वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१५ पृ. ३-४
  • तुमचा कोणी रक्षक देवदूत आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचा कोणी रक्षक देवदूत आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवदूतांचे आकर्षण
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१५ पृ. ३-४

तुमचा कोणी रक्षक देवदूत आहे का?

तुमचा कोणी रक्षक देवदूत आहे यावर तुमचा विश्‍वास आहे का? पुष्कळ लोकांचा तसा विश्‍वास आहे. याचबाबतीत, पश्‍चिम कॅनडातील एका स्त्रीला देवदूतांविषयी खास देणगी मिळाल्याचे म्हटले जाते. तुम्ही तिला २०० डॉलर आणि तुमचे पूर्ण नाव दिल्यावर, ती तुमची ओळख तुमच्या रक्षक देवदूताबरोबर करून देईल असा दावा करते. पहिल्यांदा ती मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक पाहत मनन करते. मग, तिला दृष्टान्त होतो, की तुमच्या देवदूताने तिला तुमच्यासाठी एक संदेश दिला आहे. याशिवाय, ती  तुमचा देवदूत कसा दिसतो त्याचे एक चित्र देखील काढून देते.

काहींना हे, फ्रेन्च राजा लुई नववा याच्या कथेसारखेच वाटेल. त्याने म्हणे, खूप महागडी पिसं विकत घेतली होती; ती पिसं, आद्यदेवदूत मिखाईल याच्या पंखांतून गळून पडली होती. या कथेवर बहुतेकांना विश्‍वास बसत नाही; पण कॅनडातल्या त्या स्त्रीवर मात्र लागलीच विश्‍वास बसतो.

देवदूतांचे आकर्षण

अलीकडील वर्षांत, लोकांना देवदूतांचे खूपच आकर्षण वाटू लागले आहे. टीव्ही, चित्रपट, पुस्तके, नियतकालिके आणि बातमीपत्रे यांत, आजाराने ग्रस्त असलेल्यांना व दुःखात असलेल्यांना सांत्वन देणाऱ्‍या, बुद्धी प्रदान करणाऱ्‍या व मृत्यूच्या दाढेतून लोकांना वाचवणाऱ्‍या देवदूतांविषयी आपल्याला सांगितले जाते. संयुक्‍त संस्थानांत, सुमारे २ कोटी प्रेक्षक दर आठवड्याला एक मालिका पाहतात; यात लोकांचा देवदूतांशी संपर्क येत असल्याचे दाखवले जाते. एका पुस्तकाच्या दुकानात, ४०० पेक्षा अधिक पुस्तके देवदूतांवर होती असे पाहण्यात आले आहे.

रक्षक देवदूतांनी युद्धांतील सैनिकांचे प्राण कसे वाचवले त्याचे अनुभव एका अलीकडील पुस्तकात आहेत. वाहनांवर लावल्या जाणाऱ्‍या स्टीकरवर, रक्षक देवदूत वाहन चालकांचे संरक्षण करतात असा मजकूर असतो. संघटना, परिषदा आणि चर्चासत्रे देवदूतांचा अभ्यास करण्याचे प्रोत्साहन देतात व त्यांच्याशी दळणवळण करण्यास लोकांना साहाय्य करत आहेत असे म्हटले जाते.

आयलीन फ्रीमन, देवदूतांवर तीन पुस्तके लिहिणारी लेखिका व पहिल्या पानापासून शेवटल्या पानापर्यंत फक्‍त देवदूतांविषयी माहिती असलेल्या एका वार्तापत्रकाची प्रकाशक आहे. ती दावा करते: “स्वर्गात जेवढे देवदूत आहेत तेवढेच पृथ्वीवरही पुष्कळ रक्षक देवदूत आहेत असे मला वाटते; त्यांचे कर्तव्य, स्वर्गात फक्‍त देवाची स्तुती करणे इतकेच नव्हे तर पृथ्वीवर मानवांची आणि इतर जीवांची काळजी घेणे देखील आहे. आपली गर्भधारणा होते तेव्हा आपल्या प्रत्येकासाठी एक रक्षक देवदूत नेमण्यात येतो; हा देवदूत गर्भाशयात आपली वाढ होत असताना, आपल्या जन्माच्या वेळी, आपल्या संपूर्ण आयुष्यात आपले रक्षण करतो आणि शेवटी या जगाच्या बंधनांतून मुक्‍त करून स्वर्गात गौरव प्राप्त करण्यासाठी आपले मागदर्शन करतो.” यावरून रक्षक देवदूतांबद्दलचा लोकांचा काय दृष्टिकोन आहे हे आपल्याला समजते.

या तणावपूर्व व कठीण काळात, आपले संरक्षण करणारा रक्षक देवदूत आहे असा विश्‍वास करणे सांत्वनदायक असू शकते. पण या विषयावर देवाचे वचन अर्थात बायबलला काय म्हणायचे आहे? आपण देवदूतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे का? आपला नैतिक दर्जा व धार्मिक विश्‍वास यांची त्यांना काळजी आहे का? आपण त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू शकतो? पुढील लेखात या प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा