वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१ पृ. ३०-३१
  • शुद्ध उपासनेच्या वाढीकरता केलेले स्वेच्छिक बलिदान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुद्ध उपासनेच्या वाढीकरता केलेले स्वेच्छिक बलिदान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • साहित्यांची व कौशल्यांची देणगी
  • आपल्यासाठी बोध
  • ‘अनीतीकारक धनाने मित्र जोडा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • निर्गमच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • अनुदान केल्याने आनंद मिळतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१ पृ. ३०-३१

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

शुद्ध उपासनेच्या वाढीकरता केलेले स्वेच्छिक बलिदान

यहोवाच्या बचाव शक्‍तीचे प्रदर्शन इस्राएल लोकांनी प्रत्यक्षात पाहिले होते. लाल समुद्र चमत्कारिकपणे दुभंगताना त्यांनी पाहिला होता; यामुळे कोरडी भूमी पार करून ते इजिप्शियन सैन्यापासून आपला जीव वाचवू शकले होते. आणि पार झाल्यावर सुरक्षित ठिकाणाहून त्यांनी त्याच दुभंगलेल्या पाण्याला उसळत येऊन आपल्या शत्रूंना गिळंकृत करताना पाहिले होते. यहोवाने त्यांना वाचवले होते!—निर्गम १४:२१-३१.

पण दुःखाची गोष्ट, काही इस्राएल लोकांनी देवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याला क्षुल्लक लेखले. मोशे सिनाय पर्वतावर होता तेव्हा उपासनेसाठी आपल्याकरता एक मूर्ती बनवावी म्हणून त्यांनी अहरोनाला आपल्याकडचे सोनेनाणे दिले. परत आल्यावर मोशेने पाहिले, की हे बंडखोर लोक, खातपीत होते, नाचत होते व त्या सोन्याच्या वासरापुढे दंडवत घालत होते! यहोवाच्या मार्गदर्शनानुसार, सुमारे ३,००० लोकांना—कदाचित बंड चिथावणाऱ्‍या प्रमुख लोकांना—ठार मारण्यात आले. यहोवाला अनन्य भक्‍ती देण्याची गरज आहे हा महत्त्वाचा धडा त्या दिवशी देवाच्या लोकांना शिकायला मिळाला.—निर्गम ३२:१-६, १९-२९.

या घटनेनंतर, देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशे, वाहून नेता येण्याजोगे एक उपासना मंडप अर्थात निवासमंडप बनवण्याच्या तयारीला लागला. या बांधकाम प्रकल्पासाठी मौल्यवान साहित्य व कुशल कारागिर लागणार होते. हे सर्व कोठून येणार होते? आणि बायबलमधील या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?

साहित्यांची व कौशल्यांची देणगी

मोशेद्वारे यहोवाने आज्ञा दिली: “तुम्ही आपले अर्पण परमेश्‍वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्‍वरासाठी अर्पण आणावे.” कोणते अर्पण? मोशेने दिलेल्या यादीत, सोने, रुपे, तांबे, सूत, विणलेले कापड, कातडी, लाकूड आणि मौल्यवान रत्ने हे होते.—निर्गम ३५:५-९.

अशी उदारपणे अर्पणे करायला इस्राएल लोकांकडे बरेच होते. त्यांनी इजिप्त सोडले तेव्हा अनेक वस्त्रांसह सोन्यारुप्याच्या वस्तू आपल्याबरोबर घेतल्या होत्या याची आठवण करा. होय, “त्यांनी मिसरी लोकांना लुटिले” होते.a (निर्गम १२:३५, ३६) आधी, खोट्या उपासनेसाठी एक मूर्ती बनवायला त्यांनी स्वेच्छेने आपल्याकडचे सोनेनाणे दिले होते. तशीच उत्सुकता ते आताही खऱ्‍या उपासनेच्या वाढीसाठी अर्पण करायला दाखवतील का?

येथे प्रत्येकाने अमुक रक्कम द्यावी अशी मोशेने अट घातली नाही किंवा त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करून त्यांना द्यायला भाग पाडले नाही, या गोष्टीची नोंद घ्यावी. तर त्याने “मनापासून इच्छा” असलेल्यांना विनंती केली. हे स्पष्ट आहे, की मोशेला देवाच्या लोकांवर बळजबरी करायची आवश्‍यकता भासली नाही. त्याला हा भरवसा होता, की प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे तो किंवा ती देईल.—पडताळा २ करिंथकर ८:१०-१२.

पण, निवासमंडप बांधायला फक्‍त साहित्यांची देणगी पुरेशी नव्हती. यहोवाने इस्राएल लोकांना सांगितले: “तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्‍वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे.” होय, निवासमंडप बांधायला कुशल कारागिरांची आवश्‍यकता होती. हे काम पूर्ण करायला “सर्व प्रकारचे कसब” अर्थात, लाकूडकाम, धातूकाम आणि दागदागिने बनवायचे काम समाविष्ट होते. अर्थातच, यहोवा कारागिरांना मार्गदर्शन देणार होता व त्याचे सर्व श्रेय त्यालाच जाणार होते.—निर्गम ३५:१०, ३०-३५; ३६:१, २.

आपली साधनसंपत्ती देण्याचे व आपल्या कौशल्यांचा उपयोग करण्याचे इस्राएल लोकांना आमंत्रण देण्यात आले तेव्हा त्यांनी अगदी आनंदाने दाद दिली. बायबलमधील अहवाल म्हणतो: “ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शन-मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्‍वराला अर्पण आणिले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्रीपुरुष आले.”—निर्गम ३५:२१, २२.

आपल्यासाठी बोध

आज देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे प्रचंड कार्य ऐच्छिक अनुदानांद्वारे पार पाडले जाते. बहुतेकदा हे अनुदान आर्थिक स्वरुपाचे असते. इतर बाबतीत, ख्रिस्ती बंधू आणि भगिनी आपल्याजवळच्या अनुभवांच्या संपत्तीचा उपयोग, राज्य सभागृहे, संमेलन गृहे आणि शाखा कार्यालये बांधण्यासाठी करतात. शिवाय, संपूर्ण जगभरात शंभर पेक्षा अधिक बेथेल गृहांमध्ये काम चालले आहे; आणि हे काम म्हणजे विविध कौशल्यांचे आहे. मनापासून अशी अर्पणे करणारे सर्व जण ही खात्री बाळगू शकतात, की यहोवा त्यांनी केलेली मेहनतीची कामे कधीही विसरणार नाही!—इब्री लोकांस ६:१०.

हीच गोष्ट, ख्रिस्ती सेवेमधील प्रत्येकाच्या सहभागाच्या बाबतीतही लागू होते. प्रचारामध्ये आवेशपूर्ण सहभाग घेण्याकरता वेळ काढला पाहिजे असे प्रत्येकाला आर्जवले जाते. (मत्तय २४:१४; इफिसकर ५:१५-१७) काही जण पूर्ण वेळेचे सुवार्तिक अथवा पायनियर होऊन असे करतात. इतर जण त्यांच्या परिस्थितीमुळे पायनियरांसारखे सेवेमध्ये जास्त वेळ खर्च करू शकत नाहीत. तरीसुद्धा तेही यहोवाला प्रिय आहेत. निवासमंडपासाठी लागणाऱ्‍या वर्गणीच्या बाबतीत जसे यहोवाने अमुक रक्कम देण्याची अट घातली नाही त्याचप्रकारे सेवेच्या बाबतीतही तो ठरावीक वेळ देण्याची अट घालत नाही. पण, प्रत्येकाने पूर्ण अंतःकरणाने, जीवाने, मनाने व शक्‍तीने त्याची सेवा करावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (मार्क १२:३०) आपण असे करत असलो तर, खऱ्‍या उपासनेच्या वाढीसाठी आपण करत असलेल्या स्वेच्छिक बलिदानाचे प्रतिफळ तो आपल्याला नक्की देईल याची आपण खात्री बाळगू शकतो.—इब्री लोकांस ११:६.

[तळटीपा]

a ही चोरी नव्हती. इस्राएल लोकांनी इजिप्शियन लोकांकडे वर्गणी मागितली आणि त्यांना सढळ हाताने ती देण्यात आली. शिवाय, मुळात इजिप्शियन लोकांना इस्राएल लोकांस आपले दास बनवण्याचा काहीही हक्क नसल्यामुळे, देवाच्या लोकांकडून त्यांनी वर्षानुवर्षे करवून घेतलेल्या कामाचे त्यांना वेतन न दिल्यामुळे ते कर्ज त्यांच्यावर होतेच.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा