता यहोवा याजकडून इतके काही मिळाल्यानंतर आपण त्याला काय देऊ शकतो?

बायबल आपल्याला सांगते की, यहोवाला आपण देऊ शकतो असे सर्वात उत्तम दान म्हणजे “स्तुतीचा यज्ञ.” (इब्री लोकांस १३:१५) ते का? कारण हे अर्पण, जीव वाचवण्याशी थेट संबंधित आहे; आणि या शेवटल्या दिवसांत यहोवाच्या नजरेत हे सर्वात महत्त्वाचे आहे. (यहेज्केल १८:२३)—११/१, पृष्ठ २१.

◻ “ज्ञान्यांची वचने पराण्यांसारखी असतात,” असे शलमोनाने कोणत्या अर्थाने म्हटले? (उपदेशक १२:११)

देवाच्या ज्ञानानुसार बोध देणाऱ्‍यांची वचने पराण्यासारखी असतात कारण त्यांमुळे वाचकाला किंवा ऐकणाऱ्‍याला वाचलेल्या किंवा ऐकलेल्या शब्दांनुरूप प्रगती करायला चालना मिळते.—११/१५, पृष्ठ २१.

◻ ईश्‍वरी समजबुद्धी म्हणजे काय?

बरोबर आणि चूक यांमधला फरक जाणून घेऊन मग उचित मार्ग निवडणे, याला ईश्‍वरी समजबुद्धी म्हणतात. देवाच्या वचनाचा अभ्यास आणि त्याचे पालन केल्यामुळे आपण समजबुद्धी प्राप्त करू शकतो.—११/१५, पृष्ठ २५.

◻ जबाबदाऱ्‍या स्वीकारण्याची तयारी दाखवण्यासोबतच आणखी कोणते गुण असणे आवश्‍यक आहेत? (२ तीमथ्य ३:१)

जबाबदाऱ्‍या स्वीकारण्याच्या तयारीसह चांगली निर्णयशक्‍ती असणे देखील जरूरीचे आहे. कोणाही व्यक्‍तीने इतक्या जबाबदाऱ्‍या स्वीकारू नयेत की जबाबदारींच्या ओझ्यामुळे तिला यहोवाची सेवा करण्यात काहीच आनंद उरणार नाही. जबाबदाऱ्‍या स्वीकारण्यासाठी पुढे येण्याची वृत्ती प्रशंसनीय आहे, पण अशी तयारी दाखवण्यासोबतच समतोलपणा आणि ‘मर्यादशीलता’ देखील महत्त्वाची आहे. (तीत २:१२; प्रकटीकरण ३:१५, १६)—१२/१, पृष्ठ २८.

◻ मुलांचे संगोपन करण्याच्या कठीण आव्हानाला पालकांनी कसे तोंड द्यावे?

देवाचा पालकांना हाच सल्ला आहे, की त्यांनी उदाहरणीय असावे, आपल्या मुलांचे मित्र बनावे, त्यांच्यासोबत बोलावे आणि त्यांना प्रेमाने शिकवावे. (अनुवाद ६:६, ७)—१२/१, पृष्ठ ३२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा