वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ४/१ पृ. २६
  • प्रत्येक प्रसंगी राज्याचे बीज पेरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रत्येक प्रसंगी राज्याचे बीज पेरणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • “यहोवाच्या साक्षीदारांविषयीचं माझं मत तुम्ही बदललं”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • कैद्यांसोबत पत्रव्यवहार राखणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • मला तडीपार करण्यात आले होते
    सावध राहा!—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ४/१ पृ. २६

राज्य घोषकांचा वृत्तान्त

प्रत्येक प्रसंगी राज्याचे बीज पेरणे

देवाचे वचन, बायबल उद्युक्‍तपणास प्रोत्साहित करते. शलमोन राजाने म्हटले: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीहि आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.”—उपदेशक ११:६.

प्रत्येक उचित प्रसंगी, यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचा प्रचार करण्याद्वारे “बी” पेरतात. २३० पेक्षा अधिक देशांत व द्वीप गटांत ते “येशू ख्रिस्ताविषयी शिकवणे व शुभवर्तमान सांगणे” सोडत नाहीत. (प्रेषितांची कृत्ये ५:४२, पं.र.भा.) पुढील अनुभव दाखवून देतात, की यहोवाचे साक्षीदार कशाप्रकारे प्रचार कार्यात ‘आपले हात आवरत नाहीत.’

◻ केप व्हर्डच्या प्रजासत्ताकमध्ये, एक यहोवाची साक्षीदार क्षेत्र सेवा करत असता एका तुरुंगाजवळून पायी चालली होती. तुरुंगाच्या आवारात, काही कैदी एका झाडावर बसले होते. खालून जाणाऱ्‍या साक्षीदार बहिणीस पाहून कैद्यांनी मोठ्याने ओरडून काही नियतकालिके मागितली. साक्षीदार बहिणीने अनेक टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके एका दगडाला बांधून तुरुंगाच्या भिंतीपलीकडे टाकली. या प्रारंभिक आस्थेमुळे, १२ बायबल अभ्यास सुरू करण्यात आले. यांतील तीन कैद्यांनी देवाला आपले जीवन समर्पण करून पाण्याच्या बाप्तिस्म्याकरता स्वतःस सादर केले आहे. कैद्यांपैकी एक जण, एक वर्षापासून पूर्ण वेळेचा सुवार्तिक अथवा पायनियर म्हणून सेवा करत आहे. तथापि, तुरुंगामध्ये हे लोक क्षेत्र सेवेची कार्ये कशी संचालित करतात बरे? प्रथम, तुरुंगाचे विभाजन क्षेत्रांमध्ये केले जाते. मग तीन साक्षीदारांमध्ये क्षेत्र वाटले जाते व प्रत्येक कोठडीत कार्य केले जाते. जगभरातील यहोवाचे साक्षीदार ज्याप्रकारे पुनर्भेटी करून आस्थेचा मागोवा घेतात अगदी त्याच प्रमाणे हे राज्य उद्‌घोषकही करतात. मात्र, बायबल अभ्यास संचालित करण्याची वारंवारता या संबंधी एक फरक आहे. आठवड्यातून केवळ एकदा दोनदा तासाभरासाठी अभ्यास करण्याऐवजी काही कैदी दररोज अभ्यास करतात! याव्यतिरिक्‍त, साक्षीदारांना तुरुंगाच्या जनरल डायरेक्टरने तुरुंगातच मंडळीच्या सर्व सभा संचालित करण्याची परवानगीही दिली आहे.

◻ पोर्तुगालमधील एका तरुण स्त्रीला आपल्या आजीच्या मृत्यूनंतर पुष्कळशी वॉच टावर प्रकाशने वारशाने प्राप्त झाली. ती एक यहोवाची साक्षीदार नसल्यामुळे ही पुस्तके आपल्याजवळ ठेवण्यात तिला काहीच रस नव्हता. तथापि, तिला त्यांची विल्हेवाटही लावायची नव्हती. एके दिवशी एक यहोवाची साक्षीदार दारोदारची सेवा करत असता तिच्या घरी आली तेव्हा या स्त्रीने त्या ग्रंथालयाबद्दल तिला सांगितले. ग्रंथालयाच्या खऱ्‍या मोलाची तिला काही कल्पना होती का, असे साक्षीदाराने तिला विचारले. स्त्रीने उत्तर दिले: “खरे सांगायचे तर, मला त्यांचे खरे मोल माहीत नाही, पण मी ते कसे जाणू शकते?” त्या स्त्रीने बायबल अभ्यास स्वीकारला आणि लवकरच आपल्या आजीच्या ग्रंथालयाचे ती चीज करू लागली. आता ती सुद्धा एक बाप्तिस्माप्राप्त यहोवाची साक्षीदार आहे. एवढेच नाही तर, तिची मुलगी व त्यांच्या कुटुंबाची एक जवळची मैत्रीणसुद्धा बायबलचा अभ्यास करत आहेत. पुस्तकांचा हा संग्रह किती बहुमोल वारसा ठरला!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा