वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१ पृ. ९
  • “जोमदार आणि खात्रीलायक”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जोमदार आणि खात्रीलायक”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • आपल्या समस्या या माहितीपत्रकातून अभ्यास सुरु करणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या सेवेत विविध माहितीपत्रकांचा वापर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१ पृ. ९

“जोमदार आणि खात्रीलायक”

“उद्यापासूनच मी प्रचारकार्यात त्याचा उपयोग करणार आहे कारण त्यात करण्यात आलेली चर्चा खरोखरच जोमदार आणि खात्रीलायक आहे,” असे फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदाराने लिहिले. संयुक्‍त संस्थानांतील एका साक्षीदाराने असे लिहिले: “हातात पडताच मी ते वाचून काढलं आणि क्षेत्र सेवेत मी त्याचा केव्हा उपयोग करतोय असं मला झालं होतं कारण उदासीन आणि बायबलवर विश्‍वास न ठेवणारे कितीतरी लोक आपल्याला भेटतात.” ते कशाविषयी बोलत होते? सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक नामक ३२ पृष्ठांच्या माहितीपत्रकाविषयी, १९९७/९८ मध्ये झालेल्या “देवाच्या वचनावर विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनांत वॉच टावर संस्थेने ते प्रकाशित केले.

सुशिक्षित परंतु बायबलविषयी इतकी माहिती नसणाऱ्‍या वाचकांना लक्षात ठेवून हे प्रकाशन तयार करण्यात आले होते. या अनेक लोकांनी बायबल व्यक्‍तिशः कधीही वाचलेले नाही; परंतु त्याविषयी त्यांच्या मनात निश्‍चित अशी एक मतधारणा आहे. बायबल किमान परीक्षण करण्याजोगे आहे, हे वाचकाला पटवून देणे हा या माहितीपत्रकाचा उद्देश आहे. बायबल देवाने प्रेरित केले आहे, हा दृष्टिकोन वाचकाने स्वीकारावा अशी सक्‍ती हे माहितीपत्रक करत नाही. तर स्वतः वास्तविकतांना ते बोलावयास लावते. या माहितीपत्रकात अवघड शब्दांचा वापर करण्यात आला नसून स्पष्ट शब्दांत आणि मोकळेपणे चर्चा करण्यात आली आहे.

वर उद्धृत केलेली विवेचने दाखवून देतात, की अधिवेशनांसाठी उपस्थित असलेले जन या माहितीपत्रकाचा क्षेत्र सेवेत उपयोग करण्यासाठी उत्सुक होते. उदाहरणार्थ, ऑगस्ट २३ आणि २४ रोजी जागतिक युवा दिनानिमित्त फ्रान्स, पॅरिसमध्ये जगभरातील लाखो युवा लोक आले तेव्हा खास साक्षकार्य मोहीम आयोजित करण्यात आली. सुमारे २,५०० साक्षीदारांनी (बहुतेक जन १६ ते ३० वयोगटांतील) या माहितीपत्रकाचा इटालियन, इंग्रजी, जर्मन, पोलिश, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांतील १८,००० प्रती वितरीत केल्या.

आपल्या सेवाकार्यात सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकाचा उपयोग करण्यासाठी आपण हरएक प्रयत्न करू या. आपण स्वतः बायबलचे परीक्षण करण्यास हवे, असे वाजवी लोकांना पटवून देण्याकरता हे प्रकाशन मोलवान ठरो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा