वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ८/१ पृ. ६-८
  • असमानतेच्या रोगावर नियंत्रण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • असमानतेच्या रोगावर नियंत्रण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हातात जे आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या!
  • बांधवांमधील समता अनुभवणे
  • असमानता—देवाचा उद्देश?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • असमानतेचा रोग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • समानतेचा पाठलाग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • सर्व मानव समान आहेत—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ८/१ पृ. ६-८

असमानतेच्या रोगावर नियंत्रण

मानवांना ज्याची आस लागली आहे ती समानता निर्माणकर्ता लवकरच आणणार आहे. पण, तोपर्यंत निदान आपण आपल्यावर आणि आपल्या कुटुंबांवर ज्याचा परिणाम होतो त्या असमानतेच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलू शकतो. दक्षिण आफ्रिकेचे भूतपूर्व अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी म्हटले, “एकमेकांपासून वेगळे करणारे जे आपल्याला देण्यात आले आहे त्यातून नव्हे तर आपल्याकडे जे असते त्यातून आपण काहीतरी बनवत असतो.”

इतिहास त्यांचे हे शब्द खरे ठरवतो. अशा पुष्कळ स्त्रिया व पुरुष आहेत ज्यांना जन्मतः खूपच थोडे मिळाले होते पण त्यांनी त्याचा सदुपयोग करून इतके यश मिळवले की, कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त कौशल्य असलेल्या त्यांच्या साथीदारांपेक्षा ते उठून दिसले. आणि असेही काही जण होते ज्यांच्या पायाशी सुख लोळण घेत होते तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून परिस्थितीचा सदुपयोग करून घेतला नाही.

हातात जे आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या!

बायबल अभ्यासाद्वारे लोकांनी देवाच्या उद्देशांचे ज्ञान प्राप्त करावे म्हणून यहोवाचे साक्षीदार त्यांना मदत करायची उत्कट इच्छा बाळगतात. पण, बायबलमधील माहितीचा पुरेपूर फायदा मिळवण्याकरता लोकांना लिहायला-वाचायला आले पाहिजे, याची त्यांना जाणीव आहे. याच कारणास्तव, यहोवाच्या साक्षीदारांनी लाखो लोकांना साक्षर केले; यामध्ये (१९९० दशकाच्या मध्यात) एकट्या पश्‍चिम आफ्रिकन राष्ट्रात २३,००० जणांचा देखील समावेश होतो. यहोवाचे साक्षीदार पुरवत असलेल्या या वाखाणण्याजोग्या सामाजिक सेवेचा उल्लेख करत सॅन फ्रॅन्सिस्को एक्झॅमिनरने म्हटले: “तुम्ही त्यांना आदर्श नागरीक समजू शकता. ते न चुकता कर भरतात, आजाऱ्‍यांची काळजी घेतात व निरक्षरतेविरुद्ध लढा देतात.”

याशिवाय, जनभाषणाच्या प्रगतिशील कोर्सद्वारे यहोवाच्या साक्षीदारांनी हजारो लोकांना कुशल वक्‍ते बनण्यास, लोकांपुढे अगदी अस्खलितपणे बोलण्यास साहाय्य केले आहे. या हजारोंपैकी काही असे होते ज्यांना स्पष्टपणे बोलता येत नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील एका मनुष्याचेच उदाहरण घ्या; तो लिहितो: “तोतरेपणामुळे मी जास्त बोलत नसे; दुसऱ्‍यांना माझ्यावतीनं बोलू द्यायचो. . . . मी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत माझं नाव घातलं तेव्हा मला फक्‍त काही लोक असलेल्या श्रोत्यांसमोर बायबल वाचन करायचं होतं. . . . पण वाचताना मी इतक्यांदा अडखळलो की दिलेल्या वेळेत मी वाचन पूर्ण करू शकलो नाही. सभेनंतर [सल्ला देणाऱ्‍याने] अगदी प्रमेळपणे मला व्यावहारिक सल्ला दिला. मी रोज मोठ्याने वाचण्याची सवय करावी असा सल्ला त्यांनी मला दिला. असे मी रोज केले; बायबल आणि टेहळणी बुरूज मासिकं मी रोज मोठ्याने वाचू लागलो.” या गृहस्थाने इतकी प्रगती केली की आज तो शेकडो, नव्हे हजारो श्रोत्यांसमोर जाहीर भाषणे देतो.

बांधवांमधील समता अनुभवणे

शिक्षण, आरोग्याची काळजी आणि आर्थिक व सामाजिक स्थिती यांबाबतीत, यहोवाच्या साक्षीदारांची परिस्थिती भिन्‍न आहे. ही भिन्‍नता, ते ज्या अपरिपूर्ण जगात जगत आहेत त्यांची निव्वळ पडछाया आहेत. परंतु इतर धार्मिक गटांच्या तुलनेत, त्यांच्यातील वांशिक, सामाजिक व आर्थिक पूर्वग्रह जवळजवळ केव्हाच नाहीसे झाले आहेत.

बायबलमधून ते जे शिकले आहेत ते आचरण्याचा होता होईल तितका प्रयत्न करण्याद्वारे त्यांनी हे साध्य केले आहे. पुढे सांगितलेल्या बायबल तत्त्वांना त्यांनी पूर्णपणे स्वीकारले आहे: “मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:७) “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोमकर १२:१७, १८; तसेच १ तीमथ्य ६:१७-१९; याकोब २:५, ९ पाहा.

ऐक्य वाढवणाऱ्‍या या बायबल तत्त्वांचे जवळून अनुकरण करत यहोवाचे साक्षीदार वांशिक, सामाजिक अथवा आर्थिक फरक यांच्या आधारावरील कोणत्याही असमानतेला थारा देत नाहीत. वरीलपैकी कोणतीही कारणे, ख्रिस्ती मंडळीत कोणाला विशेषाधिकार दिले जावेत हे ठरवताना आड येत नाहीत. शिकवणे व देखरेखीसारखी जबाबदारीची पदे केवळ आध्यात्मिक पात्रतेच्या आधारावरच दिली जातात.—१ तीमथ्य ३:१-१३; तीत १:५-९.

भेदभाव असलेल्या जगात राहिल्यामुळे त्रास झालेल्या लोकांना जेव्हा आपल्या निर्माणकर्त्यासमोर समान भूमिका असलेल्या बंधू व भगिनींप्रमाणे वागवले जाते तेव्हा त्यांना किती हायसे वाटते. मार्टिना याची साक्ष देऊ शकेल. तिच्या वडिलांनी तिच्या कुटुंबाला वाऱ्‍यावर सोडून दिल्यानंतर तिचे संगोपन एका गरीब व एक पालक कुटुंबात झाले. अनेकदा तिला वाळीत टाकल्याप्रमाणे वागवले जात असे; तिच्यात आत्म-सन्मानच नव्हता व इतरांमध्ये ती मिसळू शकत नव्हती. यामुळे तिही कोणाची पर्वा करत नसे. परंतु, जेव्हा तिने बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली व यहोवाची साक्षीदार बनली तेव्हा सर्वकाही बदलले. ती म्हणते: “मला अजूनही नकारात्मक विचारांविरुद्ध झगडावं लागत असलं तरी, मी माझ्या समस्या आता चांगल्याप्रकारे हाताळू शकते. माझ्यात आत्म-सन्मान वाढला आहे व मी पूर्ण विश्‍वासाने बोलू शकते. सत्याने मला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. आता मला माहीत आहे, की यहोवा माझ्यावर प्रेम करतो व हे जीवन जगण्यात काहीतरी अर्थ आहे.”

ख्रिश्‍चनांचा आंतरराष्ट्रीय गट या नात्याने, २३० पेक्षा अधिक राष्ट्रांतील यहोवाच्या साक्षीदारांमध्ये समानता आहे, जी आज दुसरीकडे कोठेच पाहायला मिळत नाही. कोणतीही धार्मिक संघटना असा दावा करून पुरावा देऊ शकते का?

अर्थातच, यहोवाचे साक्षीदार वास्तववादी आहेत. अपरिपूर्ण जगात राहात असल्यामुळे, ज्या लोकांनी अनेक शतकांपासून मानवी असमानतेला काढून टाकण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले अशा लोकांपेक्षा आपण काही जास्त करू शकत नाही असे ते कबूल करतात. तरीपण, समूह या नात्याने त्यांनी या भयानक रोगावर नियंत्रण मिळवण्याचा बराच प्रयत्न केला आहे. देवाच्या अभिवचनांवर दृढ विश्‍वास ठेवून ते धार्मिकतेच्या त्या नव्या जगाची वाट पाहून आहेत जेथे भेदभाव हा कायमसाठी इतिहासजमा झालेला असेल.

सर्व आज्ञाधारक मानवांसाठी त्यांच्या निर्माणकर्त्याने सुरवातीलाच ज्याप्रमाणे उद्देशिले होते त्याप्रमाणे एकसारखा “सन्मान व अधिकार” असलेली परिस्थिती पुन्हा येईल. किती सुखद विचार आहे हा! आणि हे सत्यात उतरणार आहे!

[७ पानांवरील चित्र]

हजारो लोकांना साक्षर करण्याद्वारे यहोवाचे साक्षीदार निरक्षरतेविरुद्ध लढत आहेत

[८ पानांवरील चित्र]

बायबलमधील सत्य वांशिक, सामाजिक व आर्थिक पूर्वग्रह पूर्णपणे नाहीसे करण्यास मदत करते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा