तुरुंगवासात असलेल्यांना आध्यात्मिक स्वातंत्र्य देणे
“आम्ही तुमचीच वाट पाहत होतो.” “गेल्या काही रात्रींपासून मी तुमच्या येण्याचीच स्वप्ने पाहत होतो.” “आम्हाला नियमितरीत्या भेटी देण्यासाठी कुणाची तरी व्यवस्था केल्याबद्दल आभारी.” “अपात्र असतानाही यहोवाकडून आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल व प्रत्येक आशीर्वादाबद्दल तसेच उचित समयी आम्हाला आध्यात्मिक अन्न दिल्याबद्दल गुणग्राहकता व्यक्त करण्याची आमची इच्छा आहे.”
कोणत्या कारणास्तव हे आभार व्यक्त करण्यात आले होते? मेक्सिकोतील वेगवेगळ्या तुरुंगवासीयांचे हे काही उद्गार आहेत. यहोवाचे साक्षीदार त्यांची काळजी घेत असल्याबद्दल ते त्यांची गुणग्राहकता बाळगतात, कारण यामुळे तुरुंगात असूनही त्यांना आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळाले आहे. मेक्सिकोत ४२ तुरुंग आहेत जेथे यहोवाचे साक्षीदार सहवासींच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकरता नियमितरीत्या सेवा करतात. या ठिकाणांना सेंट्रो रिऑडॉप्ट्स्योन सोस्यॉल (सामाजिक पुनर्वसन केंद्र) असे म्हटले जाते. या तुरुंगातील काहींमध्ये तर ख्रिस्ती सभा देखील नियमितरीत्या चालवल्या जातात ज्याचे उत्तम प्रतिफळ मिळाले आहे. जसे की अलीकडील मोजणीनुसार, सुमारे ३८० लोक या ठिकाणी होणाऱ्या सभांना उपस्थित राहत होते. तेव्हा सरासरी ३५० बायबल अभ्यास चालवले जात होते. सदतीस जण प्रचारकार्य चालू करण्यास पात्र झाले होते आणि ३२ जणांनी आपले जीवन यहोवास समर्पित केल्याचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला होता.
कार्य कसे पार पाडले जाते
या क्षेत्रांमध्ये यहोवाचे साक्षीदार त्यांचे प्रचार कार्य कसे चालू ठेवतात? पहिल्यांदा ते संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन तुरुंगात प्रवेश करण्यासाठी लेखी प्राधिकारपत्राची विनंती करतात, भेट देण्याच्या त्यांच्या उद्देशाचे, म्हणजेच, कैद्यांना त्यांचे जीवन कसे सुधारता येईल व देवास स्वीकृत असलेल्या मार्गाने त्याची सेवा कशी करता येईल हे शिकवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण त्यांना देतात.
प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली. हे अधिकारी सहवासींना दिल्या जाणाऱ्या बायबल प्रशिक्षणाची गुणग्राहकता बाळगतात. यहोवाचे साक्षीदार, या ठिकाणांकरता ठरवण्यात आलेल्या संरक्षक नियमांचे पालन करत असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले आहे. भेटी देणाऱ्या या सेवकांना त्यांच्या सभा चालवण्यासाठी त्यांनी, कार्यालये, भोजनालये आणि वर्करूम्सचा उपयोग करण्याची परवानगी दिली आहे. एके ठिकाणी तर साक्षीदारांना एक लहानसे राज्य सभागृह बांधण्याचीही परवानगी देण्यात आली. त्याची माहिती, आग्नेय मेक्सिकोतील एका प्रवासी पर्यवेक्षकांनी कथन केलेल्या पुढील अनुभवावरून मिळेल.
“१९९१ च्या सुरवातीला आम्ही ओक्साका, तेव्हान्तेपेक येथील एका तुरुंगाला भेटी देऊ लागलो; तेथील लोक आध्यात्मिकतेत खूप भुकेले असल्याचे आम्हाला दिसून आले. लगेचच आम्ही २७ बायबल अभ्यास चालू केले. कैद्यांच्या आस्थेला दृष्टीपथात ठेवून मंडळीच्या पाच सभांचे आयोजन करण्यात आले. यहोवाबद्दल खूपच प्रेम प्रदर्शित करणाऱ्या एका कैद्याने तुरुंगातच एक छोटेसे राज्य सभागृह बांधण्याचे ठरवले जेणेकरून तेथे सभा घेतल्या जाऊ शकतात. त्याने तुरुंग संचालकाकडे जाऊन परवानगी मागितली व अधिकाऱ्यांनी याबाबतीत बरेच सहकार्य दिले. डिसेंबर १९९२ च्या सुरवातीला, सहा कैदी सुवार्तेचे प्रचारक या नात्याने पात्र झाले. कैद्यांची प्रगती दिसून आल्यामुळे, तुरुंगाच्या आत स्मारक विधी साजरा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्या. भाकर आणि द्राक्षारस, ही बोधचिन्हे आणण्यासाठी आम्ही तुरुंग संचालकाकडून परवानगी मागितली आणि साडेचार तासांच्या चर्चेनंतर आम्हाला परवानगी मिळाली.
“असे झाले की, एप्रिल ३, १९९३ रोजी, (स्मारक विधीच्या तीन दिवस आधी) काही कैद्यांना सुटका मिळाली. प्रचारक असलेल्या त्यातील एकाला सुटकेचे कागदपत्र मिळाले तेव्हा त्याने, स्मारक विधी साजरा होईपर्यंत तेथे राहण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून तुरुंग संचालकास विचारले. यामुळे संचालकाला किती आश्यर्य वाटले कारण ही विनंती काही सामान्य विनंती नव्हती, पण तुरुंगातच स्मारक विधीला उपस्थित राहण्याच्या कैद्याच्या इच्छेला पाहून त्याने ती विनंती मान्य केली. स्मारकाला ५३ लोक उपस्थित राहिले, कार्यक्रमाच्या शेवटी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले. या गटाला ‘स्वातंत्र्य सेरेसो’ असे संबोधण्याचे आम्ही ठरवले कारण, ते आध्यात्मिक अर्थाने बंधमुक्त आहेत.”
या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याची अतिशय स्तुती केली जाते. त्या सुधारणागृहापैकी एका ठिकाणाचे अधिकारी, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहणे ही, सहवासींच्या जलद पुनर्वसनाची “उपचारपद्धत” असल्याची उघडपणे शिफारस करतात.
यशस्वी पुनर्वसन कार्यक्रम
यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यामुळे अनेक कैद्यांचे पूर्णपणे पुनर्वसन घडले आहे. तुरुंगात असलेल्यांची सुटका झाल्यावर कैदी गुन्हेगारीच्या जीवनाकडे वळतात हे बहुधा सत्य असले तरी, देवाच्या वचनातील संदेशाचा खरोखर स्वीकार केलेले पूर्णपणे बदलले आहेत. त्यांचे रुपांतर आपल्याला प्रेषित पौलाच्या शब्दांची आठवण करून देते की, “जारकर्मी, . . . चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही; आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान् ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.
ते त्यांच्या भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उल्लेखनीय परिवर्तन दिसून येते. काम्पेचे शहरातील काम्पेचे तुरुंगात असलेला मिजेल म्हणाला: “आज मी हे आनंदाने सांगू शकतो, की मी, २ पेत्र ३:१३ आणि मत्तय ५:५ मधील आशा असलेल्या इतर मेंढरांपैकी असल्याचे समजतो.” कोबेन, काम्पेचे तुरुंगात असलेला होसाने असे विवेचन मांडले: “मी एक कैदी असून व माझा गुन्हा अतिशय गंभीर असला तरी, यहोवा खूप दयाळू आहे व तो माझ्या प्रार्थना व विनंत्या ऐकतो हे मला कळते. तो मला क्षमा करू शकतो आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यात माझे उर्वरित जीवन खर्च करण्याची संधी मला देऊ शकतो. देवाच्या राज्याच्या अभिवचनांचा आम्हाला लाभ व्हावा म्हणून आपले वडीलजन आम्हाला तुरुंगात येऊन भेट देण्यासाठी वेळ काढतात त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. केवढे सुखद आशीर्वाद! मी कैदी आहे असे म्हणू शकतो का? नाहीच, मला हवे असणारे आध्यात्मिक स्वातंत्र्य यहोवाने मला दिले आहे.”
कोणती गोष्ट खुनी, बलात्कारी, जाळपोळ करणारे, चोर आणि इतरांना योग्य-जीवन जगणारे ख्रिस्ती होण्यासाठी परिवर्तन करण्यास प्रवृत्त करते? या मनुष्यांनुसार, देवाच्या वचनातील परिवर्तन घडवणारी शक्ती व खऱ्या भक्तिमान लोकांसोबतची चांगली संगत. सिनालो येथील मझातलानच्या सुधारणागृहातील टायबरसियो नामक कैद्याचे उदाहरण, या पुनर्वसन कार्यक्रमाचे यश दाखवते. तो सिनालो, कॉन्कोरडियाच्या तुरुंगात होता, पण त्याच्या तापट स्वभावामुळे तेथे समस्या येऊ लागल्या. त्याची पत्नी यहोवाची साक्षीदार होती. तो तिला अतिशय वाईटरीतीने वागवत असे, ती तुरुंगात त्याला भेटावयास यायची तेव्हा देखील तो असाच वागायचा. परंतु, ती सहनशील होती व त्याला भेटण्यासाठी येत राहिली. म्हणून एकदा त्याने तिला तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तक आणावयास सांगितले व तो स्वतःहून त्याचा अभ्यास करू लागला.a मग, कोणीतरी तुरुंगात येऊन त्याच्यासोबत अभ्यास करावा अशी त्याने मागणी केली. तो आध्यात्मिक प्रगती करू लागला आणि इतरांबरोबरचे त्याचे नातेसंबंध सुधारत गेले. मझातलानच्या तुरुंगात त्याला हलवण्यात आले, तेथे बायबलचा अभ्यास करणारा एक गट आहे व आता तो एक प्रचारक आहे. तो म्हणतो: “मी आता, माझी पत्नी, माझी लेकरे आणि सहवासी सोबत्यांसहित या ठिकाणी बायबल सत्य ऐकू शकतो याबद्दल कृतज्ञ आहे. व नजीकच्या भवितव्यात माझी सुटका होईल व मी सर्व संमेलनांना व मंडळीच्या सभांना उपस्थित राहू शकेल अशी माझी आशा आहे.”
तसेच, कॉनरॅडोचेही उदाहरण घ्या जो आपल्या जीवनात बदल करू शकल्यामुळे अतिशय कृतज्ञ आहे. त्याच्या विवाहात इतक्या समस्या होत्या की त्याची पत्नी त्याला सोडून गेली. म्हणून तो सांत्वनासाठी अंमली पदार्थांकडे वळाला. कालांतराने तो अंमली पदार्थांचा व्यापारी बनला. त्याला अटक करण्यात आली व गांजा आणि कोकेनची जहाजातून वाहतूक केल्याबद्दल तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगात यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करणारा एक गट होता आणि त्यांच्यासोबत अभ्यास करण्यास त्याला आमंत्रित करण्यात आले. तो आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त करतो: “सभांचे सुव्यवस्थित संचालन, प्रकाशनांद्वारे तपासणीचा कार्यक्रम पाहून व सर्व काही बायबल आधारित असल्याच्या वस्तुस्थितीमुळे मी खूपच प्रभावीत झालो. लगेचच मी बायबल अभ्यासासाठी विचारणा केली आणि सभांना उपस्थित राहू लागलो.” ती १९९३ जानेवारीची गोष्ट होती. आता कॉनरॅडो तुरुंगातून सुटला आहे व ख्रिस्ती सभांमध्ये प्रगतीपथावर आहे.
इसलॉस मॉरीऑस
मेक्सिकोत, चार बेटांचे मिळून बनलेले एक भयानक तुरुंग आहे ज्याला इसलॉस मॉरीऑस असे म्हटले जाते. शिक्षा भोगावयाच्या त्या बेटांवर तुरुंगात असलेले कैदी प्रवास करू शकतात. काही तर आपल्या पत्नी व मुलाबाळांसहित तेथे राहतात.
तेथे एक लहानशी मंडळी स्थापण्यात आली आहे. मझातलानमधून तीन बांधव महिन्यातून एकदा तेथे जाऊन भेट देतात, सभा चालवण्यास मदत करतात, साहित्य पुरवतात व उत्तेजनही देतात. कधीकधी विभागीय पर्यवेक्षक त्यांना भेट देण्यासाठी जातात. तेथील सरासरी उपस्थिती २० ते २५ असते. तेथे चार बाप्तिस्मा प्राप्त व दोन बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक आहेत. विभागीय पर्यवेक्षक कळवतात, की “काही जण रविवारच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी १७ किलोमीटर [१० मैल] चालतात आणि हजेरी लावण्यासाठी त्यांना सभा सुटल्या सुटल्या घाईने निघावे लागते. परतताना, भरभर चालूनसुद्धा दोन तास लागतात.” अलीकडेच सत्य शिकलेल्या त्या तुरुंगातील एका बांधवाने म्हटले: “पूर्वी मला, लवकर सुटका कधी मिळेल असे वाटायचे, पण आता यहोवाची इच्छा जेव्हा असेल तेव्हाच मी जाईन, कारण काहीही झाले तरी, येथे आतमध्ये मला पुष्कळ काम करायचे आहे.”
यहोवास संतुष्ट करण्याचा मार्ग शोधणाऱ्या प्रांजळ जनांना स्वतंत्र करण्यासाठी सत्य आपल्या शक्तीचा वापर करीत आहे हे पाहण्यास आम्हाला आनंद होतो. तुरुंगात सत्य शिकलेल्या एक डझनापेक्षा अधिक लोकांची सुटका झाली, त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि आता देवाचे सेवक या नात्याने, काही तर मंडळीतील वडील बनून आदरणीय जीवन व्यतीत करीत आहेत. बायबलमध्ये, अंतःकरणांना बरे करण्याची व लोकांची सुधारणा करण्याची शक्ती असल्याचे नाट्यमयरीत्या प्रदर्शित झाले आहे. दुष्कर्म केल्याबद्दल तुरुंगात डांबलेली ही मनुष्ये, देववचनाच्या प्रकाशाच्या मार्गावर प्रवेश करतात तेव्हा, “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” या येशूने दिलेल्या खऱ्या स्वातंत्र्याच्या अभिवचनाचा अनुभव घेतात.—योहान ८:३२; स्तोत्र ११९:१०५.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारा प्रकाशित.
[२३ पानांवरील चित्र]
अनेकांना, तुरुंगात शिकलेल्या ख्रिस्ती सत्याचा फायदा झाला