वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१ पृ. ३०-३१
  • मरीया “चांगला वाटा” निवडते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मरीया “चांगला वाटा” निवडते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूच्या पायांजवळ बसून शिकणे
  • आपल्यासाठी धडा
  • “मी विश्‍वास धरला आहे”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • “मी विश्‍वास धरला आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • मार्थाला सल्ला व प्रार्थनेविषयी सूचना
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • विचलित न होता यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१ पृ. ३०-३१

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

मरीया “चांगला वाटा” निवडते

येशूच्या दिवसांत यहुदी स्त्रियांवर रब्बी परंपरेची बंधने होती. यामुळे नियमशास्त्राचा अभ्यास त्यांना करू दिले जात नसे. मिशनात तर म्हटले आहे: “एखाद्या बापाने आपल्या लेकीला नियमशास्त्राचे ज्ञान दिले म्हणजे त्याने तिला बाहेरख्यालीपणा शिकवला आहे.”—सोताह ३:४.

यामुळेच पहिल्या शतकात यहुदीयातील बहुतेक स्त्रिया इतक्या शिकलेल्या नव्हत्या. “येशूच्या सेवेच्याआधी यहुदी स्त्रियांना एखाद्या महान शिक्षकाच्या शिष्या होण्याची, त्या शिक्षकाबरोबर प्रवास करण्याची किंवा मुलांव्यतिरिक्‍त इतरांना शिकवण्याची परवानगी होती असा कोणताही पुरावा नाही,” असे द अँकर बायबल डिक्शनरी म्हणते. स्त्रियांना कमी लेखणे एवढ्यावरच थांबले नाही; काही धार्मिक नेत्यांना तर, पुरुषाने लोकांमध्ये कोणत्याही स्त्रीबरोबर बोलायचे नाही असा नियमच काढला!

अशा अभक्‍त मनोवृत्तींचा येशूने धिक्कार केला. त्याने स्त्रियांना आणि पुरुषांना शिकवले; त्याच्या शिष्यगणात स्त्रियाही होत्या आणि पुरुषही होते. (लूक ८:१-३) एके प्रसंगी येशूला मार्था आणि मरीयेच्या घरी आमंत्रण मिळाले होते. (लूक १०:३८) या दोघी जणी लाजरच्या बहिणी होत्या; लाजर, मार्था आणि मरीया येशूच्या शिष्यगणातील होते आणि येशूबरोबर त्यांची चांगली मैत्री होती. (योहान ११:५) या तिघा बहिणभावाचे घराणे मोठे असावे, कारण लाजरचा मृत्यू झाला तेव्हा पुष्कळ लोक मार्था आणि मरीयेचे सांत्वन करायला आले होते. प्रसंग काहीही असो, येशू त्यांच्या घरी पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा तेथे जे घडले त्यावरून फक्‍त त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही धडा शिकायला मिळतो.

येशूच्या पायांजवळ बसून शिकणे

यात काही शंका नाही, की येशूसाठी पंचपक्वान्‍न करायचा मार्था आणि मरीयेचा बेत असावा; आणि कदाचित त्यांची तितकी ऐपत देखील होती. (पडताळा योहान १२:१-३.) पण, त्यांचा पाहुणा आला तेव्हा मरीया “प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली.” (लूक १०:३९) शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या स्त्रीला शिकवण्यापासून कोणतीही मानवी परंपरा येशूला रोखू शकत नव्हती! आपण कल्पना करू शकतो, धनी शिकवत असलेल्या शिकवणी ऐकण्यात पूर्णपणे लवलीन झालेल्या विद्यार्थ्याप्रमाणे मरीया येशूच्या पायांजवळ बसली आहे.—पडताळा अनुवाद ३३:३; प्रेषितांची कृत्ये २२:३.

पण, मार्थाची मात्र चांगलीच “तारांबळ उडाली” होती. पंचपक्वान्‍न बनवण्यातच ती गढून गेली होती. आणि तिला आपल्या बहिणीचा राग येऊ लागला कारण तिला एकटीलाच सर्व आवरावं लागत होतं आणि तिची बहीण मात्र येशूच्या पायांजवळ निवान्त बसून ऐकत होती! म्हणून मार्थाने येशूचे बोलणे मध्येच थांबवले व ती त्याला म्हणाली: “प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्‍याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा.”—लूक १०:४०.

मार्थाची ही विनंती तशी चुकीची नव्हती. कारण, पुष्कळ लोकांसाठी जेवण बनवणे काही सोपे काम नव्हते आणि तेही एकट्यावर जास्त भार पडणे चुकीचे होते. पण तिला एक मौल्यवान धडा शिकवण्यासाठी येशूने त्या संधीचा उपयोग केला. “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”—लूक १०:४१, ४२.

मार्थेला आध्यात्मिक गोष्टींत रस नव्हता असे येशूला म्हणायचे नव्हते. उलट, ती श्रद्धाळू होती हे त्याला माहीत होते.a म्हणूनच तर तिने येशूला आपल्या घरी बोलवले होते. पण, जेवण बनवण्याच्या नादात मार्था, देवाच्या पुत्राकडून मिळणाऱ्‍या व्यक्‍तिगत शिक्षणाची दुर्मिळ संधी हातची गमावत होती हे येशू तिला दाखवून देऊन तिची सौम्यरीतीने सुधारणा करीत होता.

त्या दिवसांतील रूढीप्रमाणे, स्त्रीचे कौशल्य, घरकामात ती किती निपुण आहे त्यावरून ठरवले जात असावे, हे कबूल आहे. पण येशूच्या शब्दांवरून दिसून येते, की पुरुषांप्रमाणे स्त्रियाही देवाच्या पुत्राच्या पायांजवळ बसून जीवनाच्या गोष्टी ऐकू शकत होत्या! (योहान ४:७-१५; प्रेषितांची कृत्ये ५:१४) हे लक्षात ठेवून मार्थेने खूप काही पेक्षा, थोडेसे—कदाचित एकच पदार्थ—बनवला असता तर तिलाही धन्याच्या पायांजवळ बसून त्याच्याकडून शिकण्याची संधी मिळाली असती.—पडताळा मत्तय ६:२५.

आपल्यासाठी धडा

“जीवनाचे पाणी फुकट घेवो” या येशूच्या आमंत्रणाला दाद देणाऱ्‍या लोकांमध्ये आज पुरुष आणि स्त्रियाही आहेत. (प्रकटीकरण २२:१७) प्रीतीने प्रवृत्त होऊन, काही स्त्रिया—मार्थेप्रमाणेच—सहविश्‍वासूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना होता होईल तितका प्रयत्न करतात. त्या समजदार व कार्य करण्यास चपळ आहेत आणि यहोवा त्यांच्या प्रीतीच्या श्रमाचे प्रतिफळ देण्याचे वचन देतो. (इब्री लोकांस ६:१०; १३:१६) इतर जणी मरीयासारख्या आहेत. त्या सौम्य आणि चिंतन करणाऱ्‍या आहेत. देवाच्या वचनावर मनन करण्याची उत्सुकता त्यांना विश्‍वासात पक्के मुळावण्यास मदत करते.—इफिसकर ३:१७-१९.

दोन्ही प्रकारच्या लोकांची ख्रिस्ती मंडळीत निन्तात गरज आहे. परंतु, शेवटी सर्वांनी आध्यात्मिक गोष्टींना प्राथमिकता देऊन “चांगला वाटा” निवडला पाहिजे. अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची खात्री करण्याद्वारे आपण यहोवाची पसंती आणि आशीर्वाद प्राप्त करू.—फिलिप्पैकर १:९-११.

[तळटीपा]

a मार्था आध्यात्मिक मनाची होती, ती खूप विश्‍वासू होती, हे तिचा भाऊ लाजर याचा मृत्यू झाल्यानंतर येशूबरोबर तिच्या संभाषणावरून दिसून येते. या प्रसंगी मार्थानेच आपल्या धन्याला भेटण्याची उत्सुकता दाखवली होती.—योहान ११:१९-२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा