वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१ पृ. ३-४
  • हिंसेचा अवलंब ते का करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिंसेचा अवलंब ते का करतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लोक हिंसक का होतात
  • या जगातून कधी हिंसा नाहीशी होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • हिंसाचार सर्वत्र आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?
    सावध राहा!—२०१५
  • हिंसाचाराचा कायमचा अंत—कसा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१ पृ. ३-४

हिंसेचा अवलंब ते का करतात

एका २७ आठवड्यांच्या बाळाचा डेनवर, कोलोराडो, यु.एस.ए. येथे अकाली जन्म झाला. बाळ जगले, आणि तीन महिने हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ठेवल्यानंतर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तीन आठवड्यांनंतर त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. आता काय झाले होते? त्याच्या मेंदूला जबरदस्त इजा झाली होती; त्याच्या बापाने त्याला गदागदा हलवले होते; त्याचे रडणे त्याला सहन झाले नव्हते म्हणून. ते आता जन्मभरासाठी अंधळे आणि अधू झाले होते. आधुनिक विज्ञानाने त्याला त्याच्या जन्माच्या वेळी वाचवले पण त्याच्या बापाच्या हिंसेपासून वाचवू शकले नाही.

असंख्य मुलांचे शोषण होते, त्यांना मारहाण केली जाते किंवा त्यांचा जीवही घेतला जातो; आणि ही सर्व हिंसा घडते कुठे, तर घरात! काहींच्या अंदाजानुसार एकट्या संयुक्‍त संस्थानांतच दर वर्षी ५,००० पेक्षा अधिक मुले आपल्या पालकांच्या हातून मारली जातात! बळी पडणारी केवळ मुलेच नाहीत. वर्ल्ड हेल्थ मॅग्झीननुसार संयुक्‍त संस्थानांत, “पत्नीवरील अत्याचार, हे जननक्षम स्त्रियांशी होणाऱ्‍या गैरवागणुकीचे सर्वात प्रमुख कारण आहे.” इतर देशांचे काय हाल आहेत? “[विकसित राष्ट्रांत] एक तृतियांश पेक्षा अधिक स्त्रियांच्या सर्वेत त्यांनी म्हटले की त्यांच्या पतीकडून त्यांना मारहाण होते.” होय हिंसेचे प्रमाण वाढत आहे, खासकरून घरात.

पुष्कळ पतिपत्नी त्यांच्यातील मतभेद सोडवण्याकरता हिंसेचा अवलंब करतात. काही राष्ट्रांत, पालक आणि शिक्षक मुलांवर आपला राग काढण्याकरता हिंसक होतात. निव्वळ मौजेखातर, गुंडगिरी करणारे काहीजण गरीब स्वभावाच्या लोकांवर अरेरावीपणा करून त्यांच्याशी हिंसा करतात. मानव इतके हिंसक का होतात?

लोक हिंसक का होतात

काहींचे म्हणणे आहे की मानव स्वभावतःच हिंसक आहेत. संयुक्‍त संस्थानांत सामान्यपणे हिंसक गुन्हेगारीत घट झाली असली तरी, तरुणांमध्ये ती वाढली आहे. शिवाय, आजकाल लोकांना हिंसा आवडू लागली आहे. तीन प्रमुख टीव्ही नेटवर्कने गुन्हेगारी कथांची संख्या दुप्पट व त्यात दाखवल्या जाणाऱ्‍या खुनांची संख्या तिप्पट केली आहे. होय, गुन्हेगारी पैसा मिळवून देते! मानसशास्त्रज्ञ कार्ल मेनिंनर म्हणतात: “आपण हिंसा केवळ सहन करीत नाही, तर आपल्या बातमीपत्रांमध्ये तिला पहिल्या पानावरचे स्थान देतो. एक तृतियांश किंवा एक चतुर्थांश टीव्ही कार्यक्रम मुलांच्या मौजेखातर हिंसेचा उपयोग करतात. हिंसेकडे दुर्लक्ष? छे!, मित्रांनो, आपल्याला तर हिंसा आवडते!”

मस्तिष्क जीवविज्ञान आणि परिस्थिती यांचा मानवी आक्रमकतेशी संबंध आहे असे अलिकडील वैज्ञानिक अभ्यासाने दाखवून दिले. “आजकालची अधिकाधिक मुले वाईट वातावरणात वाढत असल्यामुळे हिंसा ही रोगासारखी पसरली आहे असे आपण समजू लागलोय,” असे बालसंशोधनाच्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनियोस इन्स्टिट्यूटचे डॉ. मार्कस जे. क्रूसी यांचे म्हणणे आहे. “परिस्थितीतील घटना खरोखरच मस्तिष्कात रेणवीय बदल घडवून आणत आहेत ज्यामुळे लोक जास्तच सणकी झाले आहेत.” “कुटुंबाचे मोडणे, एकट्या पालकांत वाढ, सततचे दारिद्र्‌य आणि दीर्घकाळापासून मादक पदार्थांचे व्यसन, या कारणांमुळे मेंदूतील रसायनात इतका बदल होऊ शकतो की एखादी व्यक्‍ती आक्रमक होऊ शकते—असा परिणाम होईल असे एकेकाळी अशक्य मानले जायचे,” असे इन्साईड द ब्रेन नामक एक इंग्रजी पुस्तक म्हणते.

मेंदूतील बदलांमुळे सेरोटॉनीनच्या पातळीत घट होते असे म्हटले जाते; हे सेरोटॉनीन रागावर ताबा करणारे मेंदूतील एक रसायन आहे. मद्य, मेंदूतील सेरोटॉनीनची पातळी कमी करू शकते व यामुळे हिंसा आणि मद्याचा दुरुपयोग यांच्यातील फार पूर्वीपासून असलेल्या संबंधाविषयी वैज्ञानिक आधार मिळतो, हे अभ्यासांतून दिसून आले.

तरीसुद्धा, आज हिंसा वाढण्यामागे आणखी एक कारण आहे. भविष्यवाणींच्या एका विश्‍वसनीय पुस्तकाने अर्थात बायबलने असा इशारा दिला होता: “हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, . . . इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असलेले, विश्‍वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेले . . . असे होतील. . . . त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.” (२ तीमथ्य ३:१-५, इजी-टू-रीड आवृत्ती) आज आपण पाहत असलेली हिंसा, ‘शेवटल्या दिवसांविषयीचे’ बायबलचे भाकीत पूर्ण करते.

आणखी एका कारणामुळे आजचा काळ जास्त हिंसक झाला आहे. “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांच्या टोळीची स्वर्गातून हकालपट्टी करण्यात आली आहे व आता ते मानवजातीवर आपला दुष्टभाव प्रकट करण्यावर एकाग्र आहेत. “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” या नात्याने दियाबल “आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा” चलाखीने वापर करून पृथ्वीवर अधिकच हिंसा घडवत आहे.—इफिसकर २:२.

मग आजच्या या हिंसक ‘अंतरिक्षाचा’ आपण सामना कसा करू शकतो? आणि हिंसेविना मतभेद कसे काय सोडवू शकतो?

[३ पानांवरील संक्षिप्त आशय]

असंख्य मुलांचे शोषण होते, त्यांना मारहाण केली जाते किंवा त्यांचा जीवही घेतला जातो; आणि ही सर्व हिंसा घडते कुठे, तर घरात!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा