वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 २/१५ पृ. ५-७
  • हिंसाचाराचा कायमचा अंत—कसा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिंसाचाराचा कायमचा अंत—कसा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काय केले जाऊ शकते?
  • देवाच्या वचनाचे सामर्थ्य
  • हिंसाचाराचा अंत करणारी मोहीम
  • एक महत्त्वपूर्ण धडा
  • या जगातून कधी हिंसा नाहीशी होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?
    सावध राहा!—२०१५
  • जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 २/१५ पृ. ५-७

हिंसाचाराचा कायमचा अंत—कसा?

हिंसाचारावर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यासाठी, संयुक्‍त संस्थानातील अनेक शहरांनी एका अपूर्व कल्पनेचा प्रयोग करून पाहिला—बंदुकांऐवजी रोख रक्कम अथवा चीजवस्तू, कोणीही काही विचारणार नाही. परिणाम? उदाहरणार्थ, सेंट लुई शहरामध्ये ३,४१,००० डॉलर किंमतीच्या ८,५०० बंदुका जमा करण्यात आल्या. त्याचप्रकारच्या आणखी एका कार्यक्रमाने न्यूयॉर्क शहरामध्ये हजारापेक्षा अधिक शस्त्रे मिळवली.

परंतु, गुन्हेगारीवर याचा काय परिणाम झाला? दुःखाची गोष्ट म्हणजे फारच कमी परिणाम झाला. पुढील वर्षी सेंट लुईने बंदूकीने केलेल्या मनुष्यवधाचा उच्चांक गाठला. न्यूयॉर्क शहरात अजूनही साधारण लोकांजवळ अंदाजे २० लाख बंदुका आहेत. संयुक्‍त संस्थानांमध्ये २० कोटी बंदुका खासगी मालकीच्या आहेत म्हणजे, जवळजवळ प्रत्येक पुरुष, स्त्री आणि मुलासाठी एक. इतर देशांमध्ये, बंदुकी वापरून केलेला हिंसाचार भयंकर प्रमाणात वाढत आहे. ब्रिटनमध्ये “१९८३ आणि १९९३ दरम्यान, पोलिसांनी नोंदवलेल्या अपराधांची संख्या, ज्यामध्ये दारूगोळ्यांच्या हत्यारांचा समावेश होता, जवळजवळ दुप्पट होऊन १४,००० इतकी झाली,” असे द इकॉनॉमिस्ट म्हणते. मनुष्यवधाचे प्रमाण सापेक्षरीत्या कमी असले तरी, त्या देशात सुमारे दहा लाख बेकायदेशीर शस्त्रे आहेत.

नक्कीच, त्या भीतीदायक संख्येत थोडी जरी कमी झाली तर ते एक पाऊल पुढे असेल. परंतु, वर वर्णित उपाययोजना हिंसाचाराच्या मूळ कारणापर्यंत जातच नाहीत. ती कोणती कारणे आहेत? अनेक कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे पण त्यांच्यातील थोडकीच कारणे मूलभूत आहेत. कौटुंबिक स्थिरतेच्या आणि नैतिक शिक्षणाच्या उणीवेमुळे अनेक तरुण आपलेपणाचा आभास मिळवण्याकरता टोळ्यांकडे रेटले जातात. मोठा नफा मिळवण्याचे आमिष अनेकांना हिंसाचाराचा अवलंब करण्यास प्रवृत्त करते. अन्याय, इतरांना हिंसक मार्गांनी गोष्टींवर उपाय शोधण्यास प्रवृत्त करतो. देश, वंश किंवा जीवनातील स्थान याबद्दलचा गर्व इतरांच्या दुःखाकडे कानाडोळा करण्यास लोकांना प्रवृत्त करतो. ही खोलवर मुळावलेली कारणे आहेत ज्यांच्यावर सोपे उपाय नाहीतच.

काय केले जाऊ शकते?

आणखी पोलिस, अधिक कडक कारावासाच्या शिक्षा, बंदूक बाळगण्यासंबंधी कायदेशीर बंधने, मृत्यूदंड—गुन्हेगारी आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी हे सर्व उपाय योजून अंमलात आणण्यात आले आहेत. त्यामुळे भिन्‍नभिन्‍न प्रमाणात यश मिळाले हे खरे परंतु, हिंसाचार अजूनही आपल्यामध्ये आहे ही एक दुःखद वस्तुस्थिती आहे. का बरे? कारण हे सर्व उपाय केवळ लक्षणांवरच लागू होतात.

दुसऱ्‍या बाजूला पाहता, शिक्षण हिंसाचाराचा अंत करण्याची गुरुकिल्ली आहे असे अनेक विद्वानांना वाटते. ही कल्पना उचित असली तरी, ज्या राष्ट्रांमध्ये शैक्षणिक संधी मर्यादित आहेत त्यापुरताच हिंसाचार मर्यादित नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. खरे पाहता, असे दिसते की शिक्षणाचे उच्च दर्जे असलेली राष्ट्रे सर्वात हिंसक देखील आहेत. तेव्हा, केवळ शिक्षणाची नव्हे तर उचित प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे हे पाहणे कठीण नाही. तो कोणता प्रकार असावा बरे? लोकांना शांतीप्रिय आणि सात्त्विक लोक होण्यास शिकवणारा असा कोणी आहे का?

“तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.” (तिरपे वळण आमचे.) (यशया ४८:१७, १८) यहोवा देव लोकांना शांतीप्रिय आणि धार्मिक लोक होण्यासाठी कशाप्रकारे शिकवतो? प्रामुख्याने, त्याचे वचन बायबल याच्यामार्फत.

देवाच्या वचनाचे सामर्थ्य

बायबल केवळ जुन्या कल्पित गोष्टींचा आणि अप्रचलित व असंबद्ध म्हणींचा संग्रह मुळीच नाही. त्यामध्ये मानवजातीच्या सृष्टीकर्त्याची तत्त्वे आणि कल्पना आहेत ज्याला त्याच्या सर्वोच्च सोईस्कर ठिकाणापासून इतर कोणापेक्षाही चांगल्याप्रकारे मानवी स्वभाव माहीत आहे. “आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत,” असे यहोवा देव म्हणतो.—यशया ५५:९.

याच कारणासाठी प्रेषित पौल याची ग्वाही देतो, की “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्रीयांस ४:१२) होय, एखाद्याच्या अंतःकरणापर्यंत पोहंचण्यास व त्याचे विचार आणि वर्तन बदलवण्याचे सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. आज लोकांच्या हिंसक मार्गांना बदलवण्यासाठी याचीच तर आवश्‍यकता नाही का?

उत्तम कारणासाठी लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे सामर्थ्य देवाच्या वचनात आहे याचा जिवंत पुरावा, आता २३० पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये ५० लाखाहून अधिक संख्या असलेले यहोवाचे साक्षीदार आहेत. त्यांच्यामध्ये प्रत्येक राष्ट्र, भाषा आणि वंशाचे लोक आहेत. त्यांच्यामध्ये जीवनाच्या सर्व सामाजिक आणि आर्थिक स्थरातील तसेच सामाजिक पार्श्‍वभूमीचे लोक आले आहेत. त्यांच्यातील काहींनी पूर्वी हिंसक आणि त्रस्त जीवन व्यतीत केले होते. पण अशा कारणांना आपापसात शत्रुत्व, ईर्षा, भेदभाव आणि द्वेष भडकवू देण्याऐवजी, या सर्व अडथळ्यांवर मात करण्यास ते शिकले आहेत व शांतीप्रिय आणि जगभरात संयुक्‍त लोक बनले आहेत. हे कशामुळे शक्य झाले?

हिंसाचाराचा अंत करणारी मोहीम

देवाचे वचन, बायबलमध्ये प्रकट केलेल्या देवाच्या उद्देशाचे अचूक ज्ञान प्राप्त होण्यास मदत करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांवर जबाबदारी आहे. पृथ्वीच्या सर्व टोकांपर्यंत, यहोवाच्या मार्गांविषयी व त्याच्याकडून शिक्षण प्राप्त करू इच्छिणाऱ्‍यांना ते शोधत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिफळ मिळत आहे. या शैक्षणिक मोहिमेचा परिणाम, एक आश्‍चर्यकारक भविष्यवाणी पूर्ण होत आहे.

“शेवटल्या दिवसात असे होईल की . . . देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांस आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू,’” असे लिहिण्यास सुमारे २,७०० वर्षांपूर्वी संदेष्टा यशयाला प्रेरणा मिळाली.—यशया २:२, ३.

यहोवाकडून शिकून घेतल्यामुळे व त्याच्या मार्गांनी चालल्यामुळे लोकांच्या जीवनात आश्‍चर्यकारक बदल झाले आहेत. एका परिवर्तनाचा उल्लेख त्याच भविष्यवाणीत भाकीत केला आहे: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) अनेक लोकांनी हे शास्त्रवचन वाचले आहे. वास्तविक पाहता, हे वचन न्यूयॉर्क शहरातील संयुक्‍त राष्ट्र प्लाझाच्या भिंतीवर कोरले आहे. संयुक्‍त राष्ट्र ज्याची आकांक्षा बाळगतात पण ती समजण्यास अपयशी झाले आहेत त्याची ही एक स्मरणिका आहे. युद्ध आणि हिंसाचाराचे उच्चाटन कोणत्याही मानव निर्मित राजकीय संघटनेतर्फे साध्य केले जाणार नाही. ती अशी एक गोष्ट आहे जी केवळ यहोवा देवच करण्यास समर्थ आहे. तो ते कसे साध्य करील?

सर्वच जण “परमेश्‍वराच्या पर्वतावर” जाऊन त्याचे ‘मार्ग शिकून घेण्यास’ व ‘त्याच्या पथांनी चालण्याच्या’ अथवा ‘आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करण्यास व आपल्या भाल्याच्या कोयत्या बनवण्याच्या’ आमंत्रणाला प्रतिसाद देणार नाहीत हे स्पष्टच आहे. अशा लोकांबद्दल यहोवा काय करील? अशा लोकांकरता तो सदासर्वकाळासाठी संधीचा दरवाजा उघडा राहू देणार नाही किंवा त्यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी थांबून राहणार नाही. हिंसाचाराचा अंत करण्यासाठी, जे लोक हिंसक मार्गांचाच अवलंब करू पाहतात त्यांचा देखील यहोवा नाश करील.

एक महत्त्वपूर्ण धडा

देवाने नोहाच्या दिवसांमध्ये काय केले ते आज आपल्यासाठी एक धडा सादर करते. त्या काळी कोणत्याप्रकारचे जग होते त्याबद्दल बायबलचा अहवाल पुढीलप्रमाणे म्हणतो: “त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” त्यामुळे देवाने नोहास सांगितले: “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन.”—उत्पत्ति ६:११, १३.

आपण एका महत्त्वपूर्ण मुद्द्‌याची नोंद घेतली पाहिजे. त्या पिढीवर जलप्रलय आणत असता देवाने नोहा आणि त्याच्या कुटुंबाला वाचवले. कशासाठी? बायबल उत्तरते: “नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:९; ७:१) त्या काळी जिवंत असलेला प्रत्येक मनुष्य हिंसक होता असे नाही, पण केवळ नोहा आणि त्याचे कुटुंब ‘खऱ्‍या देवाबरोबर चालले.’ त्यामुळेच त्या हिंसक जगाच्या अंताच्या वेळी ते बचावले.

पृथ्वीवर पुन्हा एकदा ‘जाचजुलूम माजत’ असल्याचे आपण पाहतो तेव्हा देव त्याकडे दुर्लक्ष करणार नाही याची आपण खात्री बाळगावी. नोहाच्या दिवसांमध्ये त्याने केले त्याप्रमाणेच, तो लवकरात लवकर कार्यहालचाल करून हिंसाचाराचा अंत करील—कायमचा अंत करील. पण आता जे ‘खऱ्‍या देवाबरोबर चालण्यास’ शिकत आहेत, शांतीसाठी त्याच्या महान शैक्षणिक मोहिमेला जे प्रतिसाद देत आहेत अशांना संरक्षण देण्याचा मार्ग देखील तो पुरवील.

स्तोत्रकर्त्याद्वारे यहोवा ही खात्री देतो: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११.

यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी आनंद वाटेल जेणेकरून जे लोक, “चला आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांस आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू,” असे म्हणतात त्यांच्यात तुम्ही देखील सामील होऊ शकता. (यशया २:३) असे केल्याने, तुम्ही देखील सर्व दुष्टाईचा आणि हिंसाचाराचा अंत पाहणाऱ्‍यांमधील एक असाल. तुम्ही “उदंड शांतिसुखाचा उपभोग” घेऊ शकाल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा