वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१५ पृ. १०-११
  • मनुष्यांचे दास की देवाचे सेवक?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनुष्यांचे दास की देवाचे सेवक?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मनुष्यांचे अनुसरण करण्यामधील धोके
  • ख्रिस्तीजन आणि आजचा मानवी समाज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • तुम्ही अमेरिकेतील पंथ आहात का?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • यहोवाचे साक्षीदार हा एक पंथ आहे का?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • धार्मिक स्वातंत्र्य—आशीर्वाद की शाप?
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१५ पृ. १०-११

मनुष्यांचे दास की देवाचे सेवक?

“यहोवाच्या साक्षीदारांची थोडीफार प्रशंसा करावी लागेल.” असे झेअर, ग्रुबलर, एनटुझीआस्टन (दृष्टान्त पाहणारे, मनन करणारे, उत्साही) हे जर्मन पुस्तक म्हणते. साक्षीदारांबद्दल हे पुस्तक काही प्रमाणात टीकात्मक असले, तरी ते कबूल करते: “सर्वसाधारणपणे, त्यांचे जीवन निष्कलंक, मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे आहे. ते आपल्या कामात मेहनती आणि इमानी आहेत आणि शांतीप्रिय नागरिक व प्रामाणिक कर दाते आहेत. ते अति धनसंपत्ती मिळवण्याच्या मागे लागत नाहीत. . . . अधिवेशनांमधील त्यांची शिस्त प्रशंसनीय आहे. त्यांच्यातला आत्मत्यागी आत्मा इतर कोणत्याही धार्मिक गटाबरोबरीचा आहे; त्यांच्या सेवेच्या बाबतीत तर ते सर्वांपेक्षा वरचढ ठरतात. पण, आपल्या दिवसातल्या इतर कोणत्याही ख्रिस्ती चर्च आणि गटापेक्षा ते वरचढ ठरतात याचे कारण म्हणजे, त्यांच्यातले बहुतेक जण न डळमळत्या दृढनिश्‍चयाने सर्व परिस्थितींमध्ये आणि सर्व जोखिमांव्यतिरिक्‍त आपल्या शिकवणुकींची घोषणा करतात.”a

अशी सकारात्मक प्रशंसा केली असतानाही, व्यक्‍त केलेल्या मतांमुळे यहोवाच्या साक्षीदारांना वेगळ्याच दृष्टिकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. जगभरात बहुतांश राष्ट्रांमध्ये, साक्षीदारांनी कोणत्याही अडथळ्याविना दशकानुदशके आपल्या धार्मिक सेवा उघडपणे पार पाडल्या आहेत. कोट्यवधी लोक त्यांना ओळखतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांना त्यांचा धर्म अनुसरण्याचा हक्क आहे हे मान्य करतात. तर मग, यहोवाचे साक्षीदार कोण आहेत याविषयी अनिश्‍चितता का आहे?

अलीकडील काळात इतर अनेक धार्मिक गट बाल अत्याचार, सामूहिक आत्महत्या आणि अतिरेकी हल्ले करण्यात गोवले गेले आहेत हे या अनिश्‍चिततेमागचे एक कारण असावे. अर्थात, अशी ही असामान्य वर्तणूक केवळ धार्मिक लोकांमध्येच नव्हे तर सर्वत्र दिसून येते. तथापि, धर्माच्या बाबतीत पुष्कळ लोक संशयी बनले आहेत काहीजण तर प्रतिकूल बनले आहेत.

मनुष्यांचे अनुसरण करण्यामधील धोके

“पंथ” याची व्याख्या “विशिष्ट शिकवणूक किंवा एका नेत्याचे अनुसरण करणारा गट” अशी केली गेली आहे. त्याचप्रमाणे, एखाद्या ‘संप्रदायाचे’ अनुयायी देखील “एखाद्या व्यक्‍तीप्रती, कल्पनेप्रती किंवा वस्तूप्रती श्रद्धा बाळगतात.” खरे पाहता, मानवी नेते आणि त्यांच्या कल्पनांचे अनुयायी असलेल्या कोणत्याही धार्मिक गटाच्या सदस्यांना मनुष्यांचे दास बनण्याचा धोका असतो. अशा नेतेवादी दृढ संबंधाची फलश्रुती अनुचित भावनिक आणि आध्यात्मिक परावलंबनात होऊ शकते. एखाद्या व्यक्‍तीचे बालपणापासून पंथीय वातावरणात संगोपन झाल्यास हा धोका आणखी वाढू शकतो.

एखाद्या धर्माविषयी ज्यांना अशी चिंता वाटते त्यांना खरीखुरी माहिती मिळाली पाहिजे. कदाचित काहींना सांगण्यात आले असावे की, यहोवाचे साक्षीदार, आपल्या सदस्यांना गुलामाप्रमाणे बंधनात ठेवणाऱ्‍या, त्यांच्यावर हुकूमशाही अधिकार गाजवणाऱ्‍या, त्यांच्या स्वातंत्र्यावर अनुचित बंधन घालणाऱ्‍या आणि एकंदर समाजापासून भिन्‍न करणाऱ्‍या धार्मिक संघटनेचे अनुयायी आहेत.

तथापि, या चिंता योग्य नाहीत हे यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे. म्हणून, तुम्ही स्वतः याचे परीक्षण करून पाहावे यासाठी ते तुम्हाला आमंत्रण देत आहेत. काळजीपूर्वक विचार केल्यावर तुम्ही स्वतः काय तो निष्कर्ष काढा. साक्षीदार दावा करतात त्याप्रमाणे ते देवाचे सेवक आहेत की प्रत्यक्षात मनुष्यांचे दास आहेत? त्यांच्या सामर्थ्याचा उगम कोणता आहे? अशा प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे पुढील दोन लेखात पृष्ठे १२-२३ वर दिली जातील.

[तळटीप]

a सन १९५० च्या मूळ आवृत्तीत वरील विधान नव्हते. तथापि, १९८२ च्या सुधारित आवृत्तीमध्ये हे विधान आल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांविषयीची समज सुधारत आहे असे दिसते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा