वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१ पृ. ४-७
  • खऱ्‍या विश्‍वासाकडे नेणारे नाव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खऱ्‍या विश्‍वासाकडे नेणारे नाव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूच्या नावाचे सूचक
  • येशूवर किंवा कैसरावर विश्‍वास?
  • आरंभीच्या ख्रिश्‍चनांचे आज अनुकरण करणे
  • येशूच्या नावावर विश्‍वास ठेवणे म्हणजे काय
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाचं नाव येशूसाठी किती महत्त्वाचं होतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • देवाचं नाव
    सावध राहा!—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१ पृ. ४-७

खऱ्‍या विश्‍वासाकडे नेणारे नाव

“तुम्ही येशूवर आणि त्याच्या उद्धार करणाऱ्‍या रक्‍तावर विश्‍वास ठेवत नाही,” असे एका स्त्रीने एका यहोवाच्या साक्षीदाराला म्हटले. एका मनुष्याने असे म्हटले: “तुम्ही स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणवता, पण मी तर येशूचा साक्षीदार आहे.”

यहोवाचे साक्षीदार येशूवर विश्‍वास ठेवत नाहीत किंवा ते त्याला महत्त्व देत नाहीत, असे सर्रासपणे मानले जाते. पण खरी वास्तविकता काय आहे?

यहोवाच्या साक्षीदारांच्या मनात देवाच्या नावाविषयी, यहोवाविषयी नितान्त आदर आहे, हे खरे आहे.a ब्राझीलमधला इतामार हा साक्षीदार म्हणतो: “देवाचं नाव मला पहिल्यांदा कळालं आणि माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. जेव्हा मी ते नाव पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला गाढ झोपेतून जागं झाल्यासारखं वाटलं. यहोवा या नावाने मी जागृत झालो, भानावर आलो; त्या नावाने माझ्या अंतर्यामाला स्पर्श केला.” पण तो पुढे असेही म्हणतो: “येशूच्या नावाविषयीही माझ्या मनात खूप आदर आणि प्रेम आहे.”

सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता “देवाच्या पुत्राच्या नावावर,” येशूवर विश्‍वास ठेवणे अत्यावश्‍यक आहे, हे यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे. (१ योहान ५:१३) पण ‘येशूच्या नावावर’ या वाक्यांशाचा काय अर्थ होतो?

येशूच्या नावाचे सूचक

‘येशूच्या नावाने’ हा वाक्यांश आणि त्यासारखे इतर वाक्यांश संपूर्ण ग्रीक शास्त्रवचनांमध्ये किंवा ‘नवीन करारामध्ये’ पाहायला मिळतात. खरे तर येशूच्या भूमिकेच्या संदर्भात वापरण्यात आलेला “नाव” हा शब्द ८० पेक्षा अधिकवेळा येतो, आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात तर तो सुमारे ३० वेळा येतो. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, त्याच्या नावाने लोकांना बरे केले, त्याच्या नावाने शिकवले, त्याच्या नावाचा धावा केला, त्याच्या नावाकरता छळ सोसला आणि त्याच्या नावाचा महिमा केला.—प्रेषितांची कृत्ये २:३८; ३:१६; ५:२८; ९:१४, १६; १९:१७.

बायबलच्या एका डिक्शनरीनुसार बायबलमध्ये “नाव” याकरता असलेला ग्रीक शब्द बहुतेकवेळा “नावाने जे काही सूचित होते त्या सर्वांना लागू होते, जसे अधिकारास, भूमिकेस, पदास, वैभवास, सामर्थ्यास, अत्युत्कृष्टतेस वगैरे.” म्हणून येशूचे नाव यहोवाने त्याला दिलेल्या वैभवी आणि मोठ्या शासकीय अधिकारास सूचित होते. येशूने स्वतः म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” (मत्तय २८:१८) पेत्राने आणि योहानाने एका पांगळ्या मनुष्याला बरे केल्यानंतर धार्मिक पुढाऱ्‍यांनी त्यांना असे विचारले: “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” तेव्हा पेत्राने येशूच्या अधिकाराचे आणि सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या त्याच्या नावावरील विश्‍वास मोठ्या धैर्याने दाखवून दिला कारण त्याने त्या पुढाऱ्‍यांना म्हटले: “त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे.”—प्रेषितांची कृत्ये ३:१-१०; ४:५-१०.

येशूवर किंवा कैसरावर विश्‍वास?

पण येशूच्या नावावर अशाप्रकारचा विश्‍वास दाखवणे काही सोपे नव्हते. येशूने भाकीत केले होते, की त्याच्या शिष्यांचा ‘त्याच्या नावामुळे सर्व राष्ट्रांकडून द्वेष केला जाईल.’ (मत्तय २४:९) का? कारण येशूचे नाव देवाचा नियुक्‍त शासक, राजांचा राजा या नात्याने त्याच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करते, त्याच्या अधीनतेत सर्व राष्ट्रे राहतील, असे करण्यास ही राष्ट्रे सध्या तयार नाहीत किंवा तसे करण्याची त्यांची इच्छा नाही.—स्तोत्र २:१-७.

येशूच्या दिवसातील धार्मिक पुढाऱ्‍यांना देखील येशूच्या अधीन राहायचे नव्हते. त्यांनी येशूला नाकारत असे म्हटले: “कैसरावाचून कोणी आम्हाला राजा नाही.” (योहान १९:१३-१५) तर त्यांनी कैसराच्या नावावर म्हणजे त्याच्या आणि त्याच्या शासनाच्या शक्‍ती-सामर्थ्यावर विश्‍वास ठेवला. स्वतःचे पद आणि स्थान टिकून राहावे म्हणून येशूला मारण्याचेही त्यांनी ठरवले होते.—योहान ११:४७-५३.

येशूच्या मृत्यूनंतरच्या शतकांत ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या अनेकांनी यहुदी पुढाऱ्‍यांसारखी मनोवृत्ती स्वीकारली. या तथाकथित ख्रिश्‍चनांनी त्यांचा विश्‍वास राष्ट्राच्या शक्‍ती-सामर्थ्यावर ठेवला आणि राष्ट्रीय युद्धांत स्वतःला गुंतवून घेतले. उदाहरणार्थ, ११ व्या शतकामध्ये चर्चने बेकार योद्ध्‌यांना मिलिट्या ख्रिस्टी किंवा ख्रिस्ती लढवय्यांमध्ये संघटित केल्यानंतर “धार्मिक युद्धाची जबाबदारी ख्रिस्ती धर्मजगताच्या राष्ट्रांवर न येता ती ख्रिस्ती लढवय्यांवर येऊन पडली.” (दि ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ ख्रिश्‍चॅनिटी) हा अहवाल पुढे असे म्हणतो, की काही पोपच्या घोषणांमुळे बहुतेक धर्मयुद्ध करणारे असा विश्‍वास करू लागले, की “त्यांनी देवासोबत एक करार केला आहे आणि त्यामुळे परादीसमधील त्यांचे स्थान निश्‍चित झाले आहे.”

येशूसोबत एकनिष्ठ राहणे आणि त्याचवेळी राजकीय गोष्टींत भाग घेणे तसेच देशाच्या युद्धांत भाग घेणे शक्य आहे, असा काहीजण वाद घालतील. त्यांना कदाचित असे वाटेल, की वाईट गोष्टींविरुद्ध लढणे ही ख्रिश्‍चनांची जबाबदारी आहे आणि मग त्याकरता युद्ध करायला लागले तरी काही हरकत नाही. पण आरंभीच्या ख्रिश्‍चनांचा असाच दृष्टिकोन होता का?

“सुरवातीचे ख्रिश्‍चन सैन्यबळात सेवा करीत नव्हते,” असे द ख्रिश्‍चन सेंच्युरी मॅग्झीन म्हणते. ते पुढे असे म्हणते, की सा.यु. १७०-१८० दशकापर्यंत कोणी ख्रिश्‍चन सैन्यात होता असा कोणताच पुरावा दिसत नाही. हा लेख त्यानंतर म्हणतो: “कालांतराने ख्रिस्ती लष्करात भाग घेऊ लागले.”

त्याचा काय परिणाम झाला आहे? “ख्रिस्ती धर्मावर सर्वात जास्त लांछन आले असेल ते युद्धाच्या बाबतीत गैरख्रिस्ती लोकांप्रमाणे भूमिका घेतल्याने,” असे द ख्रिश्‍चन सेंच्युरी हा लेख म्हणतो. “एकीकडे प्रेमळ तारणकर्त्याच्या धर्माचे समर्थन करून आणि त्याचवेळी धार्मिक आणि राष्ट्रीय युद्धांचेही मोठ्या आवेशाने समर्थन करून या ख्रिश्‍चनांनी धर्माच्या नावाला कलंक लावला आहे.”

आरंभीच्या ख्रिश्‍चनांचे आज अनुकरण करणे

आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या उत्तम उदाहरणाचे आज ख्रिश्‍चनांना अनुकरण करता येईल का? असे करणे शक्य आहे, हे या शतकातील यहोवाच्या साक्षीदारांनी दाखवून दिले आहे. त्यांच्याविषयी होलोकॉस्ट एज्युकेशनल डायजेस्टच्या संपादकांनी असे म्हटले: “एकही यहोवाचा साक्षीदार युद्धात भाग घेणार नाही. . . . जगातल्या प्रत्येक व्यक्‍तीने त्यांच्या धर्माचे आचरण केले असते, तर [दुसरे जागतिक युद्ध] कधी झालेच नसते.”

उत्तर आयर्लंडमध्ये झाले त्याप्रमाणे अगदी अलीकडच्या राष्ट्रांतर्गत होणाऱ्‍या झगड्यांच्या बाबतीत हेच म्हटले जाऊ शकते. काही वर्षांपूर्वी, यहोवाचा एक साक्षीदार बेलफास्ट या शहरातील प्रॉटेस्टंट लोकांच्या परिसरात घरोघरचे प्रचारकार्य करत होता. घरमालकाला जेव्हा कळले, की तो यहोवाचा साक्षीदार पूर्वी कॅथलिक होता तेव्हा त्याने त्याला विचारले: “तुम्ही कॅथलिक होता तेव्हा तुम्ही आयआरएचे [आयरीश रिपब्लिकन आर्मी] समर्थन केले होते का?” हा मनुष्य हमरीतुमरीवर येईल, हे यहोवाच्या साक्षीदाराने ओळखले कारण हा घरमालक नुकताच कैदेतून सुटला होता; एका कॅथलिक माणसाला गोळ्या घालण्याकरता चालला होता तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. म्हणून या साक्षीदाराने त्याला म्हटले: “मी आता कॅथलिक नाहीए. आता यहोवाचा साक्षीदार झालोय. एक खरा ख्रिस्ती या नात्याने कोणत्याही सरकारासाठी किंवा कोणाही मनुष्यासाठी मी कोणाचा जीव घेणार नाही.” त्यानंतर त्या घरमालकाने त्याच्याशी हात मिळवला आणि म्हटले: “कोणत्याही प्रकारची हत्या चुकीची आहे. तुम्ही चांगलं काम करताय. असेच करत राहा.”

येशूच्या नावावर विश्‍वास ठेवणे म्हणजे काय

येशूच्या नावावर विश्‍वास ठेवणे म्हणजे युद्धात सहभागी न होणे इतकेच नव्हे, तर त्यापेक्षा अधिक करण्याची गरज आहे. ख्रिस्ताच्या सर्व आज्ञांचे पालन करणे असा त्याचा अर्थ होतो. नाहीतरी येशूने म्हटले: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा” आणि “एकमेकांवर प्रीति करावी,” ही त्याची एक आज्ञा आहे. (योहान १५:१४, १७) लोकांचे भले व्हावे असेच प्रेम इच्छिते. यामुळे वांशिक, धार्मिक आणि सामाजिक भेदभाव दूर होतात. येशूने हे दाखवून दिले, की हे कसे होते.

येशूच्या दिवसात यहुद्यांना शोमरोनी लोकांचा तिटकारा वाटत असे. येशू मात्र शोमरोनी स्त्रीसोबत बोलला आणि परिणामी तिने आणि अनेक लोकांनी त्याच्या नावावर विश्‍वास ठेवला. (योहान ४:३९) येशूने असेही म्हटले, की त्याचे शिष्य “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्षीदार होतील. (प्रेषितांची कृत्ये १:८) त्याचा जीवनदायक संदेश केवळ यहुद्यांपुरताच नव्हता. म्हणूनच कर्नेल्य नावाच्या एका रोमी अधिकाऱ्‍याची भेट घेण्याकरता पेत्राला सांगण्यात आले होते. दुसऱ्‍या जातीच्या मनुष्याला भेट देणे यहुद्यांकरता निषिद्ध असले, तरी देवाने पेत्राला हे दाखवून दिले, की त्याने “कोणाहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये.”—प्रेषितांची कृत्ये १०:२८.

येशूचे अनुकरण करत यहोवाचे साक्षीदार येशूच्या नावाद्वारे उद्धार होतो हे सांगण्यासाठी सर्व प्रकारच्या—वंशाच्या, धर्माच्या किंवा श्रीमंतगरीब लोकांना आनंदाने मदत करतात. येशूच्या नावावर त्यांचा विश्‍वास असल्यामुळे “येशू प्रभु आहे असे . . . आपल्या मुखाने कबूल” करण्यासाठी ते प्रेरित होतात. (रोमकर १०:८, ९) तुम्ही त्यांची मदत स्वीकारावी, असे आम्ही तुम्हाला आर्जवतो जेणेकरून येशूच्या नावावर विश्‍वास ठेवायला तुम्हाला शिकता येईल.

येशूच्या नावामुळे आपल्या मनात त्याच्याविषयी आदराची, सन्मानाची आणि आज्ञाधारकतेची भावना निर्माण होण्यास हवी. प्रेषित पौलाने म्हटले: “स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.” (फिलिप्पैकर २:१०, ११) जगातील बहुतेक लोक येशूच्या राज्याच्या अधीन होण्यास तयार नसले तरी, बायबल हे दाखवून देते, की अशी वेळ येत आहे, की एकतर त्यांना अधीन व्हावे लागेल नाहीतर त्यांचा नाश हा नक्की. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) त्यामुळे येशूच्या सर्व आज्ञा पाळण्याद्वारे त्याच्यावर विश्‍वास ठेवण्याची हीच वेळ आहे.

[तळटीपा]

a आणखी माहितीकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे १९८४ साली प्रकाशित ईश्‍वरी नाव जे सर्वकाळ टिकते (इंग्रजी) या ब्रोशरमधील पृष्ठे २८-३१ पाहा.

[६ पानांवरील चित्र]

येशूच्या नावाने लाखो लोक मेले आहेत आणि मारले गेले आहेत

[७ पानांवरील चित्र]

येशूने केव्हाही भेदभाव बाळगला नाही. तुमच्याविषयी काय?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा