वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ७/१५ पृ. २४
  • डोंगरकड्यांवरील कलाबाज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डोंगरकड्यांवरील कलाबाज
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘उंच पर्वत पहाडी रानशेळ्यांसाठी आहेत’
  • ‘पहाडी रानशेळ्यांचा विणीचा काळ तुला ठाऊक आहे काय?’
  • ‘रमणीय हरणी आणि सुंदर पहाडी रानशेळी’
  • ‘पर्वतांपेक्षा तू प्रतापी आहेस’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ७/१५ पृ. २४

डोंगरकड्यांवरील कलाबाज

मृत समुद्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर एक प्राचीन शहर वसलेले होते आणि एनगेदी नामक जंगलमय प्रदेश होता. येथे दाखवल्या आहेत त्यांसारख्या वाग्दत्त देशातील रानशेळ्यांसाठी या प्रदेशातील खडकाळ घाट आणि डोंगरदऱ्‍या राहण्याच्या दृष्टीने अगदी उत्तम आहेत.

जमिनीवर घट्ट पकड धरणारा हा प्राणी विस्मयकारक प्राण्यांच्या निर्मितीमधील एक आहे. बायबल उघडून आपण या मोहक प्राण्याविषयी आणखीन जाणून घेऊ या.

‘उंच पर्वत पहाडी रानशेळ्यांसाठी आहेत’

असे स्तोत्रकर्त्याने गायले. (स्तोत्र १०४:१८) उंच सखल भाग पहाडी रानशेळ्यांसाठी अनुकूलच असतो! डोंगराळ प्रदेशावर मोठ्या आत्मविश्‍वासाने आणि वेगाने चढून जाण्यात त्या कमालीच्या चपळ असतात. काही प्रमाणात त्यांच्या खुरांच्या रचनेमुळे त्यांना असे करणे शक्य होते. शेळीच्या वजनामुळे तिच्या खुरांमधील भाग प्रसरण पावतो त्यामुळे या प्राण्याला अरुंद खडकाळ उतरणावर उभे राहण्यास अथवा हालचाल करण्यास सुकर होते.

पहाडी रानशेळ्या कमालीचे संतुलन बाळगू शकतात. त्या लांब अंतरापर्यंत उडी मारू शकतात आणि तेही अशा कंगोऱ्‍यावर ज्यावर त्यांना आपले चारही पाय ठेवायला जागा नसते. जीववैज्ञानिक डगलस चाडविक यांनी एकदा एका पहाडी रानशेळीचे परीक्षण केले जिने, तिला वळताही येणार नाही इतक्या निमूळत्या खडकावर अडकण्याचे टाळण्यासाठी आपल्या संतुलनाचा वेगळ्याच प्रकारे उपयोग केला होता. ते म्हणतात: “जवळजवळ १२० मीटर खाली असलेल्या पुढच्या कंगोऱ्‍याकडे पाहिल्यानंतर, या पहाडी रानशेळीने आपले पुढचे पाय जमिनीवर घट्ट रोवले, स्वतःचे डोके खडकावर टेकवले आणि मागचे पाय वर उचलून ती ज्या दिशेने त्या कंगोऱ्‍यावर आली होती त्या दिशेला गोल फिरली आणि आपले मागचे पाय पुन्हा जमिनीवर टेकवले. असे करताना ती एखाद्या फिरत्या चाकासारखी दिसत होती. मी हे सर्व श्‍वास रोखून पाहत होतो.” (नॅशनल जियोग्राफिक) म्हणून पहाडी शेळीला “डोंगरकड्यांवरील कलाबाज” म्हटले जाते यात काही आश्‍चर्याचे नाही!

‘पहाडी रानशेळ्यांचा विणीचा काळ तुला ठाऊक आहे काय?’

पहाडी शेळ्या स्वभावाने अतिशय बुजऱ्‍या असतात. त्या मनुष्यांपासून दूर राहणे पसंत करतात. हे खरे आहे, की लोकांना त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या रानटी अवस्थेत त्यांचे परीक्षण करणे कठीण आहे. म्हणूनच, ‘हजारो डोंगरावरील गुराढोरांच्या’ मालकाने यथायोग्यपणे ईयोब या मनुष्याला विचारले: ‘पहाडी रानशेळ्यांचा विणीचा काळ तुला ठाऊक आहे काय?’—स्तोत्र ५०:१०; ईयोब ३९:१.

देवाने दिलेल्या उपजत ज्ञानामुळे जन्म केव्हा द्यावा हे या रानशेळीला कळते. ती सुरक्षित जागा शोधते आणि सामान्यपणे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्यात एक किंवा दोन शेरडांना जन्म देते. नुकतेच जन्मलेली शेरडे काही दिवसांतच जमिनीवर दृढ उभे राहण्याचे शिकतात.

‘रमणीय हरणी आणि सुंदर पहाडी रानशेळी’

सुज्ञ राजा शलमोन याने पतींना आर्जवले: ‘रमणीय हरणी आणि सुंदर पहाडी रानशेळी यांप्रमाणे असणाऱ्‍या तरुणपणीच्या स्त्रीसह संतुष्ट ऐस.’ (नीतिसूत्रे ५:१८, १९) असे म्हणण्यामागील उद्देश स्त्रियांची मानहानी करणे असा नव्हता. या प्राण्याचे सौंदर्य, त्याचे लावण्य आणि इतर लोभस गुणांचा शलमोन उल्लेख करत होता, हे उघड आहे.

निर्माणकर्त्याच्या सुज्ञानाचा भरपूर पुरावा देणाऱ्‍या असंख्य “जीवधारी” प्राण्यांमध्ये या पहाडी रानशेळीचा देखील समावेश होतो. (उत्पत्ति १:२४, २५) देवाने किती मोहक प्राण्यांची निर्मिती केली आहे आणि त्यांना आपल्या सभोवताली पाहून आपल्याला आनंद होत नाही का?

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of Athens University

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा