वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१ पृ. ४-७
  • शांतीने समस्या कशा सोडवता येतील?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांतीने समस्या कशा सोडवता येतील?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आधी हिंसक मग सहनशील
  • हिंसक प्रवृत्तींचा सामना करणे
  • हे शक्य आहे का?
  • या जगातून कधी हिंसा नाहीशी होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • शौलाने ख्रिश्‍चनांचा छळ का केला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?
    सावध राहा!—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१ पृ. ४-७

शांतीने समस्या कशा सोडवता येतील?

मानवी हिंसेचा इतिहास, मानवाइतकाच जुना आहे. हाबेलाचा भाऊ आणि पहिल्या मानवी जोडप्याचा ज्येष्ठ पुत्र काइन याने पहिले हिंसक कृत्य केल्याचे बायबल सांगते. देवाने जेव्हा हाबेलाचे अर्पण स्वीकारले, तेव्हा काइन “संतापला.” त्याने काय केले? “काइनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले.” नंतर, मात्र त्याला देवासमोर जाब द्यावा लागला. (उत्पत्ति ४:५, ८-१२) हिंसेमुळे काइनाची आपल्या निर्माणकर्त्यासमोर असलेली स्थिती सुधारली नाही.

समस्या सोडवायच्या असतात तेव्हा काइनाप्रमाणे शारीरिक बलाचा अवलंब करण्याचे आपण कसे टाळू शकतो?

आधी हिंसक मग सहनशील

पहिला ख्रिस्ती हुतात्मा स्तेफन याचा वध मान्य असलेल्या व तो होत असताना पाहणाऱ्‍या मनुष्याचे उदाहरण घ्या. (प्रेषितांची कृत्ये ७:५८; ८:१) या मनुष्याला अर्थात तार्सच्या शौलाला स्तेफनाची धार्मिक भूमिका मान्य नव्हती, म्हणून त्याचे काम बंद पाडण्याकरता हिंसकरीत्या त्याचा वध करण्याचा मार्ग त्याला योग्य वाटला आणि तो त्यात सहभागी झाला. कबूल आहे की शौल आपल्या जीवनातील प्रत्येक बाबतीत हिंसक नसेल. तरीही, हिंसेद्वारे समस्या सोडवणे त्याला पटले. स्तेफनाच्या मृत्यूनंतर लागलीच शौल “[ख्रिस्ती] मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाहि धरून आणून तुरुंगात टाकीत असे.”—प्रेषितांची कृत्ये ८:३.

बायबल विद्वान अल्बर्ट बार्न्स यांच्या मते, “हैराण” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो ग्रीक शब्द, असा विध्वंस सूचित करतो जो सिंह आणि लांडगे यांसारखी जंगली श्‍वापदे करू शकतात. बार्न्स स्पष्टीकरण देतात: “एखाद्या जंगली श्‍वापदाप्रमाणे शौलाला चर्चविरुद्ध राग होता—हा शब्द इतका जोरदार आहे की, शौलाने केवढ्या आवेशाने व त्वेषाने छळात भाग घेतला ते सूचित होते.” येशूच्या आणखी अनुयायांना पकडण्यास दिमिष्कास जात असताना “शौल अजूनहि प्रभूच्या [ख्रिस्ताच्या] शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्‍याविषयींचे फूत्कार टाकीत होता.” वाटेत त्याच्याशी पुनरुत्थित येशू बोलला ज्यामुळे शौल ख्रिश्‍चन बनला.—प्रेषितांची कृत्ये ९:१-१९.

या धर्मांतरानंतर इतरांबरोबर व्यवहार करण्याची शौलाची पद्धतच पार बदलली. धर्मांतर होऊन सुमारे १६ वर्षांनंतर घडलेल्या एका घटनेतून हा बदल दिसून येतो. अंतुखिया या त्याच्या मूळ मंडळीत लोकांचा एक जमाव आला आणि तेथील ख्रिश्‍चनांना मोशेच्या नियमशास्त्रानुसार वागण्याची गळ घालू लागला. तेथे “बराच मतभेद” झाला. आता शौलाला पौल या नावाने ओळखले जात होते; तो या मतभेदात पडला. आणि कडाक्याची चर्चा झाली. परंतु पौलाने हिंसेचा अवलंब केला नाही. उलट, जेरुसलेम मंडळीतील प्रेषित आणि वडिलांकडे ही बाब नेण्याचा मंडळीने विचार केला तेव्हा त्याने ते मान्य केले.—प्रेषितांची कृत्ये १५:१, २.

जेरुसलेममध्येही वडिलांच्या सभेत “पुष्कळ वादविवाद” झाला. “सर्व लोक गप्प” होईपर्यंत पौल शांत राहिला आणि मग सत्यात असलेल्या सुंता न झालेल्यांमध्ये देवाच्या आत्म्याच्या अद्‌भुत कार्यांबद्दल त्याने सांगण्यास सुरवात केली. शास्त्रवचनीय चर्चेनंतर, सुंता न झालेल्यांवर विनाकारण ओझे लादण्याऐवजी “मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म . . . वर्ज्य” करावे असा सल्ला त्यांना द्यावा यावर प्रेषित आणि जेरुसलेममधील वडिलांचे “एकमत” झाले. (प्रेषितांची कृत्ये १५:३-२९) खरेच, पौलात बदल झाला होता. हिंसेचा अवलंब न करता वादविषय सोडवण्यास तो शिकला होता.

हिंसक प्रवृत्तींचा सामना करणे

“प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे,” असा सल्ला पौलाने नंतर दिला. (२ तीमथ्य २:२४, २५) कठीण परिस्थितीला शांतीने हाताळावे असे पौलाने तरुण पर्यवेक्षक तीमथ्याला आर्जवले. पौल वास्तववादी होता. ख्रिश्‍चनांमध्येही कडाक्याची भांडणे होऊ शकतात हे त्याला माहीत होते. (प्रेषितांची कृत्ये १५:३७-४१) म्हणूनच उचितरीत्या त्याने सल्ला दिला: “तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सुर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) अनियंत्रित रागाचा उद्रेक होऊ न देता रागावर नियंत्रण करणेच उचित आहे. परंतु हे कसे साध्य करता येते?

आज, रागावर नियंत्रण ठेवणे इतके सोपे नाही. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे सहायक प्रमुख असलेल्या डॉ. डेबोराह प्रोथ्रो-स्टीथ म्हणाल्या: “अप्पलपोटीपणा सर्वत्र आढळतो. खरं तर, एकमेकांशी पटवून घेण्याचे कौशल्य—बोलाचाली, तडजोड, सहानुभाव, क्षमाशीलता—डरपोकांकडे असते असं समजलं जातं.” पण हे धीट लोकांचे गुण आहेत आणि यांच्यामुळे आपण आपल्यामध्ये उफाळणाऱ्‍या हिंसक प्रवृत्तींवर ताबा ठेवू शकतो.

ख्रिश्‍चन बनल्यानंतर पौल मतभेदांना उचित मार्गाने हाताळण्यास शिकला. तो मार्ग बायबलच्या शिकवणींवर आधारित होता. यहुदी धर्माचा गाढा पंडित या नात्याने तो इब्री शास्त्रवचनांशी चांगलाच परिचित होता. “जुलूम करणाऱ्‍याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीहि रीत स्वीकारू नको.” “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय; आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय.” “ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गांवकुसू नसलेल्या पडक्या गांवासारखा आहे,” यांसारखी शास्त्रवचने त्याला कदाचित माहीत असावीत. (नीतिसूत्रे ३:३१; १६:३२; २५:२८) तरीपण, धर्मांतर होण्याआधी या ज्ञानाने त्याला ख्रिश्‍चनांविरुद्ध हिंसा करण्यापासून रोखले नव्हते. (गलतीकर १:१३, १४) परंतु ख्रिश्‍चन झाल्यावर हिंसेचा अवलंब करण्याऐवजी, तर्काद्वारे आणि पटवण्याद्वारे वादग्रस्त विषय हाताळण्याकरता कोणत्या गोष्टीने पौलाला मदत केली?

पौल असे म्हणून आपल्याला एक क्लू देतो: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी जे काही केले होते त्याच्याबद्दल त्याने मनापासून कदर दाखवली. (१ तीमथ्य १:१३, १४) ख्रिस्त त्याच्यासाठी एक कित्ता होता. पापी मानवजातीसाठी येशूने किती सहन केले होते हे त्याला माहीत होते. (इब्री लोकांस २:१८; ५:८-१०) मशीहाविषयी यशयाची भविष्यवाणी येशूमध्ये पूर्ण झाल्याचे पौल शाबीत करू शकत होता: “त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंडसुद्धा उघडिले नाही; वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्‍यांपुढे गप्प राहणाऱ्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडिले नाही.” (यशया ५३:७) प्रेषित पेत्राने लिहिले: “त्याची [येशूची] निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.”—१ पेत्र २:२३, २४.

येशू ख्रिस्ताने तणावपूर्ण परिस्थितींना ज्या मार्गाने हाताळले ते पौलाने समजून घेतल्यामुळे स्वतःत परिवर्तन करण्यास तो प्रवृत्त झाला. तो आपल्या सहविश्‍वासूंना असा सल्ला देऊ शकला: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३) हिंसक होण्याची गरज नाही, केवळ इतके कबूल करणे पुरेसे नाही. यहोवा आणि येशू ख्रिस्ताने आपल्याकरता जे काही केले त्याची कृतज्ञता बाळगल्याने आपल्याला हिंसक वृत्तींवर मात करण्यास मदत मिळते.

हे शक्य आहे का?

जपानमधील एका मनुष्याला अशाचप्रकारच्या तीव्र प्रेरणेची आवश्‍यकता होती. सैनिक असलेला त्याचा पिता शीघ्रकोपी व त्याच्या कुटुंबावर हिंसेनेच वर्चस्व गाजवणारा होता. त्याला आणि त्याच्या आईला पुष्कळ सहन करावं लागलं. म्हणून तो स्वतः जेव्हा मोठा झाला तेव्हा हिंसक बनला. तो स्वतःजवळ दोन वेगवेगळ्या लांबीच्या सामुराई तलवारी बाळगायचा व त्यांच्याद्वारे समस्या सोडवायचा आणि लोकांना धमकावायचा.

त्याची पत्नी जेव्हा बायबलचा अभ्यास करू लागली तेव्हा तोही अभ्यासास बसायचा, पण त्याने कधी मनावर घेतले नाही. राज्याची ही सुवार्ताa असे शीर्षक असलेली पुस्तिका वाचल्यावर मात्र तो बदलला. का बरे? तो म्हणतो: “मी जेव्हा, ‘ख्रिस्त येशू,’ ‘खंडणी,’ या उपमथळ्यांखालील माहिती वाचली तेव्हा मला स्वतःलाच लाज वाटली. मला कुणाची पर्वा नसली तरी, ज्यांच्याबरोबर माझं पटायचं त्यांच्याशी मी प्रेमळपणे वागायचो. मला माझ्या मित्रांना खूष ठेवायला आवडायचं, फक्‍त माझ्या जीवनावर त्याचा परिणाम होता कामा नये. पण, देवाचा पुत्र येशू तर मानवजातीसाठी, माझ्यासारख्या लोकांसाठी सुद्धा आपला प्राण द्यायला तयार होता. मी सुन्‍न झालो, जणू मला कोणीतरी हातोड्याने मारतंय.”

त्याने आपल्या पहिल्या मित्रांची सोबत सोडून दिली व काही काळातच यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत आपले नाव नोंदवले. ही प्रशाला, बायबल शिकवण्याचे कौशल्य प्राप्त करण्यास विद्यार्थ्याला मदत करते. या कोर्सने या मनुष्याला आणखी एक फायदा झाला. तो आठवून सांगतो: “मी तरुण होतो तेव्हा, धमक्यांचा व हिंसेचा अवलंब करायचो, कारण मला माझ्या भावना व्यक्‍त करता येत नव्हत्या. इतरांना माझ्या भावना व्यक्‍त करायला मी जसजसं शिकत गेलो तसतसं, मी हिंसेचा अवलंब करण्याऐवजी त्यांच्याशी तर्क करू लागलो.”

त्यानेही पौलाप्रमाणे ख्रिस्ताचा मार्ग आपला जीवनमार्ग बनवला आहे का? मित्रत्वाची शपथ त्याने ज्याच्याबरोबर घेतली होती अशा त्याच्या एका पूर्वीच्या साथीदाराने त्याला ख्रिश्‍चन होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या विश्‍वासाची खरी परीक्षा झाली. त्याच्या या ‘साथीदाराने’ त्याला मारले आणि त्याचा देव यहोवा याची निंदा केली. पूर्वी हिंसक असलेल्या या मनुष्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तो ही शपथ ठेवू शकत नसल्याबद्दल क्षमा मागितली. निराश होऊन त्याचा “साथीदार” तेथून निघून गेला.

आपल्या हिंसक प्रवृत्तींवर मात करण्याद्वारे पूर्वी रागीट असलेल्या या मनुष्याला पुष्कळ आध्यात्मिक बंधूभगिनी लाभले आहेत, जे ऐक्याने देवावर आणि शेजाऱ्‍यांवर प्रीती करतात. (कलस्सैकर ३:१४) खरे तर, समर्पित ख्रिस्ती होऊन त्याला २० पेक्षा अधिक वर्ष झाले आहेत; आता तो यहोवाच्या साक्षीदारांचा प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने कार्य करीत आहे. पशूसारख्या मनोवृत्तीचे लोक, त्याच्याप्रमाणेच हिंसेचा अवलंब न करता समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात हे बायबलमधून दाखवता येत असल्यामुळे त्याला किती आनंद होत असावा! तसेच, “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल” या भविष्यसूचक शब्दांच्या महान पूर्ततेकडे लक्ष वेधण्याचा केवढा सुहक्क त्याला मिळाला आहे!—यशया ११:९.

प्रेषित पौल आणि पूर्वी हिंसक असलेला हा मनुष्य यांच्याप्रमाणे तुम्हीही, प्रक्षोभक परिस्थिती अथवा समस्या शांतीने सोडवण्याचे शिकू शकता. तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल.

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारा प्रकाशित.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

पौल वास्तववादी होता. ख्रिश्‍चनांमध्येही कडाक्याची भांडणे होऊ शकतात हे त्याला माहीत होते

[७ पानांवरील चित्र]

देवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची कदर बाळगल्याने सर्वांसोबत शांतीने राहता येते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा