वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. २८-२९
  • देव ‘वाकड्या’ मार्गांनी काही घडवून आणतो का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव ‘वाकड्या’ मार्गांनी काही घडवून आणतो का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुधारणूक करण्याचा समय
  • यहोवाला आपला भरवसा बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • काळजी वाहणारा देव आहे?
    काळजी वाहणारा देव आहे का?
  • विकलांगतेचा अंत कसा होणार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • “पहा! मी सर्व नवे करतो”
    “पहा! मी सर्व नवे करतो”
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. २८-२९

देव ‘वाकड्या’ मार्गांनी काही घडवून आणतो का?

“देऊस एस्क्रेव्ही सेरटू पॉर लिन्यॉस टॉरटॉस” (“वाकड्या ओळीत देव सरळ लिहितो”) ही ब्राझीलमधील एक म्हण आहे. यावरून असे सूचित होते, की देव नेहमी योग्य करतो, पण तेच काहीवेळा मनुष्याला अयोग्य वाटतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती अगदी तरुण वयातच असताना मरते तेव्हा अनेक लोक म्हणतात, ‘देवाने त्याला स्वर्गात उचलून घेतले.’ एखादा, शारीरिक व्यंगामुळे जर्जर झाला असेल किंवा दुःखाला तोंड देत असेल तेव्हा काही असे म्हणतात, ‘देवाचीच इच्छा आहे हो.’ मृत्यू, शारीरिक समस्या आणि दुःखाच्या इतर कारणांचा दोष देवावर लावला जात असल्यामुळे, अशाप्रकारच्या अभिव्यक्‍तींवरून हे सूचित होते, की देव ‘वाकडे लिहितो,’ अर्थात काही गोष्टी तो अशा तऱ्‍हेने करतो की ते मनुष्याच्या समजण्यापलीकडे आहे.

मृत्यू आणि दुःख या दोहोंकरता देव जबाबदार आहे, असे अनेक धार्मिकांना का वाटते? सहसा हे विश्‍वास, बायबलमधील इकडच्या तिकडच्या वचनांना घेऊन बनलेल्या गैरसमजुतीवर आधारित असतात. अशाच काही वचनांचा आपण थोडक्यात विचार करू या.

● “मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण [“अनुमती,” NW] करितो? मी परमेश्‍वरच की नाही?”—निर्गम ४:११.

शारीरिक व्यंगांमुळे पीडित असलेल्या सर्व लोकांची ही अवस्था देवामुळेच झाली असा याचा अर्थ होतो का? नाही. हे देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या एकवाक्यतेत नसेल. बायबल आपल्याला सांगते: “देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे.” (१ तीमथ्य ४:४) एखादा मनुष्य जन्मताच अंध, मुका किंवा बहिरा असल्यास त्यास देव दोषी नसतो. “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” यांचा तो स्रोत असल्यामुळे त्याच्या सृष्टीला चांगले ते मिळावे अशीच त्याची इच्छा आहे.—याकोब १:१७.

आदाम आणि हव्वा या आपल्या पहिल्या पालकांनी स्वतः होऊन देवाच्या विरुद्ध बंड केल्यामुळे परिपूर्णता गमावली आणि परिणामी परिपूर्ण मुलांना जन्म देण्याची क्षमताही गमावली. (उत्पत्ति ३:१-६, १६, १९; ईयोब १४:४) त्यांच्या मुलांची जसजशी लग्ने होऊन त्यांना मुले होत गेली तसतशी अधिकाधिक अपरिपूर्णता लोकांमध्ये दिसू लागली अर्थात त्यात शारीरिक व्यंगांचाही समावेश होता. या गोष्टीस यहोवा कारणीभूत नसला, तरी तसे होऊ देण्यास त्याने मुभा मात्र दिली. यास्तव, तो असे म्हणू शकला, की मनुष्यास मुका, बहिरा आणि अंध होण्याकरता तो ‘अनुमती देतो.’

● “जे वाकडे आहे ते सरळ होत नाही.”—उपदेशक १:१५.

देवाने वाकड्या गोष्टी केल्या आहेत का? मुळीच नाही. उपदेशक ७:२९ म्हणते: “देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्‍न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.” किंवा, कंटेम्पररी इंग्लिश व्हर्शन यानुसार “आपल्याला देवाने बनविले तेव्हा आपण पूर्णपणे प्रामाणिक होतो, पण आता आपली मने भ्रष्ट झाली आहेत.” देवाच्या धार्मिक दर्जांना जडून राहण्याऐवजी बहुतांश स्त्री-पुरुषांनी हेतूतः स्वतःच्या कल्पना, योजना, बेत किंवा मार्ग यांनुसार चालण्याचे निवडून स्वतःचे नुकसान करून घेतले आहे.—१ तीमथ्य २:१४.

तसेच, प्रेषित पौलाने सांगितल्यानुसार, मानवजातीच्या पातकामुळे “सृष्टि व्यर्थतेच्या स्वाधीन” झाली आहे. (रोमकर ८:२०) ही सर्व परिस्थिती मानवी प्रयत्नांनी ‘सरळ होणे’ शक्य नाही. केवळ ईश्‍वरी हस्तक्षेपानेच पृथ्वीवरील व्यवहारांतील वाकडेपणा आणि व्यर्थता दूर होईल.

● “देवाची करणी पाहा, त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल?”—उपदेशक ७:१३.

दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, शलमोन राजा असे विचारतो: ‘मानवांमध्ये असा कोण आहे जो देवाने अनुमती दिलेल्या उणिवा आणि अपरिपूर्णता सरळ करू शकेल?’ कोणीही नाही, यहोवा देव ह्‍या गोष्टी होऊ देण्यास अनुमती का देतो यास एक कारण आहे.

यामुळे शलमोन म्हणतो: “भरभराटीच्या काळी आनंदी रहा. आपल्यामागे काय होणार हे माणसाला समजू नये म्हणून भरभराटीचा तसाच संकटाचा समय त्यानेच निर्माण केला आहे, हे विपत्काली लक्षात घे.” (उपदेशक ७:१४, कॉमन लँग्वेज भाषांतर.) ज्या दिवशी सगळे सुरळीत पार पडते तेव्हा एखाद्या व्यक्‍तीने त्याची कदर बाळगावी आणि चांगल्या गोष्टी करण्याद्वारे त्याने ही कदर व्यक्‍त करावी. चांगला दिवस म्हणजे देवाची देण आहे, असा त्याने विचार करावा. पण, एखाद्या दिवशी संकट येते तेव्हा? ते संकट येण्यास देवाने अनुमती दिली आहे असे त्या व्यक्‍तीने “लक्षात” घेतल्यास अर्थात ओळखल्यास ते चांगले. देवाने असे का केले आहे? शलमोन म्हणतो: “आपल्यामागे काय होणार आहे हे माणसाला समजू नये म्हणून.” याचा काय अर्थ होतो?

देव आपल्याला दुःख आणि सुख दोन्ही अनुभवण्याची मुभा देतो या वास्तविकतेद्वारे आपल्याला याचे स्मरण होते, की भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नाही. धार्मिक तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांवरही संकट कोसळू शकते. याकरता कोणीही अपवाद नाही. यामुळे, “देव प्रिती आहे” हे लक्षात ठेवून आपण स्वतःवर नव्हे, तर देवावर विसंबून राहणे किती महत्त्वाचे आहे, याची आपल्याला समज मिळण्यास हवी. (१ योहान ४:८) आपल्याला सध्या काही गोष्टी कळत नसल्या, तरीही आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की जे काही झाले त्याद्वारे संबंधित सर्वांचा लाभ व्हावा म्हणूनच देवाने तसे होऊ देण्यास अनुमती दिली असेल.

तो जे काही होण्यास परवानगी देतो त्यामुळे धार्मिक लोकांना कायमची हानी कधीच होणार नाही. प्रेषित पेत्राच्या काळात त्याच्या सहविश्‍वासू लोकांनी जे दुःख सोसले त्याविषयी बोलताना त्याने हे स्पष्ट केले: “आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील.”—१ पेत्र ५:१०.

सुधारणूक करण्याचा समय

सध्याच्या परीक्षात तग धरण्याकरता यहोवा आपल्याला सामर्थ्य देतो. “सर्व गोष्टी नवीन” करण्याचेही तो अभिवचन देतो. (प्रकटीकरण २१:५) होय, त्याच्या स्वर्गीय राज्याने लवकरच शारीरिक व्यंग असलेल्यांना चांगले आरोग्य प्रदान करावे आणि मृत्यू पावलेल्या लोकांचे पुनरुत्थान करावे, हा त्याचा उद्देश आहे. ज्याचे मार्ग खरोखरच वाकडे आहेत—दियाबल सैतान—त्यालाही देवाचे राज्य लवकरच काढून टाकील. (योहान ५:२८, २९; रोमकर १६:२०; १ करिंथकर १५:२६; २ पेत्र ३:१३) वाईट गोष्टी सुधारण्याचा देवाची वेळ आल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर देवाचे भय बाळगणाऱ्‍यांकरता किती मोठा आशीर्वाद असेल!

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Job Hearing of His Ruin/The Doré Bible Illustrations/Dover Publications

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा