वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१५ पृ. ८-९
  • रागाला अडखळण होऊ देऊ नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • रागाला अडखळण होऊ देऊ नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • स्वतःच्या व इतरांच्या रागावर नियंत्रण ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • राग करणे नेहमीच चुकीचे आहे का?
    सावध राहा!—१९९४
  • राग—तो काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • रागावर नियंत्रण का ठेवावे?
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१५ पृ. ८-९

रागाला अडखळण होऊ देऊ नका

“दमाने, जरा दमाने!” “उगाच रागाच्या भरात काही करू नका!” “शांत व्हा, जरा शांतीने घ्या!” हे सर्व तुम्हाला ऐकल्यासारखे वाटते का? कदाचित डोकं शांत करायला तुम्ही स्वतःलाच हे म्हणत असाल. काही लोक राग शांत करण्यासाठी फेरफटका मारायला जातात. रागावर नियंत्रण ठेवण्याचे व इतरांबरोबर आपले संबंध टिकवून ठेवण्याचे हे साधे मार्ग आहेत.

पण अलीकडील वर्षांत, रागावर नियंत्रण करायचे की राग दाबून टाकायचा यावर सल्लागारांची भिन्‍न मते असल्यामुळे पुष्कळ जण बुचकळ्यात पडले आहेत. उदाहरणार्थ, काही मानसशास्त्रज्ञांचे असे नवीन मत आहे की, राग व्यक्‍त केल्यामुळे “तुम्हाला बरे वाटत असेल तर” तसे करा. इतर जण ताकीद देतात, की “धूम्रपान, उच्च रक्‍तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे जास्त प्रमाण या हानीकारक कारणांपेक्षा” वारंवार राग राग करणे हे “अकाली मृत्यूचे मोठे लक्षण” आहे. देवाचे वचन स्पष्टपणे सांगते: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तोत्र ३७:८) बायबल असा स्पष्ट सल्ला का देते?

अनियंत्रित भावनांमुळे अनियंत्रित कार्य घडू शकते. मानव इतिहासाच्या अगदी सुरवातीलाच हे दिसून आले. आपण वाचतो: “काइन संतापला व त्याचे तोंड उतरले.” यामुळे काय झाले? तो रागाच्या इतक्या आहारी गेला, की चांगले करण्याबद्दल यहोवाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्याइतपत त्याचे अंतःकरण निरढावले. काईनाच्या अनियंत्रित रागामुळे त्याच्या हातून एक घोर पाप घडले—त्याच्या भावाचा वध.—उत्पत्ति ४:३-८.

इस्राएलचा पहिला राजा शौल याने दावीदाची प्रशंसा होत असलेली ऐकली तेव्हा त्याच्या अंगातही रागाचे भूत संचारले होते. “नृत्य करणाऱ्‍या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत: ‘शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले.’ हे ऐकून शौलास फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्यास आवडले नाहीत.” रागाने शौलावर इतका कब्जा मिळवला होता, की दावीदाची हत्या करण्याचा त्याने अनेकवेळा प्रयत्न केला. दावीदाने पुष्कळ वेळा मैत्रीचा हात पुढे केला पण शौल शांती व समेट घडवण्यास तयार नव्हता. सरतेशेवटी, तो पूर्णपणे यहोवाच्या नजरेतून उतरला.—१ शमुवेल १८:६-११; १९:९, १०; २४:१-२१; नीतिसूत्रे ६:३४, ३५.

अनियंत्रित रागाच्या भरात एखादी व्यक्‍ती समोरच्या लोकांना एकतर वाईट बोलेल किंवा काहीतरी वाईट करेल. (नीतिसूत्रे २९:२२) काईन आणि शौल या दोघांना राग आला होता कारण त्या दोघांनीही ईर्ष्या व मत्सर मनात बाळगला होता. पण, वेगवेगळ्या कारणांसाठी एखादा रागावू शकतो. अनुचित टीका, अपमान, अपसमज किंवा गैरवागणूक ही ठिणगी, एखाद्यामध्ये क्रोधाची आग पेटवायला पुरेशी आहे.

काईन आणि शौलाचे उदाहरण, त्या दोघांमध्येही असलेला एक गंभीर दोष दाखवून देते. काईनाने विश्‍वासाने प्रवृत्त होऊन अर्पण केले नव्हते, हे स्पष्ट होते. (इब्री लोकांस ११:४) शौलाने एकतर यहोवाची स्पष्ट आज्ञा पाळली नाही आणि त्यावर स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून यहोवाची कृपापसंती आणि आत्मा त्याला प्राप्त झाला नाही. स्पष्टपणे, दोघांनी यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडवला.

पण, या लोकांच्या स्वभावाची तुलना दावीदाच्या स्वभावाशी करून पाहा; शौलाकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल तोही क्रोधीत होऊ शकत होता. दावीदाने स्वतःवर ताबा ठेवला. का? तो म्हणाला: “मी आपल्या स्वामीवर, परमेश्‍वराच्या अभिषिक्‍तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्‍वर मजकडून न घडवो.” यहोवाबरोबर असलेल्या नातेसंबंधाची त्याला काळजी होती, व त्यामुळेच तो शौलाबरोबर विचारपूर्वक वागला. त्याने नम्र होऊन सर्व काही यहोवाच्या हाती सोपवून दिले.—१ शमुवेल २४:६, १५.

खरेच, अनियंत्रित रागाचे परिणाम गंभीर होतात. प्रेषित पौलाने ताकीद दिली: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका.” (इफिसकर ४:२६) धार्मिक रागाला आपले स्थान असले तरी, राग आपल्यासाठी अडखळण होण्याचा धोका सतत असतो. म्हणूनच आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण करण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागतो. तो सामना आपण कसा करू शकतो?

एक प्रमुख मार्ग आहे, यहोवाबरोबर दृढ नातेसंबंध विकसित करणे. त्याच्यापुढे आपले मन व अंतःकरण खुले करावे असे प्रोत्साहन तो आपल्याला देतो. तुमच्या काळज्या, चिंता त्याला सांगा आणि रागावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून आपल्याला शांत मन द्यावे अशी त्याला प्रार्थना करा. (नीतिसूत्रे १४:३०) “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात,” याची खात्री बाळगा.—१ पेत्र ३:१२.

प्रार्थना तुम्हाला निर्देशित आणि मार्गदर्शित करू शकते. कोणत्या मार्गाने? इतरांबरोबरच्या तुमच्या व्यवहारावर तिचा खोल प्रभाव पडू शकतो. यहोवा तुमच्याशी कसा वागला त्याची आठवण करा. शास्त्रवचने म्हणतात त्याप्रमाणे, “आमच्या पातकांच्या मानाने [यहोवाने] आम्हाला शासन केले नाही.” (स्तोत्र १०३:१०) “आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये,” म्हणून क्षमा करण्याचा आत्मा आपल्यात असणे महत्त्वाचे आहे. (२ करिंथकर २:१०, ११) शिवाय, प्रार्थनेमुळे तुमचे हृदय पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारेल, ज्याकरवी सर्वात खोलवर रुजलेल्या सवयी देखील बदलू शकतात. यहोवा अगदी आनंदाने आपल्याला ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती’ देऊ करतो ज्याकरवी आपण रागाच्या तावडीतून मुक्‍त होऊ शकतो.—फिलिप्पैकर ४:७.

परंतु, प्रार्थनेबरोबरच शास्त्रवचनांचे नियमित परीक्षण करणे जरूरीचे आहे जेणेकरून आपण “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून” घेऊ शकतो. (इफिसकर ५:१७; याकोब ३:१७) रागावर नियंत्रण ठेवायला तुम्हाला कठीण जात असेल तर याविषयावर यहोवाचा काय विचार आहे ते माहीत करून घ्यायचा प्रयत्न करा. खासकरून रागावर नियंत्रण करण्याबाबतच्या शास्त्रवचनांची उजळणी करा.

प्रेषित पौल ही महत्त्वपूर्ण स्मरणिका देतो: “आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) आपले आचार-विचार इतरांचे भले करण्यावर केंद्रित ठेवा. अशाप्रकारच्या हितकारक, सकारात्मक कार्यामुळे सहानुभूती आणि भरवसा वाढतो व सहजपणे क्रोधात परिणीत होणारे गैरसमज दूर होतात.

स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर, आणि कसल्याहि दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्‍यांना फार शांति असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” (स्तोत्र ११९:१३३, १६५) हे तुमच्याही बाबतीत खरे ठरू शकते.

[९ पानांवरील चौकट/चित्र]

रागावर नियंत्रण मिळवण्याची पावले

□ यहोवाला प्रार्थना करा.—स्तोत्र १४५:१८.

□ शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा.—स्तोत्र ११९:१३३, १६५.

□ चांगल्या कार्यांमध्ये व्यस्त राहा.—गलतीकर ६:९, १०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा