वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 २/१५ पृ. १९-२०
  • जैवनीती व रक्‍ताविना शस्त्रक्रिया

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जैवनीती व रक्‍ताविना शस्त्रक्रिया
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विचारांची देवाणघेवाण
  • रक्‍तहीन उपचार व शस्त्रक्रिया यांची वाढती लोकप्रियता
    सावध राहा!—२०००
  • अंध असूनही मी पाहू शकत होतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • तुमच्या मुलांना रक्‍ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • तुम्हाला निवड करण्याचा हक्क आहे
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 २/१५ पृ. १९-२०

जैवनीती व रक्‍ताविना शस्त्रक्रिया

अलीकडील वर्षांनी औषधाच्या क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगती पाहिली आहे. परंतु, वैद्यकिय समस्या सोडवताना काही प्रगतींमुळे नीतिशास्त्रीय समस्या निर्माण झाल्या आहेत.

डॉक्टरांना पुढील पेच सोडवावे लागतात, जसे की: काही वेळा शक्‍तिशाली वैद्यकिय उपचार थांबवावेत का, की जेणेकरून रूग्ण शांतपणे मरू शकतो? डॉक्टरांना स्वतःचा निर्णय रूग्णाच्या भल्यासाठी आहे असे वाटत असल्यास त्यांनी रूग्णाच्या निर्णयांविरुद्ध जावे का? सर्वांसाठी महागडे उपचार उपलब्ध नसतात तेव्हा आरोग्याची काळजी समप्रमाणात कशी दिली जावी?

अशा प्रकारच्या जटील प्रश्‍नांनी, जैवनीती असे ज्याला संबोधले जाते तो वैद्यकिय विषय उजेडात आणला. जैविक संशोधन व वैद्यकिय प्रगतीची नीतीशास्त्रीय गुंतागुंत हाताळण्यास डॉक्टरांना व शास्त्रज्ञांना मदत करण्याचा या जैवनीतीचा हेतू आहे. बहुतेक कठीण निर्णय दवाखान्यातच उद्‌भवत असल्यामुळे, अनेक दवाखान्यांनी जैवनीतीशास्त्रीय समित्या स्थापित केल्या आहेत. बहुतेक वेळा, समितीचे सदस्य—ज्यामध्ये डॉक्टर आणि वकिलांचा समावेश होतो—जैवनीतीवरील चर्चासत्रांना उपस्थित राहतात जेथे औषधांतील नीतीशास्त्रीय समस्यांचे पृथक्करण केले जाते.

अशा प्रकारच्या चर्चासत्रांमध्ये अनेक वेळा असे प्रश्‍न उठवले जातात: प्रामुख्याने धार्मिक कारणांमुळे रक्‍त संक्रमणास विरोध करणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वासाचा डॉक्टरांनी कितपत आदर करावा? रक्‍त संक्रमण वैद्यकियदृष्ट्या “उचित” भासते तेव्हा एखाद्या डॉक्टरने रूग्णाच्या इच्छेविरूद्ध ते द्यावे का? रूग्णाच्या अजाणतेत असे करणे नैतिक असेल का जणू, रूग्णाला माहीत नसल्यामुळे त्याचे मन दुखावणार नाही?

अशा प्रकारचे वादविषय उचितपणे हाताळण्यासाठी डॉक्टरांना साक्षीदारांच्या दृष्टिकोनाची पूर्वग्रहरहित समज असणे जरूरीचे आहे. परस्पर समज, वाद टाळण्यास मदत करू शकते याची यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव असल्यामुळे ते डॉक्टरांना आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देण्यास तयार असतात.

विचारांची देवाणघेवाण

आपल्या वर्गाने देखील या विषयावर चर्चा करावी असे जैवनीतीचे एक प्रख्यात स्पॅनिश तज्ज्ञ, प्राध्यापक ड्यागो ग्रॉस्यॉ यांना वाटत होते. त्यांनी म्हटले: “रक्‍त संक्रमणाच्या बाबतीत तुम्हाला [यहोवाच्या साक्षीदारांना] आलेल्या समस्यांना लक्षात घेता . . . तुमच्या चिंता व्यक्‍त करण्याची संधी तुम्हाला देणे उचित आहे.”

यास्तव, जून ५, १९९६ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन प्रतिनिधींना आपल्या मताचे स्पष्टीकरण देण्यासाठी स्पेन, मॅडरिड येथील कॉम्प्लूटेन्स युनिव्हर्सिटीत आमंत्रित करण्यात आले. सुमारे ४० डॉक्टर आणि इतर पेशेवाईक लोक उपस्थित होते.

साक्षीदारांनी संक्षिप्त प्रस्तुती दिल्यानंतर, एक प्रश्‍नसत्र झाले ज्यात उपस्थितांना प्रश्‍न विचारण्यास अनुमती देण्यात आली. एका प्रौढ रूग्णाला एखादा विशिष्ट वैद्यकिय उपचार नाकारण्याचा अधिकार असला पाहिजे या गोष्टीला उपस्थित असलेल्या सर्वांनी संमती दिली. शिवाय, उपचारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याचे स्पष्टीकरण रूग्णाला दिल्यानंतर तो त्या उपचारास मान्यता देत नाही तोपर्यंत संक्रमण दिले जाऊ नये असेही त्या वर्गाला वाटले. तरीसुद्धा, साक्षीदारांच्या भूमिकेच्या काही पैलूंची त्यांना चिंता वाटते.

त्यांना ज्याची चिंती वाटत होती त्यातील एक प्रश्‍न होता पैसा. काहीवेळा, रक्‍ताविना शस्त्रक्रिया करण्यासाठी खास साधनसामग्रीची आवश्‍यकता असते, जसे की लेसर शस्त्रक्रिया तसेच, लाल रक्‍तपेशींच्या निर्मितीस उत्तेजन देण्यासाठी उपयोगात आणले जाणारे एरेथ्रोपोईटीनसारखी महागडी औषधे. एका डॉक्टराला वाटले, की कमी खर्चाचा उपचार (होमोलोगस रक्‍त) नाकारून, साक्षीदार सार्वजनिक आरोग्य सेवांकडून खास सोयींची अपेक्षा करत असावेत.

पैसा हे एक आवश्‍यक कारण आहे ज्यावर डॉक्टरांनी विचार केला पाहिजे याची जाणीव राखून एका साक्षीदार प्रतिनिधीनीने, होमोलोगस रक्‍त संक्रमणांच्या अप्रकट किंमतीचे पृथक्करण करणाऱ्‍या प्रकाशित झालेल्या अभ्यासांचा उल्लेख केला. यामध्ये, संक्रमण संबंधित गुंतागुंतीवरील उपचाराची किंमत तसेच अशा गुंतागुंतीमुळे होणाऱ्‍या मिळकतीची हानी यांचाही समावेश होतो. रक्‍ताच्या सरासरी युनिटची किंमत सुरवातीला केवळ २५० डॉलर इतकी असली तरी, खरे पाहता १,३०० डॉलरपेक्षा अधिक—मूळ किंमतीपेक्षा पाचपटीने अधिक खर्च झाला हे सूचित करणाऱ्‍या संयुक्‍त संस्थानांतील एका बहुसमावेशक अभ्यासाला त्याने उद्धृत केले. यास्तव, सर्व कारणांना विचारात घेतल्यानंतर, रक्‍ताविना शस्त्रक्रिया आर्थिकदृष्ट्या फायद्याची आहे हे त्याने निदर्शनास आणून दिले. शिवाय, रक्‍ताविना शस्त्रक्रियेचा तथाकथित जादा खर्च साधनांचा असतो ज्यांचा पुन्हा उपयोग केला जाऊ शकतो.

अनेक डॉक्टरांच्या मनात असलेला दुसरा प्रश्‍न गट दबावाशी संबंधित होता. त्यांना वाटले, की जर एखाद्या साक्षीदाराचा विश्‍वास डळमळला आणि त्याने रक्‍त संक्रमण स्वीकारले तर काय? त्याला साक्षीदार समाजातून बहिष्कृत केले जाईल का?

वास्तविक परिस्थितीवर प्रतिसाद अवलंबून असेल कारण देवाच्या नियमाचे उल्लंघन करणे खरोखरीच गंभीर बाब आहे, जिचे मंडळीच्या वडिलांना परीक्षण करावे लागेल. जीव-घेण्या शस्त्रक्रियेचा आघातजन्य अनुभव घेतलेल्या व संक्रमण स्वीकारलेल्या व्यक्‍तीला मदत करण्याची साक्षीदारांची इच्छा आहे. अशा साक्षीदाराला नक्कीच वाईट वाटेल व देवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाविषयी त्याला चिंता वाटेल यात काही शंका नाही. अशा व्यक्‍तीला मदतीची व समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. प्रीती, ख्रिस्ती विश्‍वासाचा मुख्य आधारस्तंभ असल्यामुळे, सर्व न्यायिक प्रकरणांप्रमाणे वडिलांना या बाबतीतही दृढ परंतु दयाळूपणे मदत करावीशी वाटेल.—मत्तय ९:१२, १३; योहान ७:२४.

संयुक्‍त संस्थानांतून आलेल्या जैवनीतीच्या एका प्राध्यापकांनी विचारले: “तुम्ही तुमच्या नैतिक भूमिकेचा लवकरच पुनः अंदाज करणार नाही का? अलीकडील वर्षांमध्ये इतर धर्मांनी तसे केले आहे.”

रक्‍ताच्या पवित्रतेचा आदर करण्याविषयी साक्षीदारांचा पवित्रा, वेळोवेळी बदलणारा नैतिक दृष्टिकोन नसून सैद्धांतिक विश्‍वास आहे, असे त्यांना सांगण्यात आले. बायबल मधील स्पष्ट आज्ञा कोणत्याही तडजोडीला अनुमती देत नाही. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) एखाद्या साक्षीदाराला, अशा प्रकारच्या ईश्‍वरी नियमाचे उल्लंघन, मूर्तिपूजा किंवा जारकर्माकडे दुर्लक्ष करण्याप्रमाणेच अस्वीकारणीय वाटेल.

यहोवाचे साक्षीदार, आपल्या बायबल आधारित विश्‍वासानुसार पर्यायी उपचार घेण्याचा जो निर्णय घेतात त्या निर्णयाचा स्वेच्छेने आदर करणाऱ्‍या डॉक्टरांची—मॅडरिड येथील जैवनीतीच्या चर्चासत्रात उपस्थित असलेल्या डॉक्टरांसारखे असलेल्या इतर डॉक्टरांची—अतिशय कदर करतात. जैवनीती, डॉक्टर-रूग्ण यांच्यातील नातेसंबंध सुधारण्यात व रूग्णाच्या इच्छेला अधिक आदर देण्याचे वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल यात काहीच शंका नाही.

एका नावाजलेल्या स्पॅनिश डॉक्टरांनी असे म्हटले होते, की डॉक्टरांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे व ती म्हणजे ते “अचूक नसलेली उपकरणे किंवा साधने वापरत असतात.” यास्तव, “जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथे खासकरून प्रीती व्यक्‍त केली जावी असे त्यांचे मत” असावे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा