वाचकांचे प्रश्न
एखाद्या ख्रिश्चनाला ज्यूरी कर्तव्याकरता बोलावले असल्यास त्याने काय करावे?
काही देशांत, न्यायिक व्यवस्था नागरिकांमधूनच निवडलेल्या ज्यूरींचा उपयोग करते. ज्या ठिकाणी हे अस्तित्वात आहे आणि एखाद्या ख्रिश्चनाला ज्यूरी कर्तव्य पार पाडण्याकरता हजर राहण्याचा आदेश दिला जातो तेव्हा प्रतिसाद कसा द्यावा हे त्याने ठरविले पाहिजे. अनेक ख्रिश्चनांनी एक शुद्ध विवेक बाळगून असा निष्कर्ष काढला आहे, की ज्याप्रमाणे शद्रख, मेशख व अबेद्नगो यांनी दूरा नामक मैदानावर हजर राहण्याच्या बाबेलोनी सरकारच्या हुकूमनाम्याचे पालन केले व ज्याप्रमाणे रोमी अधिकाऱ्यांच्या हुकूमनाम्यानुसार योसेफ व मरीया बेथलेहेमास गेले त्याचप्रमाणे ज्यूरी कर्तव्य पार पाडण्याकरता हजर राहण्यासही बायबल तत्त्वे मनाई करत नाहीत. (दानीएल ३:१-१२; लूक २:१-४) तथापि, प्रांजळ ख्रिश्चन कदाचित विचारात घेऊ शकतील अशा काही गोष्टी आहेत.
ज्यूरींचा उपयोग हा व्यापक स्वरूपाचा नाही. काही देशांत, दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा निवाडा एखादा व्यावसायिक न्यायाधीश अथवा न्यायाधीशांचे एखादे मंडळ करते. इतरत्र, तथाकथित देश विधी हयात असतो व ज्यूरी, न्यायालयीन पद्धतीचा भाग बनतात. तरीसुद्धा, ज्यूरींची निवड कशी केली जाते व ते काय करतात याची अनेक लोकांना केवळ एक पुसटशी कल्पना आहे. तर मग, ज्यूरी कर्तव्याला तुम्हाला तोंड द्यावे लागो अथवा न लागो, त्याची सर्वसामान्य माहिती असणे मदतदायी ठरेल.
देवाचे लोक यहोवाला सर्वोच्च न्यायाधीश असे मानतात. (यशया ३३:२२) प्राचीन इस्राएलमध्ये, प्रामाणिक व निःपक्षपाती असलेले अनुभवी पुरुष वादविवाद मिटवण्याकरता व कायदेविषयक प्रकरणे हाताळण्याकरता न्यायाधीश या नात्याने कार्य करत असत. (निर्गम १८:१३-२२; लेवीय १९:१५; अनुवाद २१:१८-२१) येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तोपर्यंत न्यायालयीन कार्यपद्धती, न्यायसभेच्या अर्थात यहुदी उच्च न्यायालयाच्या हातात होती. (मार्क १५:१; प्रेषितांची कृत्ये ५:२७-३४) एखादा सामान्य यहुदी दिवाणी ज्यूरीत असण्याची कोणतीच तरतूद नव्हती.
इतर देश, नागरिकांनी बनलेल्या ज्यूरींचा उपयोग करत. सॉक्रेटसची ५०१ ज्यूरी-सदस्यांनी चौकशी केली होती. ज्यूरीकरवी चौकशी करण्याची पद्धत, सम्राटाच्या राज्याधीन रद्द करण्यात आली होती तरी रोमी प्रजासत्ताकमध्ये ती अस्तित्वात होती. नंतर, इंग्लंडच्या तिसऱ्या हेन्री राजाने शेजाऱ्यांकरवी आरोपीची चौकशी करण्याची तरतूद केली. त्यावेळी असे वाटले होते, की आरोपीची त्यांना ओळख असल्यामुळे, ज्या कार्यपद्धतींमध्ये आरोपी प्रतिरोध करून अथवा दिव्यास उतरून आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो यांपेक्षा त्यांचा न्यायनिर्णय अधिक निःपक्ष असेल. काळाच्या ओघात, ज्यूरीपद्धतीचे परिवर्तन अशा एका व्यवस्थेत झाले जेथे नागरिकांचे मंडळ प्रकरणे ऐकून पुराव्याच्या आधारे एका निर्णयास पोहंचत असे. एक व्यावसायिक न्यायाधीश पुराव्याच्या बाबतींत त्यांना मार्गदर्शन करत असे.
ज्यूरींचा प्रकार, ज्यूरी-सदस्यांची संख्या आणि निर्णय देणे यांत विविधता आहे. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थाने येथे, १२ ते २३ सदस्यांची मिळून बनलेली एक विशेष न्यायसभा [ग्रँड ज्यूरी], फौजदारी अपराधाकरता एखाद्या व्यक्तीवर आरोप लावण्याइतका पुरेसा पुरावा आहे किंवा नाही हे निश्चित करते; दोष अथवा निर्दोषता यांवर ती निर्णय देत नाही. त्याचप्रमाणे, एखादा गुन्हा केला होता की नव्हता हे निश्चित करण्यासाठी कोरोनरच्या ज्यूरीमध्ये (मरणान्वेषक ज्यूरी), ज्यूरी-सदस्य पुरावा तोलून पाहतात.
पुष्कळसे लोक ज्यूरीचा विचार करतात तेव्हा त्यांच्या मनात दिवाणी वादविवाद किंवा फौजदारी प्रकरणाच्या चौकशीतील १२ नागरिकांचे मंडळ येते जे दोष अथवा निर्दोषता निश्चित करण्यासाठी साक्षीपुरावा ऐकतात. ही एका विशेष न्यायसभेच्या विरुद्ध एक लघू (लहान) ज्यूरी होय. न्यायालय बहुधा मतदार, परवाना प्राप्त वाहन चालक अथवा अशांच्या यादींतून निवडलेल्या व्यक्तींना ज्यूरी कर्तव्याकरता हजर राहण्यास नोटीस पाठवते. काहींना, जसे की घोर अपराधी म्हणून सिद्ध झालेला आणि मानसिकरित्या अक्षम असणाऱ्यांना आपोआपच अपात्र ठरवले जाते. स्थानीय कायद्यावर आधारित, इतर जण—जसे की डॉक्टर, पाळकवर्ग, वकील अथवा लघू उद्योगांचे मालक—यातून सूट मिळवू शकतात. (ज्यूरी कामासंबंधी काहींचे प्रबळ व्यक्तिगत, प्रामाणिक आक्षेप असल्यामुळे त्यांना यातून सूट दिली जाते.) तरीसुद्धा, पुष्कळशा प्रमाणात अधिकारी सूट रद्द करत आहेत ज्यामुळे ज्यूरी कर्तव्याकरता, कदाचित अनेक वर्षे वारंवारही हजर राहण्यास सगळे बांधील असतील.
ज्यूरी कर्तव्याकरता हजर राहणारे सगळेच ज्यूरी-सदस्य या नात्याने चौकशीमध्ये सहभागी होत नसतात. ज्यूरी कर्तव्याकरता बोलावण्यात आलेल्या लोकांच्या एका गटातून काहींची एखाद्या विशिष्ट प्रकरणाकरता संभवनीय ज्यूरी-सदस्य म्हणून नैमित्तिक निवड केली जाते. मग न्यायाधीश, दोन्ही पक्षकारांची व त्यांच्या वकिलांची ओळख पटवून देतो व प्रकरणाच्या स्वरूपाचे वर्णन करतो. तो आणि वकील, दोघेही प्रत्येक संभवनीय ज्यूरी-सदस्याचे परीक्षण करतात. प्रकरणाच्या विशिष्ट प्रकारामुळे हे काम न करण्याचे एक प्रामाणिक कारण एखाद्याजवळ असल्यास त्याबद्दल बोलण्याची हीच वेळ आहे.
प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत जितके जण खरोखर बसणार आहेत त्या संख्येपर्यंत गट लहान करण्याची गरज आहे. प्रकरणातील संभवनीय स्वहितामुळे ज्या कोणाच्या निःपक्षपातीपणासंबंधी आक्षेप घेतला जाईल त्याला न्यायाधीश बडतर्फ करील. तसेच, प्रत्येक पक्षाच्या वकिलांनाही काही ज्यूरी-सदस्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आहे. ज्यूरी मंडळातून बडतर्फ झालेले, इतर प्रकरणांच्या नैमित्तिक निवडीकरता पुन्हा ज्यूरी गटात जाऊन सामील होतात. अशा परिस्थितीत असता, काही ख्रिश्चनांनी अनौपचारिक साक्षकार्य करण्यासाठी या वेळेचा उपयोग केला आहे. एखाद्या व्यक्तीने ज्यूरी-सदस्य म्हणून खरोखरच कर्तव्य पार पाडले असले अथवा नसले तरी कित्येक दिवसांनंतर तिचे ज्यूरी कर्तव्य संपुष्टात येते.
ख्रिस्ती लोक, ‘दुसऱ्यांच्या कामांत ढवळाढवळ न करता आपापला व्यवसाय करण्यास’ झटून प्रयत्न करतात. (१ थेस्सलनीकाकर ४:११, १२; १ पेत्र ४:१५) जेव्हा एका यहुद्याने येशूला वारशासंबंधी न्याय करण्यास सांगितले तेव्हा त्याने उत्तर दिले: “गृहस्था, मला तुम्हांवर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले?” (लूक १२:१३, १४) येशू, कायदेविषयक बाबींसंबंधी अधिनिर्णय देण्यासाठी नाही तर देव राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी आला होता. (लूक ४:१८, ४३) येशूने दिलेल्या उत्तरावरून, वादविवाद मिटवण्यासंबंधी देवाच्या नियमशास्त्रात घालून दिलेली पद्धत उपयोगात आणण्यास तो गृहस्थ कदाचित प्रवृत्त झाला असावा. (अनुवाद १:१६, १७) हे मुद्दे महत्त्वपूर्ण असले तरी, ज्यूरी कर्तव्याकरता हजर राहण्याच्या आदेशाला प्रतिसाद देणे ही बाब, दुसऱ्यांच्या कामांत ढवळाढवळ करण्यापेक्षा भिन्न आहे. ती, दानीएलाच्या तीन साथीदारांच्या परिस्थितीच्या साधर्म्यात आहे. बाबेलोनी सरकारने त्यांना दूरा नामक मैदानावर हजर राहण्याची आज्ञा दिली होती आणि त्यांनी तसेच केल्यामुळे देवाच्या नियमाचे उल्लंघन झाले नाही. बायबल दाखवते त्याप्रमाणे, त्यांनी त्यानंतर जे काही केले ती एक निराळीच बाब आहे.—दानीएल ३:१६-१८.
देवाचे सेवक मोशेच्या नियमशास्त्राधीन नसल्यामुळे विविध देशांतील लौकिक न्यायालयांशी त्यांना व्यवहार करावा लागला. प्रेषित पौलाने करिंथमधील ‘पवित्र जणांना’ मंडळीमध्येच वादांचा निकाल लावण्यास आर्जविले. लौकिक न्यायालयांच्या न्यायमंडळाचा, ‘अनीतिमान पुरुष’ असा उल्लेख करताना लौकिक घडामोडी हाताळण्यासंबंधी अशांनाही एक स्थान होते हे पौलाने नाकारले नाही. (१ करिंथकर ६:१) रोमी न्यायिक परिस्थितीत त्याने स्वतःची बाजू मांडली येथवर, की कैसरापर्यंत त्याने आपले प्रकरण नेले. लौकिक न्यायालये मुळात अन्यायी असतात असे नाही.—प्रेषितांची कृत्ये २४:१०; २५:१०, ११.
लौकिक न्यायालये ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांचे’ कार्य होय. असे ‘अधिकार देवाने नेमलेले आहेत’ आणि ते कायदे बनवू शकतात व अंमलातही आणू शकतात. पौलाने लिहिले: “तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करिशील तर त्याची भीति बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करीत नाही; तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.” अधिकारी अशा कायदेशीर कार्यपद्धती पार पाडत असल्यामुळे ख्रिस्ती लोक ‘अधिकाऱ्याला आड येत’ नाहीत कारण ‘अधिकाराला आड येऊन’ त्यांना स्वतःवर दंड ओढवून घ्यायचा नाही.—रोमकर १३:१-४; तीत ३:१.
विविध दृष्टिकोन तोलत असता, कैसराच्या काही मागण्यांसंबंधी आपण अधीनता दाखवू शकतो किंवा नाही हे ख्रिश्चन पाहतील. पौलाने सल्ला दिला: “ज्याला [वरिष्ठ अधिकाऱ्यांना] जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यावयाची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरावयाचा त्याचा धाक धरा.” (रोमकर १३:७) ही माहिती द्रव्यरूपी कराबद्दल आहे. (मत्तय २२:१७-२१) जर कैसराचे असे म्हणणे असेल, की रस्ते साफ करण्याकरता अथवा कैसराच्या कार्यपद्धतींपैकी इतर कोणतेही कार्य करण्याकरता नागरिकांनी आपला वेळ द्यावा आणि परिश्रम करावे तर याबाबतीत अधीनता दाखवावी अगर नाही हे प्रत्येक ख्रिश्चनाने ठरवावे.—मत्तय ५:४१.
ज्यूरी सेवा ही, जे काही कैसराचे आहे ते कैसराला दिल्यासारखे आहे असा दृष्टिकोन काही ख्रिश्चनांनी बाळगला आहे. (लूक २०:२५) ज्यूरी कर्तव्यात, पुरावा ऐकणे व तथ्याच्या अथवा कायद्याच्या मुद्द्यांवर एक प्रामाणिक मत मांडणे हे काम अंतर्भूत आहे. उदाहरणार्थ, एका विशेष न्यायसभेत, ज्यूरी-सदस्य हे निश्चित करतात की पुरावा, एखाद्याला चौकशीकरता बोलावण्यास खरोखर हमी देतो का; दोष अथवा निर्दोषता यावर ते निर्णय घोषित करत नाहीत. एखाद्या सामान्य चौकशीबद्दल काय? एखाद्या दिवाणी प्रकरणात ज्यूरी-सदस्ये, नुकसान अथवा नुकसान भरपाईसंबंधीचा कदाचित निर्णय देतील. दंडनीय प्रकरणात पुरावा, एखाद्या दोषी न्यायनिर्णयाची हमी देतो का हे त्यांना निश्चित करायचे असते. काही वेळा, कायद्याने ठरवलेला कोणता दंडादेश लागू करावा याची ते शिफारस करतात. मग सरकार, ‘वाईट करणाऱ्यांचा सूड घेण्यास’ अथवा “वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी” आपल्या अधिकाराचा वापर करते.—१ पेत्र २:१४.
एखाद्या ख्रिश्चनाचा विवेक त्याला एखाद्या विशिष्ट ज्यूरीत सेवा करण्यास अनुमती देत असल्याचे वाटत नसल्यास काय? बायबल ज्यूरी कर्तव्याचा उल्लेख करत नसल्यामुळे, “कोणत्याही ज्यूरीत सेवा करणे माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे” असे तो म्हणू शकत नाही. प्रकरणावर आधारित, तो कदाचित असे म्हणू शकतो, की एका विशिष्ट प्रकरणासंबंधी ज्यूरीत सेवा करणे त्याच्या व्यक्तिगत विवेकाच्या विरुद्ध आहे. हे तेव्हा होऊ शकते जेव्हा एखाद्या प्रकरणात लैंगिक अनैतिकता, गर्भपात, मनुष्यवध अथवा दुसरा कोणताही मुद्दा गोवला असेल ज्यासंबंधी त्याच्या विचारसरणीला लौकिक कायद्याने नव्हे तर बायबल ज्ञानामार्फत दिशा मिळाली असेल. खरे तर, ज्या चौकशीकरता त्याची निवड करण्यात आली आहे त्यात असले मुद्दे गोवले नसल्याची शक्यता आहे.
न्यायाधीशांनी दिलेल्या दंडादेशासाठी तो देखील जबाबदार असेल किंवा नसेल यावरही एक प्रौढ ख्रिस्ती विचार करील. (पडताळा उत्पत्ति ३९:१७-२०; १ तीमथ्य ५:२२.) अपराधाबद्दल दिलेला एखादा न्यायनिर्णय चुकीचा निघाला आणि मृत्यूदंड लादण्यात आला तर ज्यूरीत असलेला ख्रिस्ती रक्तदोषी असेल काय? (निर्गम २२:२; अनुवाद २१:८; २२:८; यिर्मया २:३४; मत्तय २३:३५; प्रेषितांची कृत्ये १८:६) येशूच्या चौकशीच्या वेळी पिलाताला “ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष” राहायचे होते. यहुद्यांनी त्वरित म्हटले की: “त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलांबाळांवर असो.”—मत्तय २७:२४, २५.
सरकारी आदेशानुसार एखादा ख्रिस्ती ज्यूरी कर्तव्याकरता हजर झाला परंतु, न्यायाधीशाने आग्रह करून सुद्धा आपल्या व्यक्तिगत विवेकाखातर, एखाद्या विशिष्ट प्रकरणासंबंधी सेवा करण्याचे तो नाकारत असल्यास याच्या परिणामांना—मग तो दंड असो अथवा कारावास असो यांना तोंड देण्यास तो तयार असला पाहिजे.—१ पेत्र २:१९.
शेवटी सांगायचे तात्पर्य हे, की ज्यूरी कर्तव्याला तोंड देणाऱ्या प्रत्येक ख्रिश्चनाने बायबलविषयीची आपली समज व आपला स्वतःचा विवेक यांवर आधारित कोणत्या मार्गाचे अनुकरण करावे ते ठरवले पाहिजे. काही ख्रिस्ती, ज्यूरी कर्तव्याकरता हजर राहिले व काहींनी ज्यूरींमध्ये सेवाही केली. इतर काही जणांना, शिक्षा झाली असताही नकार दर्शवण्याची गरज भासली आहे. प्रत्येक ख्रिश्चनाने, तो काय करील याविषयी स्वतः निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्या निर्णयाची कोणीही टीका करता कामा नये.—गलतीकर ६:५.