वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१ पृ. ६-८
  • कुटुंब—मानवी गरज!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुटुंब—मानवी गरज!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • घर हे आश्रय आहे
  • आपल्या कुटुंबाला बचाव मिळवण्यास साहाय्य करणे
  • पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन
  • बायबल शिक्षणाचे महत्त्व
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • ख्रिस्ती कुटुंब एकत्रितपणे काम करते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • कौटुंबिक सौख्यानंदाची किल्ली शोधणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • चिरकालिक भवितव्यासाठी कौटुंबिक उभारणी
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१ पृ. ६-८

कुटुंब—मानवी गरज!

कुटुंबे बहरतात तेव्हाच मानवी समाजही बहरतो असे म्हटले जाते. कौटुंबिक व्यवस्थेचा ऱ्‍हास होतो तेव्हा समाजांची आणि राष्ट्रांची ताकद कमी होते हे इतिहास आपल्याला दाखवतो. प्राचीन ग्रीसमध्ये नैतिक ऱ्‍हासामुळे कुटुंबांचा नाश झाला तेव्हा तेथील संस्कृती खिळखिळी झाली, आणि तिला रोमनांवर विजय मिळवता आला नाही. कुटुंबे जोपर्यंत बळकट होती तोपर्यंत रोमी साम्राज्यही बळकट होते. पण, शतके जसजशी उलटत गेली तसतसे कौटुंबिक जीवन कमकुवत झाले आणि साम्राज्याचे बळ क्षीण होत गेले. “कुटुंब आणि कौटुंबिक जीवनाची सुरक्षितता व बढती, संस्कृतीचे प्रमुख हेतू व सर्व उद्योगाचे अंतिम उद्धिष्टे आहेत,” असे हार्वड विद्यापिठाचे भूतपूर्व अध्यक्ष, चार्ल्स डब्ल्यू. एल्योट म्हणाले.

होय, कुटुंब एक मानवी गरज आहे. समाजाच्या स्थैर्यावर आणि मुले तसेच भावी पिढीच्या कल्याणावर त्याचा थेट परिणाम होतो. चांगली मुले वाढवण्यासाठी कैक एकट्या माता रक्‍ताचं पाणी करतात आणि त्यांच्या या कष्टासाठी त्यांची प्रशंसा केलीच पाहिजे, यात काही शंका नाही. परंतु, संशोधनांवरून असे दिसून आले आहे, की दोन्ही पालक असलेल्या कुटुंबात मुले राहतात तेव्हा त्यांचे अधिक चांगले होते.

दोन हजार शंभर पेक्षा अधिक तरुणांवर केलेल्या एका ऑस्ट्रेलियन अभ्यासात असे दिसून आले की, “फाटाफूट झालेल्या कुटुंबातील किशोरवयीनांच्या सामान्य आरोग्य समस्या होत्या, त्यांच्यात भावनिक समस्यांची चिन्हे दिसत होती व संयुक्‍त कुटुंबातील मुलांपेक्षा ते लैंगिकरीत्या सक्रिय होते.” आरोग्य आकडेवारीच्या सं.सं. राष्ट्रीय संस्थेने केलेल्या एका अभ्यासातून असे स्पष्ट झाले, की मोडलेल्या घरांतील मुले “अपघात करण्याची २०-३० टक्के, शाळेत एकाच वर्गात पुष्कळदा नापास होण्याची ४०-७५ टक्के आणि शाळेतून काढून टाकण्याची ७० टक्के शक्यता आहे.” शिवाय, एका धोरण विश्‍लेषकाने असा अहवाल दिला: “पारंपरिक घरांत वाढलेल्या मुलांपेक्षा एक पालक कुटुंबात वाढलेली मुलं गुन्हेगारीत गोवण्याची जास्त शक्यता असते.”

घर हे आश्रय आहे

कौटुंबिक व्यवस्थेमुळे सर्वांना एक आनंदी, उभारणीकारक व सुखावह घर लाभते. “करिअर, चीजवस्तू, छंद किंवा मित्र नव्हे, तर कुटुंब हे आनंद आणि कल्याणाचा मुख्य स्रोत आहे,” असे स्वीडनच्या एका अधिकाऱ्‍याने म्हटले.

पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला, कुटुंबांचा महान जनक, यहोवा देवावरून नाव देण्यात आले कारण त्यानेच कौटुंबिक व्यवस्थेची सुरवात केली असे बायबल दाखवते. (उत्पत्ति १:२७, २८; २:२३, २४; इफिसकर ३:१४, १५) परंतु, ईश्‍वरप्रेरित शास्त्रवचनांत प्रेषित पौलाने, कुटुंबावर एक क्रूर हल्ला होईल, यामुळे ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर नैतिकता व मानवी समाज मोडकळीस येईल असे भाकीत केले होते. “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप” दाखवणाऱ्‍यांमध्ये सुद्धा बेईमानी, ‘ममताहीनता’ आणि पालकांची अवज्ञा, हे गुण ‘शेवटल्या काळाची’ चिन्हे असतील असे त्याने सांगितले. अशांपासून दूर राहण्यास त्याने ख्रिश्‍चनांना आर्जवले. देवाच्या सत्याला केलेल्या विरोधामुळे कुटुंबांमध्ये वितुष्ट येईल असे येशूने भाकीत केले होते.—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय १०:३२-३७.

पण, देवाने आपल्याला असेच उघड्यावर सोडलेले नाही. त्याच्या वचनात, कौटुंबिक नातेसंबंधाविषयी बरेच बोध दिले आहेत. आपले कुटुंब आपण यशस्वी कसे करू शकतो, प्रत्येक कौटुंबिक सदस्याला इतरांप्रती जबाबदारी असते अशा एका घरास आपण आल्हाददायक ठिकाण कसे करू शकतो हे त्यात सांगितले आहे.a—इफिसकर ५:३३; ६:१-४.

कुटुंब इतक्या धोक्याच्या दिवसांत असतानासुद्धा अशाप्रकारचा आनंदी नातेसंबंध साध्य करता येईल का? होय, निश्‍चित्तच! या कठोर, रुक्ष जगातही तुम्ही तुमचे कुटुंब आनंदी, तजेला देणारे मरुवन बनवू शकता. परंतु, यासाठी कुटुंबातील सर्वांकडून काही अपेक्षा केल्या आहेत. पुढे काही सूचना दिल्या आहेत.

आपल्या कुटुंबाला बचाव मिळवण्यास साहाय्य करणे

एकत्र वेळ घालवणे हा, कुटुंबाचे ऐक्य टिकवून ठेवण्याचा सर्वात उत्तम मार्ग होय. सर्वांनी कुटुंबाबरोबर वेळ खर्च करण्यास तयार असले पाहिजे. त्यासाठी त्याग करावे लागतील. जसे की, तरुणांनो, तुम्हाला तुमचे आवडते टीव्ही कार्यक्रम, खेळ किंवा मित्रांबरोबर हिंडणे सोडावे लागेल. तुम्ही पित्यांनो, तुम्हीच प्रमुख पोशिंदे आहात, पण फक्‍त छंदासाठी किंवा इतर व्यक्‍तिगत गोष्टींसाठी तुमचा फावला वेळ खर्च करू नका. शनिवार-रविवारच्या जोडसुट्या किंवा सुट्या कशा घालवायच्या त्याबद्दल तुमच्या कुटुंबाबरोबर योजना करा. आणि हो, सर्वजण प्रतीक्षा करतील व आनंद लुटतील अशीच काहीतरी योजना करा.

मुलांना, आपण म्हणतो तो उच्च प्रतीचा वेळ पुरेसा नाही; म्हणजे, अधूनमधून त्यांच्याबरोबर ठरलेला अर्धा किंवा एक तास घालवणे पुरेसे नाही. त्यांना जास्त प्रमाणात वेळ हवा. स्विडीश डेलीतील एक स्तंभलेखक असे लिहितो: “मी रिपोर्टर या नात्याने १५ वर्ष काम केलेल्या अवधीत पुष्कळ बालगुन्हेगारांना भेटलो आहे . . . त्या सर्वांत एक गोष्ट सारखीच होती, त्यांना आपल्या पालकांबरोबर जास्त वेळ घालवता येत नव्हता: ‘माझ्या आईवडिलांकडे वेळ नव्हता,’ ‘ते कधीच ऐकायचे नाहीत,’ ‘बाबा नेहमीच फिरतीवर असायचे,’ . . . पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाला किती वेळ देणार हे तुम्ही ठरवू शकता. मग, १५ वर्षांनंतर तुमचे १५ वर्षीय निर्दयी मूल तुमची निवड योग्य होती की चुकीची होती ते ठरवेल.”

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन

कुटुंबातील सर्वांनी पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा सर्वसामान्य खर्च भागवण्याकरता त्यांनी पैसे खर्च करण्यास तयार असले पाहिजे. खर्च भागवण्यासाठी पुष्कळ स्त्रियांना काम करावे लागते, पण तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या धोक्यांबद्दल व प्रलोभनांबद्दल सावध असणे जरूरीचे आहे. हे जग तुम्हाला स्वतःला “संतुष्ट” करण्यास व “आपल्या मर्जीप्रमाणे” वागण्यास सांगते. यामुळे तुम्हाला स्वतंत्र व्हावेसे वाटू लागले, व माता व गृहिणी म्हणून देवाने तुम्हाला दिलेली भूमिका नकोशी वाटू लागेल.—तीत २:४, ५.

मातांनो, तुम्ही घरात राहून आपल्या मुलांना मार्गदर्शन दिले, त्यांचे मित्र बनलात तर, दृढ बंधन बांधण्यास तुमचा हातभार लागेल ज्यामुळे तुमचे कुटुंब बऱ्‍यावाईट काळांत एकजुटीने राहू शकेल. एक स्त्री विशेषत्वाने आनंदी, सुरक्षित व कार्यकारी घर बनवू शकते. १९ व्या शतकातील एका राजकर्त्याने म्हटले: “एक छावणी बनवायला शंभर पुरुष लागतात, पण एक घर बनवायला एकच स्त्री पुरेशी असते.”

कुटुंबातील सर्वांनी अंथरूण पाहून आपले पाय पसरले तर त्यामुळे कुटुंबांतील पुष्कळ समस्या टळू शकतील. साधी राहणी आणि आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देण्याबाबत पतीपत्नींमध्ये एकमत असले पाहिजे. मुलांनी, कुटुंबाला परवडणार नाहीत अशा गोष्टींचा हट्ट धरण्यापेक्षा समाधानी राहण्यास शिकले पाहिजे. डोळ्यांच्या अभिलाषेविरुद्ध सावध राहा बरं का! न परवडणाऱ्‍या गोष्टी खरेदी करण्याच्या मोहामुळे अनेक नौकारूपी कुटुंबे कर्जबाजाराच्या समुद्रात बुडून गेली आहेत. एक आल्हाददायक प्रवास, घरासाठी एखादे उपयोगी व आनंददायक साधन किंवा ख्रिस्ती मंडळीला देणगी—या सारख्या कामांसाठी सर्वांनी हातभार लावला तर हे कुटुंबाच्या एकतेसाठी चांगले ठरू शकेल.

आनंदी कौटुंबिक आत्म्यासाठी सर्व कौटुंबिक सदस्यांनी दिले पाहिजे असे आणखी एक प्रकारचे “साहाय्य” म्हणजे, घराची साफसफाई आणि मेन्टनन्सची कामं, घराची, बागेची, वाहनाची, आणि इतर गोष्टींची काळजी घेणं होय. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, मुलांनासुद्धा एखादं विशिष्ट काम नेमून दिलं जाऊ शकतं. मुलांनो, तुम्ही वेळ वाया घालवणार नाही असा प्रयत्न करा. त्याऐवजी, मदत व सहकार्य देण्याचा आत्मा विकसित करा; यामुळे खरे मित्रत्व व साहचर्य वाढेल जे कुटुंबाच्या एकतेला आणखी मजबूत करील.

बायबल शिक्षणाचे महत्त्व

एका संयुक्‍त ख्रिस्ती कुटुंबात, नियमित बायबल अभ्यासाच्या महत्त्वावर देखील जोर दिला जातो. बायबल वचनांची दररोजची चर्चा आणि पवित्र शास्त्रवचनांचा साप्ताहिक अभ्यास यामुळे संयुक्‍त कुटुंबाला आधार मिळतो. मूलभूत बायबल सत्यांचा आणि तत्त्वांचा, कुटुंबातील सर्वांवर प्रभाव पडेल अशा प्रकारे चर्चा झाली पाहिजे.

अशा कौटुंबिक चर्चा शैक्षणिक तर असल्याच पाहिजेत, पण त्याबरोबर आनंदी व उत्तेजनकारकही असावयास हव्यात. स्वीडनच्या उत्तरेकडील एका कुटुंबात अशी पद्धत होती, की मुलांना आठवड्याभरात आलेले प्रश्‍न मुलांनी लिहून ठेवावेत. मग, साप्ताहिक बायबल अभ्यासात त्यांची चर्चा केली जाई. त्यांचे प्रश्‍न खरोखरच गहन व विचार-प्रवर्तक असायचे; त्यावरून मुलांची विचार करण्याची क्षमता आणि बायबल शिकवणुकींबद्दल त्यांना असलेली गुणग्राहकता स्पष्ट दिसत होती. काही प्रश्‍न असे होते: “यहोवा सर्व गोष्टी नेहमीच वाढवतो की त्याने सर्व पहिल्यांदाच निर्माण करून ठेवले?” “देव मानव नाही तर मग बायबल असे का म्हणते, की देवाने मानवाला ‘आपल्या प्रतिरूपाचा’ बनवला?” “आदाम आणि हव्वा परादीसमध्ये राहत होते तेव्हा हिवाळ्याच्या थंडीत ते गारठून गेले नसतील का, कारण त्यांच्या पायात तर काहीच नव्हते शिवाय त्यांच्या अंगावरही वस्त्र नव्हते?” “रात्रीच्या वेळी अंधार असणे आवश्‍यक असताना आपल्याला प्रकाशासाठी चंद्राची काय आवश्‍यकता आहे?” ही मुले आता मोठी झाली आहेत व पूर्ण-वेळेचे सेवक या नात्याने देवाची सेवा करीत आहेत.

कौटुंबिक समस्या हाताळताना, पालकांनो, सकारात्मक आणि आनंदी असण्याचा प्रयत्न करा. विचारी आणि लवचीक असण्यासोबत महत्त्वपूर्ण तत्त्व अनुसरण्याच्या वेळी सुसंगत असा. देवाबद्दल आणि त्याच्या योग्य तत्त्वांबद्दलच्या प्रीतीचे तुमच्या निर्णयांवर नेहमीच नियंत्रण असते हे मुलांना दिसू द्या. शाळेतील वातावरण नेहमीच तणावपूर्ण व निराशजनक असते, म्हणून अशा प्रभावाचे प्रतिसंतुलन करण्याकरता मुलांना घरामध्ये प्रोत्साहनाची आवश्‍यकता असते.

पालकांनो, तुम्ही परिपूर्ण असल्याचे ढोंग रचू नका. आवश्‍यकतेनुसार तुमच्या मुलांसमोर चुका कबूल करा आणि क्षमा मागा. तरुणांनो, आई आणि बाबा त्यांच्या चुका कबूल करतात तेव्हा त्यांच्याबद्दल तुम्हाला असलेले प्रेम वृद्धिंगत करा.—उपदेशक ७:१६.

होय, एक संयुक्‍त कुटुंबच शांतीमय, सुरक्षित व आनंदी घर बनवते. गोईथ नामक एका जर्मन कवीने एकदा असे म्हटले होते: “राजा असो वा रंक, घरांत आनंद मिळवणाराच सर्वात आनंदी असतो.” प्रशंसनीय पालक आणि मुलांना घरासारखे दुसरे कोणतेच ठिकाण नाही.

आपण जगत असलेल्या जगातील अनेक दबावांमुळे कुटुंब आज खूपच धोक्यात आहे. परंतु, कुटुंबाचा जनक देव असल्यामुळे कुटुंबाचा बचाव जरूर होईल. आनंदी कौटुंबिक जीवनाकरता असलेल्या देवाच्या धार्मिक मार्गदर्शनांचे पालन केल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्ही देखील बचावू शकाल.

[तळटीप]

a या विषयावर अधिक माहितीकरता वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेले कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे १९२ पानी पुस्तक पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा