मूलतत्त्ववाद म्हणजे काय?
मूलतत्त्ववादाची सुरवात कोठून झाली? गेल्या शतकाच्या शेवटाला, स्वैर वेदान्ती, बायबलची उच्च समीक्षा आणि उत्क्रांती यासारखे वैज्ञानिक सिद्धान्त अंगीकारण्याकरता आपल्या विचारसरणीत बदल करीत होते. याचा परिणाम असा झाला की लोकांच्या बायबलवरील विश्वासाला तडा गेला. संयुक्त संस्थानांतील रूढिप्रिय धार्मिक नेत्यांनी विश्वासाचे मूलतत्त्व असे ज्याला ते संबोधतात ते स्थापित करून याला प्रतिक्रिया दाखवली.a विसाव्या शतकाच्या आरंभाला त्यांनी, मूलतत्त्ववाद: सत्याची साक्ष (इंग्रजी), असे शीर्षक असलेल्या खंडांची शृंखला प्रकाशित केली ज्यामध्ये या मूलतत्त्वांची चर्चा करण्यात आली आहे. या शीर्षकावरूनच “मूलतत्त्ववाद” ही संज्ञा येते.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, मूलतत्त्ववाद वेळोवेळी चर्चेचा विषय बनला होता. जसे की, १९२५ मध्ये, धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी संयुक्त संस्थानांतील टेनेसीच्या जॉन स्कूप्स नामक एका शालेय शिक्षकांना न्यायालयात नेले; हे, स्कूप्स प्रकरण म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा गुन्हा काय होता? ते उत्क्रांती शिकवत होते आणि हे राज्य सरकारच्या नियमाविरुद्ध होते. त्या दिवसांमध्ये, काहींना वाटले की मूलतत्त्ववाद जास्त काळ टिकणार नाही. १९२६ मध्ये, ख्रिश्चन शतक (इंग्रजी) नामक एका प्रोटेस्टंट नियतकालिकाने म्हटले, की मूलतत्त्ववाद, “पोकळ व कृत्रिम” आणि “कार्यप्रवर्तक साध्यता अथवा दीर्घकाळ टिकून राहण्याच्या गुणांमध्ये पूर्णपणे उणे पडतो.” तो किती चुकीचा अंदाज होता!
१९७० च्या दशकापासून मूलतत्त्ववाद बहुतेकवेळा बातम्यांमध्ये झळकतो. संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्नियाच्या फुलर थिओलॉजिकल सेमिनरीचे प्राध्यापक मायरोस्लॉव वॉल्फ म्हणतात: “मूलतत्त्ववाद केवळ टिकूनच राहिला नाही तर फोफावतही चालला आहे.” आज, “मूलतत्त्ववाद” हा शब्द केवळ प्रोटेस्टंट चळवळींनाच लागू होत नसून, कॅथलिक, इस्लाम, यहुदी व हिंदू यासारख्या इतर धर्मांतील चळवळींनाही लागू होतो.
आपल्या काळातील प्रतिक्रिया
मूलतत्त्ववाद फोफावत का चालला आहे? त्याचा अभ्यास करणाऱ्यांचे म्हणणे आहे, की निदान काही अंशी तरी, आपल्या काळातील नैतिक व धार्मिक अस्थिरतेमुळे तो फोफावत चालला आहे. आरंभीच्या वर्षांमध्ये, बहुतेक समाज पारंपारिक विश्वासांवर आधारित असलेल्या नैतिक स्थैर्याच्या वातावरणात जगत होते. आता त्या विश्वासांवर एकतर संशय घेतला जातो किंवा त्यांना नाकारले जाते. पुष्कळ विचारवंतांच्या मते, देव अस्तित्वात नाही व मनुष्य एका निःस्पृह विश्वात एकटाच आहे. बहुतेक शास्त्रज्ञ शिकवतात की मानवजात एका प्रेमळ निर्माणकर्त्याच्या कृत्यांद्वारे नव्हे तर उत्क्रांतीच्या योगायोगाने आली. सर्वत्र मोकळीक देणारी मनोवृत्ती दिसून येते. हे जग, समाजाच्या प्रत्येक स्तरांमध्ये नैतिक मूल्यांच्या उणीवेने पीडित आहे.—२ तीमथ्य ३:४, ५, १३.
मूलतत्त्ववाद्यांना जुन्या विश्वासांची ओढ लागली आहे व काही तर आपल्या समाजांना व राष्ट्रांना, त्यांच्या विचारानुसार योग्य नैतिक आणि सैद्धान्तिक आधारांकडे पुन्हा मागे आणण्यास झटतात. “योग्य” नैतिक संहितेनुसार व सैद्धान्तिक विश्वासांच्या व्यवस्थेनुसार जगण्यास इतरांना भाग पाडण्यासाठी सर्व काही पणाला लावतात. एखाद्या मूलतत्त्ववाद्याची ठामपणे खात्री झालेली असते की त्याचे बरोबर आहे व इतरांचे चूक आहे. मूलतत्त्ववाद, “पूर्वग्रही, दुराग्रही, ज्ञानप्रसारबाधक, स्वपंथाभिमानी वृत्ती सुचवणारी प्रतिकूल व तिरस्कृत संज्ञा समजली जाते,” असे मूलतत्त्ववाद (इंग्रजी) नामक आपल्या पुस्तकात प्राध्यापक जेम्स बार म्हणतात.
कोणालाही संकोचित, दुराग्रही किंवा स्वपंथाभिमानी म्हटलेले आवडणार नाही म्हणून कोण मूलतत्त्ववादी आहे व कोण नाही यावर सर्वांचेच एकमत होत नाही. परंतु, धार्मिक मूलतत्त्ववादाचे गुणवर्णन करणारे काही विशिष्ट पैलू आहेत.
मूलतत्त्ववाद्याला ओळखणे
धार्मिक मूलतत्त्ववाद, बहुधा एखाद्या संस्कृतीची मूळ परंपरा किंवा धार्मिक विश्वास असे ज्याला मानले जाते त्याला जपून ठेवण्याचा प्रयत्न व ज्याला जगाचा लौकिकीकरणाचा आत्मा असे समजले जाते त्याचा विरोध करणे होय. पण यावरून मूलतत्त्ववादी सर्वच आधुनिक गोष्टींचा विरोध करतात असे म्हणता येणार नाही. काही जण आपल्या दृष्टिकोनाला बढती देण्यासाठी आधुनिक दळणवळणाच्या माध्यमांचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करतात. पण समाजाच्या लौकिकीकरणाविरुद्ध ते लढतात.b
काही मूलतत्त्ववादी, स्वतःकरताच सिद्धान्तांची पारंपारिक मांडणी अथवा जीवनशैली केवळ जपून ठेवण्याचा निर्धार करीत नाहीत तर ती इतरांवर लादण्याचा, स्वतःच्या विश्वासांना जुळतील अशाप्रकारे सामाजिक मांडणीला बदलण्याचाही त्यांचा निर्धार असतो. यास्तव, कॅथलिक मूलतत्त्ववादी स्वतः गर्भपाताचा नकार करून तेवढ्यावर थांबणार नाही. तो कदाचित त्याच्या देशातील विधीकारांवर, गर्भपाताला कायद्याने मनाई करणाऱ्या नियमांना बढती देण्यासाठी दबाव आणू शकतो. पोलंडमध्ये ला रिपब्लिका नामक बातमीपत्रानुसार, गर्भपातविरोधी नियम मान्य करण्याकरता कॅथलिक चर्चने “एक ‘झगडा’ केला ज्यामध्ये त्याने आपल्या सर्व शक्तीचा व प्रभावाचा उपयोग केला.” असे करताना, चर्च अधिकारी मूलतत्त्ववाद्यांप्रमाणेच वागत होते. संयुक्त संस्थानांतील प्रोटेस्टंट ख्रिश्चन कोअलिशन अशाचप्रकारचे ‘झगडे’ झगडत आहेत.
मूलतत्त्ववादी विशेषकरून त्यांच्या खोलवर रुजलेल्या धार्मिक विश्वासांमुळे ओळखले जातात. अशा प्रकारे, एक प्रोटेस्टंट मूलतत्त्ववादी बायबलच्या अक्षरार्थ अनुवादाचा ठाम समर्थक असेल; पृथ्वीची निर्मिती सहा अक्षरार्थ दिवसांमध्ये करण्यात आली होती असा कदाचित तो विश्वास बाळगेल. कॅथलिक मूलतत्त्ववाद्याला पोपच्या परिपूर्णतेविषयी कोणतीच शंका नाही.
तेव्हा, “मूलतत्त्ववाद” ही संज्ञा असमंजस धर्मवेडेपणाची मानसिक प्रतिमा जागृत का करते व मूलतत्त्ववादी नसलेले मूलतत्त्वाचा प्रसार होत असल्याचे पाहून अस्वस्थ का होतात हे समजण्याजोगे आहे. मूलतत्त्ववाद्यांशी आपले एकमत होणार नाही व त्यांच्या राजकीय डावपेचांमुळे आणि कधीकधी तर त्यांच्या हिंसक कृत्यांमुळे आपण घाबरून जाऊ. खरेच, एका धर्माचे मूलतत्त्ववादी दुसऱ्या धर्माच्या मूलतत्त्ववाद्यांच्या कृत्यांमुळे गर्भगळीत होऊ शकतात! तरी, पुष्कळ विचारी लोकांना मूलतत्त्ववादाच्या प्रसाराला उत्तेजन देणाऱ्या गोष्टी, जसे की वाढणारे नैतिक शैथिल्य, विश्वासाचा अभाव व आधुनिक समाजात आध्यात्मिकतेचा नकार यांबद्दलची चिंता लागून आहे.
मग या प्रवृत्तींचे, मूलतत्त्ववाद हेच एकमात्र उत्तर आहे का? जर नाही तर पर्याय कोणता आहे?
[तळटीपा]
a १८९५ मध्ये व्याख्या केलेले मूलतत्त्ववादाचे ते पाच तथाकथित मुद्दे हे होते, “(१) सर्व शास्त्रवचने ईश्वरप्रेरित व अचूक आहेत; (२) येशू ख्रिस्ताचे देवपण; (३) ख्रिस्ताचा कुमारिकेच्या पोटी जन्म; (४) आपल्या पापांचे प्रायश्चित्त होण्यासाठी ख्रिस्ताने क्रूसावर दिलेले बलिदान; (५) ख्रिस्ताचे शारीरिक पुनरुत्थान व त्याचे पृथ्वीवरील व्यक्तिगत व शारीरिक दुसरे येणे.”—स्टुडी डी टिओलॉजिया (धर्मशास्त्राचा अभ्यास).
b “लौकिकीकरण” म्हणजे, आध्यात्मिक किंवा पवित्र गोष्टींवर नव्हे तर लौकिक गोष्टींवर जोर देणे. लौकिक गोष्टी धर्म अथवा धार्मिक विश्वासांशी संबंधित नसतात.
[५ पानांवरील चित्र]
१९२६ मध्ये एका प्रोटेस्टंट नियतकालिकाने मूलतत्त्ववादाचे वर्णन, “पोकळ व कृत्रिम” आणि “कार्यप्रवर्तक साध्यता अथवा दीर्घकाळ टिकून राहण्याच्या गुणांमध्ये पूर्णपणे उणे पडणारा, असे केले